ताज्या घडामोडी :भाग २

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
14 Aug 2016 - 8:57 am
गाभा: 

पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

14 Aug 2016 - 10:23 am | संजय पाटिल

नुसती डरकाळी फोडुन काही होणार नाही. ... पण कमीतकमी डरकाळि तरी फोडली..
मी पयला..

मार्मिक गोडसे's picture

16 Aug 2016 - 7:50 pm | मार्मिक गोडसे

ह्यांना 'तो' प्रदेश भारतात नसला तरी फार पडत नसावा.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/RSS-Organizer-Map-India-Pa...

गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले

हे भारतीय गुप्तचर यंत्रणेचे यश आहे.

दिगोचि's picture

4 Oct 2016 - 3:56 pm | दिगोचि

काही दिवसापूर्वी एका पाकिस्तानी व्रुत्तपत्रात असे वाचले की गिल्गिट बाल्टीस्तानच्या एका पुढार्याने असे सान्गितले आहे की ते लोक पाकीस्तानावर हाला करणार्यन्च्या विरुद्ध उभे राहतील असेच उद्गार एका बलुच नेत्याने पण लाढले आहेत.तेम्व्हा भारताच्या नेत्यानी या दोन्ही प्रान्तातल्या लोकावर विश्वास ठेवू नये.बापण पाकिस्तानवर हल्ल केल्यास ते आपल्या विरुद्ध उभे राहतील. कारण मुसल्मान एक्मेकाना इतरान्च्या विरुद्ध मदत करतात असे आपण पाहिले आहे.

वेगळा रेल्वे अर्थसंकल्प हा प्रकार जगात आपल्या देशात सोडून इतर कुठे होत असेल असं वाटत नाही, पण ही ९२ वर्षांची परंपरा आता संपुष्टात येणार आहे. २०१७ पासून अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे एकत्र होणार आहेत. आता दरवाढ, नवीन गाड्या, रेल्वेमार्ग इत्यादी गोष्टी अर्थविभाग आणि अर्थमंत्र्यांची जबाबदारी असेल.
http://www.thehindubusinessline.com/economy/logistics/no-rail-budget-fro...

अस झालं तर मग रेल्वे मंत्री हे पद उरणार नाही का?
हे जरा जास्तीच workload नाही होणार का अर्थमंत्री ना?

बोका-ए-आझम's picture

14 Aug 2016 - 11:46 pm | बोका-ए-आझम

अस झालं तर मग रेल्वे मंत्री हे पद उरणार नाही का?

रेल्वेमंत्र्यांना रेल्वे अर्थसंकल्प प्रस्तुत करण्याव्यतिरिक्तही अनेक कामं असतातच. शिवाय रेल्वे अर्थसंकल्प रद्द झालेला नाही. तो मुख्य अर्थसंकल्पात विलीन झाला आहे. याचा अर्थ मुख्य अर्थसंकल्पात आता रेल्वे हा एक वेगळा भाग असेल.

हे जरा जास्तीच workload नाही होणार का अर्थमंत्री ना?

असं होणार नाही. रेल्वेमंत्री उलट त्यांना मदत करतील.

प्रत्यक्ष काय होतंय ते फेब्रुवारी २०१७ मध्येच समजेल.

अमितदादा's picture

14 Aug 2016 - 12:00 pm | अमितदादा

मोदी सरकार ने योग्य पाऊल उचल आहे।
पाकिस्तानच्या संभ्रम अवस्थेतील परदेशी नीती संदर्भांतील अवस्थेबद्दल खालील लेखात सुंदर विवेचन केले आहे
http://thediplomat.com/2016/08/why-pakistans-foreign-policy-is-so-confused/
पाकिस्तान मधील सरकार आणि आर्मी यांच्यातील सुप्त संघर्ष, पाकिस्तान चे अमेरिका चीन भारत अफगाणिस्तान आणि इराण शी असलेल्या संबंधावर सुद्धा भाष्य केले आहे.

अवांतर: राजकीय आणि सैनिकी डावपेचाचा (स्ट्रॅटेगिक) घडामोडी साठी वेगळा धागा असावा का?

गामा पैलवान's picture

14 Aug 2016 - 6:32 pm | गामा पैलवान

अमितदादा,

लेख चांगला आहे. पण हे शीर्षक वाचून हसू आलं : Why Pakistan's Foreign Policy Is So Confused?

पाकिस्तानला परराष्ट्रधोरण आहे हे विधानंच मुळातून मोठ्ठा विनोद आहे. अमेरिका नाहीतर चीनच्या तालावर नाचणे एव्हढेच पाकिस्तानी परराष्ट्रखात्याचे काम आहे. असो.

लेखाच्या शेवटीशेवटी आलेलं हे वाक्य महत्त्वाचं आहे :

>> In today’s modern world, the foreign policy of any country must be guided by its history,
>> geography, and internal circumstances.

पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल भारताहून वेगळा नाही. मात्र अंतर्गत परिस्थिती भारताहून पार वेगळी आहे. याचं कारण लेखातच दिलं आहे. ते म्हणजे पाकचं परराष्ट्रधोरण सुरक्षेनुरूप ठरतं. असं का, तर पाकचा प्रत्येक हुकूमशहा फक्त आपलं बूड टिकवण्याच्या चिंतेत असतो. नेमका हाच भारत आणि पाकच्या अंतर्गत परिस्थितीतला फरक आहे.

तर मोदींचं पाकला सांगणं असंय की तुम्ही नाहीतरी चीन वा अमेरिकेच्या तालावर नाचता. मग आमच्या तालावर नाचायला काय हरकत आहे? नाचून तर पहा एकदा!

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

14 Aug 2016 - 9:48 pm | अमितदादा

तुमचं बहुतांश म्हणणं पटतंय, पण हे वाक्य पूर्ण सत्य नाही

अमेरिका नाहीतर चीनच्या तालावर नाचणे एव्हढेच पाकिस्तानी परराष्ट्रखात्याचे काम आहे

पाकिस्तान ची परराष्ट्र धोरनावर अमेरिका आणि चीन यांचा परिणाम आहे मात्र पाकिस्तान त्यांची स्वतःची स्वतंत्र धोरण राबवत असतो, अन्यथा अमेरिकेचा शत्रू लादेन पाकिस्तान मध्ये सापडला नसता, पाकिस्तान ने अमेरिकेच्या इच्छे नुसार अफगाण तालिबान ला पाठिंबा काढला असता. चीन मात्र पाकिस्तान ची परराष्ट्र नीती मोठ्या प्रमाणात influence करतो. पण समजा उद्या भारत चीन संबंध चांगले झाले तरी भारत पाकिस्तान संबंध चांगले होतील याची ग्यारंटी नाही।
बाकी हा लेख यासाठी महत्वाचा करणं पाकिस्तान मध्ये असे प्रोग्रेसिव्ह विचार मांडणारे, चुका दःखावून देणारे लेख आणि लेखक खूप कमी आहेत.

पंतप्रधांनी आज भाषणामध्ये बलुचिस्तान चा उल्लेख केला.
पाकड्यांचा काश्मीर पॉलिटिक्स ला काउंटर करायला चांगली strategy वाटतेय...
आपली विदेश कुटनीती आक्रमक आणि proactive होत आहे का?
मागे एकदा youtube वर फित पहिली होती अजित डोवल यांची.... त्यांनी डायरेक्ट धमकी दिली होती पाकड्यांना कि काश्मीर मध्ये काड्या करायचे थांबवा नाहीतर बलुचिस्तान तोडतो....

अभ्या..'s picture

15 Aug 2016 - 1:28 pm | अभ्या..

देऊ दे धमक्या. बरं असतं.
धमक्या देणे हा कुणाचा विशेषाधिकार नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 12:47 am | कैलासवासी सोन्याबापु

मुळात पाकिस्तान कायम "भारत बलुचिस्तानात काशी करतंय होssss" म्हणून शिमगा करीत असे (करत असेलही, ते फक्त देव, रॉ-आयबी अन पंप्रला ठाऊक होते) ते उघड बोलून आपण आपले मॉरल व्हेंतेज घालवतो आहोत का हा विचार करायला हवा अगोदर, देवा बलुचिस्तान बद्दल उघड बोलणे म्हणजे पाकिस्तान ने कश्मीरच्या अस्थिरतेला "स्वातंत्र्यलढा" म्हणायची परवानगी अन तिकडे डब्बल नंगानाच करायचे तिकीट दिल्यासारखे ठरले तर ते ह्या देशाचे आजवरचे सर्वात मोठे इंटेलिजन्स फेलियर असेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तू समज्या क्या? नै तो मई और क्लीयर करताय

बोका-ए-आझम's picture

20 Aug 2016 - 1:36 am | बोका-ए-आझम

जसा पाकिस्तानचा हात काश्मीरमध्ये दिसतो किंवा खलिस्तानला पाकिस्तानची फूस होती हे जसं उघड झालेलं आहे तसा बलुचिस्तानमधला भारतीय सहभाग (असलाच तर) उघडपणे दिसून येत नाही. अजून एक - बलुची मुस्लिमांना आपण पंजाबी मुस्लिमांच्या दडपशाहीचे बळी आहोत असं आज नाही, पाकिस्तानच्या निर्मितीपासून वाटतंय. पूर्व पाकिस्तानमधला स्वातंत्र्यलढा पाकिस्तानला भौगोलिक अंतरामुळे चिरडता आला नाही आणि बांगलादेशचा जन्म झाला पण बलुचिस्तान कायमच पाकिस्तानची वसाहत म्हणून वापरला गेला. त्यावर आजवर फार कमी बोललं किंवा लिहिलं गेलेलं आहे. मला वाटतं आपण त्याला उघडपणे पाठिंबा न देता पाकिस्तानचा दुटप्पीपणा दाखवायला वापरत आहोत. बाकी तिथे RAW चं काम financing आणि logistical support चं जास्त आहे आणि active operational role फारसा नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या ISI च्या नावाने जसा आपल्या मिडियाने डांगोरा पिटलेला आहे तसा पाकिस्तानी मिडियाला करता आलेलं नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 8:17 am | कैलासवासी सोन्याबापु

जसा पाकिस्तानचा हात काश्मीरमध्ये दिसतो किंवा खलिस्तानला पाकिस्तानची फूस होती हे जसं उघड झालेलं आहे तसा बलुचिस्तानमधला भारतीय सहभाग (असलाच तर) उघडपणे दिसून येत नाही.

