!! जगण्या परी मारावे !!

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
6 Oct 2016 - 2:47 pm

आभाळासंगे जुगार खेळूनी,
गमवून बसला पुंजी सारी,
निसर्गाचा खेळ असा की,
कधी अकाल तर कधी पाणी मारी !!१!!

दारिद्र्याचे दंश असे की,
भूक मोठी पण खिशात नाणी,
जगास पिकवून देणाऱ्याचे,
मुले खेळती उपासवाणी !!२!!

सावकाराच्या कर्जाला तंगून,
एक दिवस तो फासावर चढतो,
जन्मभर ज्याची किंमत क्षुल्लक,
मेलेल्यावर त्याचा भाव ही ठरतो !!३!!

आयुष्य असे का दिलेस देवा,
जिथे दोन वेळची भ्रांत असे,
रुसला ज्यावर खुद्द निसर्ग देवता,
तू सांग शेतकरी जगणार कसे !!४!!

पुढच्या जन्मी जनावर होऊ,
परी जन्म नको हा शेतकऱ्याचा,
दोर असे जरी गळ्यात माझ्या,
परी दोर नसे तो माझ्या फासाचा !!५!!

कविता माझीसमाज

प्रतिक्रिया

कवि मानव's picture

6 Oct 2016 - 2:48 pm | कवि मानव

माफ करा !!

कवितेचा शीर्षक - जगण्या परी मारावे.