कुणी सल्ला देता का हो सल्ला?

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in काथ्याकूट
26 Sep 2008 - 10:51 am
गाभा: 

गेले काही दिवस नविन मोबाइल फोन घ्यायचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने शोधाशोध चालू होती. मी आयफोन साठी थांबलो होतो. मग आयफोन आधी अमेरिकेत लाँच झाला आणि २-३ दिवसात १० लाख आयफोन विकले गेले... जरा बरे वाटले की चला आता आपणही घ्यायला हरकत नाही. मग हळूहळू आयफोन बद्दल प्रतिकूल मतं यायला लागली. कोणी काही कोणी काही म्हणायला लागले... तेवढ्यात कोणी तरी म्हणाले ब्लॅकबेरी घे, नोकिया इ७१ घे... आणि काय काय. मी पुरता गोंधळून गेलोय. आमच्या राजेभाऊंचं मत आहे की ब्लॅकबेरी चांगला... दुसरा एक मित्र म्हणाला अरे पुढच्या वर्षी खूप नविन मॉडेल्स येत आहेत बाजारात, घाई करू नकोस आत्ता घ्यायची.

तेवढ्यात आज सक्काळी सक्काळी मेल मधे कोण्या एका दुष्ट मित्राने हे पाठवले.

From My Pictures

मग तर मी पारच ढेपाळलो... ~X(

तर मंडळी, कुणी सल्ला देता का हो सल्ला?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Sep 2008 - 10:54 am | अवलिया

माझे मत विचाराल तर काही दिवसांनी घ्या
कदाचित स्वस्त मिळेल
किंवा गरजच रहाणार नाही

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 10:56 am | जैनाचं कार्ट (not verified)

कदाचित स्वस्त मिळेल
किंवा गरजच रहाणार नाही

हा हा हा =))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:11 am | बिपिन कार्यकर्ते

नाना...

तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आज सकाळी वॉ.म्यु. ची खबर ऐकली... लोण पसरतंय... तुम्ही म्हणताय ती शक्यता वास्तवात बदलायला वेळ लागणार नाही बहुतेक... :(

बिपिन.

अवलिया's picture

26 Sep 2008 - 11:14 am | अवलिया

म्हणून सांगतो बाबांनो

खर्च कमी करा
कर्जात अडकु नका
बचत करा
एकाच बैंकेत सगळे पैसे ठेवु नका

कुछ भी हो सकता है..........कुछ भी

जान सलामत तो मोबाइल पचासऽ

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:27 am | बिपिन कार्यकर्ते

आपली मसलत शिरसावंद्य... म्हणताय ते खरं आहे.

बिपिन.

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 1:29 pm | जैनाचं कार्ट (not verified)

बिपिन हे बघ
http://money.cnn.com/2008/09/23/pf/job_impact/index.htm?postversion=2008...

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

श्रावणी's picture

26 Sep 2008 - 5:27 pm | श्रावणी

सहमत

विजुभाऊ's picture

26 Sep 2008 - 10:55 am | विजुभाऊ

राजेना विचारा.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:13 am | बिपिन कार्यकर्ते

भौ....

राजेंना इचारलंय ना... ते सांगायले की ब्लॅकबेरी घे म्हून.

बिपिन.

टारझन's picture

26 Sep 2008 - 11:44 am | टारझन

बिपीन भौ .. तुम्ही याला त्याला न विचारता "गटणे" ला विचारा. त्याने या प्रश्नावर गेल्या २-३ महिन्यात पिएच.डी. एवढा स्टडी केला आहे आणि मिपा वरल्या जवळ जवळ प्रत्येका कडून माहिती गोळा केली आहे. त्याच्याकडे तुम्ही विदा मागा.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

