Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप डांगे on Sun, 08/14/2016 - 08:57
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
  • Log in or register to post comments
  • 69676 views

प्रतिक्रिया

Submitted by संजय पाटिल on Sun, 08/14/2016 - 10:23

Permalink

नुसती डरकाळी फोडुन काही होणार

नुसती डरकाळी फोडुन काही होणार नाही. ... पण कमीतकमी डरकाळि तरी फोडली.. मी पयला..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 08/14/2016 - 10:42

Permalink

http://m.rediff.com/news

http://m.rediff.com/news/report/modi-has-put-islamabad-on-the-mat/20160813.htm
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Tue, 08/16/2016 - 19:50

In reply to http://m.rediff.com/news by श्रीगुरुजी

Permalink

ह्यांना 'तो' प्रदेश भारतात

ह्यांना 'तो' प्रदेश भारतात नसला तरी फार पडत नसावा. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/RSS-Organizer-Map-India-Pakistan/articleshow/46537800.cms
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त on Sun, 08/14/2016 - 11:16

Permalink

गिलगिट बालटीस्थानात जनभावना

गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले
हे भारतीय गुप्तचर यंत्रणेचे यश आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दिगोचि on Tue, 10/04/2016 - 15:56

In reply to गिलगिट बालटीस्थानात जनभावना by मुक्त

Permalink

काही दिवसापूर्वी एका

काही दिवसापूर्वी एका पाकिस्तानी व्रुत्तपत्रात असे वाचले की गिल्गिट बाल्टीस्तानच्या एका पुढार्याने असे सान्गितले आहे की ते लोक पाकीस्तानावर हाला करणार्यन्च्या विरुद्ध उभे राहतील असेच उद्गार एका बलुच नेत्याने पण लाढले आहेत.तेम्व्हा भारताच्या नेत्यानी या दोन्ही प्रान्तातल्या लोकावर विश्वास ठेवू नये.बापण पाकिस्तानवर हल्ल केल्यास ते आपल्या विरुद्ध उभे राहतील. कारण मुसल्मान एक्मेकाना इतरान्च्या विरुद्ध मदत करतात असे आपण पाहिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sun, 08/14/2016 - 11:44

Permalink

रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प यांचं एकीकरण!

वेगळा रेल्वे अर्थसंकल्प हा प्रकार जगात आपल्या देशात सोडून इतर कुठे होत असेल असं वाटत नाही, पण ही ९२ वर्षांची परंपरा आता संपुष्टात येणार आहे. २०१७ पासून अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे एकत्र होणार आहेत. आता दरवाढ, नवीन गाड्या, रेल्वेमार्ग इत्यादी गोष्टी अर्थविभाग आणि अर्थमंत्र्यांची जबाबदारी असेल. http://www.thehindubusinessline.com/economy/logistics/no-rail-budget-from-next-fiscal/article8988349.ece
  • Log in or register to post comments

Submitted by John McClain on Sun, 08/14/2016 - 20:39

In reply to रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प यांचं एकीकरण! by बोका-ए-आझम

Permalink

अस झालं तर मग रेल्वे मंत्री

अस झालं तर मग रेल्वे मंत्री हे पद उरणार नाही का? हे जरा जास्तीच workload नाही होणार का अर्थमंत्री ना?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sun, 08/14/2016 - 23:46

In reply to अस झालं तर मग रेल्वे मंत्री by John McClain

Permalink

अस झालं तर मग रेल्वे मंत्री

अस झालं तर मग रेल्वे मंत्री हे पद उरणार नाही का?
रेल्वेमंत्र्यांना रेल्वे अर्थसंकल्प प्रस्तुत करण्याव्यतिरिक्तही अनेक कामं असतातच. शिवाय रेल्वे अर्थसंकल्प रद्द झालेला नाही. तो मुख्य अर्थसंकल्पात विलीन झाला आहे. याचा अर्थ मुख्य अर्थसंकल्पात आता रेल्वे हा एक वेगळा भाग असेल.
हे जरा जास्तीच workload नाही होणार का अर्थमंत्री ना?
असं होणार नाही. रेल्वेमंत्री उलट त्यांना मदत करतील. प्रत्यक्ष काय होतंय ते फेब्रुवारी २०१७ मध्येच समजेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Sun, 08/14/2016 - 12:00

