दि. २७ नोव्हेम्बर १८७४
कवीवर्य भा. रा. तांबेंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून ........
जन पळभर म्हणतील 'बाय बाय' !
मी जाता मैफिल ती सजेल काय?
बार उघडतील, चषक भरतील,
बेवडे अपुला क्रम आचरतील,
पेग वर पेग स्वये रिचवतील,
काही फरक का पडेल काय?
जन पळभर म्हणतील 'बाय बाय' !
पेग वर्षतील, चखणा देतील,
मद्याचे या पाट वाहतील,
कुणा काळजी की न उंचवतील,
पुन्हा या मैफिलीत हेच चषक ?
जन पळभर म्हणतील 'बाय बाय' !
मित्र मंडळी एकत्र जमतील,
चखणा, वारूणी गोळा करतील,
हसुनि खिदळुनि चिअर्स करतील,
मी जाता त्यांचे काय जाय ?
जन पळभर म्हणतील 'बाय बाय' !
अशा मंडळी बाय करावे !
नवीन मैफिल, मित्र जमवावे,
मद्य चषका का विन्मुख व्हावे ?
पुन्हा एकदा धुंद का न व्हावे?
जन पळभर म्हणतील 'बाय बाय' !
मी जाता मैफिल ती सजेल काय?
प्रतिक्रिया
27 Nov 2016 - 9:12 pm | पुंबा
वा वा! मस्त जमलीये.. चिअर्स
27 Nov 2016 - 11:45 pm | कवि मानव
:)))
28 Nov 2016 - 11:28 am | वेल्लाभट
ओके