भारतीय सैनिक

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 11:20 pm

भारतीय सैनिक

राष्ट्र रक्षितो वीर होवूनी बलाढ्य खमका परवत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत...

शूरवीर तो धर्मवीर तो कर्तव्यदक्ष पुत्र..
भूमीरक्ष तो शत्रूभक्ष तो हिंदूस्वराज्य मित्र..
स्वाभिमानी तो प्राणदानी तो देशप्रेमी तो राणा..
तप्तसूर्य तो प्रांतधैर्य तो हिंदोस्तानी बाणा..
युद्ध खेळतो श्वास वेचूनी मनी स्थापितो भारत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत...

जीव हरवतो गर्व मिरवतो देशभक्त तो हिंदू..
नभी गरजतो फक्त समजतो शिवस्वराज्य शिवसिंधू..
विश्व विसरतो जगी पसरतो स्वतंत्र हिंदवी जीत..
रयत सुखवितो भाग्य पिकवितो स्मरितो राष्ट्रगीत..
ग्रिष्म शिशिर वर्षा तो भोगतो भगवे रक्त सांडत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत....

धोरण

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

21 Oct 2016 - 11:40 pm | चांदणे संदीप

आजच माझ्याकडूनही सैनीकावर दोन शब्द लिहिणे झाले! :)

तुमच्या कवितेविषयी : विषय असा आहे की यात तांत्रिक चुका कुणाला काढणे आवडणार नाही व कुणाला त्या ऐकायला/वाचायला आवडणार नाही कदाचित! त्यामुळे एक कवि म्हणून तांत्रिक बाजू भक्कम किंवा काही चुका काढता येण्यासारखी असणार नाही हे पाहणे आपले कर्तव्य आहे. भगवे, हिंदू असा शब्दप्रयोग भारतीय सैनिकासाठी योग्य वाटत नाही. काय म्हणता?? कवितेची भावना सच्ची असली तरी कविता शब्दबंबाळ झाली आहे.

तुमच्या मिपावावराविषयी: आजच चार - पाच कविता/लेखन तुम्ही मिपावर प्रकाशित केले आहे बहुतेक!
त्याबद्दल एक सांगणे. मालक, आधी तुमचा नीट परिचय इथल्या नियमित वाचक/लेखक मंडळींना होऊद्या. तुमचे विषय काय आहेत, तुमची मतं काय आहेत, तुमचा अभ्यास कशात आहे, कशाप्रकारचं लिहिण्यात तुमचा हातखंडा आहे वगैरे गोष्टी इथे सावकाशपणे सगळ्यांना कळू द्या. तरच तुमचा वाचकवर्ग तयार होईल. अन्यथा अशा लेख/कवितेच्या भडिमाराने लोकांचे दुर्लक्ष होण्याचीच शक्यता जास्त आहे.

पुलेशु!

Sandy

संदीप डांगे's picture

21 Oct 2016 - 11:58 pm | संदीप डांगे

असेच म्हणतो!

सोहम कामत's picture

22 Oct 2016 - 9:57 am | सोहम कामत

हो... सल्ल्याबद्दल धन्यवाद..

चित्रगुप्त's picture

21 Oct 2016 - 11:41 pm | चित्रगुप्त

नयन दाटूनि अश्रू वाहति 'भगवे' रक्त वाचुनी.
नवकवींचे स्वागत. आणि देशभक्तिपर कवितेबद्दल कडक सॅल्यूट.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Oct 2016 - 3:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

अजिबात नाही आवडली, कवितेतले काही कळत नाही पण सैनिकांना शेंदूर फासण्याची वैचारिक गरिबी अजिबात आवडलेली नाही.