Permalink

मोदी सरकार ने योग्य पाऊल उचल

मोदी सरकार ने योग्य पाऊल उचल आहे। पाकिस्तानच्या संभ्रम अवस्थेतील परदेशी नीती संदर्भांतील अवस्थेबद्दल खालील लेखात सुंदर विवेचन केले आहे http://thediplomat.com/2016/08/why-pakistans-foreign-policy-is-so-confused/ पाकिस्तान मधील सरकार आणि आर्मी यांच्यातील सुप्त संघर्ष, पाकिस्तान चे अमेरिका चीन भारत अफगाणिस्तान आणि इराण शी असलेल्या संबंधावर सुद्धा भाष्य केले आहे. अवांतर: राजकीय आणि सैनिकी डावपेचाचा (स्ट्रॅटेगिक) घडामोडी साठी वेगळा धागा असावा का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 08/14/2016 - 18:32

In reply to मोदी सरकार ने योग्य पाऊल उचल by अमितदादा

Permalink

लेख चांगला आहे

अमितदादा, लेख चांगला आहे. पण हे शीर्षक वाचून हसू आलं : Why Pakistan's Foreign Policy Is So Confused? पाकिस्तानला परराष्ट्रधोरण आहे हे विधानंच मुळातून मोठ्ठा विनोद आहे. अमेरिका नाहीतर चीनच्या तालावर नाचणे एव्हढेच पाकिस्तानी परराष्ट्रखात्याचे काम आहे. असो. लेखाच्या शेवटीशेवटी आलेलं हे वाक्य महत्त्वाचं आहे : >> In today’s modern world, the foreign policy of any country must be guided by its history, >> geography, and internal circumstances. पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल भारताहून वेगळा नाही. मात्र अंतर्गत परिस्थिती भारताहून पार वेगळी आहे. याचं कारण लेखातच दिलं आहे. ते म्हणजे पाकचं परराष्ट्रधोरण सुरक्षेनुरूप ठरतं. असं का, तर पाकचा प्रत्येक हुकूमशहा फक्त आपलं बूड टिकवण्याच्या चिंतेत असतो. नेमका हाच भारत आणि पाकच्या अंतर्गत परिस्थितीतला फरक आहे. तर मोदींचं पाकला सांगणं असंय की तुम्ही नाहीतरी चीन वा अमेरिकेच्या तालावर नाचता. मग आमच्या तालावर नाचायला काय हरकत आहे? नाचून तर पहा एकदा! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Sun, 08/14/2016 - 21:48

In reply to लेख चांगला आहे by गामा पैलवान

Permalink

तुमचं बहुतांश म्हणणं पटतंय,

तुमचं बहुतांश म्हणणं पटतंय, पण हे वाक्य पूर्ण सत्य नाही
अमेरिका नाहीतर चीनच्या तालावर नाचणे एव्हढेच पाकिस्तानी परराष्ट्रखात्याचे काम आहे
पाकिस्तान ची परराष्ट्र धोरनावर अमेरिका आणि चीन यांचा परिणाम आहे मात्र पाकिस्तान त्यांची स्वतःची स्वतंत्र धोरण राबवत असतो, अन्यथा अमेरिकेचा शत्रू लादेन पाकिस्तान मध्ये सापडला नसता, पाकिस्तान ने अमेरिकेच्या इच्छे नुसार अफगाण तालिबान ला पाठिंबा काढला असता. चीन मात्र पाकिस्तान ची परराष्ट्र नीती मोठ्या प्रमाणात influence करतो. पण समजा उद्या भारत चीन संबंध चांगले झाले तरी भारत पाकिस्तान संबंध चांगले होतील याची ग्यारंटी नाही। बाकी हा लेख यासाठी महत्वाचा करणं पाकिस्तान मध्ये असे प्रोग्रेसिव्ह विचार मांडणारे, चुका दःखावून देणारे लेख आणि लेखक खूप कमी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by John McClain on Mon, 08/15/2016 - 12:41

Permalink

पंतप्रधांनी आज भाषणामध्ये

पंतप्रधांनी आज भाषणामध्ये बलुचिस्तान चा उल्लेख केला. पाकड्यांचा काश्मीर पॉलिटिक्स ला काउंटर करायला चांगली strategy वाटतेय... आपली विदेश कुटनीती आक्रमक आणि proactive होत आहे का? मागे एकदा youtube वर फित पहिली होती अजित डोवल यांची.... त्यांनी डायरेक्ट धमकी दिली होती पाकड्यांना कि काश्मीर मध्ये काड्या करायचे थांबवा नाहीतर बलुचिस्तान तोडतो....
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/15/2016 - 13:28

In reply to पंतप्रधांनी आज भाषणामध्ये by John McClain

Permalink

देऊ दे धमक्या. बरं असतं.

