!! सैनिक मरतो देश राहतो !!

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
3 Oct 2016 - 3:50 pm

दोन राष्ट्रांच्या वादामध्ये,
निष्पाप बिचारा अपराधी ठरतो,
आणि उगाच कारण नसतानाही,
सैनिक का सीमेवर मारतो ? !!१!!

त्यास न ठाऊक कारण युद्धाचे,
पालन करी तो आदेशांचे,
तरी बुद्धिबळाच्या खेळा मधला,
सहज मरणारा तो प्यादा ठरतो !!२!!

डॊकावूनी पहा त्या गणवेशातून,
आपल्या सम तो ही माणूस असतो,
सौख्य-सोयरे मागे टाकून,
कुणास ठाऊक तो कसे राहतो !!३!!

लढत मरावे, मरत लढावे,
ध्यास घेउनी जीवनभर जगतो,
अन तारुण्याच्या उंबरटयावर,
अकारण मृत्युच्या शैयेवर चढतो !!४!!

युद्ध खरेतर राज्यकर्त्यांचे,
तो तर केवळ साधन ठरतो,
वाढे यादी हुतात्म्यांची कदाचीत,
एक घर मात्र - मुलगा, नवरा वा बाप गमवतो !!५!!

समाज

प्रतिक्रिया

मानवतावादी जाग दिसते.

कवि मानव's picture

3 Oct 2016 - 4:35 pm | कवि मानव

शहिदांची करुण कहाणी

अप्पा जोगळेकर's picture

3 Oct 2016 - 5:18 pm | अप्पा जोगळेकर

ओके

फार फार दुःख दिसते हो.

देश भक्तीच्या पलीकडे तो सैनिक एक माणूस सुद्धा असतो हे विचार करण्याची फार गरज आहे.... नाही तर फक्त सैनिकांनी सीमेवर शाहिद व्हावे आणि आपण बातम्या ऐकाव्यात एव्हडेच होत राहील

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Oct 2016 - 6:48 pm | llपुण्याचे पेशवेll

१. तो स्वतःच्या चॉईस ने सैन्यात भरती होतो
२. तो जो मार्ग निवडतोय ते त्याच्या मनातील कर्तव्य भावनेमुळे निवडतो
३. त्याच्या मृत्यूबद्दल शोक करताना आपण आपली नागरी कर्तव्ये पार पाडतो का हे पहावे नाहीतर त्याला त्याचे जीवन फोल वाटू शकेल
४. बाकी मानवता वगैरे केवळ हत्यार किंवा ढाल म्हणूनच वापरायची असते राष्ट्रहितापुढे बाकी सर्व प्रकारचे हित(विषेशतः शत्रू सैनिकांचे अथवा नागरीकांचे) हे दुय्यम असते. (वाचा ब्लड टेलेग्राम).

कवि मानव's picture

3 Oct 2016 - 7:06 pm | कवि मानव

तो मर्जीने जात असेल - पण हा विचार येणेच मुळात मला थोडा कृत्घनपणाचे चिन्ह वाटतं..

नीट वाचलीत तर कवितेचा आशय त्या सैनिकातल्या माणसाची आहे, ज्याला सुद्धा एखादा सामान्य ( लांबून टीका करत राहणाऱ्या ) माणसासारखा जगायला आवडेल पण ते करण्या ऐवजी तो दोन पाउल पुढे जाऊन सामोरे जात असतो.

माझ्यात किवां माझ्या सारख्या असंख्या लोकांचे धाडस होत नसेल हे करायचे पण त्यांच्याvdena समजून घेऊन त्यांच्या विषयी आदर भाव नक्कीच ठेऊ शकतो

संदीप डांगे's picture

3 Oct 2016 - 7:12 pm | संदीप डांगे

लांबून बसून अशा कविता करणे सोपे असते!

कवि मानव's picture

3 Oct 2016 - 7:23 pm | कवि मानव

माफ करा मला तुमची ही प्रतिक्रिया फार दैनंदिन वाटते (कारण तुम्ही सुद्धा माझ्या एवढेच लांब आहेत सीमे पासून)

आपण फार शूर आहे ही भावनाच नाही.... उलट आपल्याला करता न येणाऱ्या बलिदानाचे हे कौतुक आहे

बहुतांश लोकांमध्ये हा आविर्भाव का आहे की "स्वच्छ स्तुती" असू शकते

संदीप डांगे's picture

3 Oct 2016 - 7:59 pm | संदीप डांगे

एक काय ते फायनल करा साहेब, तुमची कविता प्रतिसादाशी म्याच होत नाहीये,

कवि मानव's picture

3 Oct 2016 - 8:15 pm | कवि मानव

जाऊंद्या बाळासाहेब (सोडा अश्या कविता) :)