अॅपल केक प्रकार २
अॅपल केक प्रकार १ येथे पाहता येईल.
साहित्य :
१०० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ३ अंडी, १ चमचा लिंबाचा रस, चिमूटभर मीठ, २०० ग्राम मैदा, १/४ कप दूध,
२ चहाचे चमचे (सपाट/फ्लॅट) बेकिंग पावडर
४-५ मध्यम आकाराची सफरचंदे
कृती :
बटर भरपूर फेटणे, मिक्सी फिरवताना हाताला हलके लागायला लागेल. मग त्यात साखर घालून फेटणे,
अंडी घालून फेटणे. चिमूटभर मीठ व लिंबाचा रस घालणे आणि फेटणे.
मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे. शेवटी दूध घालून फेटणे.
सफरचंदाच्या साली न काढता अगदी पातळ फोडी करणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल, त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे. त्यावर सफरचंदाच्या फोडी बसवणे.
ओव्हन प्री-हीट करणे. १८० अंश से.वर साधारण २५ ते ३० मिनिटे बेक करणे. आवश्यकता वाटली, तर अर्ध्या तासानंतर तापमान १७० अंशावर आणणे. फोडी पातळ आहेत त्या जळत नाहीत ना, ह्याकडे लक्ष देणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभित करणे. कॉफी आणि व्हिप्ड क्रीमबरोबर खाणे.


मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर केक! गुलाबाचं फूल असावं
सुंदर केक! गुलाबाचं फूल असावं तसा दिसतोय.
पहिल्यांदाच पाहतीये असा केक .
पहिल्यांदाच पाहतीये असा केक .. काय भारी दिसतोय !
+१ मस्तच.
+१
मस्तच.
मस्त मस्त केक! नक्की करुन
मस्त मस्त केक! नक्की करुन पहाते.
यम्मी
किती सुरेख दिसतोय गं... मस्त
सुरेख दिसतो आहे केक.
सुरेख दिसतो आहे केक.
अरे... कोणी तरी हा केक माझ्या
अरे... कोणी तरी हा केक माझ्या पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करा रे ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala
अगदी अगदी...माझ्याकडे द्या..
In reply to अरे... कोणी तरी हा केक माझ्या by मदनबाण
अगदी अगदी...माझ्याकडे द्या...मी पोचवतो ;)
मस्त! प्रथमच पाहतेय. गुलाबाचं
मस्त! प्रथमच पाहतेय. गुलाबाचं फुलंच जणु. अँपल पाय आवडला होता, हि चव देखील आवडेल.
फोटो दिसत नाहीयेत.
फोटो दिसत नाहीयेत.
फोटो
In reply to फोटो दिसत नाहीयेत. by सूड
तू ब्राउझर कोणता वापरतो आहेस? मलाही पूर्वाविवेकचे मूगाच्या लाडूचे फोटो मोझिला मध्ये दिसले नाहीत पण गुगल क्रोममध्ये दिसले. एकदा ब्राउझर चेंज करून बघ ना प्लिज जरा..
स्वाती
मर जावां!
हाय, मर जावां!
सुरेख दिसतोय केक
मी फेसबूक पाहिला होता पण बेकिंगचे पदार्थ अजून केले जात नाहीत. जमेल का असे वाटते
अॅपल केक?नाही,नाही काळा गुलाब
अॅपल केक?नाही,नाही काळा गुलाब दिसतोय हा,खुपच सुरेख स्वाती.
सुंदर दिसतोय केक.
सुंदर दिसतोय केक.
सुरेख झालाय :)
सुरेख झालाय :)
कालच केला. छान झालेला. Thank
कालच केला. छान झालेला. Thank you.