हिशेब
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे.
चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
(सत्यकथा नावे बदलून)
हिशेब
गाभा:
प्रतिक्रिया
3 Sep 2016 - 2:09 am | स्रुजा
शिवाय तिचा अविर्भाव तसा आहे हे खर्यां चं मत आहे. तुम्ही आम्ही नुसतंच वाचलंय. खरं बघता "डुटी" हा शब्द कुणी "काँट्रॅक्ट मध्ये आहे म्हणुन" या अर्थाने वापरणं अतर्क्य वाटतं, हा गमतीचाच भाग असण्याची शक्यता जास्त आहे. त्यात देखील दोघं मिळुन मुलाला फिरवायला नेत नाहीत हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो पण तिला घरी बसून काय काम आहे की तिने शनिवार रविवार पण आराम करावा हा सूर का बरं ?
3 Sep 2016 - 10:26 am | सुबोध खरे
स्रुजा ताई
तिला घरी बसून काय काम आहे की तिने शनिवार रविवार पण आराम करावा हा सूर का बरं ?
हे समजले नाही
3 Sep 2016 - 10:23 am | सुबोध खरे
spot on
3 Sep 2016 - 10:24 am | सुबोध खरे
हा प्रतिसाद खटपट्या भाऊंसाठी
4 Sep 2016 - 10:52 am | खटपट्या
मी कधी असं म्हणालो...
3 Sep 2016 - 2:08 am | अभिजीत अवलिया
+ इन्फिनिटी
3 Sep 2016 - 4:26 pm | अभिजीत अवलिया
बऱ्याच वेळा प्रतिसाद चुकीच्या जागी पडतात.
+ इन्फिनिटी हा प्रतिसाद पिरा ताईंच्या खालील कॉमेंट ला होता.
अच्छा म्हणजे तुम्ही धागा काढुन ---- फार आश्चर्य वाटत आहे..
2 Sep 2016 - 9:38 pm | कैलासवासी सोन्याबापु
+१०००!! आम्हाला कोणीतरी पेढे वगैरे बोलले होते मिळणार म्हणून ! म्हणून उगा टेकलो अंमळ! आम्ही नाय बाबा धागा विषयात काही बोललो!
1 Sep 2016 - 9:35 pm | अजया
पेढे देण्याची 'ड्यूटी' कोणाकडे आहे?
1 Sep 2016 - 10:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
ड्युटी =))
1 Sep 2016 - 10:04 pm | रेवती
बोलाचे पेढे आणि बोलाचेच सत्कार............
आम्ही एवढी प्रतिसाद मंडळे स्थापन करून बसलोय, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल कधी एक साखर्फुटाणा दृष्तीला पडला नैय्ये......
1 Sep 2016 - 10:01 pm | संदीप डांगे
बाकी, ते छिद्रांन्वेषी म्हणजे काय ते कोण सांगेल काय?
वरवर बघणारे किंवा फाटक्यात बोट घालून आणखी फाडून बघणारे कि अजून तिसराच काही अर्थ आहे?
1 Sep 2016 - 11:33 pm | खटपट्या
काय ठरलं मग ?
2 Sep 2016 - 12:05 am | स्रुजा
की पेढे खाऊनच हलायचं इथुन. सगळ्या शतकी धागा निर्मात्यांनी इथली जनता हालेपर्यंत आपले धागे काढु नयेत.
2 Sep 2016 - 12:08 am | खटपट्या
ओके, पण ती भाची बरोबर आहे? का तीचा नवरा बिचारा आहे?
मला वाटतंय की त्या तीन मोलकरणी सत्य परीस्थीती सांगू शकतील...
2 Sep 2016 - 12:14 am | रेवती
मग त्या तिघिंनाही पेढे द्यावे लागतील.
2 Sep 2016 - 12:28 am | स्रुजा
आणि त्या तिघी बायकाच असल्यामुळे आपण ते देऊच. "येथे पुरुषांवर अन्याय करुन मिळेल - समस्त स्त्री संघटना "
2 Sep 2016 - 12:45 am | संदीप डांगे
आधी त्यांच्या पगाराचे बघा, पेढ्यांचं नंतर बघू,
नऊ हजार रुपये? म्हणजे एकीला तीन... बापरे!
2 Sep 2016 - 12:57 am | स्रुजा
मग ! आराम स्वस्त नसतो..
2 Sep 2016 - 1:03 am | रेवती
अगदी! काय बात केलीस!
2 Sep 2016 - 1:33 am | कपिलमुनी
विकांतास नवरोबास या बायकांपासून लांब ठेवायचा असेल , पुरुषाची जात !! काय भरोसा =))
(ह घ्या)
2 Sep 2016 - 1:47 am | बोका-ए-आझम
कुठले पेढे - काका हलवाई, राजकोट, सातारी कंदी - निदान ते तरी ठरवा आधी.
2 Sep 2016 - 1:52 am | संदीप डांगे
एवढ्या हळू धागा चालला तर पेढे-बिढे विसरा,
आम्ही दिवसपाली वाल्यानी सव्वाशेवर पोचवला,
रातपालिवाल्यानं पाऊणशे करेस्तोवर तांबडं फुटल, तर कसं मिळायचं त्ये पेढं?
2 Sep 2016 - 2:04 am | स्रुजा
किती मेला तो पेढ्या - प्रतिसादांचा हिशोब कराल. आमची रात्रभर डुटी लावताय स्वतः झोपुन, किती आराम कराल?
2 Sep 2016 - 2:24 am | पिलीयन रायडर
खरंच करायचेत का २००?
मग तसे मुद्दे काढा की जरा..
पुढच्या हळदी कुंकु विमानाच्या डायवर सोबत पाठवुन द्या आम्चा पुडा. नेवार्कला उतरवुन घेऊ!
2 Sep 2016 - 3:21 am | खटपट्या
अहो पण कीती उगाळणार? मुद्दे संपलेत सर्व :)
2 Sep 2016 - 5:10 am | लीना कनाटा
चुकून हितेश वाचलं ...
वाटलं डॉक्टरकाकांनी हितेशचा हिशेब केला कि काय :)
अवांतर - डॉक्टरकाकांकडे नक्कीच शतकी प्रतिसादाचा कळफलक आहे (सुखी माणसाचा सदरा स्टाईलने वाचावे).
