हिशेब
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे.
चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
(सत्यकथा नावे बदलून)
हिशेब
गाभा:
प्रतिक्रिया
1 Sep 2016 - 11:57 am | अभ्या..
डॉक, फ्रँक्लि स्पीकींग. तुम्हाला यशस्वी जीवनाची आणि यशस्वी धाग्याची गुरुकिल्ली गावलीय.
1 Sep 2016 - 12:04 pm | खेडूत
:)
अशेच म्हणतो. आन त्या दोन्हीही किल्ल्या एकाच की चेनला लावल्या आहेत!
.
.
.
बाकी भाच्या तेव्हढ्या स्टोर्या. हिशेब कुणी/ कसा लावावा?
1 Sep 2016 - 1:15 pm | nashik chivda
+१
1 Sep 2016 - 7:15 pm | Rahul D
अनुमोदन
1 Sep 2016 - 7:15 pm | Rahul D
अनुमोदन
1 Sep 2016 - 12:10 pm | गणामास्तर
कसल्या कसल्या बायका असतात राव.
1 Sep 2016 - 12:14 pm | कंजूस
नाकात दोरी घालून घेण्याच्या अगोदर ( आज पोळा)लग्नाची गरज फक्त मलाच आहे हे कधीही जाणवून देऊ नका सर्व नवीन वळुंनो.
1 Sep 2016 - 12:43 pm | अप्पा जोगळेकर
या वाक्यात थोडीशी सुधारणा इतकीच करेन की लग्नानंतरही लग्न टिकवून ठेवण्याची गरज फक्त मलाच आहे हे जाणवून देऊ नये.
1 Sep 2016 - 7:44 pm | योगेश कोकरे
अप्पा ,,,खूप अनुभव घेत्तलेला दिसतोय ,,,,,,,अवांतर : एक धागा काढा कि ,,,,"मीच का"?
2 Sep 2016 - 10:59 am | अप्पा जोगळेकर
साहेब, माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसण्याचे कारण नाही.
1 Sep 2016 - 12:20 pm | जव्हेरगंज
च्यायला..
1 Sep 2016 - 12:27 pm | वामन देशमुख
हे सर्वात महत्त्वाचे!
1 Sep 2016 - 12:40 pm | टवाळ कार्टा
बघूया इथे बहिष्कार पडतो कि अणुयुध्ध होते =))
1 Sep 2016 - 2:22 pm | कपिलमुनी
बहिष्कार पडणार !
युद्ध स्वतःच्या जमिनीवर करायचा नस्ता हे 'त्यांना' माहित आहे =))
1 Sep 2016 - 12:44 pm | सामान्य वाचक
रामतीर्थकर madam च्या cd द्या
1 Sep 2016 - 12:58 pm | विशुमित
आयोव..!! याडंच लागल...!!!!
1 Sep 2016 - 12:45 pm | अप्पा जोगळेकर
मागे एकदा एका धाग्यावर 'शहरी स्त्रिया शेफारल्या आहेत तर खेड्यातील स्त्रिया अन्यायग्रस्त जीवन जगत आहेत' असा प्रतिसाद दिला होता त्याची आठ्वण झाली.
1 Sep 2016 - 12:47 pm | माम्लेदारचा पन्खा
गणपतीआधीच ढोलताशे वाजणार आहेत इथे !
1 Sep 2016 - 12:49 pm | अजया
हाच काय तो जगप्रसिध्द सालस आय डी ;)
1 Sep 2016 - 12:53 pm | मोदक
डॉक.. असे पब्लीकली सांगायचे नसते हो.
बाकी फांदीवर जागा धरून आहे.
1 Sep 2016 - 12:55 pm | विशुमित
एक वेळ धुणी-भांडी परवडली पण लहान मुले सांभाळणे तसे खूप जिकिरीचे. मुलं सांभाळणे म्हणजे फक्त त्याला खाऊ पीयु घालणे, कपडे बदलणे, त्याच्याशी खेळणे एवढंच नसून सतत डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणे आलं.
भाचे जावई नोकरी करतात म्हणजे खूप मोठे तीर मारत असतील असे मी मानत नाही.
बाकी चालू द्यात...!!
1 Sep 2016 - 7:52 pm | सुबोध खरे
एक वेळ धुणी-भांडी परवडली पण लहान मुले सांभाळणे तसे खूप जिकिरीचे. मुलं सांभाळणे म्हणजे फक्त त्याला खाऊ पीयु घालणे, कपडे बदलणे, त्याच्याशी खेळणे एवढंच नसून सतत डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणे आलं.
उलट आहे. मी माझ्या मुलीचे बालपण खरंच एन्जॉय केलं. तिला जेवण भरवण्यापासून अंघोळ घालण्यापर्यंत सर्व काही मी आनंदाने केले. यात मला कुठेही ओझे किंवा काम वाटले नाही. ती चालायला लागल्यावर घरातील सामान चार फूट उंच ठेवायला लागले इ गोष्टी मी आनंदाने केल्या. काच सामान फुटण्यापेक्षा तिला लागेल या काळजीने. दुर्दैवाने मुलगा लहान असताना मी समुद्रात होतो. त्यामुळे त्याच्या बरोबर मला तितका वेळ देता आला नाही हि खंत आहे.
ज्याला मुलांची आवड आहे त्याला हे ओझे आहे असे वाटणार नाही.
1 Sep 2016 - 8:19 pm | मुक्त विहारि
+ १
2 Sep 2016 - 12:50 pm | पक्षी
Make it two
2 Sep 2016 - 11:00 pm | भटक्य आणि उनाड
हे खर आहे.. त्याला तोड नाही...
1 Sep 2016 - 1:03 pm | प्रभाकर पेठकर
प्रेम संपतं तिथे व्यवहार सुरु होतो. अपल्यात तशी परिस्थिती तर निर्माण झालेली नाही नं हे आधी दोघांनीही तपासून पाहावे.
त्या आठवडाभर मुलीला सांभाळत असतील तर त्यांच्या नवर्याने बायकोच्या खुशीसाठी शनिवार-रविवार मुलीला सांभाळावे. पण त्यालाही, 'ड्यूटी' लावून का द्यावी लागावी? मुलीला सांभाळणे हे मनापासून आणि प्रेमाने न होता बायकोच्या खुशीसाठी का करावे लागावे? जाता जाता असेही सुचवावे वाटते की त्या दोघांनीही तीन पैकी दोन कामवाल्या कमी कराव्यात. हाताशी कांहीच काम नसले की डोके सैतानाचे घर होते. मुलांच्या वाढीत आई-वडील दोघांचाही सहभाग 'मनापासून' असावा, ड्यूटी म्हणून नाही. लहान मुले आजूबाजूच्या प्रत्येक बारीकसारिक गोष्टीची नोंद घेत असते. आपल्याला जाणवले नाही तरी तान्ह्या बाळाचेही आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष असते आणि ते नोंद घेत असते. एरवी स्वतःच्याच आनंदात खेळत (दुपट्यावर पडल्यापडल्या 'सायकल' चालविणारा) माझा तान्हा मुलगा आम्हा दोघांत कांही कारणावरून चढ्या आवाजात वाद्विवाद झाला तर आमची नजर टाळून, आढ्याकडे दूर भयभित नजरेने पाहात राहायचा. हे मी अनुभवले आणि आम्ही वादविवाद कमी केले. शाळेच्या वयापासून तर मुलं त्यांच्या मित्रांचे आईवडील आणि स्वतःचे आईवडील ह्यांची मनातल्या मनात, नकळत, तुलना करीत असतात.
बालपणापासून घरात सतत प्रेमाची उब जाणवली तर मुलेही प्रेमळ होतात आणि सतत व्यवहार अनुभवत आली तर त्यांचे स्वभावही रुक्ष आणि व्यवहारी बनतात. घरात सतत भांडणं चालली असतील तर मुलेही एकलकोंडी आणि आत्मकेंद्रीत बनतात.
असो.