देऊ दे धमक्या. बरं असतं. धमक्या देणे हा कुणाचा विशेषाधिकार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 08/20/2016 - 00:47

In reply to देऊ दे धमक्या. बरं असतं. by अभ्या..

Permalink

आरा बाबा असं नसतंय अभ्याव

मुळात पाकिस्तान कायम "भारत बलुचिस्तानात काशी करतंय होssss" म्हणून शिमगा करीत असे (करत असेलही, ते फक्त देव, रॉ-आयबी अन पंप्रला ठाऊक होते) ते उघड बोलून आपण आपले मॉरल व्हेंतेज घालवतो आहोत का हा विचार करायला हवा अगोदर, देवा बलुचिस्तान बद्दल उघड बोलणे म्हणजे पाकिस्तान ने कश्मीरच्या अस्थिरतेला "स्वातंत्र्यलढा" म्हणायची परवानगी अन तिकडे डब्बल नंगानाच करायचे तिकीट दिल्यासारखे ठरले तर ते ह्या देशाचे आजवरचे सर्वात मोठे इंटेलिजन्स फेलियर असेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तू समज्या क्या? नै तो मई और क्लीयर करताय
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 08/20/2016 - 01:36

In reply to आरा बाबा असं नसतंय अभ्याव by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

पण बापू

जसा पाकिस्तानचा हात काश्मीरमध्ये दिसतो किंवा खलिस्तानला पाकिस्तानची फूस होती हे जसं उघड झालेलं आहे तसा बलुचिस्तानमधला भारतीय सहभाग (असलाच तर) उघडपणे दिसून येत नाही. अजून एक - बलुची मुस्लिमांना आपण पंजाबी मुस्लिमांच्या दडपशाहीचे बळी आहोत असं आज नाही, पाकिस्तानच्या निर्मितीपासून वाटतंय. पूर्व पाकिस्तानमधला स्वातंत्र्यलढा पाकिस्तानला भौगोलिक अंतरामुळे चिरडता आला नाही आणि बांगलादेशचा जन्म झाला पण बलुचिस्तान कायमच पाकिस्तानची वसाहत म्हणून वापरला गेला. त्यावर आजवर फार कमी बोललं किंवा लिहिलं गेलेलं आहे. मला वाटतं आपण त्याला उघडपणे पाठिंबा न देता पाकिस्तानचा दुटप्पीपणा दाखवायला वापरत आहोत. बाकी तिथे RAW चं काम financing आणि logistical support चं जास्त आहे आणि active operational role फारसा नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या ISI च्या नावाने जसा आपल्या मिडियाने डांगोरा पिटलेला आहे तसा पाकिस्तानी मिडियाला करता आलेलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 08/20/2016 - 08:17

