आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं, कि जरा भीती वाटते....
खरंच.. नाही शब्दात सांगता येत, कि नेमकी किती वाटते...
म्हणजे बघ ना.. आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि चंद्र, रात्र ह्या सार्यांना टाळून कसं चालेल..?
आणि टाळलंच तर साधं पान तरी कसं हालेल..?
आता पान हललं कि पानगळ ठरलेली.. मला उद्ध्वस्त करणारी वादळं ठरलेली..
आणि माझ्या रात्रीला तुझ्या स्वप्नांची झळ सुद्धा ठरलेली..
सोसत बसते मग बिचारी मग जेवढं सोसणं होत...
मग काय, पुन्हा आभाळ भरून येतं..
बरसू लागतात मग सरींवर सरी..
आणि प्रकर्षानं आठवू लागते तुझ्या-माझ्यातली दरी..
त्या दरीचं एक टोक तू आणि मी एक टोक..
मी व्यवहारात नेहमीच मार खायचो, तुझं मात्र नेहमीच चोख..
म्हणजे बघ ना.. पाहिलेली स्वप्नं, वाहिलेले अश्रू.. सारं कसं तोलूनमापून..
आमचं सारंच अघळपघळ.. सतत हातात काळीज कापून..
आता वाटतंय तेंव्हाच सारा हिशोब जमायला हवा होता..
तोच तर ह्या वर्तमानाचा भविष्याशी असणारा दुवा होता..
हक्कानं रहायला जावं तीच अनोळखी वस्ती वाटते..
.
.
.
खरंच...
हल्ली तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि जरा भीती वाटते..
-चेतन दीक्षित
प्रतिक्रिया
4 Oct 2016 - 5:10 pm | कवि मानव
मला ही "फ्रेस" - ( हल्ली तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि जरा भीती वाटते..) खूप छान वाटली
4 Oct 2016 - 5:27 pm | वेल्लाभट
कचकावून भारी !
काय लिहिलंयस मित्रा ! वाह वाह वाह वाह !
जब्बरदस्त !
एक ताल आहे तुझ्या काव्याला, एक लय आहे, ठहराव आहे, सगळंच कमाल!
_/\_ स्वीकारा !
लव्हड इट!
4 Oct 2016 - 8:02 pm | पुंबा
आ व ड ली...
4 Oct 2016 - 9:40 pm | खटपट्या
जबरा
4 Oct 2016 - 10:50 pm | रातराणी
सुरेख!
20 Oct 2016 - 1:04 pm | वटवट
सर्वान्चा आभारी आहे...
20 Oct 2016 - 1:13 pm | पैसा
सुरेख कविता!
20 Oct 2016 - 3:12 pm | पाटीलभाऊ
मस्त
20 Oct 2016 - 3:18 pm | यशोधरा
सुरेख!
20 Oct 2016 - 5:29 pm | सस्नेह
छानच !
21 Oct 2016 - 12:13 pm | नाखु
ह्ये ज्याम भारी
21 Oct 2016 - 12:26 pm | अत्रुप्त आत्मा
पांडु मोड अॉन -
ऒ के!
पांडू मोड अॉफ .. ;)
21 Oct 2016 - 1:58 pm | यशोधरा
पांडू मोडात नुसतं "के" इतकंच म्हणायचं ओ गुर्जी!
21 Oct 2016 - 12:39 pm | अलका सुहास जोशी
उत्तम. पहिल्यातून उलगडत जाणारी पुढचीपुढची दुखरी नस.
21 Oct 2016 - 3:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
व्वाह..
21 Oct 2016 - 4:15 pm | अमोल विभुते
झकास .. मस्त जमली आहे रे चेत्या...
21 Oct 2016 - 7:43 pm | अजया
मस्त.
21 Oct 2016 - 9:07 pm | शलभ
मस्त.. आवडली..
12 May 2017 - 3:35 pm | सत्यजित...
सहज पण गहिरी कविता! आवडली!
12 May 2017 - 5:07 pm | किसन शिंदे
काय छान 'वटवट' लावलीये.
12 May 2017 - 7:03 pm | मदनबाण
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned
IT cos had firing list ready 5 years back
Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant