बाकरवडी भाजी

केडी's picture
केडी in पाककृती
24 Sep 2016 - 7:25 pm

Collage

साहित्य
२ कांदे उभे चिरून
१ वाटी सुक्क खोबरं, किसून
२ माध्यम टोमॅटो
१ मूठ कोथिंबिरीच्या काड्या
१५ ते २० लसूण पाकळ्या
1 इंच आलं
२ तमालपत्र
१ दालचिनी
१० ते १२ काळेमिरे
१/२ चमचा तीळ
१/२ चमचा बडीशेप
१ बडी इलायची
२ ते ३ छोटी इलायची
१ चक्रीफुल
२ ते ३ लाल सुक्या मिरच्या
२ ते ३ लवंगा
२ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
२ चमचे कांदा लसूण मसाला
१ चमचा हळद पावडर
तेल आवश्यकतेनुसार
मीठ , चवीनुसार
बाकरवडी माणशी ३ ते ४
कोथिंबीर बारीक चिरून

बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा वरून भुरभुरायला

घरात प्रसिद्ध "अमुक" बंधूंचे (हो, उगाच जाहिरात नको) बाकरवडी चे पाकीट येऊन पडलेले. ह्या बाकरवड्या
थोड्याच दिवसात कडक होतात किंवा सादळतात, मग त्या खाण्याची मज्जा कमी होऊ लागली. म्हंटल करावा हा प्रयोग शेव भाजीच्या धर्तीवर. मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो.
शेव भाजीचा रस्सा/कट ह्याच्या असंख्य वेगळ्या पद्धती घराघरात आहेत, त्या वापरून शेवेच्या ऐवजी बाकरवड्या घालून बघा.

कृती
एक चमचा तेलावर खोबरं भाजून घ्या. त्याच पॅन मध्ये सगळे खडे मसाले, लाल मिरची मंद आचेवर भाजून घ्या. त्यात आलं, लसूण कोथिंबीर काड्या टाकून 2 मिनिटे परतून घ्या. पॅन मधून काढून गार करायला ठेवा. पॅन मध्ये परत एक चमचा तेल घालून कांदा खमंग भाजून घ्या.

मिक्सर मधून, टोमॅटो, खडा मसाला आणि कांदा बारीक करून घ्या. (मी आधी टोमॅटो प्युरी करून घेतले, मग इतर जिन्नसा बरोबर ते सगळं बारीक वाटून घेतलं). वाटताना पाणी वापरले तरी चालेल.

कढईत अर्धी वाटी तेल घाला. तेल गरम झालं की कढई गॅस वरून खाली घ्या आणि त्यात मिरची पावडर आणि कांदा लसुण मसाला घाला. (ह्याने अर्थातच तर्री ला मस्त रंग येईल, गॅस वरून काढल्यामुळे जळणार नाही) ह्यात आता वाटलेला मसाला घालून परत गॅस वर ठेवा.

हे आता आपल्याला तेल सुटे पर्येंत परतून घायचय. ह्यात आता ८ ते १० वाट्या पाणी घाला (तर्री किती घट्ट किंवा पातळ हवी त्यावर पाण्याचे प्रमाण ठरेल. मी अगदीच पातळ न करता थोडीशी घट्ट ठेवली). उकळी आली की गॅस कमी करून झाकून हि तर्री साधारण 20 ते 30 मिनिटे उकळत ठेवा, वर तेल सुटे पर्येंत. चव बघून, मीठ, चिमूटभर साखर घाला. शेवटी एका लिंबाचा रस घालून , वरून कोथिंबीर पेरा.

Ingredients Step1
Step2 Step3
Step4 step5
Step6 Step7
Step9 Step10
Step11 Step12

वाढताना, तर्रीला मस्त उकळी काढा, एका वाटीत काढून त्यात बाकरवडी कुस्करून, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो भुरभुरून, पाव, काकडी च्या चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला घ्या!

