रडू

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
2 Oct 2016 - 10:20 pm

"आमच्या घरी ना , मला एक छोटा दादा मिळाला आहे. त्याला दोनच काम असतात. मुठ आवळून इकडेतिकडे पाहत बसण , आणि भोकाड पसरण.
आता उद्या माझा पेपर आहे आणि हा सकाळपासुन रडतोय. थांबा आजोबांनाच विचारतो तो का रडतो ते.."

"आजोबा..आजोबा.. अहो बघा ना तो कसा रडतोय सारखा. बोलून का टाकत नाही काय पाहिजे ते ?"

" अरे मानवी भाषेबद्दल पुर्ण अनभिज्ञ आहे तो. भुक लागली मग जिवाच्या आकंताने तो टाहो फोडतो. टाहो फोडला ,की आई जवळ करते हा अनुभव ते गाठीशी बांधून घेतो."

" आजोबा , मग डॅडा का कधी रडत नाही ? "

" आपण मोठो झालो की मानवी भाषाविश्वात आपला प्रवेश होतो. काना मात्र्ा वेलांटी उकार आपल्याभोवती फेर धरून नाचु लागतात. आसवांची भाषा मनाच्या कोप-यात जाऊन पडते. समाजाच्या शिष्टाचाराची , स्वताःच्या अहंकाराची पुटे त्यावर चढत जातात..."

" किती अवघड बोलता आजोबा तुम्ही ! पण डॅडा अधूनमधून टेंन्स का दिसतात ? "

" अरे आपला बालपणीचा भुकेचा अनुभवही आपली पाठ सोडत नाही. वाढत्या वयासोबत भुकेचे रुप बदलत जाते. ह्या भुकेकडे लक्ष वेधण्यासाठी रडायचं तर असत , पण तस मोकळेपणाने रडताही येत नसतं. आणि चालू होते सततची घूसमट."

"मग डॅडा तुम्हाला सगळ बोलून का दाखवत नाहीत ?"

" अरे ह्या घूसमटीतून बाहेर येण्यासाठी मानवी भाषेचा वापर आपण करू लागतो. पण ही भाषा समोरच्याच्या काळजाला हात घालू शकत नाही. पण आपली एक नकारात्मक प्रतिमा मात्र जन्मास येऊ लागते. वाढत्या शाब्दिक कुरबुरीतून संवादाचे मार्ग कमी होत जातात , आणि आपली घुसमट अत्युच्य पातळीवर जाऊन पोहचते. सतत
रडणा-या बाळाला आधाराची जास्त गरज असते , पण हसरं बाळच आधी कडेवर घेतलं जातं हे हळूहळू लक्ष्ात येऊ लागतं.

आपणही खुश आहोत हे दाखवण्यासाठी चेह-यावर मुखवटे चढवले जातात. मात्र स्वताःला आरशात पाहताना हा मुखवटा गळून पडतो. आसवांचे बांध फुटतात आणि कैक दिवसांपासुन लपून राहिलेली ही भाषा डोळ्यातून प्रगटते. ह्या मूक भाषेचा वक्ताही आपणच आणि शॉताही."

" काय आजोबा किती बोअर आहात हो तुम्ही ! जाऊ दे ..मी प्लेग्र्ाऊंडवर चाललोय.. बाय.
.
.
" आ..आजोबा .. आं...आं...मला लागला हा सोफा..."

" अरे रडू नको लगेच..हे बघ तुझा डॅडापण आला.."

" बाबा तुम्हीच बघा याच्याकडे..मला बरच काम आहे. .."
.
.
.
" आजोबा डॅडाच्या डोळ्यात पाणी होत..त्याला सांगा ना रडु नको म्हणुन..मला जास्त नाही लागलं.."

"लहान आहेस पोरा , पोटभर रडून घे ..."

बालकथा

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

5 Oct 2016 - 12:52 pm | सिरुसेरि

छान लिहिलय

सुबोध खरे's picture

5 Oct 2016 - 12:56 pm | सुबोध खरे

सुन्दर