In reply to पण बापू by बोका-ए-आझम

Permalink

जसा पाकिस्तानचा हात

जसा पाकिस्तानचा हात काश्मीरमध्ये दिसतो किंवा खलिस्तानला पाकिस्तानची फूस होती हे जसं उघड झालेलं आहे तसा बलुचिस्तानमधला भारतीय सहभाग (असलाच तर) उघडपणे दिसून येत नाही. अजूनपर्यंत दिसला नव्हता आपला हात बलुचिस्तानात, पण आता आपण शक्यता ओपन करतोय हाच माझा मुद्दा होता. अजून एक - बलुची मुस्लिमांना आपण पंजाबी मुस्लिमांच्या दडपशाहीचे बळी आहोत असं आज नाही, पाकिस्तानच्या निर्मितीपासून वाटतंय. पूर्व पाकिस्तानमधला स्वातंत्र्यलढा पाकिस्तानला भौगोलिक अंतरामुळे चिरडता आला नाही आणि बांगलादेशचा जन्म झाला पण बलुचिस्तान कायमच पाकिस्तानची वसाहत म्हणून वापरला गेला. त्यावर आजवर फार कमी बोललं किंवा लिहिलं गेलेलं आहे. मला वाटतं आपण त्याला उघडपणे पाठिंबा न देता पाकिस्तानचा दुटप्पीपणा दाखवायला वापरत आहोत. ही स्टेप सेल्फ इंसिनीरेटिंग न ठरावी म्हणजे मिळवली, म्हणजे बघा पाकिस्तानात नुसता बलोच विभाजनवादाचा मुद्दा नाहीये, इतकी वर्षे झालीत तरीही अजून फक्त बलोच नाही तर सिंधी, पख्तुन, मूहाजीर ही मंडळी सुद्धा पंजाबी दमनाची भाषा करत आले आहेत, आता असे बघा तुम्ही "सिंधुदेश मोव्हमेंट" ट्रॅक केली आहेत काय? केली असल्यास आपणाला कळेल की बलुचिस्तान प्रमाणे ते भारताची सहानुभूती मागत आहेत, अन ती गुपचूपच द्यायची असते असला बोभाटा करून नाही, परवाच एका बलोच ऍक्टिव्हिस्ट पोरीने मोदींना रक्षाबंधनाच्या भावपूर्ण शुभेच्छा दिल्या, अगदी शेवटी गुजरातीत बोलून अन अगोदर, सगळ्या बलोच स्त्रिया तुम्हाला भाऊ मानतात वगैरे प्रतिपादन करून, आता ह्या बहिणीला ओवाळणी नकोय असे म्हणता येईल का? आता ह्या अन अश्या मॅसेजसना भारत/मोदी कसे प्रतिसाद देतात त्यावर एक महत्वाची गोष्ट ठरेल, ती म्हणजे पाकिस्तानातल्या इतर दबलेल्या आवाजांना भारत विश्वसनीय वाटेल का नाही, आपल्याला नुसता बलुचिस्तान उपयोगी नाही, "एल" आकारात बलुचिस्तान अन सिंध हवे आहेत, इट्स या नाईट ऑफ फोज अहेड बोक्याभाऊ बाकी तिथे RAW चं काम financing आणि logistical support चं जास्त आहे आणि active operational role फारसा नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या ISI च्या नावाने जसा आपल्या मिडियाने डांगोरा पिटलेला आहे तसा पाकिस्तानी मिडियाला करता आलेलं नाही. सहज एकदा ह्या विषयाबाबत कीवर्डस टाकून युट्युबला चक्कर टाका(च) ही आग्रहाची विनंती. त्या नंतरही हा गैरसमज दूर न झाल्यास अजून चर्चा करता येईल !
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 08/20/2016 - 10:33

In reply to जसा पाकिस्तानचा हात by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

मला ही self-incinerating step वाटत नाही

कारण पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे ही गरज आहेच. शिवाय काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने इतक्या वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित केलाय. त्या मानाने आपण बलुचिस्तान आणि सिंध याबद्दल काहीच बोलत नाही. शिवाय पाकिस्तानातली ही अंतर्गत अशांतता त्यांच्याच पंजाबीबहुल सरकारांच्या आणि सैन्याच्या दडपशाहीमुळे आलेली आहे हे जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे आणि अमेरिकेने मदत नाकारलेली असताना, सार्क परिषदेत पाकिस्तानने भारतीय गृहमंत्र्यांना योग्य वागणूक दिलेली नसताना आणि पाकिस्तान काश्मीरसाठी बैठकींचा आग्रह धरत असताना त्यांच्या सरकारला defensive footing वर ढकलणे हा यामागचा हेतू असू शकतो. Moral high ground alone is not sufficient to resolve the issue; sometimes you have to stoke the fire - Henri Kissinger.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 08/20/2016 - 11:12

In reply to मला ही self-incinerating step वाटत नाही by बोका-ए-आझम

Permalink

पाकिस्तानला जशास तसे उत्तर

पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे ही गरज आहेच. अलबत, गरज आहेच फक्त ते काम सुमडीत कोंबडी केल्यास उत्तम, जमाना सर्जिकल स्ट्राईकचा आहे, शांतीत क्रांती सर्वोत्तम, फॉर गॉड्स सेक अहो तुम्ही मोसादकार आहात हो मी काय अजून सांगू ;) शिवाय काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने इतक्या वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित केलाय. त्या मानाने आपण बलुचिस्तान आणि सिंध याबद्दल काहीच बोलत नाही. मुद्दा उपास्थित करून कुठले तीर मारले पाकिस्तान ने? उलट मुद्दे मांडून "दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे" अशी प्रतिमा करून घेतलीच न स्वतःची त्यांनी?? आपणही तेच करावे म्हणता?? शिवाय पाकिस्तानातली ही अंतर्गत अशांतता त्यांच्याच पंजाबीबहुल सरकारांच्या आणि सैन्याच्या दडपशाहीमुळे आलेली आहे हे जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे कश्याला फुकट उघड कंदील पेटवावे म्हणतो मी राजे? उलट सहज बिडी फुकत मी नाही त्यातली करत परसदारी जाऊन उभे खळे पेटवणे अन नंतर "अरेरे वाईट झाले बघा" म्हणणे ह्यासारखी माजा नाही आणि अमेरिकेने मदत नाकारलेली असताना, सार्क परिषदेत पाकिस्तानने भारतीय गृहमंत्र्यांना योग्य वागणूक दिलेली नसताना आणि पाकिस्तान काश्मीरसाठी बैठकींचा आग्रह धरत असताना त्यांच्या सरकारला defensive footing वर ढकलणे हा यामागचा हेतू असू शकतो. तेच तर मी म्हणतोय बॅकफुटींग राहिले बाजूला, उलटे काश्मिरात घुसायची तिकिटे दिलीत असे नकोय व्हायला Moral high ground alone is not sufficient to resolve the issue; sometimes you have to stoke the fire - Henri Kissinger. Well, it is always easy to say so for Kissinger, for he has that magical green paper with him to wipe his ass. Besides, that's the beauty of keeping intel ops strictly secret, u get to play ur opponent and also weild a shield of moral high ground, no wise man would enter a fencing or lancing duel without proper body armour, which in this case is the moral high ground . :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 08/20/2016 - 11:21