जैनाचं कार्ट's picture

27 Sep 2008 - 11:19 am | जैनाचं कार्ट (not verified)

http://www.nseries.com/products/n82/#l=products,n82 नोकिना एन८२ मस्त आहे आहे... युथ फोन !
ह्या मुळे सुविधा देखील खुप आहेत वजन ११४ ग्रम च्या आसपास आहे व बॅटरी बॅकअप जबरदस्त आहे !
पाच मेगापिक्सेल कॅमेरा तुम्हाला एकदम फोटोग्राफर बनवू शकतो
व हा वायफाय अनेबल फोन आहे, ह्यामुळे तुम्ही नॉर्मल वायरलेस नेटवर्क वर आरामात जुडू शकता व नेट सर्फिंग करु शकता (जसे एयर्पोर्ट वर नेट सर्फिंग फ्री असतं)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Sep 2008 - 10:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मीपण गेले काही दिवस नवीन फोन घेण्याचा विचार करत आहे. तेव्हा नोकियाची एन सिरीज घेऊ नकोस असं बर्‍याचदा कानावर आलं.
पण मला काही फार सोयी नको आहेत. कॅमेरा टाळता येत नाही, टाळलातर अगदीच जुन्या-पुराण्या प्रकारातला फोन येतो म्हणून तो मला चालणार आहे.
मला FM radio, mp3 support आणि decent (फार काही छान नसला तरी चालेल) camera एवढंच हवंय. शक्यतो नोकियाचाच विचार करत आहे कारण बाकीचे फोन्स नेटवर्क पकडत नाहीत, किंवा नोकियाएवढे चांगले नाहीत असं कानावर आलं आहे.
काही सूचना / सल्ले / माहिती?

अवलिया's picture

26 Sep 2008 - 10:59 am | अवलिया

शक्यतो नोकियाचाच विचार करत आहे
असे असतांना काय काही सूचना / सल्ले / माहिती देणार?

गणा मास्तर's picture

26 Sep 2008 - 11:14 am | गणा मास्तर

=)) =)) =)) - गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

मनिष's picture

26 Sep 2008 - 11:16 am | मनिष

ह्याच सुविधा हव्या असतील तर मग सोनी सगळ्यात चांगला - वॉकमन सिरीज चा कोणताही फोन घे -- साउंड क्वालीटी आणि लुक्स मधे सोनी खूपच पुढे आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Sep 2008 - 11:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्याच सुविधा हव्या असतील तर मग सोनी सगळ्यात चांगला - वॉकमन सिरीज चा कोणताही फोन घे -- साउंड क्वालीटी आणि लुक्स मधे सोनी खूपच पुढे आहे!

आत्ता सोनी एरिक्सनच आहे. पण तो डब्बा काही कामाचा नाही. मोबाईल म्हणून चार वर्ष जुना नोकिया त्याला मागे टाकतो. भरपूर प्रयोग करून झाले शेवटी निष्कर्ष एकच, नेटवर्कचं आणि या सोनी-एरिक्सनचं वाकडं आहे!
गाणी कॉपी होत नाहीत, झाली तर वाजत नाहीत. कॅमेरा आहे, कॉर्ड आहे पण फोटो कंप्यूटरवर कॉपी होत नाहीत. ब्लूटूथही कंप्यूटरवर दिसत नाही. आता बोला!
नुसत्या लुक्सचं काय करू हो? तसं असेल तर एक दगड घेऊन फिरते, बिपीनभौ म्हणतात तसं! तोही जास्त उपयोगी असेल या @#$%^&* डब्ब्यापेक्षा!

