मिसळपाव दिवाळी अंक २०१६ - मुखपृष्ठ

अभ्या..'s picture
अभ्या.. in लेखमाला
28 Oct 2016 - 11:57 pm

प्रतिक्रिया

वटवट's picture

1 Nov 2016 - 2:38 pm | वटवट

झक्कास जमलंय... व्वा...
ओपनिंग तर भारीये आता निवांत अंक वाचतो..

पण या वेळी सगळ्याच मिपा अंकाच्या जाहिराती जबरदस्त होत्या . ग्रेट अभ्या ..

किसन शिंदे's picture

4 Nov 2016 - 5:32 pm | किसन शिंदे

सगळ्याच मिपा अंकाच्या जाहिराती

तुम्हाला 'मिपा अंकाच्या सगळ्याच जाहिराती' असं म्हणायचंय का? :)

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2016 - 2:07 pm | सानिकास्वप्निल

मुखपृष्ठ आवडले.
सुंदर, कल्पक आहे.

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2016 - 8:20 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळी अंकाचा विषय रहस्यकथा हा होता हे मला माहित नव्हतं. कारण गेले अनेक दिवस मिपावर येणे झालेच नाही. शिवाय व्यवसाय व्यस्ततेमुळे तर पूर्ण दुर्लक्षच झाले. क्षमस्व. पण त्यामुळे घोळ असा झाला की जाधवगड लेख आणि समोसा पाककृती रहस्य कथांमध्ये येऊन बसली. अर्थात तो स्मोक स्क्रिन सुद्धा असू शकतो, म्हणजे तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी. ही: ही: ही: ही:

मुखपृष्ठ कल्पक आणि विषयाला अत्यंत अनुरूप आहे. अभिनंदन.

किसन शिंदे's picture

4 Nov 2016 - 5:39 pm | किसन शिंदे

नेहमीप्रमाणे अभ्याने बनवलेले मुखपृष्ठ अतिशय कल्पक आहे. कुठल्याही कामासाठी बॅनर वा चित्र बनवताना अभ्या जी कल्पकता वापरतो त्याला तोड नसते. दिवाळीपूर्वी मिपाच्या मुख्य पानावर आलेल्या जाहिराती या रहस्यकथा अंकाची उत्सूकता वाढवणार्‍या होत्या हे अगदी नक्की.

मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले.
आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.

बाकी याच्याशी अगदी सहमत. उगाच गंमत निघून गेली असती त्या चित्रातली असे वाटते.

पिलीयन रायडर's picture

4 Nov 2016 - 7:54 pm | पिलीयन रायडर

मुखपृष्ठ आवडले.

पण जे टिझर्स बनवले होते ते त्याहुन जास्त आवडले होते. एक से बढकर एक होते. इथेच कायम रहावेत म्हणुन लिंक्स देऊन ठेवतेय. जमल्यास धाग्यातच अ‍ॅड करा!

1

2

हे माझे सर्वात फेवरेट. चेपुवर शेअर केले होते तेव्हा सर्वात जास्त लाईक्स मिळालेले..

3

सिरुसेरि's picture

6 Nov 2016 - 10:45 pm | सिरुसेरि

जॉनी's picture

12 Nov 2016 - 5:35 pm | जॉनी

एकच नंबर

जुइ's picture

14 Nov 2016 - 1:05 am | जुइ

अभ्या भाऊ दिवाळीच्या रहस्यकथा विशेषांकाचे मुखपृष्ठ एकदम समर्पक आहे. आता लेख वाचायला सुरुवात केली आहे.

चित्रगुप्त's picture

14 Nov 2016 - 1:52 am | चित्रगुप्त

डिझाईन म्हणून मुखपृष्ठ आवडलेच, परंतु मराठी मिपाच्या दिवाळी अंकावर लंडनचा संदर्भ असलेले चित्र, नकाशा इ. ऐवजी भारतीय.. खरेतर मराठी संदर्भ असलेले काहीतरी जास्त समर्पक वाटले असते. उदाहरणार्थ अर्नाळकरांच्या कादंबर्‍यातील पात्रे, मोडी लिपीतील जुन्या हस्तलिखिताचा तुकडा/नकाशा, त्या काळातील भारतीय शहरातले रात्रीचे दृश्य वगैरे सारखे काही.

चित्रगुप्त's picture

14 Nov 2016 - 1:52 am | चित्रगुप्त

डिझाईन म्हणून मुखपृष्ठ आवडलेच, परंतु मराठी मिपाच्या दिवाळी अंकावर लंडनचा संदर्भ असलेले चित्र, नकाशा इ. ऐवजी भारतीय.. खरेतर मराठी संदर्भ असलेले काहीतरी जास्त समर्पक वाटले असते. उदाहरणार्थ अर्नाळकरांच्या कादंबर्‍यातील पात्रे, मोडी लिपीतील जुन्या हस्तलिखिताचा तुकडा/नकाशा, त्या काळातील भारतीय शहरातले रात्रीचे दृश्य वगैरे सारखे काही.