असा कळफलक द्या मज आणुनी
बडवीन मी जो स्वबोटांनीं
भेदून टाकीन सारी मिपा
दीर्घ त्याच्या त्या 'पिंका'ळीने
2 Sep 2016 - 8:45 am | संदीप डांगे
सुंदर, अतिसुंदर... 'दिर्घ पिंकाळी' हा शब्दसमुच्चय आवडल्या गेला आहे..
2 Sep 2016 - 8:51 am | नाखु
या आठवड्यातील अनमोल ठेव अजरामर जांभई आणि ही 'दिर्घ पिंकाळी'.
कोण म्हणतं मिपा मराठी साहीत्यात भर घालीत नाही,कुंपणापलिकडच्यांनो उघडा डोळे बघा नीट
मिपा वाचक नाखु
2 Sep 2016 - 8:58 am | अजया
फारच गंडला धागा.छ्यॅ! ना पेढे ना हाणामारी. पिंकाळी तेवढी हाताशी लागली :-/
2 Sep 2016 - 10:04 am | नीलमोहर
आम्हा मिपाबायकांना काहीही न करता, हातपाय न हलवता आयता पेढा हवाय,
चितळे वा धारवाडी, कंदी मलई साखरी जंबो गुलकंद चालेल.
2 Sep 2016 - 12:07 pm | अभ्या..
खरं सांगतो नीलमोहोर,
लै बेक्कार फिस्स्कन हसू आले.
.
आणि नुसती पेढ्याची अपेक्षा धरणे शोभत नाही हो आजकालच्या जमान्यात.
2 Sep 2016 - 12:17 pm | कैलासवासी सोन्याबापु
पेढा उचलून तोंडात टाकायला तरी हात हलवायलाच लागणार!
2 Sep 2016 - 12:25 pm | संदीप डांगे
तेवढे कष्ट तरी कशाला म्हणतो मी.. आम्ही भरवू की प्रेमाने,
-बिच्चारानवराकष्टकरीसंघटना.
2 Sep 2016 - 2:54 pm | नीलमोहर
ठरलं तर मग,
संध्याकाळी आपापल्या घरी जाऊन आपापल्या बायकांना आपल्याच हाताने पेढा भरवा सगळे,
बापूंना पर्याय की ते कुण्णालाही पेढा भरवू शकतात :)
( बाकी घरी सध्या एकही बाई नाही हो, त्यामुळे हात पाय हलवण्याला पर्याय नाही :)
2 Sep 2016 - 2:17 pm | सूड
वाईट्ट! =))
2 Sep 2016 - 3:04 pm | नीलमोहर
अभिजीत,
वाक्यात नसलेले अर्थ शोधता काय, द्वियर्थ प्रेमी दु दु कुठले,
:)
2 Sep 2016 - 5:58 pm | अभ्या..
तुम्ही असली वाक्ये मुद्दामून टाकताच कशाला?
दूदू कोंडके कुठल्या. ;)
2 Sep 2016 - 9:55 pm | स्रुजा
दू दू कोंडके :) :) :) :)
2 Sep 2016 - 9:56 pm | स्रुजा
बरं झालं निमो ला जाऊन +१ नाही करुन आले
2 Sep 2016 - 1:19 pm | बोका-ए-आझम
साखरी जंबो गुलकंद हा काय प्रकार आहे?
2 Sep 2016 - 3:10 pm | मारवा
साखरी जंबो गुलकंद हे सर्व
दवणे आणि कंपनीच्या पेढ्यांचे ब्रॅन्ड्स आहेत.
शिवाय शोरुम मधे तुम्ही आणायला गेलात तर तिथे
थोडा संख मारुन द्या थोडं सिसीलीया टॉपींग करुन द्या
तर आर्डर प्रमाणे चॉकलेट चुराही मारुन मिळतो.
2 Sep 2016 - 3:46 pm | नीलमोहर
चितळ्यांचे साखरी पेढे, जंबो म्हणजे छोटा लाडू साईजचे, गुलकंद नावाप्रमाणेच,
3 Sep 2016 - 12:26 am | बोका-ए-आझम
पेढे वाटायचे प्रसंग आयुष्यात अंमळ कमीच अाले, त्यामुळे या बाबतीतलं GK जरा कमी आहे!
3 Sep 2016 - 3:36 pm | नीलमोहर
कुणी दिले तर, नाहीतर खावे वाटेल तेव्हा आणायचे स्वतः जाऊन,
2 Sep 2016 - 1:37 pm | मारवा
श्री सोन्याबापु
आणि
श्री संदीप डांगे
यांच्या प्रतिसादांनी मोठा आनंद दिला.
त्यासाठी धन्यवाद.
बाकी पेढ्यात पेढा कुठला पेढा हा ही एक महत्वाचा विषय माहीत झाला
कंदी पेढे,
घोडके-चितळे-काका-बेळगाव पेढे (पुण्यनगरी)
आणि ते कुठलस एक गाव आहे हो तिथला पेढा पण नाव कन्फ्युजलोय कवरुन का काय कर्नाटकाजवळच्या सीमेवरील गावात
त्या गावाच्या नावाने चालतो तो पेढा
जास्त माहीत नाही
धाग्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यु न्युसन्स व्हॅल्यु पेक्षा जास्त आहे.
कुणा बाहेरच्याला पहील्यांदा मिपा वाचणारा हा धागा दाखवला तर त्याला व्हरायटीने प्रतिसाद व पेढ्यांच्या चक्कर येइल.
2 Sep 2016 - 1:59 pm | मोदक
ते कुठलस एक गाव आहे हो तिथला पेढा पण नाव कन्फ्युजलोय कवरुन का काय कर्नाटकाजवळच्या सीमेवरील गावात
ऐनापुरी पेढा.
2 Sep 2016 - 3:18 pm | मारवा
कुंथलगिरी चा पेढा फेमस आहे फार. मला वाटतं तो खवाच मुळात फेमस आहे.
खव्याला खोया ही म्हणतात त्यावरुनच खोया खोया चांद हे गाण आलेल आहे.
हे म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली अस एका गटासाठी तर दुसरा गट चंद्रातही खव्याचा गोडवा शोधतो.
ऐनापुरी ची व्हॅल्यु अॅडीशन करुन देण्यासाठी अनेक आभार.
2 Sep 2016 - 3:25 pm | संदीप डांगे
मी कुंथलगिरी सांगणार होतो पण तुम्ही कर्नाटक बॉर्डर म्हणालात म्हणून बिचकलो!
