शब्दभूली

यशोधरा's picture
यशोधरा in जे न देखे रवी...
23 Sep 2016 - 6:26 pm

अचानक कधीतरी,
तू उमलून येतेस.
काळ वेळ न पाहता,
राग लोभ न जाणता.

पापणीतल्या पाण्यात
कोणाच्या मुग्ध हास्यात,
चुकार निवांत क्षणी
कोण्या विस्कटल्या मनी.

शब्दांचा आधार घेतेस
तशी मौनातही बोलतेस
उलगडतेस, तरीसुद्धा
अलगद मिटू मिटू होतेस...

तुझा सूर, तुझा नूर
कधी फटकून दूर,
गूज जीवाचे सांगण्या
शब्द कधी महापूर.

सभोवताली वावरत रहा
शब्दांची नक्षत्रं पेरत,
गावा शब्दभूलीच्या जाईन
माग नक्षत्रांचा काढत.

कविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

23 Sep 2016 - 6:38 pm | जव्हेरगंज

दमदार!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2016 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2016 - 6:50 pm | प्राची अश्विनी

आवडली,
"शब्दभूल" किती वेल्हाळ शब्द आहे!!

पद्मावति's picture

23 Sep 2016 - 6:52 pm | पद्मावति

आहा! सुरेख.

प्रचेतस's picture

23 Sep 2016 - 7:53 pm | प्रचेतस

अतीव सुंदर

सौन्दर्य's picture

23 Sep 2016 - 8:00 pm | सौन्दर्य

सुंदर कविता.

टवाळ कार्टा's picture

23 Sep 2016 - 9:21 pm | टवाळ कार्टा

मला कवितेतले काही समजत नाही पण ही ठीक वाटली

पैसा's picture

23 Sep 2016 - 9:58 pm | पैसा

सुंदर कविता!

रातराणी's picture

23 Sep 2016 - 10:03 pm | रातराणी

सुरेख कविता!

नूतन सावंत's picture

23 Sep 2016 - 10:12 pm | नूतन सावंत

शब्द्भूलीतच अडकलेले आहोत आपण सारे.

नूतन सावंत's picture

23 Sep 2016 - 10:14 pm | नूतन सावंत

शब्दभूलीतच असे वाचावे कृपया.

अभ्या..'s picture

23 Sep 2016 - 10:20 pm | अभ्या..

सुरेख मैय्या,
फारच अप्रतिम उतरलीय शब्दभूल.
लिहित जा रेग्युलरली.

नीलमोहर's picture

23 Sep 2016 - 10:48 pm | नीलमोहर

तुम्ही कविता करता माहित नव्हते,
शब्दभूलीचे गाव, शब्दांची नक्षत्रं, नक्षत्रांचा माग, सगळंच सुंदर..

असेच म्हणतो..
सुंदर कविता!

मनिष's picture

23 Sep 2016 - 11:27 pm | मनिष

किती सुरेख आहे हे...

सभोवताली वावरत रहा
शब्दांची नक्षत्रं पेरत,
गावा शब्दभूलीच्या जाईन
माग नक्षत्रांचा काढत.

रुपी's picture

24 Sep 2016 - 12:05 am | रुपी

सुंदर!

कविता खूप तरल आहे. आवडली. यावरून याच्या अगदी विरुद्ध म्हणता येईल अशा आशयाची माझी एक इंग्रजी कविता आठवली. कधीतरी शेअर करेन.

अभिजीत अवलिया's picture

24 Sep 2016 - 1:18 am | अभिजीत अवलिया

कविता आवडली. म्हणजे शब्द आवडले. मला पण कविततेतला गूढ अर्थ बऱ्याचदा कळताच नाही.
अर्थात हे माझे अज्ञान किंवा 'ढ' पणा आहे.

कविता होण्याच्या, सुचण्याच्या जाणिवेबद्दल लिहिले आहे.

अभिजीत अवलिया's picture

26 Sep 2016 - 4:50 am | अभिजीत अवलिया

आता परत वाचल्यावर अर्थ लक्षात आला. भारी आहे.

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार.

मला कवितेतले काही समजत नाही पण वाचली एकदा

राजेंद्र देवी's picture

24 Sep 2016 - 8:22 am | राजेंद्र देवी

अप्रतिम.....आवडली

चाणक्य's picture

24 Sep 2016 - 9:03 am | चाणक्य

छान रचना.

सुरेख कविता.शब्दभूल पाडणारी!

Jabberwocky's picture

24 Sep 2016 - 9:54 am | Jabberwocky

छान...आवडली....

बोका-ए-आझम's picture

24 Sep 2016 - 10:45 am | बोका-ए-आझम

शब्दांचिया रानात
शब्दांचीच झाडे!
शब्दांचीच पाने!
शब्दांचीच फुले!
त्यांचीच शब्दभूल!

चांदणे संदीप's picture

24 Sep 2016 - 12:50 pm | चांदणे संदीप

आवडली!

Sandy

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Sep 2016 - 3:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वाह.. क्या बात!!

पिशी अबोली's picture

24 Sep 2016 - 3:51 pm | पिशी अबोली

नितळ आणि तरल!

मारवा's picture

24 Sep 2016 - 4:49 pm | मारवा

वाह !
आवडली.

वरुण मोहिते's picture

24 Sep 2016 - 4:50 pm | वरुण मोहिते

कविता आवडली

सस्नेह's picture

24 Sep 2016 - 9:22 pm | सस्नेह

बोका यांची अॅडिशनही आवडली.

नंदन's picture

24 Sep 2016 - 9:51 pm | नंदन

कविता आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2016 - 10:16 pm | अत्रुप्त आत्मा

फारच छान!

सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप आभार!
बोकोबा, खरंय.

कवितेच्या वाटेला फारसा जात नाही पण ही रचना आव्डली !

हिमालयीन कवयत्रीचा गो(वा)डुला अविष्कार

उल्का's picture

26 Sep 2016 - 2:55 pm | उल्का

सुंदर कविता!

शिव कन्या's picture

29 Sep 2016 - 5:40 pm | शिव कन्या

यशो!शब्दभावनांची आरास भावली एकदम!

शिव कन्या's picture

29 Sep 2016 - 5:40 pm | शिव कन्या

यशो!शब्दभावनांची आरास भावली एकदम!

भीडस्त's picture

29 Sep 2016 - 5:59 pm | भीडस्त

रेग्यांची 'कविता' आठवली

तिमा's picture

29 Sep 2016 - 6:16 pm | तिमा

कविता आवडली. कवितेला उद्देशून किंवा एखाद्या बोलक्या मैत्रिणीला उद्देशून, या अर्थाने पाहिली तरी चांगली वाटते. तुम्ही नेहमी लिहिलं पाहिजे.

राघव's picture

28 Dec 2017 - 4:06 pm | राघव

सुंदर!

स्वगतः ही रचना कशी सुटली ब्वॉ???

नाखु's picture

28 Dec 2017 - 5:28 pm | नाखु

खरं या वेळी उपस्थित नसल्याने​ दृष्टीस पडलीच नाही ही अप्रतिम कविता

कवितेतील औरंगजेब नाखु खालमाने

चांदणे संदीप's picture

29 Dec 2017 - 1:36 pm | चांदणे संदीप

इथेच वरती...

कवितेच्या वाटेला फारसा जात नाही पण ही रचना आव्डली !
हिमालयीन कवयत्रीचा गो(वा)डुला अविष्कार

येऊन गेलात तुम्ही... !

असो, यानिमित्ताने पुन्हा एकदा कविता वाचली. पुन्हा आवडली.

Sandy