पण नाही होत ना असं!
पण नाही होत ना असं!
आपण म्हणावं,
अंगणात जरा सुखाचं बी टाकून बघू,
फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकू,
मऊ गवतावर पडून राहू, डोळे मिटून.
पण नाही होत ना असं,
जमिनीतच होतं अदृश्य सगळं सुख
कुठेतरी एखाद्या बीला येतो कोंब
पण तोवर दुःखाचं तण माजलेलं असतं
मग आपणच खुरपणी करून
नकळत काढून टाकतो तो कोंब
न जाणो हेही असेल तणच!
आपण म्हणावं,
देण्यासारखं आहे काय? थोडं प्रेम देऊन बघू,
संवेदनाशून्य मनात शिंपडू थोडा मायेचा ओलावा
आयुष्यभर मग तेवत राहू समईसारखं शांत
पण नाही होत ना असं,
तुमच प्रेम कुणाच्या खिजगणतीतही उरत नाही,
फसवणुकीचे वार सहन करत निष्ठुर बनता तुम्ही
प्रेम विश्वास सगळं उरतं ते स्वप्नात आणि पुस्तकात!
तरीही पेटलीचं एखादी ज्योत चुकूनमाकून कधी
तर आपणच तिला विझवून सांगतो, कठोर हो!
न जाणो प्रेमळ असणं हाही असेल वीकपॉईंटच!
आपण म्हणावं,
धुमसत राहिलेल्या वेदनेला आतल्याआत संपवून टाकू,
उद्या येईल त्याला हसत हसत सामोरं जाऊ,
नसेल चंदेरी झालर तर आपणच विणायची एक
पण नाही होत ना असं,
वेदनेला जाळताजाळता आपणचं जातो पूर्ण जळून,
एवढं करूनही "ती" पूर्णपणे नष्ट होतच नाही,
किती केलं तरी शेवटी राखही उरतेच,
त्याच राखेत शोधत राहतो भविष्याच्या नवीन आशा
त्यांचीही तशीच राख होणार हे माहीत असूनही
न जाणो उद्याचा उद्या नसलाच तर?
खूप सुन्दर कविता.
सुंदर!
....
सहमत. नाही होत तसं.
सुरेख!
अप्रतिम लेखन
मस्त!
सुरेख कवीता.
मस्त
मस्त
अप्रतिम कविता.
छान कविता ! 1+
छानच... कविता आवडली...
फार सुन्दर कविता.
मस्त आहे कविता. अगदी
सुन्दर लिहिलय ग रातराणी !
फार सुंदर कविता.आवडली.
सुंदर कविता !
छान....आवडली.
सर्वांचे मनापासून आभार! :)
Class!!!!!!!!
कविता खूप आवडली, शेवट आशावादी
रातराणीतै फ्यान क्लब!
त्याच राखेत शोधत राहतो
आवडले
वेदनेला जाळताजाळता आपणचं जातो
सुंदर कविता आहे
सुरेख !
कविता सुंदरंच आहे!
सर्व वाचकांचे आणि
मस्तच. आवडली.
खूपच छान जमली आहे
मस्त ....
आवडली.
कविता आवडली.