छप्पन इंचाच्या ह्या 'उरी'
भोसकली अठरा इंची सुरी
बधिर मन ऐकून शब्दफुरफुरी
मानवत नाही श्रद्धा अन सबुरी
नेहमीच का आमच्या हातावर तुरी
का सहन कराव्या ह्या कुरबुरी
फोडून टाका तो जबडा आसुरी
चमकवा तोफा, बंदुका, कुकरी
माजवा हल्लकल्लोळ शत्रूच्या पुरी
न ठेवावी कोणतीच मोहीम अधुरी
होउदे जयघोष दाखवा बहादुरी
लढाईच ही अछ्छी वा बुरी
पुरे झाल्या हो त्या चर्चा संतुरी
मागतो अखंड विजयाची कस्तुरी
-संदीप डांगे
प्रतिक्रिया
19 Sep 2016 - 5:44 pm | अप्पा जोगळेकर
कविता म्हणून ठीक आहे.
प्रत्यक्ष कारवाई प्रभावी नियोजन आणि अनपेक्षित पणे व्हावी.
19 Sep 2016 - 5:49 pm | प्रसाद_१९८२
कवितेच्या आशयशी सहमत.
आता हातासारखे भारताने एक-दोन अणुबॉम्ब पाकिस्तान वर टाकुन हा किस्सा कायमचा संपवून टाकायला हवा.
19 Sep 2016 - 8:45 pm | निनाव
+1000
19 Sep 2016 - 9:27 pm | कैलासवासी सोन्याबापु
कविता मस्त आहे पण बाकी हिडीस आहे सगळे, इतके सोपे उरलेले नाही भेंडी काहीच. ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी अक्षरशः यमराजाचा येळकोट होईल, इतके मात्र नक्की सांगतो. वर्षोंवर्षे साचलेली भडास हताशा चीड अन संताप एक एक जवानात ठासून भरलाय राव, संपवून टाकायचा का नाही हा विषय ठरवावे राज्यकर्ते लोकांनी एकदाच आजी माजी सगळ्यांनी एकत्र बसून पण काहीतरी करावेच, वीट आलाय माxxxxपणाचा पाकड्यांच्या
19 Sep 2016 - 9:52 pm | माम्लेदारचा पन्खा
असेच म्हणतो...
19 Sep 2016 - 9:58 pm | खेडूत
+१०००
दिवसभर फार अस्वस्थता आलीय!
19 Sep 2016 - 10:04 pm | नितिन थत्ते
ही कविता वाचून ही जुनी कविता आठवली.
19 Sep 2016 - 10:21 pm | प्रचेतस
कवितेमागचा त्रागा, घटनेबद्दल मनात निर्माण झालेली चीड कितीही प्रामाणिक असली तरी कविता केवळ ओढूनताणून यमक जुळवल्यासारखी वाटली.
जम्या नही संदीपशेठ.
19 Sep 2016 - 10:25 pm | संदीप डांगे
तुमचं निरीक्षण अचूक आहे, कविता आमचा प्रांत नाही, धन्यवाद!
20 Sep 2016 - 6:39 am | चांदणे संदीप
कविता जोषपूर्ण आहे!
फक्त ते कुकरी ऐवजी "संगीनी दुधारी" हा शब्द चपखल बसला असता!
तुमची परवानगी असेल तर कायप्पावर वायरल करून टाकतो.
Sandy
20 Sep 2016 - 7:02 am | संदीप डांगे
चालेल!
20 Sep 2016 - 10:10 am | चांदणे संदीप
धन्यवाद!
20 Sep 2016 - 7:41 am | जोन
आशय उत्तम आहे!!!!!