2 Sep 2016 - 3:39 pm | मारवा
ते गाव कुठ आहे नेमक तेच आता आठवत नाही नाव युनिक आहे म्हणुन
थोड कुंथुन झाल्यावर आठवल
फार पुर्वी एकदा या गावावरुन गेलो होतो इतकच आठवतय
कुठे आहे हे गाव ?
2 Sep 2016 - 3:42 pm | संदीप डांगे
बीड ते बार्शी च्या मधोमध आहे.
2 Sep 2016 - 3:45 pm | मोदक
..आणि ते बॉर्डरला वगैरे नाहीये.
मारवाजी.. तुम्हाला हिशेब चुक्याच. ;)
2 Sep 2016 - 5:57 pm | अभ्या..
ते जैन् साधू कुंथुनाथामुळे कुंथलगिरी म्हणून प्रसिध्द आहे.
जवळच उजनी म्हणून एक गाव आहे तेथे सुंदर खवा अन बासुंदी मिळते. एरीयात खूप खवाभट्ट्या आहेत.
3 Sep 2016 - 12:28 am | बोका-ए-आझम
हे आत्मूगुर्जींच्या कुठल्याशा लेखात/कवितेत वाचल्याचे आठवते.
3 Sep 2016 - 12:30 am | अभ्या..
नको बोकेशा. इस्टॉप इथेच.
बुवांना माहीत नव्हते त्यावेळी.
2 Sep 2016 - 3:23 pm | कपिलमुनी
तात्पर्य : इथून पुढे कोणी काका मामानी माहिती विचारली की जपून द्या , शकयतो कमीच द्या
2 Sep 2016 - 3:26 pm | मोदक
ते ठाण्याचे एक मिपाकर साहेब तुमचे काका / मामा आहेत त्यांना उद्देशून आहे का हे..?
2 Sep 2016 - 3:33 pm | माम्लेदारचा पन्खा
कस्लं काय घिऊन बस्लाय राव.....ह्ये आनिक कुटून कळलं तुमास्नी ?
2 Sep 2016 - 3:47 pm | कपिलमुनी
माझा कोणी काका मामा नाही
3 Sep 2016 - 9:07 am | नाखु
मी कुणाचा काका, मामा (झालेलो) नाही हे का लिहिले नाहीस हातासरशी...
सुचवणी काका नाखु
2 Sep 2016 - 3:27 pm | संदीप डांगे
किंवा सरळ म्हणा, "तुम्हाला काय करायचा हो भोचकपणा?"
आम्ही तर असेच म्हणतो, म्हणून आमच्याकडे भोचकपणा करणारे येतंच नाहीत. तेवढाच 'आराम'!!
(तो अविनाश कुलकर्णींचा कावळे वाला धागा जस्ट आत्ता आठवला.. शप्पथ!)
2 Sep 2016 - 3:30 pm | अनिरुद्ध.वैद्य
मुलाला सांभाळायची ड्युटी हा शब्द आजकाल सर्रास वापरला जातोय खासकरुन आयटीमध्ये.
त्यात काहीही हिशोबीपणा नाही, फक्त जार्गन आहे. मुलीला सांभाळणे फिरायला घेऊन जाणे आदी.
नवाआई, बाळाला सांभाळतेय म्हणुन कैक नवबाबा चहा नाष्टा करायला शिकलेत.
2 Sep 2016 - 6:09 pm | चिनार
बाकी पेढ्यांच म्हणाल तर आमच्या अकोल्याजवळ कापशी नावाचे एक खेडे आहे. तिथल्या पेढ्यासारखा पेढा आजवर खाल्ला नाही. अप्रतिम..
कारण माहिती नाही पण तो कंदी पेंढ्यांइतका फेमस नाहीये. शिवाय तो कापशीच्या बाहेर कुठेही मिळत नाही.
संदीप अन बोका भौ..तुम्ही खाल्ला असेल कदाचित
2 Sep 2016 - 6:19 pm | संदीप डांगे
हाय की नाही.. मंग म्हंता मले बोलता म्हणुन...! अवं आमची शिक्रेटं फोड्याच्या कामावर लावलं हाय काय कोणं तुमाले शिक्रेट एजंट चिनारभौ?
कापशीचा पेढा आणि वाघोली (गांधीग्राम) ची चिक्की >> आमी गुळपट्टी म्हंतो त्याले >> लय फेमस आहे. पण फक्त आकोल्यातच. वाघोलीची गुळपट्टी लोणावळ्याले भारी पडते अर्ध्या राती. लोणावळ्याची लय फेमस म्हणून चिक्की खाल्ती पैल्यांडाव, तवा म्हणो अबे ह्याच्यापेक्षा खतरा तं माली माय बनोते, आमच्या इकडे घराघरात अशा गुळपट्ट्या हमेशाच बनोतात, त्याच काय खास व्हय काय म्हाईत. ह्या पुण्यामुंबईवाल्याईचं आपल्याले काय समजत नाही राजेहो.
कसं आहे, आम्ही आमचे सिक्रेट जपून ठीवतो, म्हणुन चव टिकून रायते, अन् तुम्ही फोडा. कुटी न्याच्या लाइकीचे नै चिनार भौ तुम्ही! आता अमरावती-आकोल्यात खादाडीची ठिकाणे असा धागा काढा तेच तुम्हाले शिक्षा.
3 Sep 2016 - 12:30 am | बोका-ए-आझम
वा वा! आत्या बनवायची आम्ही भाचरं गेलो अकोल्याला की! कापशीचे पेढे खाल्ल्याचं आठवत नाही. तसंही गोड आणि माझा फार संबंध नाहीये.
3 Sep 2016 - 10:03 am | चिनार
आवं कोन्या जमान्यात रायता तुम्ही संदीप भौ...तुमची शिक्रेट आता शिक्रेट नाही ऱ्हायले..इथं डाबकी रोडचं नाव BBC वर चमकू ऱ्हायलं त कापशीचे पेढे का म्हून मांग ऱ्हायतीन?..अन अकोल्याचे पोट्टेच त बोंबलते कापशीचे पेढे ,कापशीचे पेढे म्हून...
3 Sep 2016 - 10:11 am | कैलासवासी सोन्याबापु
त्या बाकीच्या गंजाले आग लावा फनकटाच्या!!, डाबकी रोड काहाले बीबीसी वर आला थे सांगा
3 Sep 2016 - 10:18 am | चिनार
अहो ते लय जुनी बात हाय बाप्पू...92-93 च्या दंगलीत अकोला पेटलं होतं..तेंव्हा BBC वर डबकी रोडवरचं फुटेज दाखवलं होतं असं ऐकून हाय..
