मी ..... कोण ?

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
2 Oct 2016 - 1:24 pm

मी ..... कोण ?

मी कोण तुम्ही कोण
जन्माच्या वेळीच ठरवतात
जात ,पात ,धर्म,देश
ओळख तेव्हाच सांगून टाकतात !
'मी' म्हणायच्या आधी
"तू कोण " हे शिकवून टाकतात !

आधी होते बर मी यजुर्वेदी
लग्नानंतर झाले म्हणे ऋग्वेदी,
कुटुंबामध्ये आमच्या
आहेत कोकणस्थही चार ,
बिल्डिंग मध्ये आहेत ब्राम्हणच फार !

कॉलनीमधले मला 'मराठी'
म्हणून ओळखतात
शहरात इतर ठिकाणी फिरताना
'कोणत्या भागातली' म्हणून विचारतात ?

शहराबाहेर गेले तर ही' पुण्याची '
असे म्हणाले लोक ,
परप्रांतात गेले तेव्हा
'महाराष्ट्रयीन' म्हणाले ते कैक .

आज देशाबाहेर आले तेव्हा
'भारतीय' म्हणून संबोधले गेले
भारताचा गर्व करते न करते तोच
'एशियन' म्हणून निवडले गेले .

अंतराळात गेले असते
तर ही 'पृथ्वीवरची'
परग्रहावरचे म्हणाले असते ,
जर गेले असते जंगलात
तरच ते 'प्राणीच' बहुधा
मला
फक्त "माणूस" म्हणाले असते !

-------फिझा

कविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

2 Oct 2016 - 1:25 pm | अभ्या..

ओहोहोहोहो.
जब्बरदस्तच की.
आवडली

पद्मावति's picture

2 Oct 2016 - 2:13 pm | पद्मावति

सुपर्ब!

चांदणे संदीप's picture

2 Oct 2016 - 11:24 pm | चांदणे संदीप

ओहोहोहोहो.
जब्बरदस्तच की.
आवडली

सेम उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्याही मनात उमटलेला कविता वाचून. कविता आवडली!

Sandy

खेडूत's picture

2 Oct 2016 - 11:33 pm | खेडूत

मस्तच!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Oct 2016 - 7:44 am | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!!

टवाळ कार्टा's picture

3 Oct 2016 - 9:14 am | टवाळ कार्टा

आवडेश

राजेंद्र देवी's picture

3 Oct 2016 - 11:05 am | राजेंद्र देवी

जबरदस्त....

नीलमोहर's picture

3 Oct 2016 - 3:14 pm | नीलमोहर

एकदम भारी..

बबन ताम्बे's picture

4 Oct 2016 - 4:19 pm | बबन ताम्बे

छान !!

प्रसाद_कुलकर्णी's picture

4 Oct 2016 - 4:39 pm | प्रसाद_कुलकर्णी

जर गेले असते जंगलात
तरच ते 'प्राणीच' बहुधा
मला
फक्त "माणूस" म्हणाले असते