सांगण्याचा उद्देश एव्हढाच की कोणीतरी (जमल्यास तुम्ही आणि/किंवा तुमच्या पत्नीने) भाची आणि जावईबापूंना ह्या गोष्टी वेळीच समजवून्/पटवून द्याव्यात. कामाची वाटणी एकमेकांवरील प्रेमातून व्हावी, एकमेकांबद्दलच्या आदरातून व्हावी, हा संसार आपला आहे ह्या भावनेतून व्हावी. कोणाची काय ड्यूटी आहे? मी तुमच्यासाठी काय करतो? मी तुझ्यासाठी काय करते? ह्या विचारांना थारा नसावा.
1 Sep 2016 - 1:13 pm | विशुमित
नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये त्रयस्ताने पडू नये--- इति आमच्या आईसाहेब
1 Sep 2016 - 7:18 pm | सुबोध खरे
नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये त्रयस्ताने पडू नये--- इति आमच्या आईसाहेब
विशुमित साहेब
आमच्या ही आईसाहेब हेच म्हणतात
1 Sep 2016 - 1:18 pm | मुक्त विहारि
एक नंबर प्रतिसाद...
1 Sep 2016 - 1:32 pm | अजया
पेठकरकाकांचा प्रतिसाद आवडला.
1 Sep 2016 - 1:47 pm | gogglya
शतशः सहमत...
1 Sep 2016 - 1:54 pm | रघुनाथ.केरकर
+१
1 Sep 2016 - 7:16 pm | सुबोध खरे
पेठकर साहेब
रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे. चिन्मयला ऋजुता ला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे.आणि मुलगी बापाबरोबर दोन दिवस मजेत सगळ्या गोष्टी करत असते.
केवळ आमच्या भाचीच्या तोंडून हा "ड्युटी" शब्द आल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले.
उगाच त्यांच्या सुखी संसारात मी कशाला काडी घालू म्हणून मी "मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का?" हे ओठापर्यंत आलेले शब्द मागे फिरवले.
नवऱ्याला आपली ड्युटी काही जड आहे असे वाटत नाही आणि त्याची तशी तक्रारही नाही.
"नवरा सालस आहे" असे बायको म्हणाली याचा हा अर्थ असावा.
1 Sep 2016 - 7:18 pm | पिलीयन रायडर
तिने जोक मारला असेल तर??!!
1 Sep 2016 - 7:29 pm | संदीप डांगे
नसेल तर..? आजकाल काहीही सांगता येत नाही ब्वॉ कोणाचे, वरवर सुजाण, सुसंस्कृत दिसणारी लोकं आतून कशी असतात ते देवाला तरी ठावूक असेल का नाही काय माहित! तुम्हाला म्हणून सांगतो पिरा, माझ्या बायकोच्या मामाच्या बायकोच्या बहिणीचा मेव्हणा अगदी बायकोचा बैल झालाय, काय जादू केली तिनं त्याच्यावर देवच जाणे, लग्न झाल्यावर मुलगे कसे बदलतात हो! आजची पिढी अशी बायकोभोवती नाचते, आमच्यावेळी असं नव्हतं... डोळे वटारले की बायका स्वयंपाकघरात पळून जायच्या. हल्लीच्या पिढीचं काय खरं नाय बघ...!
(हुश्श!.... जमले का?)
1 Sep 2016 - 7:37 pm | प्रभाकर पेठकर
डॉक्टरसाहेब,
रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही.
भांडण असेल तरच समुपदेशन करावे असे नाही. चुकीची विचारसरणी बदलण्यासाठीही करावे. पुढे त्यांच्या मुलांनाच त्याचा फायदा होईल.
पूर्वी, माझा मुलगा ३-४ वर्षाचा, मला संताप अनावर व्हायचा. मुलाच्या चुकीसाठी त्याच्या पार्श्वभागी चटकन माझा हात उठायचा. पण माझ्या वडीलांच्य जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा त्यांनी मला सांगितले 'हात उचलू नकोस. नुसत्या नजरेने मुलाला कळलं पाहीजे एखादी गोष्ट तुला आवडलेली नाही किंवा त्याच्याकडून चुक झाली आहे.' हे माझे समुपदेशन त्यांनी केले. त्याचा मला आणि माझ्या मुलाला फायदाच झाला. असे समुपदेशन वेळीच केलेले चांगले असते. तसे त्यांनी केले नसते तर कळत्या वयात मुलाच्या मनांत माझ्याबद्दल अढी निर्माण झाली असती. तशी शक्यता असते. तो प्रसंग टाळला गेला हा केव्हढा मोठा फायदा झाला.
1 Sep 2016 - 7:52 pm | आजानुकर्ण
१. रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही.
२. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे.
३. चिन्मयला ऋजुता ला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही.
४. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे.आणि मुलगी बापाबरोबर दोन दिवस मजेत सगळ्या गोष्टी करत असते.
५. नवऱ्याला आपली ड्युटी काही जड आहे असे वाटत नाही आणि त्याची तशी तक्रारही नाही.
केवळ आमच्या भाचीच्या तोंडून हा "ड्युटी" शब्द आल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले.
ओके डॉक. गॉट इट. एका शब्दामुळे हा सगळा काथ्याकूट. ब्वॉर्र.
1 Sep 2016 - 1:13 pm | रविकिरण फडके
जगात दोन प्रकारची माणसे असतात; पिळवणूक करणारी आणि करून घेणारी. बहुसंख्य माणसे ह्याच दोन वर्गात मोडतात. तिसरा वर्ग पिळवणूक न करणारा आणि करवूनही न घेणारा. पण हा अगदीच अल्पसंख्य.
आपण कोणत्या वर्गात मोडतो हे आपली गुणसूत्रे ठरवितात, त्यामुळे पुढील आयुष्यात त्यात फारसे बदल करता येत नाहीत.
कुणीतरी (नाव आठवत नाही) म्हटलंय, बहुतेक सर्व नाती पिळवणुकीवरच आधारलेली असतात, ते खरंही असेल!
असो.
1 Sep 2016 - 1:20 pm | मुक्त विहारि
असे नसते हो....
कुटुंबातील सर्व घटक जर प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बांधलेली असतील तर असे होत नाही.
1 Sep 2016 - 1:25 pm | मुक्त विहारि
https://groups.google.com/forum/#!topic/aamhimarathi/vTfHmDh0V0Y
1 Sep 2016 - 1:27 pm | nanaba
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
>> Okay, if girl goes out for four hours on weekend and is with hubby for remaining day, will you call he was at home only for 2 days the way you are saying about his wife?
She is at home, has 3 maids to work on everything. He is also at home on weekend and has 3 maids at disposal for house work. How come he becomes "bicchaaraa" with the same aid and she becomes useless (rikamtekadi)?
~ By a working mom who utterly loves her daughter and is lucky enough to have a husband who loves the daughter to the same extent and doesn't consider spending time with the daughter as a "work", but thinks of it as fun activity - just like the mom do!
1 Sep 2016 - 1:59 pm | समी
+१
1 Sep 2016 - 3:37 pm | स्मिता.
तुमचा हिशेब गंडलाय का? खरेकाकांनी जो प्रश्न न विचारताच गिळला तो विचारल्यावर खरा हिशेब कळला असता.
1 Sep 2016 - 5:51 pm | मराठी कथालेखक
मराठी संस्थळावर, मराठी धाग्यावर निष्कारण English मध्ये असलेल्या या प्रतिसादाचा निषेध नोंदवतो
1 Sep 2016 - 1:55 pm | रघुनाथ.केरकर
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी
या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती
1 Sep 2016 - 1:57 pm | गंम्बा
डॉक्टरांना शतकी प्रतिसादांचे धागे काढायची गुरुकिल्ली सापडली आहे.
1 Sep 2016 - 2:06 pm | नाखु
आरी कुठे आहे ते पाहून ठेवणे आले.
नेहमीचे यशस्वी कलाकार आलेकी धागा पतंग भरारी घ्यायला सुरुवात होईल..