3 Sep 2016 - 11:15 am | संदीप डांगे
चला, पुण्यात आता कापशीचे पेढ्यांची आणि वाघोलीच्या गुळपट्टीचं दुकान टाकाले हरकत नाही. कोथरुड भागात पाऊन ठेवा एकांदा गाळा..
3 Sep 2016 - 12:30 pm | चिनार
हे पाहून घ्या आता..मंग म्हंता मले बोलता म्हून..
आमचावाला बिझीनेस प्ल्यान कायले साऱ्यासमोर मांडता..कॉम्पीटीशन येते ना राजेहो मंग..
तुम्हाले म्हून सांगतो..कापशीचे पेढे, गुळपट्टी,समोसे नं गिला वडा, सांबारवडी, भाकरी नं मिरच्याची भाजी असा फुलफ्लेज हॉटेल टाकायचा प्लॅन हाय..
3 Sep 2016 - 8:06 am | कैलासवासी सोन्याबापु
कापशीचे पेढे!!!! गांधीग्राम वाघोली ची गुळपट्टी !!!!!!!
नका नका रे दुष्टांनो असले शब्द वापरू माझे कोमल हृदय भग्न होते आठवणीने, अहाहा!!! अकोटल जाताना पावभर गुळपट्टी घेणेग चोहोट्टा बाजारला खल्लास गरम भजे अन खुरासनी मिरच्या त्या खाल्ल्या का गाडीचा एसी 5 वर करून गुळपट्टी खात तोंड गार करणे! सगळीच मजा.
3 Sep 2016 - 10:47 am | बोका-ए-आझम
जहाल असते काय एकदम? हा शब्द ऐकलेला नाही. खुरासन्यावी चटणी माहिती आहे.
3 Sep 2016 - 10:58 am | चिनार
म्हणजे बहुतेक तेलात तळलेल्या आणि मीठ लावलेल्या जहाल मिर्च्या
3 Sep 2016 - 11:48 am | कैलासवासी सोन्याबापु
लवंगी मिर्चीला खुरासनी म्हणतात वऱ्हाडीमध्ये, तुम्ही जी खुरासनीची चटणी म्हणता आहात त्या काळ्या तेलबिया असतात कारळ्याच्या त्यालाच नाशिक बागलाण खानदेशात खुरासनी म्हणतात, आपल्याकडे ही एक हिरवी मिर्ची असते, बोटाच्या दीड पेरा इतकी लंबी, भयानक म्हणजे भयानक जास्त तिखट, नागा चिली अन सिक्कीमीज दले खुरसानी मिर्ची नंतर भारतात तरी हिचाच नंबर लागत असावा, गुंटूर चिली मार्केट मध्ये प्रसिद्ध आहे ही मिर्ची. तिकडे ही मिर्ची इंडस्ट्रियल वापराकरता खरेदी विक्री होते (तेल, भुकटी स्वरूपात अर्क काढून चिप्स, पॅक नमकीन निर्मात्या कंपन्यात वापरायला) , ही मिर्ची कांडप मशीनमध्ये घालून पाहायचा प्रयोग करणारा माणूस दोन महिन्या करता टेम्पररी आंधळा झालेला मी स्वतः पाहिलाय, अश्या ह्या मिरच्या हिरव्या असताना मात्र अतिशय मस्त लागतात चवीला (अर्थातच जहाल तिखट) थोड्या मिरच्या बचकभर लसूण जिरं अन सांबार पाने वापरून तुफान ठेचा बनतो ह्या मिरच्यांचा :)
3 Sep 2016 - 11:29 pm | बोका-ए-आझम
3 Sep 2016 - 11:29 pm | बोका-ए-आझम
नंतर कराचीमधला मुक्काम फारच लांबला होता! ;)
2 Sep 2016 - 8:08 pm | वामन देशमुख
काय तरी चर्चा चाललीय बै!
पेढा म्हणजे आोठ तर मग लाडू म्हणजे काय?
2 Sep 2016 - 9:44 pm | अभ्या..
बोट
2 Sep 2016 - 10:12 pm | कैलासवासी सोन्याबापु
आरा गप की मुडद्या
2 Sep 2016 - 10:12 pm | कैलासवासी सोन्याबापु
आरा गप की मुडद्या
2 Sep 2016 - 10:34 pm | अभ्या..
गपलो.
.
.
पेढे दे की.
2 Sep 2016 - 9:51 pm | मुक्त
डॉ. तुमच्या भाचीने एवढ्या जवळ घर घेतले तरी तुम्हाला माहित नाही.
तुम्हाला घरभरणीला बोलावले नाही का.
2 Sep 2016 - 9:58 pm | सुबोध खरे
अहो सक्खी नाही म्हणून तर दुरूनच पाहतो आहे.
2 Sep 2016 - 10:04 pm | अभ्या..
तरीच.....
2 Sep 2016 - 10:02 pm | स्रुजा
लोल.. कुणाचं काय तर कुणाचं काय.
2 Sep 2016 - 10:08 pm | पिलीयन रायडर
आता वाटायचे का पेढे?
कोण नक्की म्हणलं होतं म्हणे पेढे वाटेन म्हणुन?
2 Sep 2016 - 10:12 pm | मोदक
कोण का म्हणेना.. मी तुला पेढे देतो.
इकडे ये आणि घेवून परत जा.
3 Sep 2016 - 1:23 am | पिलीयन रायडर
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!!!
;)
3 Sep 2016 - 1:23 am | पिलीयन रायडर
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!!!
;)
2 Sep 2016 - 10:09 pm | मुक्त
चला पेढे येऊ द्या.
2 Sep 2016 - 10:10 pm | सूड
झाले एकदाचे २००, धागा फॉलो करतच आहात तुम्ही "पेढ्यांचं प्रॉमिस करणारे". काढा पेढे, गेला बाजार तुमच्या त्या गौरीशंकरच्या पेढ्यांचा फोटो टाका!!
2 Sep 2016 - 10:17 pm | संदीप डांगे
अरे आता खरी ग्रीप पकडली धाग्याने, काल आम्ही फुंकून फुंकून छातीचे भाते मोडले, तेव्हा काय पेटला नाय, आताशा जरा धूर निघतोय,
2 Sep 2016 - 10:19 pm | मोदक
२०१४ ला अडवाणींनी हाच विचार केला असेल.. आम्ही इतक्या खस्ता खाल्ल्यानंतर आता कुठे पार्टीला अच्छे दिन आले.
