एक अतूट नातं

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
10 Aug 2016 - 4:29 pm

समुद्र आणि मी
एक अतूट नातं
शब्दांच्या अलिकडचं....
भावनांच्या पलीकडचं...
समुद्र आणि मी
एक अतूट नातं

भरतीच्या लाटांचं
ते उचंबळून येणं
नात्यातली गुंतवणूक
वाढवून जाणं
समुद्र आणि मी
एक अतूट नातं

खिन्न मनाने
आकाशात टक लावणं
तेव्हाच नेमकं ओहोटीचं
मन स्पर्शून जाणं
समुद्र आणि मी
एक अतूट नातं

अनेक आयुष्य
त्याने सामावलीत स्वतःत
अनेक नात्यांची आंबट-गोड चव
.....माझ्या मनात

म्हणूनच जाणवतं
त्याचं माझं एकत्व
समुद्र आणि मी
एक अतूट नातं

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

फुंटी's picture

10 Aug 2016 - 11:13 pm | फुंटी

"शब्दांच्या पलिकडचं....
भावनांच्या अलिकडचं.."
"खारट-गोड चव"

मी हे अस वाचल..

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2016 - 11:46 pm | ज्योति अळवणी

तुमची मर्जी तुम्ही कस वाचावं

वरील कमेंट करताना शब्दांची अदलाबदल करून काही वेगळा अर्थ पकडता येतो का हे पाहत होतो.भावनांना शब्दरूप देताना शब्दांच्या पलिकडे असलेल आणि भावनांच्या अलिकडे असण हे नेमकी अवस्था दाखवते.असो.

ज्योति अळवणी's picture

11 Aug 2016 - 2:05 pm | ज्योति अळवणी

मला नेमकं उलट म्हणायचं होतं. शब्द सुचत नाहीत भावना सांगायला आणि भावना तर अनावर होतात... असं मला म्हणायचं होत

जव्हेरगंज's picture

11 Aug 2016 - 7:25 pm | जव्हेरगंज

भारी आहे ही कविता! आवडली!

ज्योति अळवणी's picture

13 Aug 2016 - 2:31 pm | ज्योति अळवणी

@जव्हेरगंज... धन्यवाद