अजूनपर्यंत दिसला नव्हता आपला हात बलुचिस्तानात, पण आता आपण शक्यता ओपन करतोय हाच माझा मुद्दा होता.

अजून एक - बलुची मुस्लिमांना आपण पंजाबी मुस्लिमांच्या दडपशाहीचे बळी आहोत असं आज नाही, पाकिस्तानच्या निर्मितीपासून वाटतंय. पूर्व पाकिस्तानमधला स्वातंत्र्यलढा पाकिस्तानला भौगोलिक अंतरामुळे चिरडता आला नाही आणि बांगलादेशचा जन्म झाला पण बलुचिस्तान कायमच पाकिस्तानची वसाहत म्हणून वापरला गेला. त्यावर आजवर फार कमी बोललं किंवा लिहिलं गेलेलं आहे. मला वाटतं आपण त्याला उघडपणे पाठिंबा न देता पाकिस्तानचा दुटप्पीपणा दाखवायला वापरत आहोत.

ही स्टेप सेल्फ इंसिनीरेटिंग न ठरावी म्हणजे मिळवली, म्हणजे बघा पाकिस्तानात नुसता बलोच विभाजनवादाचा मुद्दा नाहीये, इतकी वर्षे झालीत तरीही अजून फक्त बलोच नाही तर सिंधी, पख्तुन, मूहाजीर ही मंडळी सुद्धा पंजाबी दमनाची भाषा करत आले आहेत, आता असे बघा तुम्ही "सिंधुदेश मोव्हमेंट" ट्रॅक केली आहेत काय? केली असल्यास आपणाला कळेल की बलुचिस्तान प्रमाणे ते भारताची सहानुभूती मागत आहेत, अन ती गुपचूपच द्यायची असते असला बोभाटा करून नाही, परवाच एका बलोच ऍक्टिव्हिस्ट पोरीने मोदींना रक्षाबंधनाच्या भावपूर्ण शुभेच्छा दिल्या, अगदी शेवटी गुजरातीत बोलून अन अगोदर, सगळ्या बलोच स्त्रिया तुम्हाला भाऊ मानतात वगैरे प्रतिपादन करून, आता ह्या बहिणीला ओवाळणी नकोय असे म्हणता येईल का? आता ह्या अन अश्या मॅसेजसना भारत/मोदी कसे प्रतिसाद देतात त्यावर एक महत्वाची गोष्ट ठरेल, ती म्हणजे पाकिस्तानातल्या इतर दबलेल्या आवाजांना भारत विश्वसनीय वाटेल का नाही, आपल्याला नुसता बलुचिस्तान उपयोगी नाही, "एल" आकारात बलुचिस्तान अन सिंध हवे आहेत, इट्स या नाईट ऑफ फोज अहेड बोक्याभाऊ

बाकी तिथे RAW चं काम financing आणि logistical support चं जास्त आहे आणि active operational role फारसा नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या ISI च्या नावाने जसा आपल्या मिडियाने डांगोरा पिटलेला आहे तसा पाकिस्तानी मिडियाला करता आलेलं नाही.

सहज एकदा ह्या विषयाबाबत कीवर्डस टाकून युट्युबला चक्कर टाका(च) ही आग्रहाची विनंती. त्या नंतरही हा गैरसमज दूर न झाल्यास अजून चर्चा करता येईल !

बोका-ए-आझम's picture

20 Aug 2016 - 10:33 am | बोका-ए-आझम

कारण पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे ही गरज आहेच. शिवाय काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने इतक्या वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित केलाय. त्या मानाने आपण बलुचिस्तान आणि सिंध याबद्दल काहीच बोलत नाही. शिवाय पाकिस्तानातली ही अंतर्गत अशांतता त्यांच्याच पंजाबीबहुल सरकारांच्या आणि सैन्याच्या दडपशाहीमुळे आलेली आहे हे जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे आणि अमेरिकेने मदत नाकारलेली असताना, सार्क परिषदेत पाकिस्तानने भारतीय गृहमंत्र्यांना योग्य वागणूक दिलेली नसताना आणि पाकिस्तान काश्मीरसाठी बैठकींचा आग्रह धरत असताना त्यांच्या सरकारला defensive footing वर ढकलणे हा यामागचा हेतू असू शकतो. Moral high ground alone is not sufficient to resolve the issue; sometimes you have to stoke the fire - Henri Kissinger.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 11:12 am | कैलासवासी सोन्याबापु

पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे ही गरज आहेच.

अलबत, गरज आहेच फक्त ते काम सुमडीत कोंबडी केल्यास उत्तम, जमाना सर्जिकल स्ट्राईकचा आहे, शांतीत क्रांती सर्वोत्तम, फॉर गॉड्स सेक अहो तुम्ही मोसादकार आहात हो मी काय अजून सांगू ;)

शिवाय काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने इतक्या वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित केलाय. त्या मानाने आपण बलुचिस्तान आणि सिंध याबद्दल काहीच बोलत नाही.

मुद्दा उपास्थित करून कुठले तीर मारले पाकिस्तान ने? उलट मुद्दे मांडून "दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे" अशी प्रतिमा करून घेतलीच न स्वतःची त्यांनी?? आपणही तेच करावे म्हणता??

शिवाय पाकिस्तानातली ही अंतर्गत अशांतता त्यांच्याच पंजाबीबहुल सरकारांच्या आणि सैन्याच्या दडपशाहीमुळे आलेली आहे हे जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे

कश्याला फुकट उघड कंदील पेटवावे म्हणतो मी राजे? उलट सहज बिडी फुकत मी नाही त्यातली करत परसदारी जाऊन उभे खळे पेटवणे अन नंतर "अरेरे वाईट झाले बघा" म्हणणे ह्यासारखी माजा नाही

आणि अमेरिकेने मदत नाकारलेली असताना, सार्क परिषदेत पाकिस्तानने भारतीय गृहमंत्र्यांना योग्य वागणूक दिलेली नसताना आणि पाकिस्तान काश्मीरसाठी बैठकींचा आग्रह धरत असताना त्यांच्या सरकारला defensive footing वर ढकलणे हा यामागचा हेतू असू शकतो.

तेच तर मी म्हणतोय बॅकफुटींग राहिले बाजूला, उलटे काश्मिरात घुसायची तिकिटे दिलीत असे नकोय व्हायला

Moral high ground alone is not sufficient to resolve the issue; sometimes you have to stoke the fire - Henri Kissinger.

Well, it is always easy to say so for Kissinger, for he has that magical green paper with him to wipe his ass. Besides, that's the beauty of keeping intel ops strictly secret, u get to play ur opponent and also weild a shield of moral high ground, no wise man would enter a fencing or lancing duel without proper body armour, which in this case is the moral high ground . :)

अभ्या..'s picture

20 Aug 2016 - 11:21 am | अभ्या..

कश्याला फुकट उघड कंदील पेटवावे म्हणतो मी राजे? उलट सहज बिडी फुकत मी नाही त्यातली करत परसदारी जाऊन उभे खळे पेटवणे अन नंतर "अरेरे वाईट झाले बघा" म्हणणे ह्यासारखी माजा नाही

समजले.
निळूभाऊ फुलेंना पर्याय नाही. ;)

तर्राट जोकर's picture

20 Aug 2016 - 11:38 am | तर्राट जोकर

बापूसाहेब,
पण मग "माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर" करणार्‍यांचे कसे होईल???

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

20 Aug 2016 - 11:41 am | खालीमुंडी पाताळधुंडी

या

अमितदादा's picture

20 Aug 2016 - 12:23 pm | अमितदादा

बापू तुमचा मुद्दा एकंदरीत पटतोय परंतु भारताने बलुचिस्तान या विषयावर अजून हि रेड लाईन क्रॉस नाही केलीय. भारताने कुठे हि बलुच स्वातंत्र्याबद्दल चकार शब्द नाही काढला फक्त तेथील असणाऱ्या असंतोषावर बोट ठेवले आहे. थोडक्यात काय भारताला सध्या पाकिस्तान ची जखम मोठी करायची नाहीये फक्त त्यावर मीठ चोळायच आहे. भारत सध्या बलुचिस्तान चा pressure point म्हणून वापर करतंय.

अजूनपर्यंत दिसला नव्हता आपला हात बलुचिस्तानात, पण आता आपण शक्यता ओपन करतोय हाच माझा मुद्दा होता.

