पहिलं पाऊल

विनायकपाटील८९'s picture
विनायकपाटील८९ in जे न देखे रवी...
20 Oct 2016 - 6:01 am

क्षणात क्षण विरत गेला
काळ ही पुढे चालत गेला
अबाल राहिलो आजही तसेच
कर्तव्य ना दिसले कुठेच

उद्या करीन म्हणता म्हणता
उद्या कधी आलाच नाही
दाभोळकर, कुलबूर्गी गेले
तरी आम्हाला जाण नाही

हो, मस्त चाललंय आमचं
पण पोट मात्र भरत नाही
शोधून शोधून थकलो, पण
समाधान कुठे मिळत नाही

इराक, सिरीया साक्ष आहे
भविष्य फार स्पष्ट आहे
सावरा लवकर स्वतःला
ऐका तळमळीच्या साद ला

कुठून येतात कन्हैया, उमर
पुरे आता यांचा कहर
का नाही पुरस्कारांचा मान
हेच का सामाजिक भान

बदललं पाहिजे वाटतं
बलिदान, निस्वार्थ जाचतं
शक्य आहे तुम्हा आम्हालाच
फक्त पहिलं पाऊल लागतं.....

समाज

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

20 Oct 2016 - 6:37 am | चित्रगुप्त

अबाल राहिलो आजही तसेच...
म्हणजे काय ? 'बाल' म्हणजे 'बालपण' मधला की 'बाल की खाल' मधला ?

विनायकपाटील८९'s picture

20 Oct 2016 - 9:28 pm | विनायकपाटील८९

शिवाय तुम्ही सांगितलेले दोन्ही बाल वापरले तरी कवितेत बसतात ...काव्याची हीच कला असते ..जो तो आपल्या दृष्टी सृष्टी आणि विचारानुरूप घेतो आणि समजतो...धन्यवाद चूक लक्षात आणून देण्यासाठी...

विनायकपाटील८९'s picture

20 Oct 2016 - 9:23 pm | विनायकपाटील८९

धन्यवाद चित्रगुप्त साहेब ....कृपया अबोल वाचावे ...छापील चूक भूल माफ असावी..