मोदकाशेजारीच जागा पकडून बसलो आहे
1 Sep 2016 - 2:19 pm | मीरा वैद्य
हिशेबच लावायचा तर सरळ गणीती हिशेब मांडुयातः
१. मुलगी रोज ४ तास शाळेत जाते म्हणजे ५ दिवसांचे मिळुन २० तास बायकोला पुर्ण फ्री. जे हवे ते करावे. ९००० रुपये मोजुन ३ बायका कामाला आहेत म्हणजे त्यांच्याकडुन सगळी कामे करुन घेत असावेत. (अर्थात त्या बायकांकडुन काम करुन घावे लागते हे मुजोर आणी आळशी पुरुष जातीच्या लोकांना कधी कळणार नाही.) थोडक्यात २० तास पुर्ण मोकळा वेळ मिळतो असे दिसते. (गरीब बिचार्या भोळ्या भाबड्या सरळ साध्या बाईला इतकी मेहनत करुन एका आठवड्यात काय मिळते तर केवळ २० तास मोकळा वेळ आणि माजोरडे नवरे मात्र...... जाउदेत)
२. माजोरडा, आलशी, ऐदी, ऐतखाउ नवरा रोज कामावर जातो. उच्चपदस्थ आहे म्हणजे किमान १० तास काम करत असावा. ८ तास झोपण्यात जातात आणी रोजी १ तास प्रवासात आणी १ तास आन्हिकांमध्ये जातो असे धरल्यास हा माणूस रोज ४ तास फ्री असतो आणी घरी असतो. म्हणजेच याला पण २० तास पुर्ण मोकळा वेळ मिळतो असे दिसते. अर्थात ५ दिवस तो मुलीची कुठलीही जबाबदारी घेत नाही, मुलगी त्याच्याकडे आल्यास हाडहाड करुन हाकलुन देतो असे मानुयात.
थोडक्यात ५ दिवसात दोघांनीही २० तास मोकळा वेळ मिळतो मात्र विकांताला सगळे नवर्यानेच करायचे आणि बायको पाय पसरुन बसणार (बायका आहेतच). आता वाटेल हिशोबाचे पारडे बायकोच्या बाजुने झुकले. पण एह एवढे सरळ आहे का? बाईमाणसाची या सगळ्या प्रकारात किती कुचंबणा होते हे नवरे समजु शकतात का?:
१. एकतर बिचारी नौकरी सोडुन घरी बसली आहे. ती सुद्धा शिकलेली असेल. तुलाही करीयर करायचे असेल. मात्र जणु मुलगी वाढवण्याची जबाबदारी तिचीच. माजोरडा, आळशी, ऐदी, ऐतखाउ नवरा काय तो फक्त करियर करणार काय?
२. बायकांकडुन काम करुन घेणे किती अवघड असते हे माजोरड्या, आळशी, ऐदी, ऐतखाउ पुरुषांना माहिती तरी असते का? वरकामाची बाई फर्निचर पुसते तेव्हा तिच्या मागे लागुन पंखे पण पुसुन घ्यावे लागतात. तिला आठवणा करुन द्यावी लागते की बाई ग ड्रेसिंग टेबल वर पण एक फडके मार गं. स्वयंपाकाच्या बाईकडुन रोजच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त एक दिवस चटणी कुटुन घेउन दाखवा. १० दिवस मागे लागल्यावर ती एकदा चटणी कुटेल. १० दिवस रोज सांगायला लागणे हे पण एक कामच आहे ना? शिवाय फरशी पुसणारी बाई सोफ्याखालुन फडके मारत नाही. आठवण ठेउन तिला सांगावे लागते की बाई मागच्या आठवड्यात फडके मारले होते तिथुन आता परत मार. पेरियोडिक फॉलो अप यु सी. शेड्युल मेंटेन करणे हे काही सोप्पे काम आहे का? भांडी घासणारी बाई मधुनच दमते मग स्वयंपाकाच्या बाईला सांगुन तिघींसाठी चहा करुन घ्यावा लागतो. Optimal utilization of available resources. You see. Resource management is such a task. त्यात परत या बाया अधुन मधुन दांड्या मारतात तेव्हा थोडीशी धूळ दिसली की तो माजोरडा, आळशी, ऐदी, ऐतखाउ नवरा कुरकुर करायला तयार आहेच. शिवाय या बायका रोज येत आहेत की नाही हे बघणॅ, नाही आल्या तर त्यांना फोन करणे. चुचकारुन त्यांच्याकडुन कामे करुन घेणे. एक न अनेक. किती कामे असतात.
३. ऐदी, आळीशी नवर्याला काय त्रास आहे? रोज हापिसात एसी मध्ये बसतो. सहकार्यांवार ऑर्डर सोडतो आणि कामे करुन घेतो. Its that simple. मध्येच त्याचा बास गुरकावला तर दुर्लक्ष तर करायचे असते. शिवाय डेडलाइन्स चे टेंशन नसतेच. ऑफिल पॉलिटिक्स वगैरे प्रकार नुसतीच गंमत आहे. पीसीकडे टक लावुन बघणे हे काही काम होउ शकत नाही (बाकी काम असतेच काय?)
असो. तर बिचार्या बायकांना या सगळ्या त्रासातुन जावे लागत असताना डॉक्टरांना असले प्रश्न पडावेत हे बघुन वाईट वाटले , गृहिणी असणे म्हणजे विश्रांतीची गरज नसणे का ?
1 Sep 2016 - 2:27 pm | गणामास्तर
फक्त या लेखात उल्लेख आलेला नवरा आळशी,माजोरडा,ऐदी, ऐतखाउ आहे असे आपल्याला म्हणायचे आहे कि जगातल्या सर्व पुरुष जमातीबद्दल आपले हे मत आहे?
बरं, फक्त या लेखातला पुरुष आळशी,माजोरडा,ऐदी, ऐतखाउ असल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात
हे जाणून घेण्यास उत्सुक.
1 Sep 2016 - 2:51 pm | गंम्बा
मीराताईंचा प्रतिसाद उपहासात्मक वाटला, खास करुन पॉईंट नंबर ३
1 Sep 2016 - 2:34 pm | विशुमित
मीरा ताई,
झक्क्कास...!!
1 Sep 2016 - 3:01 pm | सामान्य वाचक
तुमच्या प्रतिसादाचा रोख लोकांच्या लक्ष्यात आलेला दिसत नाहीये
1 Sep 2016 - 3:38 pm | मृत्युन्जय
एकुणच पुरुष जातीवर शरसंधान करण्याच्या नादात तुम्ही विवक्षित व्यक्तीवर नसती (ऐदी, ऐतखाउ, आळशी, माजोरडा वगैरे) विश्लेषणे लावली आहेत हे आपल्याला कळते आहे काय? आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत नसताना त्याबद्दल असे कसे काय लिहु शकता?
1 Sep 2016 - 3:44 pm | प्रभाकर पेठकर
तो प्रतिसाद उपरोधिक आहे. पुरुषांबद्दल जो सर्वसाधारणपणे विचार केला जातो त्या कल्पनेला छेद देणारा आहे.
1 Sep 2016 - 3:55 pm | गणामास्तर
जाऊद्या हो. .ते मज्जा घेतायत तर आपण पण थोडी मजा करू.
नवे सोंग धारण केलेला जुनाचं अवतार आहे तो :)
1 Sep 2016 - 4:31 pm | अप्पा जोगळेकर
अहो, बहुधा त्यांनी तो प्रतिसाद त्यांच्या पतींसंदर्भात दिला आहे. त्यामुळे विविक्षित कसे म्हणता ?
1 Sep 2016 - 4:26 pm | चिनार
हा प्रतिसाद खरोखर उपरोधिक आहे का ?
-- उपरोधीक नसेल तर मेगाबायटी प्रतिसाद देण्यास उत्सुक असलेला एक ऐदी, ऐतखाउ, आळशी, माजोरडा मिपाकर..
1 Sep 2016 - 2:49 pm | स्वीट टॉकर
जर नवरा आणि बायकोला ही अरेंजमेंट पसंत असेल तर ती योग्यच म्हणायला पाहिजे.
माझ्या दृष्टीनी खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मुलीबरोबर फिरायला जाताना आईवडिलांना एकत्र जावंसं वाटंत नाही ही वस्तुस्थिती बोलकी आहे.