हे काही पटत नाही मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भारताने सगळ्यात मोठा घोळ घालून ठेवला. 2009 मध्ये 2009 Sharm el Sheikh बैठकीत बलुचिस्तान मधील भारताचा हस्तक्षेप मान्य केलाय.

सहज एकदा ह्या विषयाबाबत कीवर्डस टाकून युट्युबला चक्कर टाका(च) ही आग्रहाची विनंती. त्या नंतरही हा गैरसमज दूर न झाल्यास अजून चर्चा करता येईल !

हे अगदी योग्य, युट्युब ला नाही गेलात आणि जरी डॉन हे पाकिस्तान च वर्तमानपत्र वाचलं तरी समजेल भारताच्या नावाने किती भोभाटा केला जातो ते. अगदी परवा quetta मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या भारताला जबाबदार धरण्यात आलाय.

खरं तर बलुचिस्तान अलग करण शक्य नाही फक्त तेथील असंतोष भडकवत ठेवून पाकिस्तान ला काश्मीर मध्ये नांग्या टाकण्यास भाग पाडले जाऊ शकते असे सद्याच्या शासन कर्त्यांचे मत दिसते, अर्थात भारताने पाकिस्तान खलिस्तान चळवळ जिवंत करू शकतो यासाठी तयार राहायला हवे.

श्रीगुरुजी's picture

16 Aug 2016 - 2:41 pm | श्रीगुरुजी

‘अॅम्नेस्टी इंडिया’विरोधात बंगळुरात देशद्रोहचा गुन्हा

नेहरू विद्यापीठात ६ महिन्यांपूर्वी असाच प्रकार झाला होता व काही विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, तेव्हा केंद्रातील भाजप सरकार सूड्बुद्धीने वागत आहे असा आरोप करून राहुल व केजरीवाल विद्यापीठात धावत गेले होते व त्यांनी विद्यार्थ्यांचे समर्थन करणारी जोरदार भाषणे ठोकली होती.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे आणि तिथेच देशद्रोही घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा कर्नाटक पोलिसांनी दाखल केला आहे. राहुल आणि केजरीवाल बंगळुरचे विमान कधी पकडतात याची उत्सुकतेने वाट पहात आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 8:33 am | कैलासवासी सोन्याबापु

भारतातल्या दोन मोठ्या अन महत्वाच्या मुस्लिम पंथांपैकी एक म्हणजे बरेलवी पंथाच्या एका बॉडी ने हाफिज सईद विरुद्ध फतवा घोषित केला असून ह्या फतव्याअंतर्गत त्याला मुसलमान मानू नये असे सांगितले आहे, तसेच त्याचे शब्द, भाषणे वगैरे ऐकणे हे सुद्धा "हराम" असेल असे घोषित केले आहे, ही एक चांगली बाब असून ह्याचे मार्केटिंग व्हायला हवे असे वाटते,

अजून डिटेल्स इथे वाचता येतील

चंपाबाई's picture

20 Aug 2016 - 9:37 am | चंपाबाई

असा एक पंथ एका व्यक्तीला एका धर्मातून घालवू शकतो का ?

हे म्हणजे आळंदीच्या ब्रह्मवृंदाने अमका तमका हा ब्राह्मण नाही असे जाहिर केल्यागत झाले ना ?

बापूंचे आभार! ब्राम्हण हा पंथ मानल्याबद्दल चंपूताईंचे आभार! १३ व्या शतकात घडलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा आजच्या दहशतवादाशी संदर्भ लावल्याबद्दल चंपूताईंचा येत्या बकरी ईदेला देवबांद इथे जाहीर सत्कार करण्याची आणि त्यांना एक बटाटावडा, त्याचं तेल आणि एक वांगं हे बक्षीस म्हणून देण्याची मी मिपाप्रशासनाला विनंती करतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 9:55 am | कैलासवासी सोन्याबापु

काई माहिती नाही बुआ, फतव्या संबंधी कायदे कसे आहेत हे तुमच्यासारखा शरिया भक्त सांगू शकला तर बरे कसे?

Ujjwal's picture

20 Aug 2016 - 1:31 pm | Ujjwal

+१

भारत चीन सीमेवर भारत चांगल्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, सैनिक यांची भर घालत आहे. त्यातील काही चालू घडामोडी
1) भारताने नुकतेच अरुणाचल प्रदेश मधील पासीघाट ह्या advanced landing ground (ALG) वर सुखोई उतरवलं. अरुणाचल प्रदेश मध्ये असणाऱ्या 8 ALG पैकी 5 ALG ह्या भारतीय वायुसेनेनें अत्याधुनिक केल्या आहेत. 2 ALG वर अत्याधुनिक करायचं काम चालू आहे आणि 1 ALG वर भविष्यात काम होईल. सुखोई वरती ब्राह्मोस ची यशस्वी integration झाल्या मुळे सुखोई ची संहारण क्षमता किती तरी पटीने वाढाली आहे.भारतीय वायुसेनेच्या दोन squadron ईशान्य भारतात आहेत. तेजपुर आणि छबूआ, दोन्ही ठिकाणे आसाम मध्ये आहेत.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/iaf-makes-histor...

2) भारताने चीन सीमेवरती एकूण 73 रोड हे स्ट्रॅटेगिक दृष्टया महत्वाचे म्हणून घोषित केले आहेत आणि त्याच काम BRO वेगाने करत आहे. आत्तापर्यंत यातील 22 रोड पूर्ण झाले असून उरलेले पूर्णत्वाचा विविध टप्यावर आहेत.
http://www.asianage.com/india/india-aggressive-roads-china-997

3) लडाख मध्ये भारताने नुकतेच 100 T72 टॅंक तैनात केले आहेत
http://us.blastingnews.com/news/2016/07/modi-orders-deployment-of-over-1...

4) ईशान्य भारतात लवकरच भारतीय आर्मी ब्राह्मोस मिसाईल रेजिमेंट तैनात करेल. भारतीय सरकार ने नुकतीच ह्याला मंजुरी दिली आहे
http://m.timesofindia.com/india/Army-to-get-steep-dive-BrahMos-missile-r...

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2016 - 11:29 pm | श्रीगुरुजी

काय छपरी माणसं आहेत! सिंधु अंतिम फेरीत पोहोचल्यावर तिच्या खेळाऐवजी तिची नक्की जात कोणती याचीच लोकांना जास्त उत्सुकता लागून राहिली.

http://www.maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016...

गामा पैलवान's picture

21 Aug 2016 - 12:27 am | गामा पैलवान

त्याचं काय आहे श्रीगुरुजी, भारतातल्या काही लोकांना कोणी प्रसिद्ध व्यक्ती आपल्या जातीची असल्याचं कळलं की एक प्रकारचा सामाजिक उत्कटबिंदू (= सोशल ऑर्ग्याझम) प्राप्त होतो. त्याला काही इलाज नाही. :-(
आ.न.,
-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

20 Aug 2016 - 11:37 pm | बोका-ए-आझम

यांची RBI चे Governor म्हणून निवड. Inflation Warrior म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाॅ.पटेल यांची निवड करुन सरकारने महागाई निवारण आणि रोजगारनिर्मिती या दोघांपैकी महागाई नियंत्रण हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं असल्याचे संकेत दिले आहेत. रघुराम राजनना job killer वगैरे विशेषणं वाओरणारे सुब्रमण्यम स्वामी डाॅ. पटेलना काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.

इल्यूमिनाटस's picture

21 Aug 2016 - 10:44 am | इल्यूमिनाटस

जसे राजन तसेच पटेल. दोघांवरही पाश्चात्य आर्थिक संस्कृतीचा पगडा. त्यामुळे स्वामींची चांगलीच पंचाईत झाली असणार!
पण मोदी सरकारची पहिल्यांदाच चांगली नेमणूक!

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2016 - 8:46 am | श्रीगुरुजी

Good step by central government

http://m.rediff.com/news/report/purchase-of-property-issuance-of-driving...

Keeping its promise to provide succour to refugees from neighbouring countries, the National Democratic Alliance government has approved additional facilities for members of minority communities living in India on long-term visa that include opening bank account and power to purchase properties.

Ever since the Narendra Modi government came to power, several concessions have been offered to the persecuted Hindus and Sikhs of the neighbouring countries.

PM Modi had, during the Lok Sabha poll campaigning in 2014, made a distinction between Hindu and Muslim refugees from Bangladesh arguing that the former should be accommodated.

"We have a responsibility towards Hindus who are harassed and suffer in other countries. India is the only place for them. We will have to accommodate them here," he had said.

चंपाबाई's picture

21 Aug 2016 - 10:47 am | चंपाबाई

मोदींच्या नऊ लाख रु च्या कोटची गिनिज बुकात नोंद.

मोदी व मोदीभक्तांचे अभिनंदन.

तो कोट एकाने ४ कोटि रुपयाना विकत घेतला व ती रक्कम देणगी म्हणुन दिली हे मात्र लिहायला विसरलात. मी भारतात राहात नाही व मोदीभक्तही नाही.

चंपाबाई's picture

21 Aug 2016 - 7:51 pm | चंपाबाई

भाजपाचा कार्यकर्ता बाँब तयार करताना स्फोट होऊन केरळात मेला.

( टिपू सुल्तानाने भारताच्या इतिहासात प्रथमच मिसाइल वापरले. ह्याना साधा बाँब तयार करुन उडवता येत नाही. )

आणि शेवटी ब्रिटिशांच्या हातनंच मारला गेला ना तो. काय दिवे लावले मिसाईल बनवून?