In reply to पाकिस्तानला जशास तसे उत्तर by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

कश्याला फुकट उघड कंदील

कश्याला फुकट उघड कंदील पेटवावे म्हणतो मी राजे? उलट सहज बिडी फुकत मी नाही त्यातली करत परसदारी जाऊन उभे खळे पेटवणे अन नंतर "अरेरे वाईट झाले बघा" म्हणणे ह्यासारखी माजा नाही
समजले. निळूभाऊ फुलेंना पर्याय नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sat, 08/20/2016 - 11:38

In reply to कश्याला फुकट उघड कंदील by अभ्या..

Permalink

बापूसाहेब,

बापूसाहेब, पण मग "माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर" करणार्‍यांचे कसे होईल???
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Sat, 08/20/2016 - 11:41

In reply to बापूसाहेब, by तर्राट जोकर

Permalink

या

या
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Sat, 08/20/2016 - 12:23

In reply to जसा पाकिस्तानचा हात by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापू तुमचा मुद्दा एकंदरीत

बापू तुमचा मुद्दा एकंदरीत पटतोय परंतु भारताने बलुचिस्तान या विषयावर अजून हि रेड लाईन क्रॉस नाही केलीय. भारताने कुठे हि बलुच स्वातंत्र्याबद्दल चकार शब्द नाही काढला फक्त तेथील असणाऱ्या असंतोषावर बोट ठेवले आहे. थोडक्यात काय भारताला सध्या पाकिस्तान ची जखम मोठी करायची नाहीये फक्त त्यावर मीठ चोळायच आहे. भारत सध्या बलुचिस्तान चा pressure point म्हणून वापर करतंय.
अजूनपर्यंत दिसला नव्हता आपला हात बलुचिस्तानात, पण आता आपण शक्यता ओपन करतोय हाच माझा मुद्दा होता.
हे काही पटत नाही मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भारताने सगळ्यात मोठा घोळ घालून ठेवला. 2009 मध्ये 2009 Sharm el Sheikh बैठकीत बलुचिस्तान मधील भारताचा हस्तक्षेप मान्य केलाय.
सहज एकदा ह्या विषयाबाबत कीवर्डस टाकून युट्युबला चक्कर टाका(च) ही आग्रहाची विनंती. त्या नंतरही हा गैरसमज दूर न झाल्यास अजून चर्चा करता येईल !
हे अगदी योग्य, युट्युब ला नाही गेलात आणि जरी डॉन हे पाकिस्तान च वर्तमानपत्र वाचलं तरी समजेल भारताच्या नावाने किती भोभाटा केला जातो ते. अगदी परवा quetta मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या भारताला जबाबदार धरण्यात आलाय. खरं तर बलुचिस्तान अलग करण शक्य नाही फक्त तेथील असंतोष भडकवत ठेवून पाकिस्तान ला काश्मीर मध्ये नांग्या टाकण्यास भाग पाडले जाऊ शकते असे सद्याच्या शासन कर्त्यांचे मत दिसते, अर्थात भारताने पाकिस्तान खलिस्तान चळवळ जिवंत करू शकतो यासाठी तयार राहायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 08/16/2016 - 14:41