कारण काही का असे ना, यातून चिन्मयला एक मोठा फायदा होणार आहे. बापाची आणि मुलीची नाळ प्रचंड घट्ट होईल. That is reward enough!
1 Sep 2016 - 4:53 pm | पैसा
+१
पण ही परिस्थिती त्यानी दोघांनी ठरवूनच तयार केली असेल तर कोणी काय करू शकतो?
1 Sep 2016 - 4:57 pm | संदीप डांगे
पण ही परिस्थिती त्यानी दोघांनी ठरवूनच तयार केली असेल तर कोणी काय करू शकतो?
पैताई, गॉसिप करु शकतो ना? त्याचाच आहे ना धागा?
1 Sep 2016 - 6:29 pm | पिलीयन रायडर
अगदी अगदी!
पैसाताईशी सहमत..
ह्यात आपण काय करु शकतो? नवर्याला "बिच्चारा" का ग्रुहित धरलेलं आहे? वीकांताला मुलीचं वडिलांनी केलं का तर आई कंटाळली आहे आठवडाभर करुन तर तिला "हिशोबी" का म्हणलेलं आहे? आपल्याच लेकराचं करणं हे काही काम असतं का?
आणि समजा असेलही तो बिचारा आणि ती हिशोबी, मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी?!
1 Sep 2016 - 6:47 pm | संदीप डांगे
क्या करेगा काझी?!
>> अब्बीच बोला ना! खाली 'गॉसिप' करेगा करके =))
(ह्या धाग्यावर मी कुठल्याही प्रकारचे योगदान देवू शकत नाही, तस्मात् 'गॉसिप' हा शब्द जास्तित जास्त वेळा लिहायची मला संधी उपलब्ध करुन द्यावी ही तमाम मिपाकरांना विनम्र विनंती ;))
1 Sep 2016 - 6:48 pm | आजानुकर्ण
एक्झॅक्टली. 'आपल्याला' जी मूल्यं योग्य वाटतात तीच सगळ्यांनी पाळावीत अशा आग्रहातून आलेला धागा.
1 Sep 2016 - 7:23 pm | सुबोध खरे
गोडबोले साहेब
मुलीबरोबर फिरायला जाताना आईवडिलांना एकत्र जावंसं वाटंत नाही.
असंही वाटत नाही. कारण इतर सर्व कार्यक्रमात ते एक कुटुंब म्हणून व्यवस्थित पणे आनंदात आहेत असे दिसते. शिवाय काही "कुरबुर" असेल तर नातेवाईकांत चर्चा सुद्धा होते तसंही काही दिसलं नाही.
1 Sep 2016 - 2:56 pm | पद्मावति
+१००
1 Sep 2016 - 3:03 pm | दा विन्ची
"मुलीबरोबर फिरायला जाताना आईवडिलांना एकत्र जावंसं वाटंत नाही ही वस्तुस्थिती बोलकी आहे."
मला पण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटला.
1 Sep 2016 - 3:33 pm | nanaba
मुलगी + बाबा
मुलगी + आई
आई + बाबा
मुलगी + आई + बाबा
फक्त आई
फक्त बाबा
हे सगळे कोंबिनेशंस हवेतच हेल्दी नात्यांकरता.
खर्यांच्या एक वेळच्या निरिक्षणावरून डायरेक्ट प्रश्नचिन्ह!
बाई ही एक माणूस आहे आणि एकट असणं ही तिचीही गरज आहे हे ध्यानात घेतलत तर आजची परिस्थिती जरा बदलेल.
1 Sep 2016 - 3:34 pm | विशुमित
सहमत
1 Sep 2016 - 7:26 pm | सुबोध खरे
बाई ही एक माणूस आहे आणि एकट असणं ही तिचीही गरज आहे हे ध्यानात घेतलत तर आजची परिस्थिती जरा बदलेल.
हे संपूर्ण मान्य आहे.
पण एक "ड्युटी" असल्यासारखे दर शनिवार रविवार बापाने मुलीला सांभाळणे याबद्दल हि चर्चा आहे.
1 Sep 2016 - 3:37 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मलाही हाच मुद्दा जास्त विचाराधीन वाटला.एरवी कामामुळे दोघांना एकमेकांना वेळ देता येत नसेल तर शनिवार रविवार एकत्र घालवावा असे त्यांना वाटत नाही हे जास्त गंभीर आहे.
1 Sep 2016 - 4:59 pm | मारवा
काही जुन्या अॅडव्हरटाइजमेंट्स बघत होतो.
हा धागा प्रतिसाद वाचल्यावर काही जुन्या मनोवृत्तींची जागा मॅच झालेली पाहुन मौज वाटली.
1 Sep 2016 - 5:10 pm | मारवा
1 Sep 2016 - 5:23 pm | रेवती
पेठकरकाका व स्वीट टॉकर यांचे प्रतिसाद आवडले. सुट्टीच्या दिवशी मुलीबरोबर आईवडिलांनादेखील फिरायला एकत्र जावेसे वाटले नाही. लेखात ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे हे वाचल्यावरच डोक्यात घंटा वाजायला हवी. नवरा कितीही उच्च पदस्थ असू दे, प्रेम एकमेकात हवे ना! नवर्यानेही आधी पासून फक्त पैसा पैसा केले असेल व आता खरेच पैसा हातात येत असेल तर ती म्हणेल की बाबा रे, आधी माझे तुझ्याबरोबरचे चार क्षण मातीमोल केलेस तर आता कर खर्च तुझा तो पैसा! निदान त्याचा तरी वापर करू दे! समजा परिस्थिती वेगळी असेल व बायकोच्या अपेक्षा गगनाला भिडणार्या असतील व तिने त्या पूर्ण व्हाव्यात या हेतूने नवर्याला खूप सपोर्ट केलेला असेल व या पदाला पोहोचण्यास मदत केली असेल तर माहित नाही. नक्की दोघांमध्ये काय झालेय हे माहित नाही. त्यांची परिस्थिती काहीही असो पण पतीपत्नीमधील भावबंध उत्तमरित्या समजणार्या डॉ. खरे यांना कोण बरोबर? हा प्रश्न पडावा याचे आश्चर्य वाटले.
1 Sep 2016 - 7:36 pm | सुबोध खरे
रेवती ताई
नवरा ऐतखाऊ आळशी ऐदी आणि जे काय म्हटलंय असा काही नाहीये. किंवा पैसा पैसा करणाराही नाहीये. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येऊन इंजिनियर झाला. चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. लग्न बघूनच झालेलं आहे. लग्न अगोदर भाची नोकरी करत होती. लग्नानंतर तिने नोकरी सोडली.( कारण माहित नाही)
मुलाला एक भाऊ आहे जो वडिलांबरोबर राहतो. लग्न झाल्यावर काही दिवसांनी जागा कमी पडते म्हणून यांनी अगोदरचा एक छोटा दुसरा फ्लॅट होता तेथे हे दोघे राहू लागले. ते घर विकून आता यांनी मोठे तीन बेडरूमचे घर घेतले आहे. बायकोच्या अपेक्षा काही गगनाला भिडणाऱ्या नाहीत( निदान वाटत तरी नाहीत).
दोघांचे संबंध कधीही असे वाटले नाही कि ऐकिवात आलेले नाही
1 Sep 2016 - 8:00 pm | पिलीयन रायडर
खरे काका,
तुमच्या प्रतिसदांवरुन हे अगदी सामान्य कुटुंब वाटत आहे. मुलगी काही सिरीयल्स मध्ये दाखवतात तशी कजाग वगैरेही वाटत नाही. तुम्हालाही अगदी पक्की माहिती नसुन नुसते अंदाजच आहेत. त्यामुलीने अगदी गम्मत म्हणुनही म्हणले असेल.