:))
2 Sep 2016 - 10:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
=)) लैच खंग्री कॉमेंट सुचली होती मोदक भाऊ पर बस आप हमारे अपने हो करके आवऱ्या ;)
2 Sep 2016 - 10:47 pm | मोदक
टाका की इथे बापू.. टाईमपासच सुरू आहे. :))
नैतर व्यनीत टाका मग...
2 Sep 2016 - 10:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
नगं नंतर पहाय यिल
2 Sep 2016 - 10:35 pm | संदीप डांगे
झालं का...!? तेवढंच राहिले होते... ;)
2 Sep 2016 - 10:38 pm | अभ्या..
दोनहजारचौदामे हमने खाया खस्ता
तभी मिला तुमको पेढेपरका पिस्ता
.
कवि: पेढाबॉक्स पाठवले
2 Sep 2016 - 10:17 pm | नीलमोहर
पेढे देण्याची आश्वासने देणाऱ्यांनो, मिपाजनता माफ नहीं करेगी !!
कुणी वाटेना तर हे माझ्याकडून, ५ महिन्यांनंतर एकदाची कामवाली बाई मिळाल्याबद्दल.
#feelinglucky
2 Sep 2016 - 10:17 pm | कैलासवासी सोन्याबापु
सर्वांनी लायनीत या पोरींची रांग अलग आहे!
2 Sep 2016 - 10:32 pm | अभ्या..
च्यायला पेढ्यावर पण मोदी.
लाटकर(हेमंत नाही, सातार्यातले) आहेत ना जिवंत अजून?
2 Sep 2016 - 10:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
नमो यत्र तत्र सर्वत्र आहेत ;)
2 Sep 2016 - 10:43 pm | संदीप डांगे
रे सुलतान!
3 Sep 2016 - 4:45 am | लीना कनाटा
जाहीर निवेदन
आमच्या असे निदर्शनास आले आहे कि आमच्या जिलबीची मिप्लिकेट जिलबी पाडली गेली आहे आणि या जिलबीची मिपार्केट मध्ये राजरोस विक्री चालू झाली आहे.
तरी तमाम मिपापडीक रिटे सदश्यांना सूचित करणेत येत आहे कि आमचीच जिलबी वरिजनल असून वाचताना किंवा पिंकाळी टाकताना आमच्या जिलबी वर मिपा 'सु' प्रसिद्ध ३'D' 'खरा'मार्क असल्याचा 'बोध' घेऊन खात्री करावी हि णम्र इनंती.
या व्यतिरिक्त आमच्या वारिजनल जिलबी वर खालील बाबींचा ठळक उल्लेख तपासून पाहावा :-
१/ आमच्या जिलबीची इतरत्र कोठेही शाखा नाही
२/ आमची जिलबी दुपारी १ ते ४ बंद राहील
३/ आमची जिलबी खाण्यासाठी... सवारी वाचण्या साठी स्वतःचा पीसी/टॅब/मोबाईल नेटपॅक सह असणे आवश्यक आहे.
४/ पिंकाळी साठी स्वतःचा कळफलक वापरावा. आमचा सहस्त्र अद्यतनयी कळफलक अज्याबात मिळणार नाही.
५/ आमच्या जिलबी वरचा मिठायांचा उल्लेख जसे कि धारवाडी मोदी पेढे, दवणे आणि कंपनीचे कंदी मलई साखरी जंबो गुलकंद इति आदी तपासून पाहावा.
आपल्या 'स्नेहा' चा 'अंकित' असललेला पिंकाभिलाषी जिल्बीकार
3 Sep 2016 - 7:21 am | आदूबाळ
पण पाकृच्या पुस्तकाचं नाव भाचीला का ठेवलंय??
(चारशेला बर्फी असावी म्हणून एक हातभार.)
3 Sep 2016 - 8:09 am | कैलासवासी सोन्याबापु
एक प्रतिसाद दिलंत आबा! बर्फीचा फक्त फटू किंवा सुवास मिळेल अश्याने!
3 Sep 2016 - 9:11 am | रेवती
पेढे जाऊ देत, निदान खडीसाखर तरी हातावर ठेवा की!
3 Sep 2016 - 10:35 am | सिरुसेरि
हे mcp म्हणजे काय ? आणी त्या माजोरड्या, आलशी, ऐदी, ऐतखाउ नव-याचे पुढे काय होते ?
3 Sep 2016 - 11:13 am | सुबोध खरे
http://womenshistory.about.com/cs/60s70s/g/gl_mcp.htm
3 Sep 2016 - 2:59 pm | पूर्वाविवेक
1. पण ती घरी बसून आहे म्हणजे पूर्णपणे रिकामी आहे का? कदाचित ती 'वर्क फ्रॉम होम' करत असेल. ती लेखन करत असेल. तिचा कुठला तरी छंद असेल तर त्याला वेळ देत असेल. ब्लॉग लिहीत असेल. काहीतरी शिकत असेल, मग ते ऑन लाइन शिक्षण असू शकत. सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहुण्यांना बसत सांगत नाही.
माझा सुद्धा ब्लॉग आहे. मला त्यासाठी दिवसातले किमान 1-2 तास खर्च करावे लागतात. अर्थात मला माझ्या कामातून मला तेवढाच वेळ मिळतो. मला माझ्या ब्लॉग मधून कुठलाही आर्थिक फायदा मिळत नसेल तर मी हे जा जो वेळ माझ्या ब्लॉगसाठी घालवतेय तो व्यर्थ आणि बिनकामाचा आहे. माझ्या ब्लॉग बद्दल म्हणाल तर माझ्या कित्येक नातेवाईकांना, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना सुद्धा माहित नाही कि मी ब्लॉग लिहिते. अगदी माझ्या घरी येणाऱ्या कामाच्या बाईलाही माहित नाही. मग लोकांच्या मते मला जे दिवसातले 3-4 तास वेळ असतो तो लोळण्यात घालवते असा होऊ शकतो. माझा नवराही दिवसातले 12 तास बाहेर राहून त्याला शक्य असेल तेवढी मदत मला करतो.
2. आणि तिने गंमतीने म्हटले असेल कि आज त्याची 'ड्युटी' तर तुम्ही एकदम जजमेंटल कसे होऊ शकता?