चंपाबाई's picture

22 Aug 2016 - 7:43 am | चंपाबाई

कधीतरी प्रत्येकजण मरणारच ना ? की, मिसाइल मिळाले म्हणून तो अमर होणार होता ?

गामा पैलवान's picture

22 Aug 2016 - 12:54 pm | गामा पैलवान

कधीतरी प्रत्येकजण मरणारच ना ? की, बाँब फुटला नाही म्हणून तो अमर होणार होता ?

-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

22 Aug 2016 - 1:13 pm | बोका-ए-आझम

असल्यास शेअर करावी.

अर्धवटराव's picture

22 Aug 2016 - 1:17 am | अर्धवटराव

काहि शिका म्हणावं जिहादी एक्स्पर्ट्स कडुन.

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2016 - 2:13 pm | श्रीगुरुजी

http://indianexpress.com/article/india/india-news-india/abid-pasha-mysur...

WHEN THE Mysuru police arrested carpenter Abid Pasha, 34, on August 7, they reckoned they would find answers to two major crimes — the March 13 murder of Bajrang Dal activist K Raju and the June 2011 twin murders of business management students Vignesh and Sudhindra, who had been kidnapped. What they had not reckoned with was his involvement in five other murders.

Pasha’s revelations that he was involved in a series of four murders between 2008 and 2011 and another in 2014 have stunned the police, who had not even listed him as a suspect. They have now found that Pasha and a group of other men — whose affiliations they say are not yet clear — had targeted several people over moral digressions or associations with right-wing Hindu groups in the last eight years.

हे सेक्युलर खून असल्याने पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांनी खुनांचा निषेध करण्याची व पुरस्कार परत करण्याची आवश्यकता नाही.

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 2:19 pm | संदीप डांगे

१,पॉवर गेम मधून हे खून झालेत का?
२,पुरोगाम्यांनी कशावर बोलावे हे तुम्ही ठरवू पाहताय का?

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2016 - 2:35 pm | श्रीगुरुजी

१) पॉवर गेम म्हणजे काय? खून का झालेत हे वृत्तांतात अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे.

२) हे मी कोण ठरविणार बापडा? पुरोगामी कशावर जीव तोडून बोलतात आणि कशावर आळीमिळी गुपचिळी मौन पाळतात हे सर्वांनाच ठाऊक आहे.

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2016 - 7:30 pm | बोका-ए-आझम

भाजप आणि संघविरोध हे पुरोगामी असल्याचं एकमेव लक्षण आहे असं तुम्ही मानता का?

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 7:47 pm | संदीप डांगे

भाजप आणि संघविरोध हे पुरोगामी असल्याचं एकमेव लक्षण आहे

मी असं कुठं म्हटलंय?

हिंदूंच्या हत्या होतांना जे ओरडत नाहीत, पुरस्कार परत करत नाहीत त्यांना श्रीगुरुजी पुरोगामी व निधर्मी विचारवंत म्हणत आहेत. अक्चुअली हा प्रश्न तुम्हीच त्यांना विचारायला हवा.

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2016 - 7:54 pm | बोका-ए-आझम

हिंदूंच्या हत्या होतांना जे ओरडत नाहीत, पुरस्कार परत करत नाहीत त्यांना श्रीगुरुजी पुरोगामी व निधर्मी विचारवंत म्हणत आहेत.

त्यांच्या बोलण्यातला उपहास तुम्हाला कळला नसेल असं मला वाटत नाही. आणि या दोन प्रतिक्रियांमधला (जेव्हा मारले जाणाऱ्यांचे धर्म वेगवेगळे असतात तेव्हा ज्या प्रतिक्रिया येतात) विरोधाभासही जाणवत नसेल असंही वाटत नाही. तरीही तुम्ही गुरुजींना प्रश्न विचारलात याचं आश्चर्य वाटलं.

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 8:05 pm | संदीप डांगे

गुरुजींच्या वागण्यातही तोच सोयिस्करपणा, तीच विसंगती असते जे ती दुसर्‍यांमधे शोधून शोधून (राजकिय कारणास्तव) इथे आणून टाकत असतात. गुरुजींना प्रश्न विचारण्याचे कारण हीच विसंगती उघड करणे.

त्यात काय आश्चर्य, "जबतक तेरे पैर चलेंगे, उसकी सांसे चलेंगी" असं नातं आहे आमचं. =))

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2016 - 12:18 am | श्रीगुरुजी

हिंदूंच्या हत्या होतांना जे ओरडत नाहीत, पुरस्कार परत करत नाहीत त्यांना श्रीगुरुजी पुरोगामी व निधर्मी विचारवंत म्हणत आहेत. अक्चुअली हा प्रश्न तुम्हीच त्यांना विचारायला हवा.

चुकीचा निष्कर्ष. हिंदूंच्या हत्या होतांना जे ओरडत नाहीत, पुरस्कार परत करत नाहीत त्यांना मी पुरोगामी व निधर्मी विचारवंत म्हणत नसून जे पुरोगामी व निधर्मी विचारवंत (म्हणजेच निधर्मांध) आहेत ते हिंदूंच्या हत्या होतांना ओरडत नाहीत व पुरस्कार परत करत नाहीत असे मी म्हणतो. (गणिती प्रमेयातील कॉन्व्हर्स आहे हा).

अमितदादा's picture

23 Aug 2016 - 2:42 pm | अमितदादा

बातमीच्या हेडींग वरून बातमी दुर्लक्षित केलेली परंतु तुम्ही इथं पोस्ट केल्यावर वाचली. हीन आणि हिंसक मनोवृत्ती आहे. रॅडिकल मनोवृत्ती दिसून येतेय. गुरुजी एखादी लिंक पोस्ट केल्यावर त्याची समरी 2 वाक्यात मराठीत दिली तर बरं होईल, अर्थात ही विनंती आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2016 - 2:54 pm | श्रीगुरुजी

वरील बातमीनुसार म्हैसूर मधील अबिद पाशा व त्याच्या टोळक्याने गेल्या ८ वर्षात भाजप, संघ व बजरंग दलाशी संबंधित असल्याच्या कारणावरून एकूण ८ जणांचा खून केलेला आहे असे पोलिस तपासात दिसते.

त्यांनी २००८ मध्ये शशीकुमार नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मुस्लिम मुलीशी संबंध असल्यावरून खून केला. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी आनंद पै या स्थानिक भाजप नेत्यावर व त्याच्या रमेश नावाच्या साथीदारावर हल्ला केला. त्यात रमेशचा मृत्यु झाला. त्यानंतर भाजप, बजरंग दलाशी संबंधित असल्याच्या कारणावरून त्यांनी अनेक खून केले.

हे सर्व खून जातीयवादी, धार्मिक कारणांवरून झालेले दिसतात. अगदी अलिकडचा खून म्हणजे के राजू नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मार्च २०१६ मध्ये झालेला खून.

ऑक्टोबर २०१५ मध्ये अखलाखच्या खुनावरून रान उठविणारे, पुरस्कार परत करणारे निधर्मांध या ८ हिंदूंच्या धार्मिक कारणावरून केलेल्या खुनांबद्दल तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प आहेत. ही मंडळी खून झाल्यानंतर आधी मरणार्‍याचा व मारणार्‍याचा धर्म बघतात आणि नंतर ठरवितात की बेंबीच्या देठापासून किचाळायचे का डोळे मिटून मौन पाळायचे.

चंपाबाई's picture

23 Aug 2016 - 3:10 pm | चंपाबाई

तुमची आठ प्यादी मेली तर तुम्ही का नाही किंकाळ्या फोडल्या ?

गामा पैलवान's picture

23 Aug 2016 - 6:47 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

फोडल्या की किंकाळ्या. तुम्हाला ऐकू नाही आल्या? कान फुटले काय?

आ.न.,
-गा.पै.

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2016 - 7:28 pm | बोका-ए-आझम

तुमची आठ प्यादी मेली तर तुम्ही का नाही किंकाळ्या फोडल्या ?

तुमची म्हणजे? जे मारले गेले ते भारतीय नव्हते का? का हिंदू भारतीय नसतात असं तुमचं मत आहे?

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2016 - 7:21 pm | बोका-ए-आझम

ती केरळमधल्या बातमीची लिंक कुठे आहे? का ती बातमी तुम्हाला झालेला साक्षात्कार होता?

चंपाबाई's picture

23 Aug 2016 - 8:10 pm | चंपाबाई

http://m.firstpost.com/india/kerala-bjp-worker-dies-as-bomb-made-by-him-...

गुगलवर केरळ बीजेपी बाँब शोधा.

याचा अर्थ अजून काही निश्चित झालेलं नाही. Selective reporting म्हणतात ते हेच.

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2016 - 8:11 pm | राजेश घासकडवी

'पाकिस्तान हा नरक नाही, तिथे आपल्यासारखीच माणसं राहातात.' हे विधान केल्याबद्दल कोणावर तरी देशद्रोहाचा खटला घातला. अशा भलत्यासलत्या अफवा पसरवणारांना अशीच शिक्षा पाहिजे. माणसं राहातात म्हणे तिथे! जिभेला काही हाडबिड काही आहे की नाही?

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/advocate-registers-case-ag...