एरवी तिच्या हाताखाली कामाला बायका असल्या तरी त्याव्यक्तिरिक्त घरात पुष्कळ काम असतेच. तिने लग्नानंतर नोकरी का सोडली ह्यालाही अनेक कारणे असतील. आत्ता परिस्थिती उत्तम वाटत असली तरी आधी तिने कष्ट काढले असतील. तिला घरात थोडा मोकळा वेळ हवा असेल. शिवाय वडीलांना आठवडाभर मुलीसोबत घालवायला वेळ नसेल म्हणुन तिची काळजी त्यानी वीकांताला घ्यायची असे ठरले असेल, त्यात वाईट काहीच नाही. तिने केवळ "ड्युटी" हा शब्द वापरला ह्या एका तकलादु मुद्द्यावर ज्यांच्याबद्दल मुदलात तुम्हालाच १००% माहिती नाही त्यांच्याबद्दल मिपाकरांनी कशी चर्चा करायची? का करायची?
"घरात बसुन बायकांनी नवर्याला कामाला लावणे" असा मुद्दा असु शकतो चर्चेचा.. पण एका विशिष्ट कुटूंबाबद्दल कशासाठी बोलायचे? की ह्या एका अर्धवट उदाहरणातुन बायकांबद्दल सरसकटीकरण करायचे आहे?
एका निर्णयामागे १०० कारणं असतात.. वरकरणी बाहेरच्यांना काहीही वाटले तरी खरी परिस्थिती काय हे फक्त नवरा बायकोलाच माहिती असते. आणि त्यांचे ते सुखी असताना बाहेरच्यांनी निष्कारण चर्चा करुन काही होत नसतं.
एक तिर्हाईत म्हणुन तुम्ही तोकड्या माहितीवर असे धागे का काढत आहात असा प्रश्न राहु राहुन पडतो.. ते ही तुमच्या कडे लिहायला माहितीचा एवढा खजिना असताना..
1 Sep 2016 - 6:00 pm | मराठी कथालेखक
पुन्हा एक द्वि /त्रिशतकी धागा :)
1 Sep 2016 - 6:47 pm | आजानुकर्ण
अहो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे आठवड्याचे पाच दिवस त्याला ऑफिसात चांगली विश्रांती मिळते. दोन दिवस केले घरकाम तर बिघडले कुठे.
कैच्या कै धागा.
1 Sep 2016 - 6:49 pm | संदीप डांगे
ओ तुमचे ते पेटंट वाक्य वापरा ना!
1 Sep 2016 - 6:52 pm | आजानुकर्ण
कुठलं पेटंट वाक्य... एक दुसरा हिशोब करा. कामाच्या वेळेत (सोम-शुक्र) मिपावर येणारे प्रतिसाद आणि कामाच्या वेळेबाहेर मिपावर येणारे प्रतिसाद. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर ऑफिसात किती मानेवर खडा ठेवून काम करतात हे महामहोपाध्याय खरे डॉक्टरांना कळेल.
(वीकेंड आला की पोटात गोळा येणारा पण कामच्या वेळेत रिलॅक्स असणारा सॉफ्टवेअर इंजिनियर) आजानुकर्ण.
1 Sep 2016 - 7:01 pm | संदीप डांगे
(बाकी पोटात गोळा यायचं कारण?? नै हरकत नसेल तर सांगा, आम्हाला गॉसिप करायला तेवढा अजून एक विषय)
1 Sep 2016 - 7:04 pm | आजानुकर्ण
अाठवडाभर ऑफिसात रिलॅक्स असल्यावर वीकेंडला घरची कामं करावी लागतील यामुळं गोळा येणारच की! ;) ऑफिसातल्या बॉसला गंडवता येतं. घरच्या बॉसला नाही.
1 Sep 2016 - 6:48 pm | कंजूस
भाचीनेही गमतीने सांगितले असेल मामाला तर आपला प्रतिसादांचा रतिब फुकाचा ठरेल.
1 Sep 2016 - 7:35 pm | मारवा
भाचीनेही गमतीने सांगितले असेल मामाला तर आपला प्रतिसादांचा रतिब फुकाचा ठरेल.
अरे असा तर विचारच आला नाही डोक्यात
मगत मोठ्ठाल्ला पॅराडाइम शिफ्ट होऊन जाईल
पण असे नसेल बहुधा अशी आशा धरतो.
1 Sep 2016 - 7:37 pm | संदीप डांगे
बरोबर, तुम्ही धराच आशा, सोडली तर तुम्हाला गॉसिप कसे करता येईल?
1 Sep 2016 - 7:42 pm | मोदक
स्कोर सेटलिंगचा वास येत आहे डांगेण्णा.. एकदा सांगून मुद्दा कळतो.
1 Sep 2016 - 7:59 pm | संदीप डांगे
हो का? बरं बरं.... तुमचं नाक बिघडलंय असं कळवतो.
कुणी लिहलंय ह्यापेक्षा काय लिहिलंय हे महत्त्वाचं - एवढं तत्त्व पाळतोय, आत्ताही!
आणि जिथले बिल त्याच टेबलावर पे करायचं, उधार ठेवायचं नाही हे दुसरं तत्त्व!
आत धाग्याबद्दलः ड्युटी म्हणजे कर्तव्यही म्हणायचं असेल तिला.. मला अशा 'असेल, नसेल' वाल्या गोष्टींवर, त्याही नवरा-बायकोच्या तर अजिबात रस नाही वाटत. तिने ते गंभीरपणे म्हटलं असेल तरी मला ते चुकीचं वाटत नाही. घरी राहणार्या बायकांबद्दल माझी मते पूर्वग्रहदूषित नाहीत. त्यांच्याबद्दल नोकरी करणार्या स्त्रियांइतकाच आदर आहे.
माझंच उदाहरण देतो: माझ्या स्वतःच्या बायकोला मी तीची चांगली नोकरी सोडून मुलांसाठी घरी बसायला सांगितलंय, माझ्या घरातही दोन बायका मदतीला होत्या.. तिची काय ससेहोलपट होते ते मला माहित आहे, जाणीव आहे. बायकोही मला कुठल्याही कामाला हात लावू देत नाही. अगदी शब्द झेलायला तयार असते. बाहेरच्या लोकांना, आमच्या नातेवाईकांना तर असंच वाटत असतं की "हि इथे राणीसारखी राहते". सो दे गॉसिप!
ज्याचं खरं त्याला ठावूक असतं, लोकांनी उगाच गॉसिप करुन मिपासारख्या ठिकाणी असलं काही मांडावं आणी ज्या पद्धतीने मांडावं (घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो.) ह्याचं फारच म्हण्जे फारच वाईट वाटलं... तुम्हाला नै वाटलं?
ह्या धाग्यात गॉसिपशिवाय कणभरही काही महत्त्वाचे असेल तर कॄपया सांगा... माझे सर्व प्रतिसाद इथून डीलिट मारायला संपादकांना सांगेन व धागाकर्त्याची जाहीर माफी मागेन. धन्यवाद!
(कर्मधर्मसंयोगाने जर त्या मुलीने वा मुलाने खरेंचा हा धागा वाचला तर खुद्द खरेंबद्दल त्यांचे काय मत होईल हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे असे माझे मत आहे. त्यावर कोणी बोललेले दिसत नाही अजून...)
1 Sep 2016 - 8:06 pm | पिलीयन रायडर
धागा त्या मुलीनेच वाचण्याबद्दल..
अगदी दाट शक्यता आहे. खुप लोक मिपा वाचत असतात. माझ्या इथल्या लेखनावरुन कालच एका ओळखीतल्या मुलीने "तुच पिरा आहेस का?" असां विचारलं. तिचा इथे आयडी सुद्धा नाही. तिला मिपा माहिती आहे हे ही मला माहिती नव्हतं. पण आपल्या लिहीण्यावरुन लोकांना अंदाज येतोच.
काका तर खर्या नावाने लिहीत आहेत. त्यांचे कुणी ना कुणी नातेवाईक नक्कीच मिपा वाचत असतील. त्यांना अंदाज यायला वेळ लागणार नाही. पण तसं काही होऊ नये हीच इच्छा!
1 Sep 2016 - 8:13 pm | सुबोध खरे
पिरा ताई
"धागा त्या मुलीनेच वाचण्याबद्दल"
याच साठी मी बराच तपशील लिहीलेला नाही आणि जृसे लिहीले आहे त्याने कुणाला कळण्याची शक्यता नाही.पण मी जे लिहिले आहे ते तसेच आहे.