ज्या अर्थी बाप-लेक एकी कडे फिरायला गेले होते आणि मग तुमची भाची दुसरीकडे एकटीच निरुद्देश, निरर्थक भटकत होती का? तिचेही काहीतरी काम असू शकत. एकीकडे असं म्हणता कि त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे. तर मग अश्या कुठल्याही बाईला संध्याकाळी नवऱ्याला सोडून एकटं फिरावंस वाटेल का? ती नाही त्यांच्या सोबत फिरायला जाणार.
3. चिन्मयला ऋजुताला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे. असं तुम्ही म्हणता तर मग त्यालाच असं वाटत असेल की आपला सगळं वेळ लेकीसाठी खर्च करावा. न्हाऊ-माखू, जेवू-खाऊ घालावं. ती तुमची लांबची भाची असावी कारण तुमहाला माहीतच नव्हते की ती कुठे राहते ती. तुम्ही अनायासे दिसलात म्हणून तुम्हाला तिने घरी नेलं. म्हणजेच त्या दोघांच्या सगळ्या गोष्टी ती तुम्हाला सांगत बसणार का? आणि का सांगाव्या?
4. मला दोन मुली आहेत. छोटीच दात घासण्यापासून सगळं करावं लागत. दात घासताना ती मला खूप त्रास देते. मग मी पण माझ्या नवऱ्याला रात्रीचे तिचे दात त्याने घासावे अशी 'ड्युटी' लावली आहे.
5. ज्याला मुलांची आवड आहे त्याला हे ओझे आहे असे वाटणार नाही.....अगदी बरोबर. लहान मुलांचं करायला खूप मज्जा येते. शाळेत न जाणारी मुले तर आई सोबत 24 तास असतात. कितीही मुलांवर प्रेम असलं आणि हौस असली तरी कधी कधी कंटाळा येतो. वाटतंच की काही तास निवांत रहावं, एकटं रहावं. ज्या स्त्रिया यातून गेल्या आहेत त्यांना हे नक्की कळेल. मुलांना एकट्या आईन सांभाळणं सोप्प काम नाही. पूर्वी एकत्र कुटुंबात मूळ कशी मोठी व्हायची कळायचं पण नाही असं म्हणतात, ते का ते कळलंय आता.
3 Sep 2016 - 3:04 pm | चिनार
सहमत...
3 Sep 2016 - 3:09 pm | संदीप डांगे
अतिशय सहमत!!
3 Sep 2016 - 3:29 pm | सुबोध खरे
अहो ताई
तिने म्हटलं ते गमतीनं नाही आणि ती कोणतेही "वर्क फ्रॉम होम" करत नाही.
नवऱ्याने मुलीला सांभाळणे आणि पूर्ण दोन दिवस तूच "सांभाळलं पाहिजे" यात मूळ फरक नाही का?
ती लेखन करत असेल. तिचा कुठला तरी छंद असेल तर त्याला वेळ देत असेल. ब्लॉग लिहीत असेल. काहीतरी शिकत असेल, मग ते ऑन लाइन शिक्षण असू शकत. सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहुण्यांना बसत सांगत नाही.
ब्लॉग लिहिणं किंवा छंद जोपासणं हे काम कसं म्हणून शकता? नवऱ्याला नसेल का करावसं वाटत तसंच उरलेल्या दोन दिवसांत?
ब्लॉग लिहिणं लेखन करणं ऑन लाईन शिक्षण करणं हे जर नवऱ्याने उरलेल्या दोन दिवसात केलं तर त्याला तुम्ही काम म्हणाल का?
मग तर त्याची परिस्थिती ओझ्याच्या बैलापेक्षा वाईट आहे.
तिने ड्युटी म्हणाली ते गमतीने अजिबात नाही. मी आणि बायको दोघांनाही ते अजिबात तसे वाटले नाही. ते गमतीने असेल तर धाग्याचे प्रयोजनच राहत नाही हि स्पष्ट गोष्ट आहे.
तुम्ही केवळ स्त्रीवादी दृष्टिकोन घेऊन तसे गृहीतच धरून टाकलं आहे
शाळेत न जाणारी मुले तर आई सोबत 24 तास असतात.
इथे ती मुलगी शाळेतही चार तास जाते हा वेळ तिला संपूर्ण स्वतःसाठी आहे.कारण घरातील सर्व कामासाठी बायका लावलेल्या आहेत. आता असे म्हणून नका कि चार तास बायकांच्या मागे जाण्यात जातात.
तुम्ही वैयक्तिक बाबतीत बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित नाहीत हे लिहिता आहात तसे नाही त्यांच्या वैयक्तिक गोष्टी जालावर येऊ नयेत म्हणून मी त्या इथे लिहीत नाही याचा अर्थ असा नाही कि त्या मला माहित नाहीत.
रुचिराच्या "बाजूने" बोलण्यासाठी तुम्ही काहींच्या काही गृहीतके धरून बोलत आहेत एवढेच मी म्हणेन. ती आळशी आहे आणि काहीही करीत नाही हे मला व्यव्स्थितपणे माहित आहे एवढेच मी म्हणेन.
3 Sep 2016 - 4:58 pm | पूर्वाविवेक
रुचिराच्या "बाजूने" बोलण्यासाठी तुम्ही काहींच्या काही गृहीतके धरून बोलत आहेत एवढेच मी म्हणेन. ती आळशी आहे आणि काहीही करीत नाही हे मला व्यव्स्थितपणे माहित आहे एवढेच मी म्हणेन......... तिच्या बाजूने बोलायला ती माझी भाची नाही. तुम्हाला एवढा राग येतो आहे तर ती तुमच्या या कथित गोष्टीची खलनायिका आहे का?
ती आळशी आहे ......हे तुम्हाला माहित आहे. तर मग तुम्हाला अजून काय सिद्द करायचे आहे?
तुम्ही सगळ्या तिच्या गोष्टी इथे सांगितल्या नाहीत का तर तुमहाला प्रायव्हसी जपायची आहे. मग कशाला हा धागा काढलाय?
त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे, तिच्या नवऱ्याला त्यात काही चुकीचे वाटत नाहीये. मग तुम्हाला या गोष्टीचा एवढा त्रास का होतो आहे? तिच्या नवऱ्याने अथवा सासरच्या मंडळींनी तुमच्याकडे तक्रार केली होती काय? तुमच्या घरातल्या गोष्टी आम्हाला सांगून तुम्हाला काय हवे आहे? अश्या गोष्टी म्हणजे गॉसिप पेक्षा काय वेगळ्या आहेत काय?