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2016 - 2:19 pm | श्रीगुरुजी

विधान केल्याचा हेतू अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला आहे. रम्याला अपेक्षेपेक्षा जोरदार प्रसिद्धी मिळाली आहे. सवंग आणि बिनभांडवली प्रसिद्धी मिळविण्याचे जे यशस्वी मार्ग आहेत त्यामध्ये मोदींविरूद्ध १४० अक्षरांचे ट्वीट करणे (उदा. अडगळीत पडलेली नेहा धुपिया नावाची एक सुमार नटी एका ट्वीटमुळे एकदम चर्चेचा विषय झाली होती) किंवा पाकिस्तानचे तोंड भरून कौतुक करणे. असे काही केले की तुम्ही अडगळीतून बाहेर येऊन एकदम प्रसिद्धीच्या झोतात येता.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2016 - 2:39 pm | श्रीगुरुजी

सवंग आणि बिनभांडवली प्रसिद्धी मिळविण्याचा अजून एक खात्रीशीर मार्ग म्हणजे देशातील वाढत्या फॅसिझममुळे आणि वाढत्या असहिष्णुतेमुळे आपण व्यथित झालो असून त्याच्या निषेधार्थ आपण आपल्याला मिळालेला पुरस्कार परत करीत आहोत असे जाहीर करणे. असे केले की अफाट प्रसिद्धी मिळते. कोणालाही माहित नसलेले अनेक लुंगेसुंगे गतवर्षी हा मार्ग वापरून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते.

राजेश घासकडवी's picture

25 Aug 2016 - 12:04 am | राजेश घासकडवी

बरोब्बर. मला तर वाटतं की 'पाकिस्तान नरक नाही' असं विधान केल्याबद्दल वस्सकन अंगावर येणारे सगळे त्या रम्याचे भक्त असणार. हे सगळं प्लॅंडच आहे. किंबहुना तिच्यावर खटला ठोकणारा माणूसही तिला किंवा कॉंग्रसला सामील असणार. काय चाललंय हे? पूर्वी असं नसायचं. खुद्द वाजपेयींनी 'पाकिस्तानात माझं चांगलं स्वागत झालं' असं म्हटलं होतं. तेव्हा असलं काहीतरी षडयंत्र नव्हतं.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2016 - 9:42 am | श्रीगुरुजी

अगदी बरोबर. फुकट आणि सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा हक्क सर्वांनाच आहे.

मटा ऑनलाइन वृत्त । संयुक्त राष्ट्रे

भारताचा मोस्ट वाँटेड गुंड दाऊद इब्राहिम आमच्याकडे नाहीच, असं म्हणणाऱ्या पाकिस्तानचं पितळ पुन्हा उघडं पडलं आहे. पाकमध्ये दाऊदनं वास्तव्य केलेल्या नऊ ठिकाणांचे पत्ते भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीला दिले होते, त्यापैकी सहा ठिकाणी दाऊद राहिल्याचं स्पष्ट झालं आहे, तर तीन पत्ते चुकीचे आढळले आहेत.

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे, याबद्दल भारत ठाम आहे. पाकनं त्याला संरक्षण दिल्याचा भारताचा आरोप असून त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीकडे केली होती. त्यासोबत त्यांनी दाऊदच्या पाकमधील नऊ निवासस्थानांचे पत्ते दिले होते. या ठिकाणी दाऊदचं सतत येणं-जाणं आणि मुक्काम असतो, असं भारतानं नमूद केलं होतं.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या आयएस आणि अल् कायदा प्रतिबंधक समितीने भारताने दिलेले पत्ते तपासून पाहिले असता, तीन पत्ते चुकीचे आढळले, तर सहा पत्ते बरोबर निघाले आहेत. त्यामुळे 'आम्ही नाही त्यातले' म्हणणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा 'पोल खोल' झाली आहे.

भारताने दाऊदचा म्हणून दिलेला एक पत्ता युनोच्या राजदूत मालेहा लोधी यांचा असल्याचे समोर आले. त्याशिवाय, आठवा मजला, मेहरान स्क्वेअर, परदेशी हाऊस-३, तलवार एरिआ, क्लिफ`टन, कराची, पाकिस्तान आणि ६/अ, कजुबाम तंजीम, फेज-५, डिफेन्स हौसिंग एरिया, कराची, पाकिस्तान हे दोन्ही पत्ते चुकीचे असल्याचे समितीने म्हटले असून हे तीनही पत्ते यादीतून वगळण्यात आले आहेत
http://m.maharashtratimes.com/international/international-news/dawood-ib...

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

24 Aug 2016 - 1:23 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

अरूणाचलमध्ये ब्राह्मोस तैनातीने चीनवर दबाव.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2016 - 10:58 pm | श्रीगुरुजी
चंपाबाई's picture

24 Aug 2016 - 11:01 pm | चंपाबाई

बरोबर्च बोलले ... त्यांचा घात करणारा संघात होता , इतकेच ते बोलले होते.

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 10:54 am | बोका-ए-आझम

आणि नारायण आपटे हे दोघेही संघाचे नाही तर हिंदू महासभेचे सदस्य होते आणि हिंदू महासभा संघाचा भाग नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर संघाशी संबंधित नव्हते तरीही त्यांना गांधीहत्येच्या खटल्यात आरोपी बनवण्यात आलं होतं. पुढे निर्दोष सोडावं लागलं ही गोष्ट वेगळी. जर नथुराम संघात होता तर सावरकरांना अटक करायची काय गरज होती?
-(चंपाबाईंच्या गुणपत्रकावरचे इतिहासात मिळालेले गुण जाणण्यास उत्सुक) बोका-ए-आझम

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 10:56 am | कैलासवासी सोन्याबापु

हिंदुमहासभा अन रास्वसंघ वेगळे का झाले हो??

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 1:15 pm | बोका-ए-आझम

हिंदू महासभा आणि रा.स्व.संघ हे कधीच एकत्र नव्हते. निदान तसं कुठेही वाचनात आलेलं नाही. अगदी डाव्यातल्या डाव्या इतिहासकारांच्या पुस्तकांतही या दोन्ही संघटना वेगवेगळ्या आहेत असाच उल्लेख पाहिलेला आहे. त्यामुळे त्या कधी वेगळ्या झाल्या हे कसं सांगणार? हिंदू महासभा हा पक्ष लाला लाजपतराय आणि पं. मदनमोहन मालवीय यांच्या अखिल भारतीय हिंदू सभेमधून उदयाला आला आणि या सभेची स्थापना ही १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीनंतर (लाॅर्ड कर्झनकृत) मुस्लिम लीगच्या स्थापनेला उत्तर म्हणून झाली होती असं वाचलेलं आहे. संघाची स्थापना १९२५ मध्ये नागपूरला झाली.

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 2:10 pm | चंपाबाई

Godse dropped out of high school and became an activist with Hindu nationalist organizations Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) and Hindu Mahasabha, although the exact dates of his membership are uncertain

https://en.m.wikipedia.org/wiki/Nathuram_Godse

http://indianexpress.com/article/india/india-others/retracing-nathuram-g...

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 6:42 pm | बोका-ए-आझम

तुम्ही नाही आहात मिपावर?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

25 Aug 2016 - 8:22 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

याला म्हणतात "पळता भुई थोडी"
पळा अजून कुठे कुठे पळताय बघू.

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 9:08 pm | बोका-ए-आझम

आणि आमची मुंडी पण ताठ असते. खाली नसते.

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 9:07 pm | बोका-ए-आझम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधी होते आणि गांधीजींच्या हत्येच्या वेळी संघाचे सदस्य होते का याबद्दल निश्चित माहिती नाहीये. पण हिंदू महासभेचं नियतकालिक ' अग्रणी ', ज्याला नंतर ' हिंदू राष्ट्र ' हे नाव देण्यात आलं, त्याचं संपादन त्याने केलं होतं. आता हिंदू महासभेच्या मुखपत्राचा संपादक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता हे तुम्ही तुमच्या दिव्यदृष्टीने पाहून बोलू शकता. तुम्हाला भारतीय राज्यघटनेने धादांत खोटं बोलायचं स्वातंत्र्य दिलेलं आहेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 9:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

रास्वसंघ अन हिंदुमहासभा वेगळे का झाले बोक्याभाऊ??

नाखु's picture

26 Aug 2016 - 12:20 pm | नाखु

अध्यक्ष जे कॉण्ग्रेस विचारांचे आणि पक्षाचेही नेते होते

चिनार's picture

1 Sep 2016 - 4:48 pm | चिनार

बापू , बोकाभाऊ,चंपाताई,

ते संघ, हिंदू महासभा वगैरे जाऊ द्या हो...मला एक सांगा

1. "संघाच्या लोकांनी गांधीजींना मारलं -- इति राहुल गांधी
2. "संघाच्या लोकांनी गांधीजींना मारलं असं मी कधीही म्हटलं नव्हतं, गांधीजींना मारणारा संघाशी संबंधित होता असं मी म्हटलंय -- इति राहुल गांधी ह्यांचे सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्र.
3. मी जे म्हटलंय त्यावर मी ठाम आहे. मी कोठेही घुमजाव केलं नाही-- इति राहुल गांधी

अरे आखिर केहना क्या चाहते हो ??

माझं प्रामाणिक मत -- राहुल गांधींच्या फोनवर पोकेमॉन गो डाऊनलोड करून द्यावा. काँग्रेसला अच्छे दिन येतील

चिनार's picture

1 Sep 2016 - 5:02 pm | चिनार
चंपाबाई's picture

8 Sep 2016 - 8:34 am | चंपाबाई

१. नथुराम संघाचा नव्हता.

