भिकारी

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
3 Dec 2016 - 11:38 am

असे एक वेडा तिथे तो भिकारी
भुकेच्या आकांती जगाला पुकारी

तमा न तयाला उन्हा-पावसाची
दिसे भुक डोळी किती त्या दिसाची

नसे आप्त कोणी तया पामराला
जीवा साथ द्याया कुणी न घराला

थकुनी कधीचा फिरे तो अभागी
कुठे श्वान वेडे तयापाठी लागी

अधु पाय त्याचा अधु लोचनेही
नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही

करुणा जगाची कुठे आज गेली
दशा मानवाची खुलेआम झाली

दिले हाकलोनी जया अन्न मागी
अखेरी उपाशी बसे एक जागी

आगीने भुकेच्या जणु अर्धमेला
म्हणे तुच देवा पाहा लेकराला

किती लोक आले किती लोक गेले
तया पाहताही किती थेट गेले

कुणी एक आला दिली त्यास नाणी
दुवा देई त्याला अधु त्या हातानी

असे वंचिताचे कि ते संचिताचे
जिणे हे नशीबी जणु शापिताचे

दशा त्या जीवाची अशी का हो झाली?
कुणी दूर नाती अशी लोटलेली?

- शार्दुल हातोळकर

कविता माझीकरुणकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Dec 2016 - 2:51 pm | प्रचेतस

अतिशय लयबद्ध आणि विदारक.

चांदणे संदीप's picture

3 Dec 2016 - 3:12 pm | चांदणे संदीप

बुचकळ्यात टाकणारी रचना पण!

कुठे असा भिकारी पाहून हे लिहावसं वाटलं तुम्हांला??

Sandy

शार्दुल_हातोळकर's picture

3 Dec 2016 - 6:32 pm | शार्दुल_हातोळकर

शालेय वयात दोन-तीन भिकारी अतिशय दयनिय अवस्थेत नेहमी पाहण्यात यायचे. उनाड पोरे आणि मोकाट कुत्रे त्यांना त्रास द्यायचे. मोठी माणसेही भिकाऱ्यांच्या स्थितीचा विचार न करता त्यांना हाकलुन देण्यातच धन्यता मानायची.

ते पाहुन वाटायचे कि यांना कोणी नातेवाईक का नसतील? यांच्या घरच्यांनी यांना का सोडले असेल? ते विदारक चित्र मनात घर करुन राहिले आहे.

त्यांचे वर्णन प्रातिनिधिक स्वरुपात इथे कवितेतुन मांडले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2016 - 7:06 am | अत्रुप्त आत्मा

बरोबर. चित्रदर्शी वर्णन व काव्य .

चित्रदर्शी कविता आवडली
पैजारबुवा,

बाजीप्रभू's picture

3 Dec 2016 - 3:55 pm | बाजीप्रभू

माझा "PF" संपल्यानंतर काय होईल याचा थोडक्यात अंदाज आला.

कवि मानव's picture

3 Dec 2016 - 5:20 pm | कवि मानव

एका दुर्दैवी / कटू सत्याचा छान वर्णन आहे... सादी न असरदार कविता !!

यशोधरा's picture

3 Dec 2016 - 5:23 pm | यशोधरा

कविता आवडली.

शार्दुल_हातोळकर's picture

3 Dec 2016 - 6:36 pm | शार्दुल_हातोळकर

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी !!

गौरी कुलकर्णी २३'s picture

3 Dec 2016 - 6:48 pm | गौरी कुलकर्णी २३
गौरी कुलकर्णी २३'s picture

3 Dec 2016 - 6:49 pm | गौरी कुलकर्णी २३

मनाचा ठाव घेतला कवितेने. डोळ्यासमोर भिकारी उभा राहिला !

कविता अत्यंत भावस्पर्शी आहे. आजकाल मात्र धंदेवाईक भिकारी पाहून त्यांच्याबद्दल अजिबात आस्था वाटेनाशी झालीये.

गौरी कुलकर्णी २३'s picture

3 Dec 2016 - 6:58 pm | गौरी कुलकर्णी २३

खरं आहे...

गौरी कुलकर्णी २३'s picture

3 Dec 2016 - 6:57 pm | गौरी कुलकर्णी २३

संवेदनशील मनाचा माणूस अन् बुद्धीधीनिष्ठ असे उपेक्षितांचे, दुर्लक्षितांचे आयुष्य समजून घेऊ शकते.त्यांच्या व्यथा शब्दबद्ध करु शकते !

गौरी कुलकर्णी २३'s picture

3 Dec 2016 - 7:00 pm | गौरी कुलकर्णी २३

बुद्धीनिष्ठ*

ज्योति अळवणी's picture

3 Dec 2016 - 11:34 pm | ज्योति अळवणी

मनाला स्पर्शून गेली कविता

रातराणी's picture

5 Dec 2016 - 4:55 pm | रातराणी

चित्रदर्शी कविता.

पैसा's picture

6 Dec 2016 - 10:19 am | पैसा

खूप उत्कट, लयबद्ध रचना.

वेल्लाभट's picture

6 Dec 2016 - 10:24 am | वेल्लाभट

अतिशय टोचून जाणारी कविता. सुरेख लय असणारी.

शेवटची ओळ वाचून का कोण जाणे, संगीत दाते (अरुण दाते यांचा पुत्र) ची काही दिवसांपूर्वी बघितलेली बातमी वाचली. फार वाईट वाटलं होतं, अर्थात पडद्यामागचं आपल्याला कळत नाही, पण पडद्यावरचं चित्र मात्र विषण्ण करून जातं.

किसन शिंदे's picture

6 Dec 2016 - 10:30 am | किसन शिंदे

कविता आवडली.

शार्दुल_हातोळकर's picture

6 Dec 2016 - 9:48 pm | शार्दुल_हातोळकर

प्रचेतस, संदीपभाऊ, आत्मबंध, पैजारबुवा, बाजीप्रभू, कमा, यशोताई, गौरी, एस, ज्योति अलवनि, रातराणी, पैसा, वेल्लाभट, किसनदा, आपणा सर्वांचे मनापासुन आभार ! __/\__

एक एकटा एकटाच's picture

14 Dec 2016 - 8:54 pm | एक एकटा एकटाच

चांगली लिहिलीय

देशप्रेमी's picture

1 Jan 2017 - 8:59 pm | देशप्रेमी

सुरेख वर्णन. अगदी डोळ्यासमोर भिकारी उभा राहतो.

शार्दुल_हातोळकर's picture

3 Jan 2017 - 9:33 pm | शार्दुल_हातोळकर

एक एकटा एकटाच आणि देशप्रेमी आपणा दोघांचेही मनापासुन आभार ! _/\_