आणि जर ती असेलही तशी आळशी, कामचोर तर तो तिचा आणि तिच्या नवऱ्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. यात दुसऱ्याने ढवळाढवळ करण्याचा प्रश्न येतोच कुठे?
तिने ड्युटी म्हणाली ते गमतीने अजिबात नाही. मी आणि बायको दोघांनाही ते अजिबात तसे वाटले नाही. ते गमतीने असेल तर धाग्याचे प्रयोजनच राहत नाही हि स्पष्ट गोष्ट आहे.....तुम्हाला दोघांना वाटलं नाही म्हणजे नाहीच का?
तुमच्या धाग्याचा उद्देश काय ? तिच्या उदाहरणावरून तुम्हाला समस्त घरात राहणाऱ्या स्त्रियांना एका तराजूत तोलायचे आहे का? का फक्त तिलाच नाव ठेवायची आहेत? मग स्वतःच फ्रस्टेशन चारचौघात कशाला?
एकाच धाग्यात तुम्ही इतकी टोकाची वेगवेगळी वक्तव्ये कशी करू शकता?
मागील धाग्यात पण तुम्ही एका मुलीला केंद्र स्थानी ठेवून तुमच्या मनाने तिला 'आरोपी'च्या पिंजऱ्यात ठेवून मोकळे झालात. आता या धाग्यात तुमच्या कथित भाचीला. तुम्ही म्हणजे काय न्यायालय आहेत काय? प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते.
आणि मी स्त्रीवादी दृष्टिकोन ठेवून लिहिते असं तुम्हाला वाटत तर मग तुमचा धागा काय दर्शवतो? पुरुषी अहंकार.
मी संपादक मंडळाला विनंती करते कि असे स्त्री विरोधी, स्त्रीत्वाचा अपमान करणारे, बुरसट विचारसरणीचे धागे उडवून टाका. खरंच का आपण फुले-आगरकरांच्या महाराष्ट्रात राहतो आहोत?
इतर अनेक जणांनी म्हटल्या प्रमाणे धाग्याचे टीआरपी वाढवणे हा या धाग्याचा आणि अर्थात तुमचा एकमेव उद्देश आहे. समान निंदा- स्तुती मानुनी वाढुया टीआरपी.
त्यामुळे अजून प्रतिसाद देऊन मला तुमच्या उद्देशात सामील व्हायचे नाही.
3 Sep 2016 - 6:29 pm | टवाळ कार्टा
लै भारी, सविस्तर प्रतिसाद नंतर वेळ मिळाल्यावर लिहितो,आत्ता पार्वती करायला जातोय :)
3 Sep 2016 - 6:31 pm | टवाळ कार्टा
चायला "पार्टी"चे "पार्वती" होते मोबाल्यावरच्या गुगलच्या कीबोर्डने =))
3 Sep 2016 - 6:31 pm | अभ्या..
काय करायला जातोस बे? पार्वती?
शंकर कधी झाला?
3 Sep 2016 - 8:43 pm | सुबोध खरे
पूर्वा ताई
तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबण्याचे काय कारण?
तुमच्या धाग्याचा उद्देश काय ? तिच्या उदाहरणावरून तुम्हाला समस्त घरात राहणाऱ्या स्त्रियांना एका तराजूत तोलायचे आहे का? का फक्त तिलाच नाव ठेवायची आहेत? मग स्वतःच फ्रस्टेशन चारचौघात कशाला?
धाग्याचा उद्देश अशाही स्त्रिया आहेत ज्या सालस नवऱ्याला वेठीस धरतात. संसारात केवळ हिशेब करून चालत नाही.
यात माझे फ्रस्ट्रेशन कुठे दिसले? हि काही माझ्या बायकोची कहाणी नाही.
मी संपादक मंडळाला विनंती करते कि असे स्त्री विरोधी, स्त्रीत्वाचा अपमान करणारे, बुरसट विचारसरणीचे धागे उडवून टाका. खरंच का आपण फुले-आगरकरांच्या महाराष्ट्रात राहतो आहोत?
यात कुठे स्त्रीविरोधी स्त्रीत्वाचा अपमान करणारे वक्तव्य आहे? बुरसट विचारसरणी म्हणजे काय?
आपण केवळ स्त्रीच्या जन्माला आलो म्हणजे आपण झाशीची राणी झालो असे समजणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा जरा कुणी वस्तुस्थिती दाखवली कि पहा हे पुरुष पुंगव आमच्यावर कसा अन्याय करतात असा टाहो फोडतात.
ब्लॉग लिहिणं किंवा छंद जोपासणं हे काम कसं म्हणून शकता? नवऱ्याला नसेल का करावसं वाटत तसंच उरलेल्या दोन दिवसांत?
हे लिहिला म्हणून तुमच्या शेपटीवर पाय पडला का? पण माझ्या नवऱ्याला नसेल का करावसं वाटत या प्रश्नच उत्तर आपण खुबीने टाळलंत.
इतर अनेक जणांनी म्हटल्या प्रमाणे धाग्याचे टीआरपी वाढवणे हा या धाग्याचा आणि अर्थात तुमचा एकमेव उद्देश आहे. यात ७०-८० प्रतिसाद हे केवळ पेढा बर्फीवर आहेत ज्याचा या धाग्याशी काहीही संबंध नाही. आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला मी प्रत्युत्तरही दिले नाही किंवा माझे उपप्रतिसाद संख्येने मर्यादित आहेत.
आणि हा टी आर पी ते माझ्या कंपूबाजीमुळे आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमच्या विचारसरणीचा दोष आहे असे मी म्हणेन.
धाग्यात असणाऱ्या विचाराचा आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसाद संख्येचे काहीही संबंध नाहीत.
3 Sep 2016 - 8:53 pm | सतिश गावडे
यातला "किंवा"च्या आधीचा अनुभव खुप वेळा येतो; अगदी इथे मिपावरही ;)
3 Sep 2016 - 8:55 pm | संदीप डांगे
ओ काडी पैलवान! ;)
3 Sep 2016 - 11:38 pm | बोका-ए-आझम
तुम्ही धाग्याच्या आधीच एक disclaimer द्यायला हवा होता की या धाग्यातलं उदाहरण म्हणजे सर्व स्त्रियांवर आणि पुरूषांवर आणि त्यांच्या कामाच्या वाटपावर आणि निर्णयांवर शेरेबाजी आहे असं समजू नये. हे फक्त एक उदाहरण आहे आणि ते त्याच स्वरूपात घेतलं पाहिजे - उदाहरण. त्याची theory बनवणं म्हणजे सरसकटीकरण होणारच - दोन्हीही बाजूंनी.