Permalink

‘अॅम्नेस्टी इंडिया’विरोधात

‘अॅम्नेस्टी इंडिया’विरोधात बंगळुरात देशद्रोहचा गुन्हा नेहरू विद्यापीठात ६ महिन्यांपूर्वी असाच प्रकार झाला होता व काही विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, तेव्हा केंद्रातील भाजप सरकार सूड्बुद्धीने वागत आहे असा आरोप करून राहुल व केजरीवाल विद्यापीठात धावत गेले होते व त्यांनी विद्यार्थ्यांचे समर्थन करणारी जोरदार भाषणे ठोकली होती. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे आणि तिथेच देशद्रोही घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा कर्नाटक पोलिसांनी दाखल केला आहे. राहुल आणि केजरीवाल बंगळुरचे विमान कधी पकडतात याची उत्सुकतेने वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Ujjwal on Tue, 08/16/2016 - 21:34

Permalink

हाफिज सईदने पुन्हा गरळ ओकली

http://zeenews.india.com/marathi/news/international/enter-pakistan-army-in-kashmir-hafiz-saeed/325192
  • Log in or register to post comments

Submitted by Ujjwal on Tue, 08/16/2016 - 21:35

Permalink

हाफिज सईदने पुन्हा गरळ ओकली

http://zeenews.india.com/marathi/news/international/enter-pakistan-army-in-kashmir-hafiz-saeed/325192
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 08/20/2016 - 08:33

In reply to हाफिज सईदने पुन्हा गरळ ओकली by Ujjwal

Permalink

हाफिज सईद विरुद्ध मुस्लिमांचा फतवा

भारतातल्या दोन मोठ्या अन महत्वाच्या मुस्लिम पंथांपैकी एक म्हणजे बरेलवी पंथाच्या एका बॉडी ने हाफिज सईद विरुद्ध फतवा घोषित केला असून ह्या फतव्याअंतर्गत त्याला मुसलमान मानू नये असे सांगितले आहे, तसेच त्याचे शब्द, भाषणे वगैरे ऐकणे हे सुद्धा "हराम" असेल असे घोषित केले आहे, ही एक चांगली बाब असून ह्याचे मार्केटिंग व्हायला हवे असे वाटते, अजून डिटेल्स इथे वाचता येतील
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sat, 08/20/2016 - 09:37

In reply to हाफिज सईद विरुद्ध मुस्लिमांचा फतवा by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

...

असा एक पंथ एका व्यक्तीला एका धर्मातून घालवू शकतो का ? हे म्हणजे आळंदीच्या ब्रह्मवृंदाने अमका तमका हा ब्राह्मण नाही असे जाहिर केल्यागत झाले ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 08/20/2016 - 09:45

In reply to ... by चंपाबाई

Permalink

चंपाबाईंना सकाळी सकाळी acidity दिल्याबद्दल

बापूंचे आभार! ब्राम्हण हा पंथ मानल्याबद्दल चंपूताईंचे आभार! १३ व्या शतकात घडलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा आजच्या दहशतवादाशी संदर्भ लावल्याबद्दल चंपूताईंचा येत्या बकरी ईदेला देवबांद इथे जाहीर सत्कार करण्याची आणि त्यांना एक बटाटावडा, त्याचं तेल आणि एक वांगं हे बक्षीस म्हणून देण्याची मी मिपाप्रशासनाला विनंती करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 08/20/2016 - 09:55

In reply to ... by चंपाबाई

Permalink

काई माहिती नाही बुआ, फतव्या

काई माहिती नाही बुआ, फतव्या संबंधी कायदे कसे आहेत हे तुमच्यासारखा शरिया भक्त सांगू शकला तर बरे कसे?
  • Log in or register to post comments

Submitted by Ujjwal on Sat, 08/20/2016 - 13:31

In reply to हाफिज सईद विरुद्ध मुस्लिमांचा फतवा by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 08/19/2016 - 16:47

Permalink

http://m.rediff.com/news

http://m.rediff.com/news/report/nda-will-win-304-seats-today-poll/20160819.htm
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Sat, 08/20/2016 - 00:37

