मैत्रिणीचा ..... प्रतिसाद ("मैत्रीण " ला ).....

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 3:03 pm

मित्र मैत्रिणींनो , धन्यवाद !!!! 'मैत्रीण 'हि कविता तुम्हाला आवडली. माझ्या ज्या मैत्रिणीसाठी हि कविता उमटली, त्या मैत्रिणीने त्या कवितेला दिलेला प्रतिसाद इथे पोस्ट करत आहे .... ...... ...... ......

तुझी साधी आठवण काढली तरी तुला हाक जाते
तुझ्या मनाच्या कोपऱ्यात माझीच हाक ऐकू येते
मग तुझ्या देशातला वारा माझ्या देशी धावत येतो
प्राजक्ताचं झाड नसूनही प्राजक्ताचा वास येतो
मग मीही त्या वार्यासोबत शेवरीचं फूल पाठवते
अन शेवरीच्या कानात माझी खुशाली कळवते
आपला असा संवाद घडतोय हे कुणालाच कळत नाही
कित्ती बरंय नै?

माझ्या आयुष्यातले थोडे उन्हाळे तू वेचतेस
तुझ्या जवळच्या पावसातले दोन थेंब मला देतेस
त्याच दोन थेंबात चिंब भिजून जाते मी
माझ्या जगण्यातला उन्हाळाच विसरून जाते मी
या उन पावसाच्या देवाणघेवाणीत
आपल्या मैत्रीचं इन्द्रधनु क्षितिजावर उमटतं
पण लोकांना ती निसर्गाचीच किमया वाटते
कित्ती बरंय नै?

या अवघ्या जगाच्या कोलाहलात
एकमेकींच्या लयीत चालताना
एकमेकींच्या सूरात सूर मिसळताना
एकाच पट्टीत दोघींनी शोधलेलं एकच द्वंद्व गाताना
कुठला आवाज तुझा आणि कुठला माझा
हे आपलं आपल्यालाच ओळखू येत नाही
कित्ती बरंय नै?

..............माझी मैत्रीण

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

12 Oct 2016 - 3:09 pm | पद्मावति

वाह!! सुरेख.

फिझा's picture

12 Oct 2016 - 3:19 pm | फिझा

खूप सुंदर .......

अशी हवी मैत्रीण आणि असा हवा प्रतिसाद ........

ज्यांनी " मैत्रीण" कविता वाचली नसेल त्यांच्यासाठी .लिंक .........

सानझरी's picture

12 Oct 2016 - 3:34 pm | सानझरी

सुंदर कविता..

कुठला आवाज तुझा आणि कुठला माझा
हे आपलं आपल्यालाच ओळखू येत नाही
कित्ती बरंय नै?

वाह!!!!

कवि मानव's picture

12 Oct 2016 - 3:41 pm | कवि मानव

शेवटचा कडवं खूपच सुंदर आहे.... वाह वाह !!

वा! सुंदर कवितेला तितकेच सुंदर उत्तर.

अत्यंत भावस्पर्शी आणि तरल.

जुईचे फूल's picture

12 Oct 2016 - 4:10 pm | जुईचे फूल

दोनहि कविता अप्रतिम! तुमच्या मैत्रिला दृष्ट न लागो कुणाची...

रातराणी's picture

12 Oct 2016 - 11:42 pm | रातराणी

सुरेख!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Oct 2016 - 9:14 am | मिसळलेला काव्यप्रेमी

दारुण शोंदर..

यशोधरा's picture

13 Oct 2016 - 9:16 am | यशोधरा

हीसुद्धा आवडली.