छिद्रान्वेषी लोकांना फाट्या वर मारा
1 Sep 2016 - 8:26 pm | संदीप डांगे
अगदी अगदी! पूर्ण सहमत! त्याशिवाय गॉसिप कसं करणार??
2 Sep 2016 - 1:57 pm | मोदक
हो का? बरं बरं.... तुमचं नाक बिघडलंय असं कळवतो.
बर्र.. तसे समजा.
कुणी लिहलंय ह्यापेक्षा काय लिहिलंय हे महत्त्वाचं - एवढं तत्त्व पाळतोय, आत्ताही!
आणि जिथले बिल त्याच टेबलावर पे करायचं, उधार ठेवायचं नाही हे दुसरं तत्त्व!
हे नक्की आहे ना..?
2 Sep 2016 - 3:02 pm | संदीप डांगे
नक्की नक्की. कारण कुठल्या धाग्यावर मी किंवा कुणी काय बोललो होतो हे विसरुन जातो, खरं बोलतोय, आयशप्पथ!
काही लोक दांभिकपणात सातत्य ठेवतात त्यामुळे तुम्हाला स्कोअरसेटलींगचा वास येण्याची शक्यता वाढते, त्यात दोष माझा नव्हे, दांभिकपणाचा आहे असे कळवतो. =))
2 Sep 2016 - 3:09 pm | मोदक
काही लोक दांभिकपणात सातत्य ठेवतात त्यामुळे तुम्हाला स्कोअरसेटलींगचा वास येण्याची शक्यता वाढते, त्यात दोष माझा नव्हे, दांभिकपणाचा आहे असे कळवतो.
=)) हा प्रतिसाद जपून ठेवेन. =))
2 Sep 2016 - 3:19 pm | संदीप डांगे
नक्कीच ठेवा! खूप आवश्यकता पडणार आहे.
2 Sep 2016 - 3:08 pm | मृत्युन्जय
हे नक्की आहे ना..?
मते बदलतात माणसांची मोदकशेठ.
कधीकधी काही माणसांची मते माणूस, धागा , वेळ आणि विषय पाहुन पण बदलतात
2 Sep 2016 - 3:18 pm | संदीप डांगे
हे अगदी खरे बोललात मृत्यूंजयसाहेब, इथे मिपावरच तर अनेकांचे अनेकदा असे होतांना पाहिले आहे मी स्वतःच्या डोळ्यानी. तुमचे निरिक्षण चोक्कस आहे!
2 Sep 2016 - 8:13 pm | कैलासवासी सोन्याबापु
अरे काय तुम्ही लोक्स राव!! तुमचे हे "नक्की का??? नक्की ना???" पुराण ऐकून आमच्या जुन्या जखमा वाहू लागतात!! एम्बुश आठवते झालेले, अन मुख्य म्हणजे पाठीत वार करणारे आठवतात!
1 Sep 2016 - 7:41 pm | सुबोध खरे
कंजूस साहेब
गमतीने सांगितले असेल
नाही
ते गमतीने सांगितले आहे असे वाटत नाही
1 Sep 2016 - 6:52 pm | सिरुसेरि
माजोरडा, आलशी, ऐदी, ऐतखाउ नवरा .. मग तो रोज कामावर कसा जातो ? विरोधाभास वाटत आहे .
2 Sep 2016 - 9:29 pm | मुक्त
आराम करायला. =))
1 Sep 2016 - 7:04 pm | चौकटराजा
कालाच्या पट्टीवर मी योग्य वेळी जन्माला आलो आता योग्य वेळी जाणार. जाताना पुढच्या पिढीला दंडवत करून प्राण सोडणार.
1 Sep 2016 - 7:11 pm | संदीप डांगे
चौराकाका, तुम्ही का अचानक पेन्शनरांसारखे बोलायला लागलात...?
1 Sep 2016 - 7:12 pm | सूड
ह्या धाग्याचं द्विशतक झालं की पेढे वाटायचा संकल्प एका मिपाकराने कायप्पावर केला आहे. तेव्हा बाकी काही होवो न होवो धाग्याचं द्विशतक लवकर करा ब्वा!!
1 Sep 2016 - 7:13 pm | पिलीयन रायडर
लो एम इज क्राईम! किमान चारशे म्हणा!
1 Sep 2016 - 7:15 pm | सूड
दोनशेच्या पुढे किती का होईना!! पण खरंय, डोक्यावरुन पाणी चारशे तरी पायजेतच.
1 Sep 2016 - 7:40 pm | संदीप डांगे
ओ, अर्धे पेढे माझ्यासाठी वेगळे काढून ठेवा.. =))
1 Sep 2016 - 7:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
पेढ्यांच्या आधी दिग्गज अनाहितांस कौल लावा! अनायसे ज्येष्ठागौरी बसल्याच आहेत श्रावणातल्या, तेव्हा लावून टाकायला हवा कौल! अनाहितांस कौल लावल्याशिवाय काय धागा तरत नाय बा
।।सत्वर पाव ग अनाहिता ताई मला, कॉमेंट वाहीन तुला।।
टीप :- ही एक हलकीफुलकी कॉमेंट आहे तरी कृपाया माझ्या तायांनो, माझी पिसे काढू नका ही नम्र विनंती, नाहीतर पेढ्याबर मला बी गिळाल कच्चा!
अनाहितांचा(च) सालस , गोंडस भाऊ
बापुल्या!
1 Sep 2016 - 7:43 pm | पिलीयन रायडर
=))
बापरे!! मी हसुन हसुन मेले!!
टक्कु मक्कु शोनु नंतर बापुल्या!!!
1 Sep 2016 - 8:13 pm | कैलासवासी सोन्याबापु
ओ ताय, मी वेगळा भाऊ हाय! टक्कू मक्कू शोनू आमचा मित्र नाहीये! कारण त्याला बुलेट आवडत नाही ना!! =)) , मोदक ला आवडते, मोदक जव्हेरभाऊंच्या पक्या सारखा ग्रामपंचायतीपुढे बुलेट वर बसला होता मी तिथे गेलो तर म्हणाला तुला पण बुलेट आवडते का? मी म्हणले हे तर थोरच आहे! तेव्हापासून आम्ही मित्र आहोत !
1 Sep 2016 - 8:29 pm | स्रुजा
लोल.. बापू ____/\___
काय बोलायचं या धाग्यावर ?? डांगे अण्णा आणि पिरा ला आपलं स्टँडिंग मम म्हणुन ठेवते. एक साधासा उद्गार तो काय ! आणि किती तो खल..
1 Sep 2016 - 8:30 pm | स्रुजा
आणि हो, मिपाबायका म्हणा ब्वॉ ! अनाहिता इज सो लास्ट ईअर यु नो ...
1 Sep 2016 - 8:32 pm | पिलीयन रायडर
करेक्ट!! मिपाबायका!
1 Sep 2016 - 8:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
ते मिपाबायका अजरामर आहे! माझं खापरपतवंड जेव्हा मिपावर उलथेल तेव्हाही तेच उपयोगात राहणार आहे!
2 Sep 2016 - 3:38 pm | अनिरुद्ध.वैद्य
लैच जबरदस्त!
1 Sep 2016 - 8:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
ओ सुडराव शतक झालं!! कबूल केल्याच्या अर्धे पेढे तरी खरेदी करा आता म्हणे मी
1 Sep 2016 - 9:06 pm | सूड
छे हो पुण्यात राहायला आल्यापासनं पेढे वैगरेंसारख्या गोष्टी स्वत: खरेदी करणं म्हणजे महापाप!! एका मिपामित्राने कबूल केलेन. मज मिळाले की आपणासही देईन. ;)
1 Sep 2016 - 9:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
धोका देण्याच्या ह्या प्रकारचे वर्णन करायला एक अतिशय ग्राम्य म्हण आहे हिंदी भाषेत, कशीबशी आवरलेली आहे ती आता, भावना तुम्ही समजलेच असाल
1 Sep 2016 - 7:44 pm | अभिजीत अवलिया
सर्वात जलद शतक मारणार हा धागा. खरे साहेबांचा शनिवार वाड्यावर सत्कार करूया. बाकी पेठकर साहेबांचा प्रतिसाद उत्तम.