3 Sep 2016 - 11:57 pm | संदीप डांगे
असे डिस्क्लेमर म्हणजे हा धागा शंभर टक्के गॉसिप आहे असे धागाकर्त्याने स्वतःहून कबूल करण्यासारखे आहे.
4 Sep 2016 - 12:18 am | सुबोध खरे
people believe what they want to believe
4 Sep 2016 - 12:40 am | संदीप डांगे
अगदी अगदी,
तुमच्या भाचीबद्दल तुम्हीही तेच करत आहात, वरुन हा कोट जिथे जिथे टाकत आहात, शहाजोगपणा म्हणावा काय हा?
4 Sep 2016 - 1:00 am | सुबोध खरे
कशावरुन
उचलली जीभ लावली टाळ्याला.
इथे लिहीलेल्या चार शब्दावरुन ओपिनियन देत आहात.
चार बुकं अजून वाचा आणि मग अभिप्राय द्या.
उगाच आर्ध्या हळकुंडाने पिवळे.
4 Sep 2016 - 1:27 am | संदीप डांगे
>> people believe what they want to believe
>> people believe what they want to believe
people believe what they want to believe
people believe what they want to believe
4 Sep 2016 - 10:36 am | सुबोध खरे
ब्वॉर
3 Sep 2016 - 5:42 pm | चित्रगुप्त
डॉक्टर साहेब, आजच्या आपल्या सामाजिक जीवनात घडून येत असणारे बदल आणि त्याबद्दलची तुमची निरिक्षणे मननीय आणि मनोरंजक असतात. कुणाचे बरोबर वा चूक असा विचार त्रयस्थांनी करण्यात खरेतर अर्थ नसला, तरी असे विचार प्रत्येकाच्या मनात येत असतातच, हेही खरे.
हे वाचून नकळत माझ्या नजरेसमोर मी बघितलेल्या आजकालच्या काही नवविवाहिता तरळून गेल्या, आणि लिहायला बसलो.
मग ते इथे लिहीण्याऐवजी एक नवीन धागाच काढला:
हिशेब हिशेबाचा
http://www.misalpav.com/node/37206
3 Sep 2016 - 5:59 pm | चंपाबाई
चक्क सहमत !
3 Sep 2016 - 6:26 pm | टवाळ कार्टा
चंपाबाई या चक्क डॉक्टर खऱयांशी सहमत, अजि म्या ब्रम्ह पाहिले :)
4 Sep 2016 - 8:23 am | झेन
हे वैयक्तीक नाही तर समाजातल्या सध्याच्या ट्रेंड बद्दल आहे
प्रत्येक वेळी निगेटिव पत्राच्या द्र्ष्टीकोनातून घटनेकडे बघणे (उपेक्षितांचे अंतरंग) हे आजकाल विद्वत्तेचे लक्षण समजले जाते आणि त्यासाठी कुठलीही गृहितके धरणे, सकारत्म पात्रांकडे अन्याय करणाऱ्या खलनायकासारखे बघाणे, सिलेक्टिव्ह अँड कन्विनिएंट रिडींग बिटवीन द लाइन हे कौशल्य असावे लागते. त्याला जर प्रस्थापित/विस्थापित , जातीय समीकरणे, स्त्री स्वातंत्र्य, शेतकरी आत्महत्या वगैरे असला तडका दिला ना कि मग रेसिपी जमून येते.
.....आशुतोष बघा संदीप कुमारचा कसा बचाव करतो
4 Sep 2016 - 8:57 am | कैलासवासी सोन्याबापु
"समाजाचे ट्रेंड" काढायला पूर्ण सांख्यिकीशास्र फाट्यावर मारून , इव्हनिंगवॉक वर आलेली भाची पाहून निष्कर्ष काढणे ह्यातच काय ते ह्या धाग्याचे सार सामावले आहे, बाकी पात्र "negative" असल्याचा निष्कर्ष मजेशीर आहे, वैयक्तिक अनुभवाला सामाजिक लेव्हल पर्यंत सत्यच समजण्याच्या वृत्तीवर हसावे का रडावे हे तर आतापर्यंत कळत नव्हतं मात्र स्वतः रिडींग बेटवीन द लाईन्स करून स्त्रियांचे प्रश्न ते शेतकरी प्रश्न ह्यांना तडका म्हणून सर्टिफाय करणाऱ्या बृहस्पती वृत्तीचेही आश्चर्य वाटते!
4 Sep 2016 - 10:51 am | चंपाबाई
मोगाखान मोड ऑन..
एक बायको व तीन मोलकरणी ! त्यापेक्षा धर्म बदलून चार बायकाच केल्या असत्या तर जास्त सुखी झाला असता ना?
4 Sep 2016 - 12:13 pm | शाम भागवत
शनिवार रविवार चार बायकांची चार पोर सांभाळायची?
काहीही हं.
4 Sep 2016 - 12:16 pm | संदीप डांगे
चार बायकांची चारच पोरं? बहुत छोटा खयाल है जनाब..!
4 Sep 2016 - 12:26 pm | चंपाबाई
मी संभाळीन
4 Sep 2016 - 1:18 pm | सुबोध खरे
@ चंपाबाई
घरचं झालं थोडं नि
व्याह्या नं धाडलं घोडं
4 Sep 2016 - 1:39 pm | संदीप डांगे
तीव्र सहमती!
4 Sep 2016 - 12:28 pm | अभ्या..
जरा खयालोकी नर्सरी बनने दो. छोटे छोटे खयालोंकी टीमे बनाकर मॅच होने दो. तो आयेगा मजा.
4 Sep 2016 - 12:34 pm | संदीप डांगे
ओय मेरे मिपा के गुलजार! =))
4 Sep 2016 - 12:50 pm | हेमन्त वाघे
त्या नंतर मुलगी धर्म कार्यासाठी इशरत जहाँ सारखी शाहिद झाली किंवा इसिस वाल्या पुरुषांच्या "सेवेत " गेली कि मज्जाच मज्जा !!
आपण या दृष्टीने ट्रैनिंग सुरु केले असेलच नाही का मोगा खान ??