भास...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जे न देखे रवी...
19 Sep 2016 - 6:38 pm

ओलावत नाहीत पापण्या,
भिजून जातात...
तुझे-माझे-आपले क्षण
नव्याने रूजून येतात...
संधिप्रकाश पसरतो
मनभर, आभाळभर...
समुद्रही उसळतो
स्वार होतो लाटांवर...
दिसू लागतो एक पुल
समुद्रात आकार घेणारा...
जाणवतो एक स्पर्श
हात हाती देणारा...
भास कुठला
हा की तो
कळत नाही...
नशीबाच्या मुर्ख रेषा
काही केल्या जुळत नाहीत...
उरतो उद्वेग, शरणागती...
वर्षं वर्षं उलटून जातात
तरी उरतात कशी नाती...

कविता

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

19 Sep 2016 - 6:45 pm | शिव कन्या

नशीबाच्या मुर्ख रेषा...... पटले...

पैसा's picture

19 Sep 2016 - 10:37 pm | पैसा

कविता आवडली.

चांदणे संदीप's picture

20 Sep 2016 - 6:56 am | चांदणे संदीप

आवडली!

Sandy

यशोधरा's picture

20 Sep 2016 - 7:49 am | यशोधरा

कविता आवडली.

रातराणी's picture

20 Sep 2016 - 8:29 am | रातराणी

सुंदर कविता!

छानच.. डोळ्यांपुढे चित्रे निर्माण होतात वाचताना..

माहीराज's picture

25 Sep 2016 - 10:54 am | माहीराज

शब्द संग्रह आणि मांडणी आवडली .. ..खुप छान ..

अंतरा आनंद's picture

25 Sep 2016 - 11:07 am | अंतरा आनंद

सुंदर. कविता आवडली.

Jabberwocky's picture

30 Sep 2016 - 4:28 pm | Jabberwocky

छान आहे कविता......

नीलमोहर's picture

1 Oct 2016 - 3:44 pm | नीलमोहर

नशीबाच्या मुर्ख रेषा
काही केल्या जुळत नाहीत...