प्रेम म्हणजे काय

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
23 Oct 2016 - 2:30 am

प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प्रेम म्हणजे काय??
साखरेचा गोडवा की दुधावरली साय??

प्रेमाला ना कसले बंधन म्हणता तुम्ही कसे..
जाती गोती विणूनी माणूस कुंडलीच अभ्यासे..
कुंडलीतले शनी नि मंगळ पैदा करती दोष..
३६ गुण जुळता तुम्हा मिळतो तो संतोष..
गोंधळात या विसरून जाता मुलांचा तो अभिप्राय..
प्रेम प्रेम करता तुम्ही अहो प्रेम म्हणजे काय??
साखरेचा गोडवा की दुधावरली साय??

प्रेम असते सुंदर निर्मळ म्हणता तुम्ही कसे..
आकर्षणाच्या व्यसनामध्ये शिक्षण मुलांचे फसे..
घरातली ती लक्ष्मी फक्त सांभाळे चुल नि मुल..
नवरा घरचा कर्ता धर्ता बनवी विचित्र रुल..
संसारात प्रेमाची त्या बनते गरीब गाय..
प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प्रेम म्हणजे नक्की काय??
साखरेतला मधुर गोडवा की दुधावरली चिकट साय??

कविता

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

23 Oct 2016 - 4:43 am | चित्रगुप्त

प्रेम म्हणजे साय-साखर आटवून केलेली बासुंदी
.

चित्रगुप्त's picture

23 Oct 2016 - 4:50 am | चित्रगुप्त

प्रेमविवाह म्हणजे 'स्पेशलयुक्त बासुंदीचा चहा'
.

चित्रगुप्त's picture

23 Oct 2016 - 4:55 am | चित्रगुप्त

सासू म्हणजे चहात पडलेली माशी
.

विवेकपटाईत's picture

23 Oct 2016 - 7:39 am | विवेकपटाईत

प्रेम म्हणजे दारू, स्वाद असतो कडू, पण आयुष्य भर माणूस झिंगत राहतो.