[मुलं खाणार असल्यामुळे मी हिरवी मिरची नाही वापरली, तसेच लाल मिरचीचे प्रमाण अगदी अल्प ठेवले. मी वापरतो तो कांदा लसुण मसाला बेताचा तिखट असल्यामुळे त्यानुसार वापरलाय.]

Final

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

24 Sep 2016 - 7:57 pm | यशोधरा

अगागा.

पाकृचे फोटू चांगले आलेत पण असं कसं हो करायचं!

बादलीभर लाळ गाळल्या गेली आहे.

पद्मावति's picture

24 Sep 2016 - 8:23 pm | पद्मावति

क्लास्स!!!!!

पिंगू's picture

24 Sep 2016 - 8:45 pm | पिंगू

आहाहाहा.. जीव गेला..

पगला गजोधर's picture

24 Sep 2016 - 9:37 pm | पगला गजोधर

१+

:=>b)....

चाणक्य's picture

24 Sep 2016 - 9:52 pm | चाणक्य

.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2016 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटचा फोटू पाहून दिवंगतलो आहे.

तुषार काळभोर's picture

24 Sep 2016 - 10:32 pm | तुषार काळभोर

केडी, जीव घेताय तुम्ही नुसत्या फोटोंनीच!

(शंका: या कटाची मिसळ करता येईल का?)

मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो.

हे पाकृ मध्ये लिहिलंय.....

अभ्या..'s picture

24 Sep 2016 - 11:00 pm | अभ्या..

ही ग्रेव्ही स्पेशल भाजीय. बाकरवडीएवजी काहीही घातले तरी खपून जाईल इतकी टेस्टी ग्रेव्ही बनलीय.
.
बादवे अशी रेडी २ मिनिट ग्रेव्हीसाठी काही आहे का उपाय?

मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो.

हे पाकृ मध्ये लिहिलंय.....

पिलीयन रायडर's picture

25 Sep 2016 - 5:11 am | पिलीयन रायडर

बाब्बो!!!!!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Sep 2016 - 6:21 am | अनिरुद्ध.वैद्य

कसली जबर भाजी केलीये हो!
हॅट्स ऑफ्फ!

वरुण मोहिते's picture

25 Sep 2016 - 12:04 pm | वरुण मोहिते

आणि पाककृती +१

नेत्रेश's picture

25 Sep 2016 - 12:49 pm | नेत्रेश

मस्त, पण असे काही करण्यचे टॅलेंट नाही आपल्या कडे :)

स्वाती दिनेश's picture

25 Sep 2016 - 2:24 pm | स्वाती दिनेश

दिसते आहे मस्त पण एक प्रॅक्टिकल शंका आहे, बाकरवड्या मऊ पडेपर्यंत शिल्लकच राहत नाहीत आमच्याकडे. :)
स्वाती

पिशी अबोली's picture

25 Sep 2016 - 2:41 pm | पिशी अबोली

हेच्च हेच्च..

त्यामुळे मलापण नुसती लाळ गाळण्याशिवाय पर्याय नाही.

मग ह्यात फरसाण घालून मिसळ करून बघा! किंवा भावनगरी शेव घालून शेव भाजी.

खर्र खर्र खर्र सान्गा तुम्ही अन गणपा कुम्भ मेळ्यात हरवलेले २ भाउ आहात ना ;) ;) ;)
अहाहा काय दिसतय ते ........ कलर तर एकदम खतरा !!!!!

केडी's picture

25 Sep 2016 - 7:45 pm | केडी

हाहाहा... लोल

खादाड's picture

26 Sep 2016 - 8:24 am | खादाड

Ha ha

अजया's picture

25 Sep 2016 - 2:35 pm | अजया

जबरदस्त.

आत्ताच करून पाहिली. चविष्ट झाली होती. धन्यवाद!

वाह, छान, फोटो असेल तर टेपवा कि इकडे.

बाबा योगिराज's picture

26 Sep 2016 - 12:32 am | बाबा योगिराज

आत्ता कळलं कि प्रशांतराव बाकरवडी कुठे विसरले ते. उगीच अमुक बंधू, उगीच (झैरात नको) बदनाम झाले.