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:34 am | बिपिन कार्यकर्ते

तै... तुला सध्या खरं म्हणजे दगड जास्त उपयोगाला येईल. खफ ची संपादिका झालियेस ना... :)

=)) =))

मनिष's picture

26 Sep 2008 - 12:05 pm | मनिष

मग घे नवीन नोकिया खरच...६ महिन्यात बदलायला निघशील, मग बोलू. एन सिरीज विषयी तर तुला आधीच लोकांनी सांगितले आहे. बघ प्रयोग करून! ;)

नाहितर मोटोरोला घे हाय-एन्ड, ते पण लिनक्स वापरतात! :)

ऋचा's picture

26 Sep 2008 - 11:30 am | ऋचा

हा घे
हा चांगला फोन आहे.
स्वस्त आहे.
कीतीही वेळा पडला तरी काही होत नाही.
तुला ह्व्या त्या सगळ्या सोयी उत्तम आहेत यात.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 10:57 am | जैनाचं कार्ट (not verified)

http://shopping.indiatimes.com/ism/faces/tiles/catalogue.jsp?catalogueID...

गुमान ह्या पैकी एक घेऊन टाका !
मस्त आहे ... उपयुक्त आहे... !
सर्व सोयी आहेत... !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मनिष's picture

26 Sep 2008 - 10:58 am | मनिष

आयफोन १०१% नको घेऊस...बाकी थांबणार असशील तर सोनीचा X1 येतोय ३० तारखेला..१-२ महिन्यात भारतात मिळेल. नाहीतर मग HTC Touch चांगला आहे (स्लो आहे थोडा) किंवा बाकीचे बघ. मला नोकिया नाही आवडत... ई-७१ तर कॅल्कुलेटर वाटतो!

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 11:01 am | जैनाचं कार्ट (not verified)

>> ई-७१ तर कॅल्कुलेटर वाटतो!

=))

९३०० जेमेट्रीबॉक्स वापरलेला

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:14 am | बिपिन कार्यकर्ते

डिट्टेलवार माहिती कळंल का, एक्स१ ची?

बिपिन.

मनिष's picture

26 Sep 2008 - 11:22 am | मनिष

इथे वाचा -

http://www.tech2.com/india/news/smart/xperia-x1-launching-on-30th-septem...
http://sonyericssonxperia.com/
http://www.sonyericsson.com/cws/products/mobilephones/overview/x1

टेक-२ साईट उपयोगी आहे कारण परिक्षण भारतात केले जाते, आणि मॉडेल्स, किंमती ह्या पण इथल्या असतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:25 am | बिपिन कार्यकर्ते

बघतो...

मनिष's picture

26 Sep 2008 - 11:05 am | मनिष

इथे वाचा -
http://www.tech2.com/india/reviews/smart/iphone-3g/45281/0
कॉपी-पेस्ट सारखी अतिशय प्राथमिक सुविधा पण नाही.

@अदिती - नोकिया बद्दलची ही माहिती निदान १० वर्षे जुनी आहे (३३१५/७११० च्या कळातील)....नेटवर्क पकडणे इ. इ. प्रोब्लेम सध्या हाय एन्ड फोनला (तरी) कधीच येत नाही. आणि बहुतेक वेळा हे ऑपरेटरे चे प्रॉब्लेम असतात.

मनिष's picture

26 Sep 2008 - 11:13 am | मनिष

मी सोनी P1 गेले १३ महिने वापरत आहे (माझा आत्तापर्यंत सगळ्यात जास्त वापरलेला फोन) -- मला काहीही प्रॉब्लेम नाही. टच-स्क्रीन, पॉप मेल सपोर्ट, डॉक्युमेंट रीडर आणि राईटर ही (नोकिया मधे तेव्हा फक्त रीडर होते) आणि ३.१ मेगापिक्सेल कॅमेरा फ्लॅश सहित आणि १९२ एम बी मे्मरी असल्याने फास्ट आहे (तेंव्हा मी घेतलेल्या HTC Touch ला ६४ एम बी होती. आता त्यांनी १२८ केली आहे). मला आवडले हे मॉडेल - म्हणूनच मी
सोनी X1 ची वाट पाहतोय -- पहिल्यांदाच सोनी सिंबियन च्या ऐवजी विन्डोज वापरणार आहे. बिसनेस/स्मार्ट फोन घेतांना रॅम अवश्य बघावी नाहीतर २/३ ऍप्लिकेशन सुरू असला की फोन झोपतो -- खास करून विन्डोज फोन.