1 Sep 2016 - 8:17 pm | राजेश घासकडवी
मी काय म्हणतो, तुम्ही तिला स्पष्टच का विचारलं नाहीत? की कागं, बापाने जी कामं करणं अपेक्षितच आहे त्याला तू ड्यूटी का म्हणतेस? ती तू त्याला लावून दिलेली आहेस की त्याने प्रेमाने अंगावर घेतलेली आहे? अजूनही तुम्ही जर हे प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं इथे दिलीत तर मिपाकरांचे चर्चाकष्ट वाचतील.
असं अर्धवट माहिती असलेलं लेखन केल्याने या आणि आधीच्या लेखातून 'स्त्रिया स्वार्थी असतात, स्वातंत्र्याचा उपभोग घेतात, मजा मारतात आणि काही जबाबदाऱ्या घेत नाहीत' असे तुमचे विचार असल्याचा भास होऊ शकतो. तुमची प्रतिमा 'किंचित स्त्रीद्वेष्टी व्यक्ती' अशी झालेली तुम्हाला चालेल का?
1 Sep 2016 - 8:26 pm | सुबोध खरे
जालावरील प्रतिमा आभासी असतात आणि लोकांची माझ्याबद्दल प्रत्यक्ष जगात काय प्रतिमा आहे याचा मला शष्प फरक पडत नाही.
माझ्या बायकोचे नाव लग्नानंतर मी बदलले आणि "तिच्याच " आवडीचे ठेवले आहे. ( तिला तिचे पहिले नाव आवडत नव्हते)
याबद्दल माझ्या लष्करी वर्गमित्रांनी मला mcp म्हटले होते.मुलीचे नाव हि तिची ओळख आहे इ इ. मी याचे स्पष्टीकरण कुणालाही देण्याच्या फंदात पडलो नाही. तेंव्हाही नाही आणि आजही माझा एक मित्र तिला आवर्जून लग्नाच्या अगोदरच्या नावाने हाक मारतो.
असो
1 Sep 2016 - 8:42 pm | कैलासवासी सोन्याबापु
अहो सर अश्याने आढ्य म्हणतील लोक मग?
1 Sep 2016 - 9:32 pm | सुबोध खरे
अहो म्हणतातच
सानू की?
1 Sep 2016 - 9:34 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाय बा मला काय नाय, तुम्हाला चालतंय म्हणल्यावर आम्ही काय बोलणार, वेन्जॉय! _/\_
2 Sep 2016 - 11:45 am | सुबोध खरे
बापूसाहेब
"सानू कि" म्हणजे मला काय ?( घेणं देणं)
"त्वा नू कि" म्हणजे तुम्हाला काय करायचंय.
मी "सानू कि" विचारलं
गैरसमज नसावा म्हणून.
1 Sep 2016 - 8:29 pm | कायरा
बरे या बायकांना त्यांच ऐकणारे नवरे मिळतात. सगळ्या बायका एवढ्या भाग्यवान नसतात.
1 Sep 2016 - 8:30 pm | पिलीयन रायडर
हा खरा प्रतिसाद आहे!!
1 Sep 2016 - 8:32 pm | स्रुजा
फुल२ काडी प्रतिसाद आहे.. मानलं !!
1 Sep 2016 - 8:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
अरे मी नक्की कोणाला द्यायचेत पेढेssssssss
1 Sep 2016 - 9:25 pm | मिसळ
हे असे बायकोचे ऐकणारे नवरे बाहेर 'खाली मुंडी आणि पाताळ धुंडी' असतात. त्यांचं मेल्यांच काय कौतुक सांगू नका.
आणि ३-३ मोलकरणींच काय मेलं ते ऐवढं, सगळं आवरावं लागत शेवटी त्या घरातल्या स्त्रीलाच.
1 Sep 2016 - 8:53 pm | श्रीगुरुजी
डॉक्टरसाहेब,
जर दोघांनी एकमेकांच्या संमतीने अशी विभागणी मान्य केली असेल तर त्रयस्थाने त्यावर फार विचार करण्याची गरज नाही. माझ्या माहितीतील ३ उदाहरणे देतो.
१) नवरा व बायको दोघेही ५० च्या पुढचे आहेत. ते पुण्यातील आहेत. त्यांना एकच मुलगा आहे. तो अमेरिकेत आहे. त्याचे ४-५ वर्षांपूर्वी लग्न झाले. नवरा सौदीत काम करतो. बायको बॅकेत काम करते व मुंबईतील एका शाखेत व्यवस्थापक आहे. मुलगा व सून अमेरिकेत असले तरी दोघेही वेगवेगळ्या शहरात आहेत व दोन्ही शहरे एकमेकांपासून बरीच दूर आहेत. या पुण्यातील कुटुंबातील सर्व चार जण पुण्यात नसून प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी एकटा आहे. पण त्या सर्वांनीच ही परिस्थिती स्वतःहून स्वीकारलेली आहे. आम्हाला ही परिस्थिती विचित्र वाटते, पण हे त्या सर्वांना मान्य आहे.
२) ओएनजीसीत समुद्रात कायमस्वरूपी असणार्या जहाजावर एक केटरर होता. वर्षातील बरेच महिने तो जहाजावर असायचा. काही दिवस रजा घेऊन तो घरी यायचा. त्याची बायको व दोन्ही मुले व घर मुंबईत आहे. त्याने जहाजावर अनेक वर्षे काम केले. ते काम सोडल्यावर गुजरातमधील एका पर्यटनस्थळावरील एका हॉटेलात त्याने केटरिंगचे काम स्वीकारून वर्षातील बराच काळ तो तिथेच असतो. बायको मुंबईत काम करते व शिकणारा मुलगा तिच्याबरोबर असतो. मुलगी पदवीधर असून दुबईत काम करते. कुटुंबातील ४ सदस्य ३ वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्याच्या सांगण्यानुसार तो जेव्हा सुटी घेऊन मुंबईत घरी परत जातो तेव्हा त्याच्यात व बायकोत औपचारिक संभाषण असते. नवरा लग्नापासून बहुसंख्य काळ घरापासून लांबच असल्याने तिने स्वतःचा ग्रुप व स्वतःची वेळ घालविण्याची साधने शोधली आहेत. त्यामुळे तो घरी परत आला तरी त्यांच्यात फारसा संवाद नसतो. परंतु त्या सर्वांनी हे स्वतःहून स्वीकारले आहे.
३) वयाच्या २५ व्या वर्षापासून मर्चंट नेव्हीत काम करणारा एक जण मला माहित आहे. तो वर्षातील ७-८ महिने जहाजावर असतो व उर्वरीत ३-४ महिने घरी असतो. सध्या त्याचे वय ५० आहे. त्याला २ टीन एजर्स मुले आहेत. मुलगी १६-१७ वर्षाची असून मुलगा १३-१४ वर्षांचा आहे. १-२ वर्षापूर्वी दुर्दैवाने त्याची बायको कर्करोगाने वारली. मर्चंट नेव्हीत काम केले असल्याने भरपूर पैसे जमा केले आहेत. आम्हाला सर्वांना वाटले की बायको गेल्यावर तो नोकरी सोडून मुलांसाठी घरी थांबेल कारण टीन एजर्स मुलांना आई नसताना निदान वडीलांचा आधार मिळाला असता. पण या पठ्ठ्याने आपल्या सासूसासर्यांना मुलांकडे बघण्यासाठी घरी आणून ठेवले आहे (त्याचे स्वतःचे आईवडील पूर्वीच गेलेले आहेत) व त्याने आपला जहाजावरील जॉब सुरू ठेवला आहे. मुलांना आई नसताना वडीलांची आत्यंतिक गरज असताना हा मात्र नोकरी सोडायला तयार नाही. परंतु त्या सर्वांनी ही परिस्थिती मान्य केली आहे. आपल्याला त्यांचे वागणे कितीही अयोग्य वाटले तरी प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो व तो त्यांच्या दृष्टीने बरोबरच असतो. आपण त्याबाबतीत काहीही करू शकत नाही.