नवं कट्टेकरी
बाबा योगीराज

खादाड's picture

26 Sep 2016 - 8:23 am | खादाड

Mast

सस्नेह's picture

26 Sep 2016 - 10:32 am | सस्नेह

एकदम डिटेल.. ! फोटो भारी.

नाखु's picture

26 Sep 2016 - 10:48 am | नाखु

पण पावाबरोबर खायचे पातक सोडून बिन्धास भाकरीबरोबर खाल्ल्या जाईल याची नोंद घेणे आणि सोबत पातीचा कांदा+काकडी.

स्वगतःरवीवारी करावा काय बेत?

पैसा's picture

26 Sep 2016 - 10:53 am | पैसा

अगागा! लैच्च चित्ताकर्षक प्रकार आहे!

स्थितप्रज्ञ's picture

26 Sep 2016 - 10:55 am | स्थितप्रज्ञ

लि ट र ली तोंडाला पाणी सुटलं :)'

भाते's picture

26 Sep 2016 - 1:52 pm | भाते

सचित्र आणि सविस्तर नविन पाकृ आवडली. करून बघायला नक्की आवडेल.

किसन शिंदे's picture

26 Sep 2016 - 2:09 pm | किसन शिंदे

शेवटचा फोटो लय कातिल आलाय राव. तोंडाला अ‍ॅक्चुअली पाणी सुटलेय. =))

दिपक.कुवेत's picture

26 Sep 2016 - 2:45 pm | दिपक.कुवेत

गतप्राण झालो आहे. ग्रेव्ही आवडली. बाकरवडी एवजी भाज्या घालीन.

बाकरवड्या मऊ होईस्तवर शिल्लक राहात नाहीत, त्यामुळे पास. ग्रेव्ही चटकदार दिसतेय, त्यामुळे दुसर्‍या कशात तरी चालवून घेणेत येईल.

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2016 - 4:38 pm | प्रभाकर पेठकर

पहिला आणि शेवटचे छायाचित्र खतरनाक आहे. पाककृतीच्या दृष्टीकोनातून आणि छायाचित्रणाच्या कलेच्या दृष्टीकोनातूनही.

पाककृती झणझणीत आणि सणसणीत दिसते आहेच. आता बाकरवड्या मुद्दाम उरवून प्रयोग करावा लागणार.

खान्देशात अशाच ग्रेव्हीमध्ये अळूवड्या टाकून खातात.

पैसा's picture

27 Sep 2016 - 11:06 am | पैसा

मस्त लागत असणार!

अनन्न्या's picture

26 Sep 2016 - 5:50 pm | अनन्न्या

फोटो लय भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2016 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो लय जीवघेणे आले आहेत.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

26 Sep 2016 - 6:47 pm | मोदक

झक्कास..!!!

मोदक's picture

26 Sep 2016 - 11:57 pm | मोदक

आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार भाग्यश्री बांदिवार नामक काकू केडी सरांच्या पाककृती केडीचा आणि मिपाचा टॅग काढून त्यांच्या ग्रूपावर चिकटवत आहेत.

या चोरीला काय करावे..?

भाग्यश्री मॅडमचे प्रोफाईल - https://www.facebook.com/bhagyashri.bandiwar?fref=ts
आम्ही सारे खवय्ये - https://www.facebook.com/groups/1735753063324406/

तुषार काळभोर's picture

27 Sep 2016 - 10:59 am | तुषार काळभोर

कान उघडणी करावी?

त्या प्रोफेशनल चोर आहेत. नियमित मिपावरच्या पाककृती चोरत असतात. आम्ही लोकानी विरोध केला तर त्या पोस्ट्स उडवणे, मेसेजेसना ऊर्मट उत्तरे देऊन जाब विचारणार्‍याला ब्लॉक करणे असले उद्योग करतात. ज्या मुलीनी मेसेजेस टाकले होते त्याना मिपाकर ग्रुपवर आणि इथे स्क्रीनशॉट्स टाकायला सांगते.