केवळ_विशेष's picture

26 Sep 2008 - 11:27 am | केवळ_विशेष

मी पाहिलेल्यामध्ये झकास फोन!

आता बहुधा मिळतच नाही...पी ९९० की असाच पी सिरिज मधला पण चांगला आहे...तो ही बहुधा मिळत नाही आता...

सखाराम_गटणे™'s picture

26 Sep 2008 - 11:14 am | सखाराम_गटणे™

मी हा घेतला आहे
http://www.gsmarena.com/lg_ks20-2105.php

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:16 am | बिपिन कार्यकर्ते

बरा वाटतोय... केवढ्याला?

सखाराम_गटणे™'s picture

26 Sep 2008 - 11:19 am | सखाराम_गटणे™

INR १६२०० ला
+ 1 GB card

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

केवळ_विशेष's picture

26 Sep 2008 - 11:18 am | केवळ_विशेष

रिक्वायरमेंट काय आहे?
तुम्ही कुठे वापरणार आहात?

त्यावर कुठल्या सर्विसेस हव्या आहेत?

वाय्-फाय हवं असेल तर ३जी / एचएसडीपीए ला पर्याय नाही.

पी.डी. ए घ्यायचा आहे की साधा?

पी.डी. ए मध्ये एच. टी. सी चांगला आहे...
मी स्वत: आय फोन च्या बाजूने नाही...

एसस काही लोकं आसूस म्हणतात तो ही चांगला असावा...
आयमेट पण चांगला आहे, मी स्वतः आयमेट पी.डी. ए वापरतोय, पण माझा जुना झालाय्...मी ही विचार करतोय नविन घेण्याचा आणि माझा कल एच. टी. सी कडे आहे...

सोनीएरिकसन ने अजून माझ्या मते तरी विन्डोज प्रणाली वर चालणारे फोन्स तयार केलेले नाहीत्...लवकरच आणतील असा अंदाज आहे.

ई-७१ तर कॅल्कुलेटर वाटतो! ...सहमत...

नोकिया...मी तर लै बोर झालोय वापरून्...माझ्याकडे एन-८० आहे...चांगला आहे फोन्...पण एअरटेल ची वाय्-फाय/जीपीआरएस सर्विस तेवढी चांगली नसल्यामुळे फोनचा तेवढ्या क्षमतेने वापर करता येत नाही

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:24 am | बिपिन कार्यकर्ते

मी सध्या आयमेट जॅम वापरतो आहे. वयोमानानुसार तो आता थकला आहे. अचानक झोपी जातो, मग सारखा सारखा जागा करावा लागतो. मला शक्यतो पीडीए सारखाच फोन हवा आहे. विंडोज मोबाईल ला पर्याय आहे का शोधत आहे. नसेल तर एचटीसी घ्यावा लागेल. राजेभाऊ ब्लॅकबेरी म्हणत आहेत म्हणून तो ही स्पर्धेत आहे. मनिष म्हणतोय तसं सोनी एक्स१ जर का विंडोज मोबाईल वर येत असेल तर थांबून बघतो.

अजून काय ऑप्शन्स?

मनिष's picture

26 Sep 2008 - 11:37 am | मनिष

HTC हे HP आणि i-Mate OEM होते, त्यामुळे नाव नवीन असले तरी प्रॉडक्टस जुने आहे. मागच्याच आठवड्यात त्यांनी HTC Touch चे नवीन मॉडेल्स आणलीत - ३.२ मेगापिक्सेल अऍटॉफोकस कॅमेरा (माझ्या १३ महिने जुन्या सोनी P1 मधे आहे - शिवाय फ्लॅश पण) आणि जस्त रॅम आहे..ते मॉडेल चांगले आहे पण अजून भारत्तात उप्लब्ध नाही - पण HTC Touch लुक्स मधे आय-फोन च्या तोडीस तोड आहे -- त्यातली हॅन्ड्रायटींग रेकग्निशन सुवुधा फार चांगली आहे.

