गुडगांव

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
8 Sep 2016 - 9:10 pm

आपणच खरवडून काढावे
आपल्या अजस्र जखमेवरच्या
अपक्व खपल्यांचे तुकडे....
तसं हे शहर

भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर
दिवास्वप्नांच्या भीतीने
टक्क जागे राहावे.....
तसं हे शहर

सागराचा थांग घेताना
अथांग व्हावे नदीने
अन् त्याचा माज करावा......
असं हे शहर

उत्फुल्ल पाण्यात
कळकट शेवाळी
तवंग तरंगावा.....
तेच हे नगर

एका पराभवातून अलगद
दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या
विजयाचा आनंदोत्सव....

.....गुडगांव

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

9 Sep 2016 - 12:08 am | चांदणे संदीप

कविता आवडली...!

Sandy

अभ्या..'s picture

9 Sep 2016 - 12:21 am | अभ्या..

बॅडगाव आहे म्हणा कि हे.
आवडली स्वामी कविता

तुषार काळभोर's picture

9 Sep 2016 - 6:33 am | तुषार काळभोर

पण गुडगाव कनेक्शन न कळल्याने वाईच कंफ्युज झालोय.

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2016 - 7:08 am | अभिजीत अवलिया

हा धागा दोनदा का आलाय?

http://www.misalpav.com/node/37289

स्वामी संकेतानंद's picture

9 Sep 2016 - 7:41 am | स्वामी संकेतानंद

कल्पना नाही ब्वा! इंटरनेटच्या गडबडीमुळे दोनदा प्रकाशित झाला असेल.

पथिक's picture

9 Sep 2016 - 9:42 am | पथिक

वा! आवडली !

हलकट बाब्या's picture

9 Sep 2016 - 11:28 am | हलकट बाब्या

कवितेचं शीर्षक गुरुग्राम करा हो, गुडगांवच गुरुग्राम केलंय हरियाणा सरकार ने.. उगीच भावना दुखवायला नको ;)

दिल्ली/नोइडाही चालेल ना?

स्वामी संकेतानंद's picture

11 Sep 2016 - 7:07 am | स्वामी संकेतानंद

बर्‍यापैकी चालू शकेल. पण या कवितेत दिल्लीतून गुडगाव उगवले आहे याचे हिंट्स आहेत, त्यामुळे दिल्ली गॄहीत धरली तर अजून वेगळ्या पद्धतीने त्या ओळी पहाव्या लागतील. अर्थात, एका कवितेचे वेगवेगळ्या दृष्टिकोणातून आकलन नक्कीच शक्य असते. दिल्लीवर माझी एक कविता आहे, पण ती हिंदीत आहे. कधीतरी मराठीत अनुवाद करून टाकतो. नोइडाचा फार अनुभव नाही मला, त्यामुळे नोइडावर थेट अशी कविता लिहीलेली नाही अद्याप.

पैसा's picture

9 Sep 2016 - 1:46 pm | पैसा

माणसांच्या जंगलात हरवलेलं शहर! शहर का जंगल म्हणावं हे! का मानवी भावनांचं वाळवंट?

जव्हेरगंज's picture

9 Sep 2016 - 3:30 pm | जव्हेरगंज

मस्त!!

ᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜ
jv
ᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜ

ज्योति अळवणी's picture

9 Sep 2016 - 6:11 pm | ज्योति अळवणी

नाही आवडली

नाखु's picture

10 Sep 2016 - 9:44 am | नाखु

आम्हाला आवडली (सगळी समजली नाही आणि सगळी समजलीच पाहिजे असा अट्टाहासही नाही,कधी कधी न कळण्यातही आनंद असतोच की)

का आवडली नाही त्याचे एक दोन घटक्/मीमांसा सांगा ही विनंती.

याचकाची पत्रेवाला नाखु

ज्योति अळवणी's picture

10 Sep 2016 - 9:32 pm | ज्योति अळवणी

नकारात्मक भावना जाणवते कवितेत. म्हणून नाही आवडली.

स्वामी संकेतानंद's picture

11 Sep 2016 - 7:04 am | स्वामी संकेतानंद

हाहाहा! कविता सकारात्मकच पाहिजे असे असते तर आपण पुष्कळशा अप्रतिम कवितांना मुकलो असतो. अख्खं विद्रोही साहित्यच गायब झालं असतं! हेहेहे!

ज्योति अळवणी's picture

11 Sep 2016 - 10:46 am | ज्योति अळवणी

कविता मला का आवडली नाही ते मी सांगितलं. एकूण विद्रोही किंवा नकारात्मक साहित्याची मीमांसा अपेक्षित आहे हे मला माहीत नव्हात. असो! चालुद्या

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Sep 2016 - 9:01 am | ज्ञानोबाचे पैजार

एका पराभवातून अलगद
दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या
विजयाचा आनंदोत्सव.

हा एक जबरदस्त षटकार आहे ह्या कवितेतला. वैश्विक सत्य वगेरे काय ते म्हणतात तसे.

बाकीच्या एकेरी दुहेरी धावाही आवडल्या

पैजारबुवा,

फेदरवेट साहेब's picture

11 Sep 2016 - 10:39 am | फेदरवेट साहेब

गुडगावात कुत्री असतात का हो? काय परिस्थिती आहे आमच्या समाजाची तिथे?

(अखिल भारतीय कलुंगी कुत्री संघटना, संस्थापक अध्यक्ष)

ढेल्या

विवेकपटाईत's picture

11 Sep 2016 - 4:51 pm | विवेकपटाईत

दिल्ली आणि गुरूग्राम दोघांचे वर्णन - एके ठिकाणी महानगर आणी दुसरीकडे मागासलेली गाव असे आहे. बाकी द्रोणाचार्यांचे गाव म्हणाल तर एकी कडे युवराज अर्जुन तर दुसरी कडे सूतपुत्र कर्ण. एकाच नगरात राहतात. पण गुरूग्राम अत्यंत महागडे शहर आहे, हे म्हणू शकतो. नौकरी साठी हजारोंच्या संख्येने दिल्लीकर गुरूग्राम येथे येतात.

शिव कन्या's picture

11 Sep 2016 - 10:52 pm | शिव कन्या

एका पराभवातून अलगद
दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या
विजयाचा आनंदोत्सव....

शहरीकरण होताना होणारे शहारीकारण.
अप्रतिम.