" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... "

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
28 Sep 2016 - 6:40 am


" कृष्णाकडे असतील का उत्तरे ???....... "

'त्याच्या' दूर दूर जाणाऱ्या
पाठमोऱ्या आकृतीकडे
राधा फक्त पाहत राहायची .....
रिकामं केलेलं मन
पुन्हा एका नजरेने गच्च भरून जायचा .... तो
वेड्या मनाला आता परत कसं सावरावं ?
ना तिच्याकडे उत्तर .... ना 'त्याच्या'कडे

मनामनांवर राज्य करणारा तो
जगाचा रक्षण करणारा तो ,
प्रत्येक जीवात वास करणारा तो,
विश्वविधाता तो ,
त्यालाही प्रश्न पडावा ? हे कसले 'प्रेम' ?

केवळ अढळ विश्वास ,
जीवाला घोर लावणारी हुरहूर,
डोळ्यात प्राण आणून वाट पाहायला लावणारी आस ,
फक्त एका क्षणाच्या भेटीसाठी ?
बस्स!! फक्त एवढंच राधेच्या नशिबात ?
पण .......
आसुसलेल्या डोळ्यांना
'त्याचे' दर्शन तरी व्हायचे ....
वेडावलेल्या मनाला
'त्याची' नजर स्पर्शून तरी जायची.....
वाट पाहताना
'तो' कधीतरी भेटेल हि आस तरी असायची ......
तो भेटून परत जाताना
मन भरून तरी जायचे .......
'त्याच्या' भेटीच्या ,नजरेच्या ,स्पर्शाच्या
खुणा तरी असायच्या तिच्याकडे .......

पण मीरा ....... ?
तिला तर यातले काहीच नाही... .नशिबी ........
तिचे मन काय मागत असेल ?
तिचे डोळे कोणती आस लावून बसले असतील ?
तिची भेटीची ओढ कशी असेल ?
तिचं अस्तित्व कशासाठी असेल ?

त्या 'कृष्णा' कडे असतील हि उत्तरे ?

--------- फिझा

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

29 Sep 2016 - 12:00 am | पद्मावति

अतिशय सुंदर कविता.

निओ's picture

29 Sep 2016 - 1:53 am | निओ

छान आहे

महासंग्राम's picture

29 Sep 2016 - 10:00 am | महासंग्राम

तुफान आवडलीये कविता

विनटूविन's picture

29 Sep 2016 - 10:35 am | विनटूविन

राधा आणि कृष्ण
म्हणजे
उत्तर नसलेले
प्रश्न..

संदीप खरे यांची, "राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला" या कवितेची आठवण झाली.
छान आहे तुमची कविता......

अभ्या..'s picture

30 Sep 2016 - 5:18 pm | अभ्या..

छानच हो कविता.
आवडली

प्राची अश्विनी's picture

30 Sep 2016 - 5:53 pm | प्राची अश्विनी

सुंदर!

कवि मानव's picture

3 Oct 2016 - 4:08 pm | कवि मानव

खुपच छान !!

नीलमोहर's picture

3 Oct 2016 - 4:18 pm | नीलमोहर

काही प्रश्नांना उत्तरे नसतात,