सोनी P1 मधे बिझनेस कार्ड रिडर आहे -- ती एक फर उप्योगी सुविधा आहे, पेपर कार्ड वरील मजकूर स्कॅन करून तो लगेच कॉन्टॅक्ट डिटेल्स मधे साठवला जातो... ई-मेल, फोन, पत्ता, फॅक्स सगळे जागच्या जागी आणि कॉन्टक्ट फोटो म्हणून बिझनेस कार्डचा फोटो. मी ही सुविधा खूप अवापरतो आणि मला त्याचा खूप उपयोग होतो. जर विंडोज नको असेल (कींवा विंडोज नसलेले चालणार असेल) तर सोनी P1 घेता येईल. मी २२००० ला घेतला होता, अज तो १६००० पर्यंत असेल, शिवाय आता त्यात जी.पी. एस पण आहे म्हणे.

- (मोबाईल प्लॅट्फॉर्म साठी २००० सालापासून वॅप आणि सिंबियन, विंडोज प्रोग्रॅमिंग केलेला) मनिष

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:46 am | बिपिन कार्यकर्ते

मी दुबई मधे घेणार आहे फोन.

केवळ_विशेष's picture

26 Sep 2008 - 12:14 pm | केवळ_विशेष

सर्विस प्रोव्हयडर काय काय सेवा पुरवतो? मला माहीत नाही...

आयमेट जॅम (न्यू) चा एकच तोटा आहे...जो मी वापरतो, त्याला कीबोर्ड नाही...त्यामुळे चालता चालता/ट्रेन मध्ये वगैरे लघुसंदेश वगैरे लिहिणं अंमळ कठीण जातं स्टायलस च्या सहाय्यानं...

तुमची काय परीस्थिती आहे?

एच्टीसी मधे TyTNII नावाचं की बोर्ड वालं मॉडेल आहे...

ओएस बद्द्ल मनीष जास्त चांगलं सांगू शकतील्...पण आता विंडोज ६.१ आलय...

आयमेट जॅम सारखा फोन वापरल्यावर सोनी चा एक्स-१ लूक वाईज अपील होत नाही जरी त्याला किबोर्ड असला तरीही! आणि तो विन्डोज च्या कुठल्या फलाटावर चालतो हे सापडलं नाही...
मी मोबाइल आवड म्हणून घेतो आणि वापरतो...टेक्निकल डिटेल्स म्हणजे ६.०/६.१ मला डीटेल मधे सांगता येणार नाहीत...पण एक नक्की सांगू शकतो की ६.० पेक्षा ६.१ हे नविन असणार!

टारझन's picture

26 Sep 2008 - 12:27 pm | टारझन

अवांतर
दुबई सर्विस प्रोव्हयडर काय काय सेवा पुरवतो? मला माहीत नाही...
विशिष्ट सेवा पुरवतो :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मनिष's picture

26 Sep 2008 - 12:31 pm | मनिष

HTC चा TyTN II हा फार चांगला आहे असे म्हणतात, पण इथे फार महाग आहे (३०,०००+). मी Sony P1 घेतांन १० दिवस एवढा महाग फोन घ्यावा का हा विचार करत होतो (खर तर मी HTC Touch च्या प्रेमात पडून शेवटी मन घट्ट करून तो घेतला, पण आठवड्यातच त्याला प्रॉब्लेम आले म्हणून तो बदलून Sony P1 घेतला - Sony P1 दिसायला इतका अपिलिंग नाही, पण कामाला वाघ!). :D त्या आधीचा माझा सर्वात महाग फोन ११००० चा मोटोरोला रेजर होता. ;)

- मनिष
अवांतर - आजकालची नुकतीच नोकरीला लागलेली पोरं २०,००० -२५००० चा मोबाईल सहज घेतात बघून आश्चर्य/कौतुक वाटते. आम्हाला २००१ चे ले-ऑफ आठवतात अजून, त्यामुळे कमाई त्याच्य दुप्पट/तिप्पट असली तरी हिम्मत नाही होत असा खर्च करायची!

