बरोबरीने तुझीया आले,
तुझ्याहून ही नाव जाहले,
काय कमी रे माझ्या ठायी
जे मी लढण्या आधीच हरले ...
नऊ मास मी त्रास सोसुनी
जन्म जरी हा तुजला देते,
तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे
पाप माझ्याच माथी येते. ...
तुच अपुरा माझ्यावाचुन
साथ तुला शतजन्मी देते,
मान्य तुला ना सत्य हे सारे
म्हणून भोग हे निमित्त ठरते ...
जाणुन घे रे किंमत माझी
तुला न ठावे हिम्मत माझी
शांत ज्योतीसम ही जळणारी
आग अंतरी शतजन्माची ...
प्रतिक्रिया
7 Oct 2016 - 10:08 pm | सतिश गावडे
नवरात्रानिमित्त सुंदर, समयोचित कविता.
पहील्याच काव्यपंक्तीतील "तुझीया" शब्द काळजाला भिडला.
8 Oct 2016 - 4:29 pm | पैसा
समयोचित कविता
8 Oct 2016 - 6:15 pm | पद्मावति
कविता आवडली.
8 Oct 2016 - 8:27 pm | अनन्न्या
स्त्रीशक्तीला प्रणाम!!
9 Oct 2016 - 10:58 pm | कवि मानव
@माहिराज
कविता छान झाली आहे.... तुमची कविता मी केलीली एक जुनी कविता आठवली
प्रकाशित करतो..... पण खूपच छान