२. गांधीजी संघाला प्रातःस्मरणीय आहेत

यांचा वारंवार उच्चार करण्यात संघवाले धन्यता का मानतात, हे अगदी उघड आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2016 - 8:40 am | श्रीगुरुजी

नवीन सिंद्धांत -

१) भारतातील दहशतवादासाठी पाकिस्तानी दहशतवादी जबाबदार आहेत. पाकिस्तान त्यासाठी जबाबदार नाही.

२) जगभरातील दहशतवादासाठी इसिस जबाबदार नसून इसिसचे सदस्य त्यासाठी जबाबदार आहेत.

३) भारतातील भ्रष्टाचारासाठी खांग्रेस जबाबदार नसून त्यासाठी खांग्रेसी जबाबदार आहेत.

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 9:09 am | चंपाबाई

ठाणे नाट्यगृह स्फोट प्रकर्णात सनातननेही जाहिर केले होते , हे त्या व्यक्तींचे वैयक्तिक काम आहे . संस्थेचा संबंध न्हाय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 9:17 am | कैलासवासी सोन्याबापु

=)) =)) चंपाबाई म्हणते गुर्जीसनी काय सुट्टीच नाय ! =)) =))

गामा पैलवान's picture

26 Aug 2016 - 6:22 pm | गामा पैलवान

चंपाबाई,

संस्थेचा संबंध नाही हे केवळ संस्थेचं म्हणणं नसून न्यायालयाचंही अगदी तस्संच मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

Organization is an artificial, legal person.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2016 - 6:23 pm | श्रीगुरुजी
अमितदादा's picture

25 Aug 2016 - 1:05 am | अमितदादा

नागा बंडखोरांच्या शिखर संघटनेशी भारत सरकार ची चालू असलेली बोलणी शेवटच्या टप्यात आहेत अशी बातमी आहे. फायनल aggrement काय असेल याची कोणतीही माहिती बातमी मध्ये दिली नाही.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/nagaland-india-p...

नागा peace commitee च खालील स्टेटमेंट मुळे उत्सुकता आणखी वाढली आहे "The NSCN and the Naga people highly appreciate the government of India for recognizing the sovereign rights of the Nagas through the framework agreement.”

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2016 - 9:49 am | श्रीगुरुजी

काय चाललंय हे. आता मुलांवर सुद्धा हे हिंदू संस्कृती लादायला लागले. णिषेध!

http://m.rediff.com/news/report/bmc-okays-proposal-to-make-yoga-mandator...

गामा पैलवान's picture

25 Aug 2016 - 12:58 pm | गामा पैलवान

लोकहो,

कन्नड अभिनेत्री आणि (माजी?) काँग्रेस आमदार रम्या हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल झाला आहे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/advocate-registers-case-ag...

वरील बातमीनुसार हा खटला सरकारकडून नसून खाजगी आहे. तसेच तिच्या वक्तव्यावरून कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये.

माझ्या मते तिचं वक्तव्य अपराधपात्र नाही. पाकिस्तान नरक नाही हे तिचं व्यक्तीनिष्ठ मत आहे. तिला ते बाळगायची पूर्ण मुभा आहे. तिने तिथले लोकं आपल्यासारखेच आहेत असं म्हंटलं आहे. त्यातही काहीही आक्षेपार्ह नाही. तसं पाहायला गेलं तर १९४७ साली फाळणीच्या वेळेस पाकिस्तानी लोकांनी वेगळा पाकिस्तान मागितलाच नव्हता. तो त्यांच्यावर लादला गेला आहे. अर्थात, आज पाकिस्तानात जे नरकसदृश्य अराजक आणि दहशतवाद आहे तो तिथल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे आहे. पाकिस्तानी सत्ताधारी भारताचे शत्रू आहेत. पाकिस्तानी जनता नव्हे.

त्यामुळे रम्याच्या वक्तव्यात देशद्रोह शोधायला जाणे म्हणजे हातचा हुकुमी एक्का घालवणे आहे. शेवटी ती तिच्या वक्तव्यावर ठाम आहे हे वाचून संतोष वाटला.

आ.न.,
-गा.पै.

लोकहो,

हा काय प्रकार आहे? : पूजा, विवाहादी कार्यक्रमांसाठी १०० पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची अनुमती आवश्यक !

पोलिसांच्या हाती अमर्याद अधिकार येणार असं दिसतंय. आमच्या (एकत्रित) घरी न बोलावता तीनचारशे माणसं सहज जमतात कुठल्याही कार्यास. दरवेळेस पोलिसांना कळवणार कोण!

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 6:22 pm | संदीप डांगे

"हिटलरशाहीकडे एक पाऊल" असं वर्णन करायचं का ह्या कायद्याचं...?

सूचना आणि आक्षेप कळवा. home_special4@maharashtra.gov.in या मेल आयडी वर.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 7:56 pm | संदीप डांगे

अरेवा, माहितीसाठी अनेक धन्यवाद! नक्की मेल करतो.

धन्यवाद.. इथेही एक प्रत चिकटवा.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 8:15 pm | संदीप डांगे

हां, ते टंकणारच होतो पण सोडून दिलं.. प्रत देतो.

मार्मिक गोडसे's picture

25 Aug 2016 - 7:34 pm | मार्मिक गोडसे

फक्त सार्वजनिक ठिकाणीच परवानगी घ्यावी लागणार. तसेच हा कायदा अजूनही मंजूर झालेला नसून मंजुरीपुर्वी त्याबाबत जनसामान्यांच्या सूचनांचा जरूर विचार केली जाईल, अशी ग्वाही गृह विभागाचे अतिरक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली आहे.

मार्मिक गोडसे's picture

29 Aug 2016 - 10:03 am | मार्मिक गोडसे

प्रस्तावित अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण विधेयकाचा मसुदा राज्य सरकारने मागे घेतला.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2016 - 8:26 pm | श्रीगुरुजी

हा काय प्रकार आहे? : पूजा, विवाहादी कार्यक्रमांसाठी १०० पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची अनुमती आवश्यक !

निव्वळ मूर्खपणा.

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 7:41 pm | चंपाबाई

इन्कम ठ्याक्स कडुन एस एम एस आलाय ..

काला पैसा पांढरा करा म्हणुन.

ते स्वीस ब्यान्केच्या.काळ्या पैशाचेही असेच पांढरे करणार का ?

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 8:06 pm | बोका-ए-आझम

शेअर करा की.

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 8:21 pm | चंपाबाई

Declare undisclosed income / assets under Income declaration scheme 2016 call 1800-180-1961/visit www.incometaxindia.gov.in or Room no.338 Aaykar Bhavan,Mumbai.

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 8:39 pm | बोका-ए-आझम

उगाचच अट्टाहास.

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 10:22 pm | चंपाबाई

अनडिस्क्लोज्ड म्हणजे काय पांढरा पैसा ?

नाही ना? मग? बाकी तुमच्याकडे आहे का undisclosed income?नसेल तर तुम्हाला काय फरक पडतो?

चंपाबाई's picture

26 Aug 2016 - 5:05 pm | चंपाबाई

a याच्याच हिंदी जाहिरातीत काला धन असा शब्दप्रयोग आहे. आताच पाहिली

चंपाबाई's picture

25 Aug 2016 - 10:26 pm | चंपाबाई

२०१४ ..... स्वीस ब्यान्केतला काळा पैसा आणू.

२०१६ .... काळा पैसा पांढरा करा स्कीम .

२०१७ ..... स्वीस ब्यान्केतील भारतीय ठेवी घटल्या !

बघा ... मोदीनी काळा पैसा भारतात आणला.

नमो नमो !

मार्मिक गोडसे's picture

25 Aug 2016 - 8:43 pm | मार्मिक गोडसे

मलाही इतक्यात ८.०२ वाजता सेम असाच मेसेज आला. आता कामाला लागावेच लागेल.

मृत्युन्जय's picture

1 Sep 2016 - 3:56 pm | मृत्युन्जय

बाई कदाचित तुम्हाला महिती नसावे की Voluntary Disclosure of Income Scheme ही स्कीम यापुर्वी देखील येउन गेली आहे. पी चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी देखील ही स्कीम राबवली होती. उगा कशाल भाजपा आणि मोदींच्या नावाने खडे फोडता आहात?

चंपाबाई's picture

2 Sep 2016 - 3:36 pm | चंपाबाई

काळा पैसा आण्णार अशी दहशत घालून मग वॉलंटरी इन्कम डिस्क्लोजची स्कीम आणणं.

हे म्हणजे...

दहावीची परिक्षा प्रॅक्टिकल अवघड असते बघ ! अशी दहशत घालून स्वतः मास्तरनेच दहावीचा प्रायव्हेट क्लास काढुन मुलाना तिथे येण्यास मजबूर करणं

यासारखेच आहे ना ?

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 3:44 pm | संदीप डांगे

किती ताणताय? सोडा आता. काय उपयोग नाही. तसंही उदाहरण गंडलंय..