Permalink

भारत चीन सीमेवर भारत चांगल्या

भारत चीन सीमेवर भारत चांगल्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, सैनिक यांची भर घालत आहे. त्यातील काही चालू घडामोडी 1) भारताने नुकतेच अरुणाचल प्रदेश मधील पासीघाट ह्या advanced landing ground (ALG) वर सुखोई उतरवलं. अरुणाचल प्रदेश मध्ये असणाऱ्या 8 ALG पैकी 5 ALG ह्या भारतीय वायुसेनेनें अत्याधुनिक केल्या आहेत. 2 ALG वर अत्याधुनिक करायचं काम चालू आहे आणि 1 ALG वर भविष्यात काम होईल. सुखोई वरती ब्राह्मोस ची यशस्वी integration झाल्या मुळे सुखोई ची संहारण क्षमता किती तरी पटीने वाढाली आहे.भारतीय वायुसेनेच्या दोन squadron ईशान्य भारतात आहेत. तेजपुर आणि छबूआ, दोन्ही ठिकाणे आसाम मध्ये आहेत. http://indianexpress.com/article/india/india-news-india/iaf-makes-history-as-first-sukhoi-fighter-aircraft-lands-in-arunachal-pradesh-2985356/ 2) भारताने चीन सीमेवरती एकूण 73 रोड हे स्ट्रॅटेगिक दृष्टया महत्वाचे म्हणून घोषित केले आहेत आणि त्याच काम BRO वेगाने करत आहे. आत्तापर्यंत यातील 22 रोड पूर्ण झाले असून उरलेले पूर्णत्वाचा विविध टप्यावर आहेत. http://www.asianage.com/india/india-aggressive-roads-china-997 3) लडाख मध्ये भारताने नुकतेच 100 T72 टॅंक तैनात केले आहेत http://us.blastingnews.com/news/2016/07/modi-orders-deployment-of-over-100-tanks-on-china-border-001028169.html 4) ईशान्य भारतात लवकरच भारतीय आर्मी ब्राह्मोस मिसाईल रेजिमेंट तैनात करेल. भारतीय सरकार ने नुकतीच ह्याला मंजुरी दिली आहे http://m.timesofindia.com/india/Army-to-get-steep-dive-BrahMos-missile-regiment-for-China-front/articleshow/53514581.cms
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/20/2016 - 23:29

Permalink

काय छपरी माणसं आहेत! सिंधु

काय छपरी माणसं आहेत! सिंधु अंतिम फेरीत पोहोचल्यावर तिच्या खेळाऐवजी तिची नक्की जात कोणती याचीच लोकांना जास्त उत्सुकता लागून राहिली. http://www.maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016/rio-olympic-games-2016-news/while-pv-sindhu-fought-hard-for-a-medal-many-indians-googled-her-caste/articleshow/53786556.cms
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 08/21/2016 - 00:27

In reply to काय छपरी माणसं आहेत! सिंधु by श्रीगुरुजी

Permalink

सामाजिक उत्कटबिंदू

त्याचं काय आहे श्रीगुरुजी, भारतातल्या काही लोकांना कोणी प्रसिद्ध व्यक्ती आपल्या जातीची असल्याचं कळलं की एक प्रकारचा सामाजिक उत्कटबिंदू (= सोशल ऑर्ग्याझम) प्राप्त होतो. त्याला काही इलाज नाही. :-( आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 08/20/2016 - 23:37

Permalink

डाॅ. ऊर्जित पटेल

यांची RBI चे Governor म्हणून निवड. Inflation Warrior म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाॅ.पटेल यांची निवड करुन सरकारने महागाई निवारण आणि रोजगारनिर्मिती या दोघांपैकी महागाई नियंत्रण हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं असल्याचे संकेत दिले आहेत. रघुराम राजनना job killer वगैरे विशेषणं वाओरणारे सुब्रमण्यम स्वामी डाॅ. पटेलना काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by इल्यूमिनाटस on Sun, 08/21/2016 - 10:44

In reply to डाॅ. ऊर्जित पटेल by बोका-ए-आझम

Permalink

जसे राजन तसेच पटेल. दोघांवरही

जसे राजन तसेच पटेल. दोघांवरही पाश्चात्य आर्थिक संस्कृतीचा पगडा. त्यामुळे स्वामींची चांगलीच पंचाईत झाली असणार! पण मोदी सरकारची पहिल्यांदाच चांगली नेमणूक!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 08/21/2016 - 08:46

Permalink

Good step by central

Good step by central government http://m.rediff.com/news/report/purchase-of-property-issuance-of-driving-licence-heres-the-list-of-sops-for-refugees-from-pak-bdesh/20160820.htm Keeping its promise to provide succour to refugees from neighbouring countries, the National Democratic Alliance government has approved additional facilities for members of minority communities living in India on long-term visa that include opening bank account and power to purchase properties. Ever since the Narendra Modi government came to power, several concessions have been offered to the persecuted Hindus and Sikhs of the neighbouring countries. PM Modi had, during the Lok Sabha poll campaigning in 2014, made a distinction between Hindu and Muslim refugees from Bangladesh arguing that the former should be accommodated. "We have a responsibility towards Hindus who are harassed and suffer in other countries. India is the only place for them. We will have to accommodate them here," he had said.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sun, 08/21/2016 - 10:47

Permalink

..

