एक रात्र मिठीतली.

आनन्दा's picture
आनन्दा in जे न देखे रवी...
14 Sep 2016 - 11:28 pm

खरेतर अश्या रोमँटिक कवितेचे विडंबन करावयास कीबोर्ड कचरत होता, पण शेवटी धीर करून टंकलो.. निनाव सर क्षमा करा.. प्रेर्णास्थान

आलो आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझिया आज पहा रे
आवरे वेग मज न अधिक आता
एकदाचा मज पडू दे ना रे...

निजले जग, निजले तारे
अंतर असे हे मिटले सारे
मिठीत तुझिया मी अवतरता
सागरासही उधाण आले

किती बरसलो मला कळेना
तरी मिठीतुन बांध फुटेना
मी तर सारा बरसून गेलो
तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे

आले विरह ते किरणांचे मज
कलह मनाचा काही शमेना
दरवळते अजुनी तिथले गंध,
पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे?

आलो आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझिया आज पाहा रे
आता तरी सांभाळ गड्या रे
मिठीतले घर सोडून जा रे.

विडंबन

प्रतिक्रिया

निनाव's picture

15 Sep 2016 - 1:11 am | निनाव

Bikul man mokale karoon liha...kalaji nasavi. :)
Tumhi kharech khoop jabbardast twist dile aahe hya kavites. Haha...manaapasoon aavadle Anand ji.

आनन्दा's picture

15 Sep 2016 - 9:21 pm | आनन्दा

धन्यवाद.

गामा पैलवान's picture

15 Sep 2016 - 1:24 am | गामा पैलवान

आनन्दा,

ही मिठी म्हणजे मुंबईतली मिठी नदी ना?

आ.न.,
-गा.पै.

इतके अचूक कसे काय ओळखले गा.पै :)

आनन्दा's picture

15 Sep 2016 - 9:21 pm | आनन्दा

हो.. हा "मिठी"चा श्लेष मला इतका आवडला की मला कविता पाडल्याशिवाय राहवेच ना.

प्रभास's picture

16 Sep 2016 - 11:11 am | प्रभास

भारीच विडंबन...