तुषार काळभोर's picture

27 Sep 2016 - 12:56 pm | तुषार काळभोर

आईशप्पथ!!
लई डेरिंगबाज बाई आहेत!

पूर्वाविवेक's picture

27 Sep 2016 - 11:49 am | पूर्वाविवेक

माझ्या ब्लॉगवरच्या अनेक रेसिपी तिथे मला सापडल्या. म्हणून मी त्या बाईंना मेसेज पाठवला व कायदेशीर कारवाईबद्दल बोलले तर तिने मला अतिशय उद्धट उत्तरे देऊन ब्लॉक केलं. मी तिच्या ग्रुपवर आता माझ्या बहिणीच्या ac वरून नजर ठेवून आहे. त्यानंतर तिने माझ्या रेसिपी वापरल्या नाहीत व वरवरच्या माझ्या काही रेसिपी उडवल्या पण माझ्या जुन्या रेसिपी फोटोंसह अजूनही तिथेच आहेत. इथे मिपावरील अनेक रेसिपी आहेत विशेषतः सानिकाच्या तसेच मायबोली व चकली ब्लॉगच्या अनेक रेसिपी आहेत. मी ते स्क्रीन शॉट मिपाच्या फेसबुक पेजवर टाकत आहे.

तुम्ही प्लीज एक काम कराल का? मिपावर याचा एक धागा काढा. त्याची लिंक आम्ही तेथे चिकटवतो.

आम्हाला ब्लॉक केले तर आपण त्यांचे प्रोफाईल रिपोर्ट करून त्याला टाळे लावू शकतो.

अभ्या..'s picture

27 Sep 2016 - 11:59 am | अभ्या..

Handsome aahe kaakoo.
LOL

धन्यवाद पूर्वाविवेक नजरेस आणून दिल्याबद्दल, आणि मोदक भाऊ त्यांची रितसर कानउघाडणी केल्या बद्दल.

ह्या पुढे आशा आहे की त्या असं काही करणार नाहीत. पाककृती बद्दल नेहेमीच कॉपीराईट नसू शकतो, पण कष्टाने काढलेल्या फोटोंवर मात्र मूळ लेखकाचा हक्क असतो, तेवढं त्यांना लक्षात आलं तर बरं पडेल. निदान मूळ स्रोत (source) तरी त्यांनी द्यावा.

सकाळीच त्यांनी अनन्या ह्यांची पातोळे पाककृती तिथे टेपवली आहे, सगळ्या छायाचित्रां सकट!

तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार!

अनन्न्या's picture

27 Sep 2016 - 7:11 pm | अनन्न्या

राग येतो अशा चोरी करणाय्रांचा!

नुसता राग नका करु ताई, रिपोर्ट थिस ग्रुप करा.

ज्यांच्या ज्यांच्या म्हणून रेसिपीज चोरल्यात त्यांनी रिपोर्ट ग्रुप ऑप्शन सेलेक्ट करा. मिपावरच्या चोरल्या असतील तर मिपाकर ग्रुपच्या अ‍ॅडमिन्सना पण हे करता येत असेल तर बघा. बाई अगदी बेरकी दिसत्ये.

आणि मिपावरच्या रेसिपीज उचलतात म्हणजे या प्रतिसादांवरही बाई लक्ष ठेवून असणार, त्यामुळे घाई करा.

प्रमोद तांबे मिपावरच्या पाकृ उचलून तिकडे टाकतात. पटाईत यांच्या एका पाकृबद्दल हे घडलेले आहे. इथे पहा.

माझी पाकृ नसल्यामुळे मला रिपोर्ट करण्याचा योग्य पर्याय निवडता आला नाही. कृपया ज्यांच्या चोरल्या आहेत त्यांनी रिपोर्ट करत रहा म्हणजे अश्या कृत्यांना आळा बसेल.

मराठमोळा's picture

27 Sep 2016 - 8:20 am | मराठमोळा

केडी साहेब.. तुमच्या कलेला आणि कल्पकतेला सलाम. कोणत्याही गोष्टीची आवड आणि पॅशन यात जो फरक असतो. तुमच्याकडे ते पॅशन आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्हाला मास्टर शेफ मधे पहायला नक्की आवडेल. शुभेच्छा!!

