मेथी उडीद वड्यांची भाजी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
15 Mar 2015 - 5:58 pm

मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसांपासून, रोज रोज तेच तेच गाजर-मटार, फुलगोबी, वांगे (घ्या मौसमात या भाज्या स्वस्त मिळतात) खाऊन कंटाळळो आहे. सुक्या बनविता येत असल्यामुळे, ऑफिसच्या डब्यात ह्याच भाज्या खायला मिळतात. खंर म्हणावे तर सौने काल एक वाटी उडीद डाळ भिवून ठेवली होती, उडीद गोळ्यांची भाजी बनविण्याचा तिचा विचार होता. ती म्हणाली मेथी टाकून उडीद वड्यांची भाजी चालेल का? नाही, हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, हो म्हणावेच लागले. अश्यारीतीने ही भाजी आज सकाळी खायला मिळाली.

साहित्य: वड्यांसाठी -रात्र भर भिजवून उडीद डाळ - एक वाटी, मेथी धुऊन बारीक चिरलेली, एक वाटी, लसूण(५-६ पाकळ्या), आलं(अंदाजानुसार), मिरचीचे (१-२)पेस्ट , मीठ , हळद, धनिया पावडर -१ चमचा, गरम मसाला एक चमचा.

कृती: उडदाची डाळ मिक्सर मधून पिसून घ्यायची. शक्यतो पाणी नका टाकू. त्यात चिरलेली मेथी, आलं, लसूण मिरची पेस्ट, हळद धनिया पावडर, गोड मसाला, मीठ मिसळून फेटून घ्या. कुकरच्या एका भांड्यात तेलाचा हात लाऊन मिश्रण त्यात घाला व कुकरचे झाकण बंद करून. गॅस वर कुकरची एक-दोन सिटी काढून घ्या. थंड झाल्यावर एका ताटात वड्या कापून घ्या.
मेथी उडीद वड्यांची भाजी
कृती भाजी: दोन कांदे , तीन टमाटो, आलं (१/२ इंच), लसूण (३-४ पाकळ्या), मिरची १-२. सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्या. गॅस वर कढई ठेऊन त्यात ३-४चमचे तेल टाका, तेल गरम झाल्यावर मोहरी (१/२ चमचा) टाका . मोहरी तडतडल्या वर मिक्सर मधली पेस्ट टाका. ५-६ मिनिटे तेल सुटे पर्यंत परतवा. मग त्यात गरम मसाला(१ चमचा), धनिया पावडर (१ चमचा), हळद (१/२ चमचे), तिखट (१-२ चमचे) टाकून परतवून घ्या. नंतर १ गिलास पाणी घालून उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर मीठ -१/२ चमचे (आधी वड्यात मीठ घातले आहे, आता फक्त ग्रेवी साठी मीठ) व नंतर त्यात वडे घालून, एक वाफ काढून घ्या.

जेवताना गरमा-गरम मेथी उडीद वड्यांची भाजी पोळी आणि भाता सोबत मस्त लागेली.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

15 Mar 2015 - 6:07 pm | स्पंदना

:))))

आदूबाळ's picture

15 Mar 2015 - 6:15 pm | आदूबाळ

या बात! करणार!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2015 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

वॉव!

सविता००१'s picture

15 Mar 2015 - 6:26 pm | सविता००१

सुंदरच वाटते आहे वाचूनच.
करून पाहीन नक्कीच.

वेगळी भाजीची कृती वाचूनही बरे वाटले. दुसरा हिरवा पदार्थ कोणता आहे?

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2015 - 9:16 pm | स्वाती दिनेश

वेगळीच भाजी! करून पाहिली पाहिजे.
(रेवती,हिरवा पदार्थ चिरलेली मेथी असावी असे वाटतेय.)
स्वाती

निवेदिता-ताई's picture

15 Mar 2015 - 11:00 pm | निवेदिता-ताई

चिरलेली नाहीय ग ती.. वाफवलेली मेथी आहे.असे वाटतेय.

स्वाती दिनेश's picture

16 Mar 2015 - 5:46 pm | स्वाती दिनेश

अग, वाफवलेली मेथी+डाळीचे मिश्रण दिसतेय ते, त्याच्याच वड्या पाडल्या असाव्यात.
स्वाती

हां, हे जरा पटण्यासारखं आहे. मला चीज घालून बेक केलेली मेथी असल्यासारखे दिसले गं.