मोदींच्या नऊ लाख रु च्या कोटची गिनिज बुकात नोंद. मोदी व मोदीभक्तांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by दिगोचि on Tue, 10/04/2016 - 16:09

In reply to .. by चंपाबाई

Permalink

तो कोट एकाने ४ कोटि रुपयाना

तो कोट एकाने ४ कोटि रुपयाना विकत घेतला व ती रक्कम देणगी म्हणुन दिली हे मात्र लिहायला विसरलात. मी भारतात राहात नाही व मोदीभक्तही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sun, 08/21/2016 - 19:51

Permalink

मेक इन इंडिया

भाजपाचा कार्यकर्ता बाँब तयार करताना स्फोट होऊन केरळात मेला. ( टिपू सुल्तानाने भारताच्या इतिहासात प्रथमच मिसाइल वापरले. ह्याना साधा बाँब तयार करुन उडवता येत नाही. )
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 08/22/2016 - 01:11

In reply to मेक इन इंडिया by चंपाबाई

Permalink

टिपू सुलतानाने स्वतः मिसाईल बनवले नव्हते चंपूताई!

आणि शेवटी ब्रिटिशांच्या हातनंच मारला गेला ना तो. काय दिवे लावले मिसाईल बनवून?
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Mon, 08/22/2016 - 07:43

In reply to टिपू सुलतानाने स्वतः मिसाईल बनवले नव्हते चंपूताई! by बोका-ए-आझम

Permalink

..

कधीतरी प्रत्येकजण मरणारच ना ? की, मिसाइल मिळाले म्हणून तो अमर होणार होता ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 08/22/2016 - 12:54

In reply to .. by चंपाबाई

Permalink

..

कधीतरी प्रत्येकजण मरणारच ना ? की, बाँब फुटला नाही म्हणून तो अमर होणार होता ? -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 08/22/2016 - 13:13

In reply to .. by चंपाबाई

Permalink

य बातमीची लिंक आहे का?

असल्यास शेअर करावी.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 08/22/2016 - 01:17

In reply to मेक इन इंडिया by चंपाबाई

Permalink

+१

काहि शिका म्हणावं जिहादी एक्स्पर्ट्स कडुन.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 08/22/2016 - 20:51

Permalink

कॅनडात हिंदू पद्धतीने 'गे'

कॅनडात हिंदू पद्धतीने 'गे' विवाह
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 08/23/2016 - 14:13

Permalink

http://indianexpress.com

http://indianexpress.com/article/india/india-news-india/abid-pasha-mysuru-murders-revelations-religious-leaning-carpenter-bajrang-dal-2991215/ WHEN THE Mysuru police arrested carpenter Abid Pasha, 34, on August 7, they reckoned they would find answers to two major crimes — the March 13 murder of Bajrang Dal activist K Raju and the June 2011 twin murders of business management students Vignesh and Sudhindra, who had been kidnapped. What they had not reckoned with was his involvement in five other murders. Pasha’s revelations that he was involved in a series of four murders between 2008 and 2011 and another in 2014 have stunned the police, who had not even listed him as a suspect. They have now found that Pasha and a group of other men — whose affiliations they say are not yet clear — had targeted several people over moral digressions or associations with right-wing Hindu groups in the last eight years. हे सेक्युलर खून असल्याने पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांनी खुनांचा निषेध करण्याची व पुरस्कार परत करण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 08/23/2016 - 14:19

In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी

Permalink

१,पॉवर गेम मधून हे खून झालेत

१,पॉवर गेम मधून हे खून झालेत का? २,पुरोगाम्यांनी कशावर बोलावे हे तुम्ही ठरवू पाहताय का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 08/23/2016 - 14:35

In reply to १,पॉवर गेम मधून हे खून झालेत by संदीप डांगे

Permalink

१) पॉवर गेम म्हणजे काय? खून

१) पॉवर गेम म्हणजे काय? खून का झालेत हे वृत्तांतात अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे. २) हे मी कोण ठरविणार बापडा? पुरोगामी कशावर जीव तोडून बोलतात आणि कशावर आळीमिळी गुपचिळी मौन पाळतात हे सर्वांनाच ठाऊक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 08/23/2016 - 19:30

In reply to १,पॉवर गेम मधून हे खून झालेत by संदीप डांगे

Permalink

पुरोगामी म्हणजे काय?

भाजप आणि संघविरोध हे पुरोगामी असल्याचं एकमेव लक्षण आहे असं तुम्ही मानता का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com