संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस
की जेवण तयार आहे का..
आज मी जेवण तयार केलं नाही..
आज मूड नाही रे...
महाबळेश्वर हून आपण आणलेल्या सा~या स्ट्रा बेरी मी टेबलवरच्या ग्लास बाऊल मध्ये ठेवल्या आहेत..
त्या मूठभर मी तोंडात घेणार आहे..
अन तू तुझ्या ओठांनी त्याचा सारा रस चोखून घ्यायचा आहे..
होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर
अन ओटी पोटावर ओघळतोय,
पण तो तू ओठांनी हळुवार पणें टिपून घ्यायचा आहेस..
ह्या बेधुंद संध्याकाळी. आज, थोडं वेड्या सारखं वागायचं आहे..
सा~या स्ट्रा बेरी आपण अशाच संपवणार आहोत...
संध्याकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यावर नेहमीप्रमाणे विचारू नकोस
की जेवण तयार आहे का..
प्रतिक्रिया
21 Aug 2016 - 7:32 am | मुक्त
कविता ?????
21 Aug 2016 - 7:48 am | कैलासवासी सोन्याबापु
21 Aug 2016 - 12:17 pm | आदूबाळ
लौल! अकु कपूर.
21 Aug 2016 - 12:46 pm | अभ्या..
श्रध्दा पाहिजे. त्याशिवाय काही खरे नाही.
21 Aug 2016 - 12:27 pm | माम्लेदारचा पन्खा
ती जय आदितीची पोस्टरं अशीच होती... फक्त थोडी अलिकडची !
21 Aug 2016 - 12:59 pm | प्रसाद_१९८२
:) ळॉळ...
21 Aug 2016 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयडिया आयडियाने लिहित राहा, अंदाज पाहुन बरं का ! बाकी, काय चाललंय ? पाऊस असा उघडला की जसा पावसाळ्याचा त्याचा काही संबंधच नाही. पाऊस नसला तर कुठून यायच्या स्ट्रॉब-या ? ;)
-दिलीप बिरुटे
21 Aug 2016 - 1:53 pm | जव्हेरगंज
खिक्क!!
21 Aug 2016 - 7:37 pm | क्षमस्व
खट्याक!!
22 Aug 2016 - 3:35 pm | बोका-ए-आझम
रच्याकने स्ट्रा बेरी काय असतं?
22 Aug 2016 - 5:14 pm | नाखु
बेरी विना स्ट्रॉने आस्वादायच्या असतात असं काहीस्म असेल. अता श्रीराम असते तर त्यांनी दिवे(टे) नक्की लावले असते, असा कयास आहे.
वाचक नाखु
22 Aug 2016 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा
अकुंची श्रुं गारीक जिल्बी!
22 Aug 2016 - 9:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
होय गुर्जी, ही "श्रुं गारीक" जिलबी वाचून उगाच "गार्लिक जिलबी" खायला लागली तर जसे होईल तसे तोंड झाले होते आमचे
22 Aug 2016 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा
बलं...
मअता पेढा खा.. आणी गोड करा तोंड.
22 Aug 2016 - 10:55 pm | उडन खटोला
>>>होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर
अन ओटी पोटावर ओघळतोय
तुम्ही स्ट्रॉबेऱ्या बघून घेतल्या नाहीयेत. ताज्या अशा चिकचिकित होऊन ठिपकत नाहीत. तुम्ही घेतलेल्या जास्त पिकलेल्या असणार.
बाकी आता सिझन नसताना (स्ट्रॉबेरीचा म्हणतोय मी) कसं काय ब्वा???
22 Aug 2016 - 10:55 pm | उडन खटोला
>>>होय मला माहीत आहे ओठातून सारा रस वक्षावर
अन ओटी पोटावर ओघळतोय
तुम्ही स्ट्रॉबेऱ्या बघून घेतल्या नाहीयेत. ताज्या अशा चिकचिकित होऊन ठिपकत नाहीत. तुम्ही घेतलेल्या जास्त पिकलेल्या असणार.
बाकी आता सिझन नसताना (स्ट्रॉबेरीचा म्हणतोय मी) कसं काय ब्वा???