सस्नेह's picture

16 Mar 2015 - 8:13 am | सस्नेह

खरंच वेगळी आहे. करून बघायला पाहिजे

निवेदिता-ताई's picture

15 Mar 2015 - 10:56 pm | निवेदिता-ताई

सुन्दर

जुइ's picture

15 Mar 2015 - 11:28 pm | जुइ

करुन पाहण्यात येइल.

रमेश आठवले's picture

16 Mar 2015 - 12:39 am | रमेश आठवले

छान. नवीन आणि पौष्टिक पदार्थ. हिवाळ्यात तर अवश्य खाण्या सारखी भाजी.

मधुरा देशपांडे's picture

16 Mar 2015 - 1:47 am | मधुरा देशपांडे

मस्त पाकृ. नक्की करण्यात येईल.

आयुर्हित's picture

16 Mar 2015 - 6:15 am | आयुर्हित

पौष्टीक पाकृ!

यशोधरा's picture

16 Mar 2015 - 8:52 am | यशोधरा

उडीद डा़ळ आधी भाजून वगैरे घ्यायची का?

वेगळी भाजी ! यात यात पडलेले सर्व सामान पसंदीचे असल्यामुळे बिल्कुल जरूर करून खिलवन्यात येइल. :)

सुनील's picture

16 Mar 2015 - 9:53 am | सुनील

वेगळीच पाकृ. फोटोही छान.

बाकी शीर्षकातील मेथी आणि उडिद हे शब्द वाचून उडीद-मेथी ह्या पाकृची आठवण आली.

विजय पिंपळापुरे's picture

16 Mar 2015 - 3:30 pm | विजय पिंपळापुरे

हयाच प्रमणे चणा डाळी पिठा पासून वड्यांची भाजी बनवतात.

त्याला पाटवड्यांची ची भाजी अस म्हणतात.

प्रभाकर पेठकर's picture

16 Mar 2015 - 3:39 pm | प्रभाकर पेठकर

>>>>कुकरच्या एका भांड्यात तेलाचा हात लाऊन मिक्सर त्यात घाला

माझा सुमित मिक्सर कुकर मध्ये मावत नाहीये (smilya कुठे गेल्या?) बाकी पाककृती चांगली वाटते आहे. नक्कीच करून पाहीन.

आदूबाळ's picture

16 Mar 2015 - 4:15 pm | आदूबाळ

मिक्सर बदला.

पैसा's picture

16 Mar 2015 - 4:56 pm | पैसा

बदलला.

सूड's picture

16 Mar 2015 - 6:22 pm | सूड

कुकर बदला!! ;)

विवेकपटाईत's picture

17 Mar 2015 - 8:30 pm | विवेकपटाईत

मिश्रण च्या जागी चुकून मिक्सर लिहल्या गेले.

पैसा's picture

16 Mar 2015 - 4:53 pm | पैसा

मस्त पाकृ!

छान आहे पा. कृ

करून पाहीन --

रुपी's picture

17 Mar 2015 - 12:41 am | रुपी

कालच भरपूर उडीदवडे हादडले... आता अशी भाजी लवकर करून पाहणार!

आरोही's picture

17 Mar 2015 - 2:10 pm | आरोही

नवीनच प्रकार ...छान आहे ..

शिव कन्या's picture

3 Nov 2015 - 5:22 pm | शिव कन्या

तोंपासु. करणार.

शिव कन्या's picture

3 Nov 2015 - 5:23 pm | शिव कन्या

तोंपासु. करणार.

ही पाकृ प्रमोद तांबे यांनी फोटोसहीत उचलून फेसबूक वर "आम्ही सारे खवय्ये" वर टाकली आहे. विशेष म्हणजे फोटोखाली स्वतःचे नाव दिले आहे. त्यांनी आधीही कुणाची तरी पाकृ उचलल्याचे मध्ये वाचल्यासारखे आठवते.

हा फेसबूक पोस्टचा दुवा - https://www.facebook.com/AmhiSareKhavvaye/photos/pcb.1065439510238765/1065439416905441/?type=3&theater

ही उचलेगिरी थांबवायला आपण काही करु शकतो का?

चंपाबाई's picture

18 Sep 2016 - 12:57 am | चंपाबाई

सोने ते सोने आणि तांबे ते तांबे