अॅपल केक

Primary tabs

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in लेखमाला
29 Oct 2016 - 12:22 am

अ‍ॅपल केक प्रकार २
अॅपल केक प्रकार १ येथे पाहता येईल.

साहित्य :

१०० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ३ अंडी, १ चमचा लिंबाचा रस, चिमूटभर मीठ, २०० ग्राम मैदा, १/४ कप दूध,
२ चहाचे चमचे (सपाट/फ्लॅट) बेकिंग पावडर
४-५ मध्यम आकाराची सफरचंदे

कृती :

बटर भरपूर फेटणे, मिक्सी फिरवताना हाताला हलके लागायला लागेल. मग त्यात साखर घालून फेटणे,
अंडी घालून फेटणे. चिमूटभर मीठ व लिंबाचा रस घालणे आणि फेटणे.
मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे‌. शेवटी दूध घालून फेटणे.
सफरचंदाच्या साली न काढता अगदी पातळ फोडी करणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल, त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे. त्यावर सफरचंदाच्या फोडी बसवणे.
ओव्हन प्री-हीट करणे. १८० अंश से.वर साधारण २५ ते ३० मिनिटे बेक करणे. आवश्यकता वाटली, तर अर्ध्या तासानंतर तापमान १७० अंशावर आणणे. फोडी पातळ आहेत त्या जळत नाहीत ना, ह्याकडे लक्ष देणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभित करणे. कॉफी आणि व्हिप्ड क्रीमबरोबर खाणे.

.

.

प्रतिक्रिया

सुंदर केक! गुलाबाचं फूल असावं तसा दिसतोय.

पहिल्यांदाच पाहतीये असा केक .. काय भारी दिसतोय !

पद्मावति's picture

29 Oct 2016 - 2:42 am | पद्मावति

+१
मस्तच.

इशा१२३'s picture

29 Oct 2016 - 8:39 am | इशा१२३

मस्त मस्त केक! नक्की करुन पहाते.

सविता००१'s picture

29 Oct 2016 - 11:29 am | सविता००१

किती सुरेख दिसतोय गं... मस्त

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 5:37 pm | यशोधरा

सुरेख दिसतो आहे केक.

अरे... कोणी तरी हा केक माझ्या पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करा रे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2016 - 1:55 pm | टवाळ कार्टा

अगदी अगदी...माझ्याकडे द्या...मी पोचवतो ;)

पूर्वाविवेक's picture

2 Nov 2016 - 3:45 pm | पूर्वाविवेक

मस्त! प्रथमच पाहतेय. गुलाबाचं फुलंच जणु. अँपल पाय आवडला होता, हि चव देखील आवडेल.

सूड's picture

2 Nov 2016 - 4:12 pm | सूड

फोटो दिसत नाहीयेत.

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2016 - 12:45 am | स्वाती दिनेश

तू ब्राउझर कोणता वापरतो आहेस? मलाही पूर्वाविवेकचे मूगाच्या लाडूचे फोटो मोझिला मध्ये दिसले नाहीत पण गुगल क्रोममध्ये दिसले. एकदा ब्राउझर चेंज करून बघ ना प्लिज जरा..
स्वाती

पैसा's picture

2 Nov 2016 - 5:27 pm | पैसा

हाय, मर जावां!

अनन्न्या's picture

3 Nov 2016 - 10:30 am | अनन्न्या

मी फेसबूक पाहिला होता पण बेकिंगचे पदार्थ अजून केले जात नाहीत. जमेल का असे वाटते

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 10:55 am | नूतन सावंत

अॅपल केक?नाही,नाही काळा गुलाब दिसतोय हा,खुपच सुरेख स्वाती.

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 2:54 pm | सस्नेह

सुंदर दिसतोय केक.

पियुशा's picture

5 Nov 2016 - 3:56 pm | पियुशा

सुरेख झालाय :)

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2016 - 11:11 am | प्राची अश्विनी

कालच केला. छान झालेला. Thank you.