केडी's picture

27 Sep 2016 - 12:00 pm | केडी

तुमचे मनापासून आभार.
___/ \___

इशा१२३'s picture

27 Sep 2016 - 9:41 am | इशा१२३

भारीच !!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2016 - 9:47 am | कैलासवासी सोन्याबापु

ह्याच्यात जर त्या छोट्या छोट्या मिनी बाकरवड्या येतायत त्या घातल्या तर??

नाखु's picture

27 Sep 2016 - 11:10 am | नाखु

ही आयडीया भारी वाटतेय,
म्हणजे लगदा पण होणार नाही आणि शेवेसारखी कुर्कुरीत पण राहील.

धन्यावाद

गणामास्तर's picture

27 Sep 2016 - 11:05 am | गणामास्तर

हायला, कसला त्यो भयानक शेरवा !

पूर्वाविवेक's picture

27 Sep 2016 - 11:51 am | पूर्वाविवेक

फोटो एकदम कातील आलेत. रेसिपी फारच छान. ह्या रश्श्यात अळूवडी, कोथींबिरवडी, कोबीवडी पण छान लागते.

नरेश माने's picture

27 Sep 2016 - 1:01 pm | नरेश माने

एकदम कातिल फोटो आलेत. तरीचा रंग आणि पाककृती लय भारी.

उल्का's picture

27 Sep 2016 - 1:26 pm | उल्का

मस्तच आहे.

विजय पिंपळापुरे's picture

27 Sep 2016 - 1:40 pm | विजय पिंपळापुरे

ह्यात भाकरवड्या बदली भाजणीची चकली घातली तरी छान लागते

चकल्या घालून एक उकळ काढावी

विशाखा राऊत's picture

28 Sep 2016 - 2:20 am | विशाखा राऊत

रेसेपी आवडली

रुपी's picture

28 Sep 2016 - 3:36 am | रुपी

मस्त.. तर्री भारीच आहे.

अजून (शाकाहारी) पाकृ येऊ द्या.

मदनबाण's picture

29 Sep 2016 - 6:01 am | मदनबाण

तर्री भारीच आहे.
हेच म्हणतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT

अहाहा.....लाजवाब दिसतेय ही तर्री!!!!!

सुखीमाणूस's picture

29 Sep 2016 - 7:06 pm | सुखीमाणूस

सान्डगे पण या ग्रेव्ही मधे छान लागतील असे वाटतेय. Receipe भारी आहे

दक्षिणा's picture

26 Oct 2016 - 2:21 pm | दक्षिणा

झन्नाट पाककृती
तोंडाला जाम पाणी सुटलं

अनिंद्य's picture

27 Mar 2020 - 3:03 pm | अनिंद्य

@ केडी,

रेसीपी झकास आहे आणि ग्रेव्ही तर प्रेग्नेंट विथ पोटेन्शियल आहे - अनेक पाककृती / प्रयोगांना जन्म देऊ शकेल :-)

केडी's picture

27 Mar 2020 - 10:02 pm | केडी

:-)) हाहा...

चौकस२१२'s picture

27 Mar 2020 - 4:43 pm | चौकस२१२

कांदा लसूण मसाला हा झणझणीत पणा साठी आणि
काश्मिरी लाल मिरची पावडर रंगासाठी ...अशी रचना आहे का केडी?
तोंडाला पाणी सुटले आणि हळहळ पण वाटली
हळहळ अशासाठी कि अहो ती "निनावी" बाकरवडी धूमकेतू सारखी मिळते आणि ती सुद्धा समुद्रमार्गे आलेली म्हणजे १ महिने प्रवासात (साधी खाताना पंण ओव्हन मध्ये भाजून घेतली तर जरा खुसखुशीत होते ) आणि भारतीय दुकानात पंजाबी आणि गुजराथी राज्य असल्यामुळे असली कांदा लसूण मसाला जवळ जवळ नाहीच ...
असो करा लेको मज्जा