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 12:36 pm | बिपिन कार्यकर्ते

ले ऑफ...

आजकालची नुकतीच नोकरीला लागलेली पोरं २०,००० -२५००० चा मोबाईल सहज घेतात बघून आश्चर्य/कौतुक वाटते. आम्हाला २००१ चे ले-ऑफ आठवतात अजून

आताच्या पोरांना २००८-०९ चे ले ऑफ आठवतील. :) वर नाना काय म्हणताहेत ते वाचलं ना?

भाग्यश्री's picture

26 Sep 2008 - 11:50 am | भाग्यश्री

चांगली चर्चा चालू आहे! बरीच माहीती मिळत आहे..

कदाचित अवांतर असेल.. पण इंडीया मधे, VoIP असलेले फोन्स आहेत का? व्हॉइस चॅट,स्काईप चे कॉल्स फोन थ्रु करता येतात वगैरे सोय असलेले..?

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 11:59 am | बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री ताई, तुमची पण २ पैश्याची माहिती टाका इथे... या फोन ने लै वात आणलाय... मदत फ्रॉम एनी क्वार्टर इज वेलकमच...

भाग्यश्री's picture

26 Sep 2008 - 12:10 pm | भाग्यश्री

मला खरंच सद्ध्या काही माहीती नाही हो.. इथे अमेरीकेमधे येऊन मी माझ्या मोटो रेझरची साधी रिंगटोन सुद्धा बदलली नाहीए. बाकीच्या काही हाय टेक गोष्टी खूपच लांब.. सद्ध्या माझा मोबाईल केवळ फोन आहे. त्यामुळे नो इन्पुट्स फ्रॉम माय साईड, सॉरी! :(
व्हीओआयपी बद्दल विचारलं कारण मी शोधत आहे तशी काही सुविधा आहे का भारतातल्या फोन्स मधे. घरच्यांशी,मित्रमंडळाशी स्काईप थ्रु फोन वर फुकटात हवं तेव्हा बोलता येईल म्हणून! :)

सर्किट's picture

26 Sep 2008 - 12:02 pm | सर्किट (not verified)

फोन हवाय की इमेल बघायचे यंत्र ?

फोने हवा असल्यास नोकिया, आणि इतरही काही (इमेल, मेसेंजर, इंटरनेट वगैरे) करायचे असल्यास, ब्लॅकबेरी.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 12:06 pm | बिपिन कार्यकर्ते

बिझनेस फोन या कॅटेगरीतील हवा आहे. अजून तरी एचटीसी आणि ब्लॅकबेरी होते मनात आता मनिष सोनी एक्स१ म्हणतोय, तो पण आहे स्पर्धेत. इमेल्स, मेसेंजर इ. हवे आहेच. पण आयफोन खरंच एवढा बकवास आहे का हो?

सर्किट's picture

26 Sep 2008 - 12:18 pm | सर्किट (not verified)

आयफोन बकवास आहे. उगाच ऍपल ब्रँड बघून खिसा रिकामा करू नका.

ब्लॅकबेरी कर्व्ह सारखे सुख नाही दुसरे. पर्ल घेऊ नका, कीबोर्ड मोठा हवा, एका बटनावर एक अक्षर हवे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 12:17 pm | जैनाचं कार्ट (not verified)

पण आयफोन खरंच एवढा बकवास आहे का हो?

माझ्या मते नाही !