1 Sep 2016 - 9:41 pm | कैलासवासी सोन्याबापु
काय कंसिस्टीणसी आहे राव =)) , "ड्युटी" ह्या एकम शब्दोद्भव धाग्यावरही गुर्जी चक्क मेगाबायटी बोलून गेले देवा! लोकं धाग्यावर चार पैसे किंवा बजेट नुसार 2 पैसे देऊन जातात, गुर्जी खाणकन बंदा रुपयाच आपटून जातात बघा!
2 Sep 2016 - 11:52 am | सुबोध खरे
जर दोघांनी एकमेकांच्या संमतीने अशी विभागणी मान्य केली असेल तर त्रयस्थाने त्यावर फार विचार करण्याची गरज नाही
गुरुजी
हे मान्य आहेच.
परंतु नवरा पाच दिवस नोकरी करतो आणि बायको पाच दिवस मुलीला सांभाळते
मग दोन दिवस नवरा मुलीला सांभाळत असेल तर ते दोन दिवस बायकोने त्याचे काम करावे कि नाही.
म्हणजे नवऱ्याने पाच दिवस नोकरी करायची आणि दोन दिवस पूर्णपणे मुलीला सांभाळायचे
आणि बायकोने पाच दिवस मुलीला सांभाळायचे आणि दोन दिवस कम्प्लिट आराम?
हे कुठेतरी खटकलं.
खाली म्हटल्याप्रामण बायकोला आठवड्यात काही वेळ पूर्ण पणे स्वतःसाठी हवा असेल तर ते हि मान्य पण त्याचा "हिशेब" होऊ नये असे वाटते.
कदाचित आमची विचारसरणी जुनी/ जुनाट झाली असेही असेल.
1 Sep 2016 - 8:56 pm | बोका-ए-आझम
बाकी लोकांना दुस-याच्या घरात नाक खुपसायची आवड असतेच हे अगदी आंतरजालावरही सिद्ध करणारा धागा आहे. जगात इतके बाकीचे आणि महत्त्वाचे विषय आहेत. पण जरा नवरा-बायकोच्या relationship वर धागा आला तर समस्त पब्लिक त्याच्यावरच घोंघावतंय.
1 Sep 2016 - 9:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
मी पेढे मिळायच्या आशेने आलो शपथ सांगतो ! डोक्यावर रिंगण असणारी परी वाली स्मायली
1 Sep 2016 - 9:10 pm | पिलीयन रायडर
मी वेळ काढायला आले होते.. पेढ्यांच नाव निघालं म्हणून थांबलेय..
आमची ती जांभळी, शिंग असलेली आणि हीहॉहॉ टाईप हसणारी स्मायली!
1 Sep 2016 - 9:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
त्या जांभळ्या स्मायलीचं नामकरण "पाताळविजयम स्मायली" करायला हवे !
1 Sep 2016 - 10:37 pm | सूड
मला पण पेढे देणार कबूल केलेन म्हणून चार प्रतिसाद दिले हो!! सवाशे झालेत आता तांबड्या जोगेश्वरीच्या कृपेने लवकर उरलेले पंच्याहत्तर व्हावेत, याहून मागणं लई नाही.
2 Sep 2016 - 11:54 am | सुबोध खरे
बोका शेट
बाकी लोकांना दुस-याच्या घरात नाक खुपसायची आवड असतेच हे अगदी आंतरजालावरही सिद्ध करणारा धागा आहे.
हेच तर कारण आहे कि इतक्या कचकोळ धारावाहिक असतानाही सगळ्या चालतात. लोकांना स्वतःच्या पेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त "रस" असतो.
2 Sep 2016 - 6:35 pm | पिलीयन रायडर
तुम्ही स्वतः दुसर्याबद्दल धागा टाकुन लोकांना काय टॉण्ट मारताय?! कमाल आहे!
2 Sep 2016 - 8:56 pm | स्रुजा
हो ना !! + १११११
2 Sep 2016 - 9:02 pm | सुबोध खरे
अहो लोकांत तुम्ही मी सगळेच आलो ना ?
मी धागा टाकला आणि तुम्ही प्रतिसाद दिलेत.
2 Sep 2016 - 9:23 pm | पिलीयन रायडर
अहो पण तुम्हाला जर हे बरोबर वाटत नाही तर मुळात धागा काढलाच कशाला? धागा काढुन वर अशी चर्चा करणं चुक आहे असं तुम्हीच कसं काय म्हणताय? आणि त्यात आम्हालाही ओढताय?
आणि हे असं करणं चुक आहे हेच सांगायला आम्ही प्रतिसाद देतोय, अर्धवट माहितीवर तिर्हाईंताबद्दल चवीचवीनी चर्चा करायला नाही.
2 Sep 2016 - 9:31 pm | अभिजीत अवलिया
मला वाटते इथून पुढे मिपावर तिऱ्हाईत व्यक्तीबद्दल चर्चा करणाऱ्या धाग्यांना बंदी असावी. कुणाच्या खाजगी आयुष्याबद्दल अशा सार्वजनिक ठिकाणी चर्चा करण्याचा हक्क कुणालाच असू नये.
2 Sep 2016 - 9:34 pm | सुबोध खरे
लोकांना स्वतःच्या पेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त "रस" असतो.
यात "तुम्हाला जर हे बरोबर वाटत नाही" हे कुठे आले
2 Sep 2016 - 10:07 pm | पिलीयन रायडर
अच्छा म्हणजे तुम्ही धागा काढुन वर बोकाभाऊंशी "लोकांना दुसर्यांच्या भनगडीत नाक खुपसायची आवड असते" ह्याला सहमत होऊन परत वर "तुम्ही आणि मी सुद्धा आलोच लोकांमध्ये" असं म्हणुन आता "मला हे बरोबर वाटत नाही असं कुठे म्हणलो" असं विचारताय..
म्हणजे लोकांच्या भानगडीत नाक खुपसणे चुक नाही असे तुम्हाला वाटते तर... कारण हा धागा त्याचेच उदाहरण आहे..
काका, उगाच खुसपट काढायचे म्हणुन नाही तर वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे तुम्ही असे धागे काढण्याचं फार आश्चर्य वाटत आहे..
2 Sep 2016 - 11:50 pm | सुबोध खरे
यात कुणाचीही भानगड नाही की कुणी त्यात नाक खुपसत नाही.
आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
बरोबर की चूक हे ज्याच्या त्याच्या बुद्धी प्रमाणे ज्याने त्याने ठरवायचे आहे.
कुणाचेही नाव न घेता एक जेनेरिक गोष्टसांगितली आहे.
गमतीत लिहीले तर त्याचा उलटा अर्थ काढाल असे वाटले नव्हते.
आसो.
2 Sep 2016 - 11:54 pm | स्रुजा
मला तरी या धाग्यात काही पुरुषांची च मानसिकता दिसतीये, आणि मी ताकाला जाऊन भांडं लपवत नाही त्यामुळे ती मला चुकीची वाटते आहे हे सरळ सांगते.
3 Sep 2016 - 12:06 am | सुबोध खरे
जरा उलगडून सांगाल काय ?
3 Sep 2016 - 12:10 am | खटपट्या
फक्त पुरषांची मानसिकता दिसते? ती मुलगी हक्काने नवर्याकडून काम करवून घेते दे दीसत नाही का? आणि तीचा अविर्भाव असा आहे की "आठवड्यातून दोन दीवस केलेच पाहीजे असा आहे"
अशी ऑफीससारखी कामे वाटून घेतल्यावर काय मजा त्या संसारात? काँट्रॅक्ट आहे की काय?
3 Sep 2016 - 12:15 am | स्रुजा
अहो खटपट्या भाऊ, धाग्यात दिसतीये, प्रतिसादांत नाही. आणि सांगते उलगडुन @ खरे काका, थोड्यावेळाने.
3 Sep 2016 - 12:18 am | रेवती
अहो पण तुम्हाला / मला हे कुठं माहितिये की तो कुठं आणि कसा कमी पडला म्हणून असं भजं झालय?
वर दिसतं त्यापेक्षा वेगळं असू शकेल याची धडधडीत शक्यता दिसतिये ना!