क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे....
-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच
हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखवून जाण्यासाठी..
या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भितीही वाटली.
प्रिय मित्रा,
मला सांग रे
तात्कालिकची मर्यादा किती?
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?
सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!
प्रतिक्रिया
28 Sep 2008 - 11:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रिय मित्रा,
मला सांग रे
तात्कालिकची मर्यादा किती?
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?
सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!
जब्रा !!!
28 Sep 2008 - 11:14 pm | रेवती
कविता भन्नाट आहे.
वाचायला सुरूवात केली पण झपाट्यात वाचून संपली असे वाटले.
रेवती
28 Sep 2008 - 11:18 pm | प्राजु
खरंच छान आहे.
एकदम भारी!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Sep 2008 - 11:22 pm | मुक्तसुनीत
नाजूक नात्याचे रेशीमधागे उलगडवून दाखवणारी कविता. समजूतदार आणि तरीही लखलखीत.
28 Sep 2008 - 11:27 pm | मृदुला
उत्तम कविता.
आणि मग? बोलून झाल्यावर काय पुढे? घोळच की. त्यापेक्षा न बोललेलं बरं. :-)
29 Sep 2008 - 10:50 pm | सुवर्णमयी
कविता आवडली.
बाकी मृदुलाशी सहमतः)
28 Sep 2008 - 11:59 pm | शितल
मनाची घालमेल शब्दात सुंदररीत्या व्यक्त केली आहे.
कविता आवडली. :)
29 Sep 2008 - 12:01 am | नीधप
सगळ्यांचे आभार!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
29 Sep 2008 - 1:24 am | विसोबा खेचर
सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!
क्या बात है..!
बाकी, एकदा समोरासमोर बोलून टाकलेलं बरंच असतं! :)
असो, एक वेगळी कविता...
तात्या.
29 Sep 2008 - 11:07 pm | यशोधरा
आता तरी नियमित लिहायचे मनावर घे..काय?
30 Sep 2008 - 5:45 pm | सहज
कृपया आपल्या कवितेचे समिक्षण करावे ज्यामुळे कळण्यास सोपे जाईल.
तात्कालीक मर्यादा, दुहेरी गोफ काही समजले नाही :-(
30 Sep 2008 - 6:01 pm | नीधप
स्वतःच समीक्षा करणे योग्य नाही.
आणि माझ्या कविता समजतात असा दावा वा समजाव्यात असा हट्टही नाही :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
30 Sep 2008 - 6:05 pm | सहज
दुसरीकडे विचारले तर तुम्हाला राग आला. तुम्ही म्हणालात की दुसरीकडे कशाला विचारणा? म्हणुन इथे विचारले तर उत्तर नाही.
असो तुम्ही आता आम्हाला लायसेन्स दिले आहे :-)
लेट द गेम्स बिगीन :-)
30 Sep 2008 - 6:11 pm | नीधप
बिगीन तर बिगीन!! मेरा क्या..
मात्र उत्तर दिले आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
30 Sep 2008 - 6:18 pm | स्वाती राजेश
छान लिहिली आहे.
30 Sep 2008 - 7:01 pm | सखाराम_गटणे™
सहमत
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.