काही सुविधा आयफोनच्या एकदम मस्त आहे त व मला आज ही आयफोनचं आवडतो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सर्किट's picture

26 Sep 2008 - 12:22 pm | सर्किट (not verified)

ऍपल जेव्हा आय फोन मध्ये कट-पेस्ट अथवा कॉपी पेस्ट ची सुविधा टाकेल तेव्हा विचार करण्यात येईल. आणि काँट्रॅक्ट सकट ५० डॉलरच्या खाली किंमत येईल तेव्हा. तोवर स्टिव्ह जॉब्ज ह्या पॉकेटमाराला आमच्या खिशात हात घालू देणार नाही.

(ता. क. मला आय फोन फुकटात मिळाला होता कंपनीकडून, पण माझ्याकडे ब्लॅकबेरी असल्यामुळे मी तो दान केला. दोन्ही वापरण्याचा अनुभव आहे म्हणून सांगतो आहे.)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 12:25 pm | जैनाचं कार्ट (not verified)

ह्म्म्म!
हे खरं आहे !

पण सर्किट राव आम्ही तुमचाच सल्ला घेतला होता विकत घेत असताना ;)
बाकी मी तर तो कधीच विकला :)
ब्लॅ़कबेरी वापरत आहे सध्या !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

म्हणजे फोन लॉन्च झाला त्यावेळेस त्यासाठी लाइन वगैरे लावून वेळ घालवणारे बघितले...तेवढा चांगला तर नाहीच नाही...

मनिष's picture

26 Sep 2008 - 12:17 pm | मनिष

मी ब्लॅकबेरी वापरला नाही...पण मधे तो फेमस 'ब्लॅकबेरी पर्ल' पाहिला होता, मला नाही फार आवडला - आणि त्याचा की-बोर्ड वापरायला फार सुलभ वाटत नव्हता! आणि शिवाय इथे भारतात ब्लॅकबेरीवर बंदी असे काहितरी वाचल्याचे आठवते...

विसोबा खेचर's picture

26 Sep 2008 - 2:52 pm | विसोबा खेचर

हा हा हा!

बिपिनशेठ, आयफोनची सह्हीच करून टाकली आहे! :)

झकासराव's picture

26 Sep 2008 - 5:21 pm | झकासराव

हाय एन्ड मोबाइल्स बाबत आम्ही अगंठाबहाद्दर आहे.
पण तुम्हाला आलेली ती मेल मात्र जबरा आहे हा.
आयफोन ची किमंत जर १०००० असती तर मी तोच घेतला असता.
पण ३०००० + रु देवुन परवडत नाही.
पुढच्या महिन्यात घ्यायचा आहे मोबाइल.
बास साधाच हवा.
कॅमेरा असेल तर उत्तम. पण मग २ मेगापिक्सल कमीत कमी.
एफ एम आणि एम पीथ्री असणारा २ जीबी कार्डासहीत फोन घेइन.
बाकी फीचर फार कमी वापरात येतात हो.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आता आम्ही काय बोलणार...सगळेच हायफाय फोन वापरतात. आपण फक्त फोन बोलण्यासाठी वापरतो. नोकिया २६२६ :P
हरवला,पडला तरी दु:ख होत नाही.फक्त कॉन्ट्क्ट नंबर हरवल्यामुळे पंचायत होते.गाणी ऐकण्यासाठी आयपॉड २ जीबीचा.......आणि फोटो काढण्यासाठी सोनी सायबर शॉट ७.१ मे.पी. वापरतो. =P~ झक्कास काम आहे...
वेताळ

भडकमकर मास्तर's picture

27 Sep 2008 - 12:54 am | भडकमकर मास्तर

सगळा धागा वाचला...
बराचसा तांत्रिक भाग डोक्यावरून गेला.... लैच तांत्रिक गोष्टी आहेत आणि महाग सुद्धा...
इतकंच समजलं आणि ठरवलं...आता पुढचा फोन घेताना मिपाकरांना विचारून घेइन....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

केवळ_विशेष's picture

27 Sep 2008 - 12:25 pm | केवळ_विशेष

ठरलं की नाही अजून कुठला फोन घ्यायचा ते!