सोपं नसतं मायबाप होणं.........!!!!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
14 Oct 2016 - 2:08 pm

सोपं नसतं मायबाप होणं .......!!!!!

इवल्याशा जीवाला घास भरवताना 

अडखळणाऱ्या पायांना आधार देताना 

बोबड्या बोलांमध्ये स्वतःला शोधणं, 

सोपं नसतं, हातांच्या कुशीत लेकरांना सांभाळत 

रात्र रात्र जागणं ,

सोपं नसतं मायबाप होणं !!

काडी काडी वेचून आपलं घरटं बांधणं,  

उन्हं अंगावर झेलून लेकरांना सावली देणं, 

कधी जमीन बनून तर कधी आभाळ बनून 

घरट्यातला प्रेमाचा ओलावा कायम ठेवणं 

सोपं नसतं, भिजत असताना लेकरांचे 'इंद्रधनू' पाहणं, 

सोपं नसतं मायबाप होणं !!!!!

पंख फुटलेले पिल्लू उडू लागते, 

घरटे सोडून दूर जाऊ लागते,

सोसाट्याचा वारा असो कि उधाणलेला समुद्र 

पिलांचा दीपस्तंभ बनून त्यांना दिशा दाखवत राहणं 

दूर जाणाऱ्या पिलांना पाहत, 'स्वतःचा' आधार होणं 

सोपं नसतं,मागेल त्याला मागेल ते देत जाणं, 

सोपं नसतं मायबाप होणं !

सोपं नसतं मायबाप होणं !!!

--------फिझा

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

14 Oct 2016 - 2:34 pm | पद्मावति

सुरेख!

कवि मानव's picture

14 Oct 2016 - 2:57 pm | कवि मानव

मस्त !!

चार ओळी सुचल्या,

पुंडलिका कधी न गेला पंढरी,
स्वयें अवतरला पांडुरंग तयाच्या घरी,
तयासी आवडे मात-पित्याची सेवा दर्शनी परी,
कारणे उभा विठ्ठल उगे अठ्ठावीस विठेवरी !!

चांदणे संदीप's picture

14 Oct 2016 - 3:01 pm | चांदणे संदीप

संदर्भ लागेना! :/

सोपं नसत मूल (इथे पुंडलिक) असं म्हणायच का तुम्हाला कमा??

कवि मानव's picture

14 Oct 2016 - 3:12 pm | कवि मानव

नाही खरं तर...आई वडिलांचे कष्ट जाणून त्यांना दिलेली हि छोटीशी भेट आहे

पुंडलिकाच्या आधार घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न... "मात-पित्याची सेवा दर्शनी परी"

चांदणे संदीप's picture

14 Oct 2016 - 2:59 pm | चांदणे संदीप

आवडलीच!

Sandy

सस्नेह's picture

14 Oct 2016 - 3:26 pm | सस्नेह

सुरेख कविता.

नाखु's picture

14 Oct 2016 - 3:29 pm | नाखु

बालक-पालक नाखु

सतोश ताइतवाले's picture

17 Oct 2016 - 9:54 am | सतोश ताइतवाले

आई वडील शिवाय दुसरे कोणतेच दैवत नाही
वाचून आनंद जल
खूप छान कविता

पाटीलभाऊ's picture

17 Oct 2016 - 7:37 pm | पाटीलभाऊ

सुंदर कविता...!