मार्मिक गोडसे's picture

25 Aug 2016 - 8:03 pm | मार्मिक गोडसे

आता काळा पैसा कुठून आणायचा बरे? चला तुरडाळ, चणाडाळ,मुगडाळ... साठवूया.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 8:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

मिस्टर तुम्ही जावा वरती वरुणदेवाला हेग च्या कोर्टात खेचा! आमच्या "चतुर व्यापाऱ्यांना" बोलायचे काम नाही! ;)

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2016 - 8:55 pm | श्रीगुरुजी

पराराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी बुधवारी रात्री पाकिस्तानचे पराराष्ट्र सचिव अझिज चौधरी यांना पत्र लिहून यापुढे फक्त सीमेवर होणा-या दहशतवादावर चर्चा होईल असे सांगितले. १५ ऑगस्टला पाकिस्तानच्या पराराष्ट्र सचिवांनी एस जयशंकर यांना पत्र पाठवून चर्चेचे आमंत्रण देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर १९ ऑगस्टला काश्मीरमधल्या हिंसाचाराप्रकरणी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानाने औपचारिक चर्चेचे निमंत्रण भारताला पाठवले होते. या पत्राला याआधीच भारताने उत्तर दिले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत चर्चा होईल पण पाकिस्तानने ठरवून दिलेल्या विषयांवर नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले होते. भारत पाकिस्तानशी काश्मीरविषयी नाही तर सीमेवर होणा-या दहशतवादावर चर्चा करने असेही भारताकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे एस जयशंकर यांनी पाकिस्तानला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर पाकिस्तान चर्चा करण्याचे गांर्भीयाने घेत असेल तर दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यावर सुरूवातीपासून चर्चा व्हायला हवी. यात पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ला देखील चर्चीला गेला पाहिजे असेही भारताने पत्राने म्हटल्याचे समजते आहे. पाकिस्तानला चुकीचे मुद्दे काढून खेळी करायची असेल तर आम्हाला देखील असे खेळ खेळता येतात अशीही तंबी पत्राद्वारे भारताने दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पराराष्ट्र सचिव एस जयशंकर मिळून या विषयावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची योजना आखत असल्याचीही माहिती सुत्राने दिली आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/in-late-night-letter-to-pakista...

_____________________________________________________________________________________

हे एक वेगळे पाऊल व चांगली सुरूवात आहे. पाकिस्तानबरोबरील धोरणात भारताची भूमिका कायमच धरसोड असलेली व सातत्य नसलेली राहिलेली आहे. त्यामुळे या नवीन भूमिकेवर भारत किती काळ ठाम राहील याची खात्री नाही.

अमितदादा's picture

25 Aug 2016 - 9:14 pm | अमितदादा

पाकिस्तानबरोबरील धोरणात भारताची भूमिका कायमच धरसोड असलेली व सातत्य नसलेली राहिलेली आहे. त्यामुळे या नवीन भूमिकेवर भारत किती काळ ठाम राहील याची खात्री नाही.

हे महत्त्वाचं गुरुजी! आज ना उद्या भारत सरकार ला फुटीरवादी आणि पाकिस्तान बर काश्मीर विषयी चर्चा करावीच लागणार आहे. काश्मीर जसे जसे पेटत जाईल तस तस ह्यांची ठाम भूमिका मावळ होत जाईल. आजच राजनाथ सिंग यांच्या काश्मीर भेटीतून याचे संकेत मिळालेत.

नाशिक येथे विक्रीयोग्य कांदयाला घाऊक बाजारात "५ पैसे" प्रति किलो भाव मिळाला जरी कोणाकडे ५ / १० / २० / २५ पैशाची नाणी शिल्लक असतील तर कांदा खरेदीस वापरुन संपवावीत.

जर कोणाला विश्वास असेल कि कांदा भाव याहुन कमी होतील, त्यांनी ५ / १० / २० / २५ पैशाची नाणी जपुन ठेवावीत.

अच्छे दिन आ गये.

विशुमित's picture

26 Aug 2016 - 4:47 pm | विशुमित

100 रुपयात ट्रक च घ्या की कांद्याचा...!!

विशुमित's picture

26 Aug 2016 - 4:25 pm | विशुमित

"लोकमत" मध्ये आज एकमेकांना पूरक अश्या 2 बातम्या आल्या आहेत. पहिली "हजी अली दर्ग्याचे दार महिलांसाठी खुलं, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय " आणि "त्याला फाईट आणि वातावरण टाईट" करण्यासाठी "मंगळागौरीमध्ये पुरूषांच्या प्रवेशासाठी उच्च न्यायालयात याचिका". याचिका सुद्धा मजेशीर आहे आणि कोर्टाने देखील ती दाखल करून घेतली आहे.
इंडिया बदल रहा है...!!!!!
http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14321041

http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14321045

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2016 - 11:27 pm | श्रीगुरुजी

न्या. धिंग्रांचा अहवाल सादर; रॉबर्ट वाड्रा गोत्यात?

http://m.maharashtratimes.com/nation/justice-dhingra-commission-submits-...

श्रीगुरुजी's picture

31 Aug 2016 - 11:30 pm | श्रीगुरुजी

रोज आपल्या पत्नीच्या पाया पडतो असे सांगून काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले संदीप कुमार महिलांसोबत या सीडीमध्ये आक्षपार्हस्थितीत दिसून आल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. संदीप कुमार मूळचे हरियाणातील सारंगथल गावातील आहेत. केजरीवाल सरकारमधून हकालपट्टी करण्यात आलेले संदीप कुमार हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र तोमर आणि असिम अहमद खान या मंत्र्यांना केजरीवाल सरकारने बाहेरचा रस्ता दाखविला होता.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-cm-kejriwal-removes-minis...

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 2:54 pm | संदीप डांगे

1

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 4:17 pm | संदीप डांगे

आज रिलायन्स ने जीओ दूरसंचार सेवेची अधिकृत घोषणा केली. दिनांक पाच सप्टेंबर २०१६ पासून जिओ नेटवर्क सुरु होत आहे. आपले सादरिकरण करतांना मुकेश अंबानी यांनी जिओ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इण्डिया ह्या संकल्पनेला साहाय्यक ठरेल अशी आशा व्यक्त केली. इतर सेवापुरवठादारांना गर्भित धमक्या देत त्यांनी इशारा केला आहे की जिओ च्या कोणत्याही सेवेमधे अडथळा आणण्याचे प्रयत्न करु नये.

रिलायन्स जीओच्या उपभोक्त्यांना आयुष्यभरासाठी कॉलसुविधा मोफत असणार असून एक जीबी फोरजी डाटाप्लानसाठी फक्त ५० रुपये द्यावे लागतील त्याच बरोबर विद्यार्थ्यांना २५ टक्के अतिरिक्त डेटा फ्री मिळणार आहे.

सांप्रतच्या टेलिसर्विसप्रोवायडरचे कंबरडे मोडणारे हे पाऊल आहे असे दिसत आहे. आगे आगे देखो होता है क्या.

मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना जिओ सोडून इतर सर्व्हिस प्रोव्हायडर वापरू नये असे सांगितले आहे.
एच आर कडून तसे लिखित आदेश सुद्धा दिले गेले आहेत. हे कितपत योग्य वाटते ?
अशी सक्ती एखादी कंपनी करू शकते का ?

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 4:45 pm | संदीप डांगे

काय वाईट आहे त्यात? मला तरी नाही वाटत. ज्या कंपनीचे स्वतःचे नेटवर्क आहे त्यांनी अशी सर्विस वापरायला काय हरकत आहे? शिवाय कंपनी एम्प्लॉयी म्हणून विशेष सवलती असतीलच. कंपनी सोडल्यावर तर सक्ती नाही ना करणार?

मी कर्मचारी असतो तर मला काही समस्या नसती वाटली. नंबर तोच असुद्यात फक्त. सर्विसप्रोवायडर कोन का असेना.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 4:46 pm | संदीप डांगे

काय वाईट आहे त्यात? मला तरी नाही वाटत. ज्या कंपनीचे स्वतःचे नेटवर्क आहे त्यांनी अशी सर्विस वापरायला काय हरकत आहे? शिवाय कंपनी एम्प्लॉयी म्हणून विशेष सवलती असतीलच. कंपनी सोडल्यावर तर सक्ती नाही ना करणार?

मी कर्मचारी असतो तर मला काही समस्या नसती वाटली. नंबर तोच असुद्यात फक्त. सर्विसप्रोवायडर कोन का असेना.

गणामास्तर's picture

1 Sep 2016 - 4:54 pm | गणामास्तर

चांगले अथवा वाईट या अर्थाने म्हणत नव्हतो मी. भले सवलतीच्या दरात मिळत असेल, इतर काही फायदे असतील परंतु अशी 'सक्ती' करणे कितपत योग्य आहे ? मला काही कारणास्तव जिओ वापरायचेच नसेल तर जबरदस्ती का म्हणून ?

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 5:08 pm | संदीप डांगे

मोदक व गणामास्तर,

माफ करा, पण ह्यात 'सक्ती' नक्की काय आहे हे मला खरंच कळत नाही आहे. मी आजवर सर्वच कंपन्यांचे नेटवर्क वापरुन पाहिले आहे. मला असा फरक कधीच वाटला नाही. त्यामुळे कदाचित मला हे सक्ती प्रकरण समजत नसावं.

जिओ न वापरण्याचं कारण कळलं तर कदाचित समजू शकेल. नाहीतर आयुष्यभर कॉल फुकट, मजबूत नेटवर्क, डेटा स्वस्त अशा उत्तम सर्विसची जबरदस्ती म्हणजे स्वर्गात राहायची जबरदस्ती म्हणेल मी ;)

मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना जिओ सोडून इतर सर्व्हिस प्रोव्हायडर वापरू नये असे सांगितले आहे.
एच आर कडून तसे लिखित आदेश सुद्धा दिले गेले आहेत.

