माझ्यासाठी तूच एक असशील ना ?

आदिती @'s picture
आदिती @ in जे न देखे रवी...
10 Aug 2016 - 3:28 pm

नमस्कार मिपाकर,

माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा सांभाळून घ्या
३ वर्षांपूर्वी लिहिलेली कविता जेव्हा चेपुवर दुसऱ्याच्या नावाने लिहिलेली भेटते तेव्हा खूप वाईट वाटत. माझी ही कविता थोडे शब्द बदलून मला चेपुवर वाचायला भेटली होती.
याआधी लिहिलेली कविता तुम्ही वाचलात, तुम्हाला आवडली म्हणून म्हटलं आपली जुनी डायरी काढून त्यातून उरलेल्या कविता पण इथे टंकाव्यात.

शब्दात नाही सांगता येणार
डोळ्यातून समजून घेशील ना?
अस्वस्थ होईन मी जेव्हा
धीर मला देशील ना?
माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ मला करशील ना?
ओघळले अश्रू माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?
आयुष्याच्या वाटेवर कधी एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला जेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
चुकतेय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?
हरवले मी कुठे कधी तर
सावरून मला घेशील ना ?
कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून माझ्याशी बोलशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
मी तुला विसरणे शक्य नाही
तू मला लक्षात ठेवशील ना ?
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना ?
मला तुझी गरज आहे
हे न सांगता ओळखशील ना ?
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकले
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येंकांपैकी एक असले तरी
माझ्यासाठी तूच एक असशील ना ?

आदिती@

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

आदिती @'s picture

10 Aug 2016 - 3:31 pm | आदिती @

कृपया हा धागा उडवा, चुकून उपलोड झाला आहे

सध्यातरी दोन झालेत. धागे हो.