खरा खुरा रंगमंच ..... !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
28 Sep 2016 - 12:00 pm

खरा खुरा रंगमंच ..... !

हुरहूर मनात घेऊन वेशभूषेत मग्न कधी
तर कधी चेहऱ्यावर रंग उमटवलेला !
संगीताच्या तालात दंग कधी
तर कधी रंगीत छटांचा प्रकाशात रमलेला !
अभिनयास सज्ज कधी
तर कधी नुसताच प्रेक्षक बनलेला !
हा रंगमंच !

नटसम्राटांची कारकीर्द असो
वा असो अध्यात्माचा वास
वीरांची असो शौर्यकथा वा
कधी फुटकळ परिसंवाद
कधी लख्ख दिव्यज्योतींमध्ये शांत
तर कधी कुजबुजलेला अंधारात ,
हा रंगमंच !

कधी बोबडे बोल कधी वार्धक्याची हाक
कधी गुलाबी संवाद साधलेले ,
कधी अश्रुंचे कधी हास्याचे
चोख अभिनय साकारलेले,
कुणाच्या नशिबाची जुगारी
कधी कुणाच्या आयुष्याची लाचारी,
कधी तरंग कथा, तर कधी सत्य व्यथा,
हा रंगमंच !

रंगमंच असते आयुष्य प्रत्येकाचे
परतीची वाट नाही, ना रंगवेषभूषेला वाव ,
भूमिका प्रत्येकाची ठरलेली इथे
जमवलेला प्रत्येकाने तो संवाद ,
सखेसोबती इथेच भेटी
नेपथ्य अन सोहळे इथेच होती ,
कलाकार तोच प्रेक्षकही तोच
पडदा पडतो तेव्हा डोळे बंद करणाराही तोच !!
हा रंगमंच !!!

---------- फिझा

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

28 Sep 2016 - 11:57 pm | पद्मावति

सुरेख!

मदनबाण's picture

29 Sep 2016 - 5:56 am | मदनबाण
मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Sep 2016 - 8:02 am | मिसळलेला काव्यप्रेमी

फारच सुंदर.. छान जमून आलीये रचना..