तुम्ही फक्त आणि फक्त MS Office वापरून जे काही काम असेल ते करायचे. कोरल ड्रॉ, फोटोशॉप किंवा आणखी तुम्हाला आवडतील ती सॉफ्टवेअर्स वापरायची नाहीत.

ही "सक्ती" चुकीची आहे असे माझे आणि मास्तरचे मत आहे.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 5:34 pm | संदीप डांगे

मोदकराव, तुम्ही एमऑफिस व कोरल-फोटोशॉपची तुलना जिओ व इतर नेटवर्क्स अशी नै करु शकत. त्यांची कॅटेगीरीच वेगळी आहे. अ‍ॅडोबची सक्ती आणि कोरलला मज्जाव करणार्‍या अ‍ॅडएजन्सी आहेत. असं काही उदाहरण दिलंत तर समजेल. पण कोरल असो वा अडोबी, (काही लायसन्स इशूज असतात) सक्ती मान्य करु शकतो. कारण कोरल असो वा अ‍ॅडोबी, 'मी' काम काय व कसं करतो ह्यावर अवलंबून असतं, 'सॉफ्टवेअर'वर नाही. इथे आपण संत्र आणि सफरचंद ह्याची तुलना करत नै आहोत. हे म्हणजे या झाडावरच्या 'तमक्या' फांदीवरचं नाही 'अमक्या'च फांदीवरच सफरचंद खायचं अशी सक्ती आहे. आणि तुम्ही म्हणताय आम्हाला कुठल्याही फांदीवरच्या सफरचंदाची मुभा हवी. इट्स गॉना टेस्ट द सेम!

मला इतर नेटवर्क्स आणि जिओ ह्याच्यातला फरक समजून घ्यायचा आहे. माझ्यालेखी सगळ्या नेटवर्क्स मधे काहीही फरक नाही. (अपवादः कवरेज, कॉल/डेटा रेट्स यामध्ये असणार्‍या तफावती सोडून)

गंम्बा's picture

1 Sep 2016 - 5:23 pm | गंम्बा

सक्ती नाहीच आहे ह्यात.

कोणीही कुठलेही नेटवर्क वापरु शकते. तसेही, समजा दुसरे नेटवर्क वापरले तर कंपनीला काय कळणारे?

-----
फक्त जे लोक मोबाईल कंपनीच्या कामासाठी वापरला म्हणुन बिल क्लेम करत असतील त्यांच्या साठी रीलायंस च वापरला पाहिजे अशी अट कंपनीने घातली आहे. त्यात मला काही चुक दिसत नाही आणि सक्ती ही नाही.

पेपर मधल्या बातम्यांवर मत बनवु नका. कंपनीने सुचना केली असेल, पण सक्ती नाही.

कारण सक्ती केली तरी कर्मचारी जर दुसरे नेटवर्क वापरत असेल तर रीलायंस ला कळणार कसे? कोणी म्हणले की मी मोबाईलच वापरत नाही तर काय?

सुचना आहे, कंपनीची सेवा वापरुन कंपनीचा ब्रँड कर्मचार्‍यांनी प्रपोगेट इतकीच इच्छा आहे./असावी.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 5:45 pm | संदीप डांगे

हेच म्हणायचे होते. धन्यवाद!

"सक्ती करणे" हाच मूळ मुद्दा खटकत आहे. बाकी अशी सक्ती अनेक कंपन्या करतात.

टाटां मोटर्स मध्ये बाकी ब्रँडच्या गाड्या आत घेणार नाही असे काहीतरी ऐकले होते. हा तसाच प्रकार आहे.

गणामास्तर's picture

1 Sep 2016 - 4:59 pm | गणामास्तर

एक्झॅक्ट्ली तसलाचं प्रकार. .टाटा चे कर्मचारी इतर ब्रँडच्या गाड्या आत घेऊन जाऊ शकत नाहीत. गेटवर गाडी लावून आतपर्यंत तंगडतोड करायची.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 5:09 pm | संदीप डांगे

ही मात्र खरंच सक्ती आहे. पण मी ऐकले होते रतन टाटा 'टोयोटा करोला' वापरतात म्हणे... टाटाचे लोक्स मर्क-बीमर वापरत नाही का?

मी ऐकल्यानुसार ते एक इंडिगो मरिना किंवा इंडिका कुळातील एक गाडी वापरतात.

त्यांचा आणखी एक मुंबईच्या रस्त्यांवरचा जॅग्वार वापरतानाचा व्हिडीओ आहे. आत्ता मिळत नाहीये.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 5:37 pm | संदीप डांगे

इंडिगो मरिना किंवा इंडिका कुळातील एक गाडी >> असं असेल तर हॅट्स ऑफ त्या प्राण्याला... आधीच असलेला आदर अजून वाढला. बाकी जॅग्वार वापरत असेल तर 'अक्खी कंपनी विकत घेईन नंतरच जॅग्वार चालवीन' अशी काय शपथ घेतली होती का सायबांनी..? ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Sep 2016 - 5:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो कसली टोयोटा अन जियो घेऊन बसलात इन्फी हिंजवडी मध्ये तर पोरांना टाय (कंठलंगोट) सुद्धा कंपल्सरी आहे म्हणे, तो नसला तर गेटवरचा गार्ड मामा आत शिरू देत नाही (इति भूतपूर्व रूममेट उवाच), मग पोरे बिचारी गेट वर टाय घालुन जातात किंवा खिशातून टाय काढून मामास दाखवतात मग आत एन्ट्री होते म्हणे. ही खरी सक्ती! च्यायला आधीच सॉफ्टवेअर म्हणजे डोक्याचा भुगा डेडलाइनचा फास काय पुरेसा नसतो म्हणून हे नवे प्रकरण करावे म्हणतो मी, सॉफ्टवेअर विकसनाला डोके फ्रेश असावे म्हणतात मग खरेतर पोरांना हाफचड्डी सुद्धा अलौड कराय हवी ! उगाच का गूगल च्या हापिसात घासारगुंड्या अन झोपाळे लावलेत म्हणे परत मीच

मोदक's picture

1 Sep 2016 - 5:35 pm | मोदक

बापू.. फरक आहे.

तुम्हाला उद्या फक्त आणि फक्त अरमानीचेच्च टाय वापरायचे, अन्य कोणत्या ब्रॅंडचे वापरायचे नाहीत असे म्हटले तर या सक्ती बरोबर तुलना होईल.

सॉफ्टवेअर विकसनाला डोके फ्रेश असावे म्हणतात मग खरेतर पोरांना हाफचड्डी सुद्धा अलौड कराय हवी

प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आणि सर्विस बेस्ड कंपनीतला हा मूलभूत फरक असतो. मी काम केलेल्या एका कंपनीत ८ तासाचे बंधन नाही, फुल / हाफचड्डीचे बंधन नाही. चप्पल बुटाचे बंधन नाही. तेच आधीच्या एका कंपनीत मंगळवारी टाय कंपल्सरी होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Sep 2016 - 5:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही जाणकार आहात म्हणून विचारतोय मोदकभाऊ, भारतात ओरिजिनल कोड किती डेव्हलपमेंट होते? किती सोर्सकोड लिहिले जातात ? का फक्त आयत्या येणाऱ्या कोडला पावडर लाली करायची अशी कोड एनहॅन्समेंटची कामे होतात ??

मी यातला जाणकार नाही. मी मिळेल त्या माहितीत किडे करत आणि ते निस्तरवत बसतो. [ बघा.. मी फक्त मिपावर किडे करत नाही ;) ]

उदाहरणार्थ -

तुमच्या कुठल्या रेजिमेंट कुठल्या ठिकाणी आहेत.
एकूण किती रणगाडे आहेत या पासून ते किती LMG आहेत? त्यातली नादुरूस्त हत्यारे किती? नादुरूस्त पैकी किती हत्यारे किती % नादुरूस्त? काश्मीरात बर्फामुळे किंवा अरूणाचल / आसामात पावसामुळे एखादा विशिष्ट पार्ट खराब होतो का?

मी असे भरपूर प्रश्न शोधून त्यावर उत्तरे मिळवत बसतो. (अर्थातच आमच्या कमांडिंग ऑफिसरच्या आज्ञेनुसार)

रच्याकने - सतिश गावडे यातले जाणकार आहेत.

गावडे मास्तर यातलेही जाणकार आहेत.

या दुरुस्तीसह अनुमोद(क)न.

सोन्याबापू साहेब.
-- मी सध्या ज्या कंपनीत काम करतो तिथे आम्ही गेली 4.5 वर्षे एक प्रोजेक्ट करतोय. मार्च 2012 साली शून्यातून हा प्रोजेक्ट आम्ही 4 जणांनी चालू केला होता. फक्त क्लायंटला काय हवेय हे सांगणारे एक डॉक्युमेंट आम्हाला दिले होते. प्रोजेक्टला मॅनेजर सुद्धा न्हवता. 1 वर्षात पहिले व्हर्जन दिले आणि गेल्या 4.5 वर्षात एकूण 12 ( Enhancements ) देऊन झालेल्या आहेत.

अक्षरश: डोक्याचा भुगा होणारे प्रॉब्लेम येतात. कधी कधी 16-16 तास काम करून issues फिक्स केलेले आहेत. काही लोक (तुम्ही असे म्हणत नाही) समजतात तितके आय.टी. फिल्ड म्हणजे टाईमपास नाही.