प्रेरणा - misalpav.com/node/36902
Pokemon Go
गेम कशी खेळता आली पाहिजे...
मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोड़ थांबून.. पोकेमाॅन पकडता आला
पाहिजे...
स्वाईप करून..बाॅल टाकता आला पाहिजे..
सगळ्यांना हे जमतच अस नाही...
पोकेमाॅन सापडतोच असं नाही...
प्रवासातून रोमान्स नेटपॅक वसूल अस नाही...
'गेम' नावाचा शब्द 'जीव' बनतोच अस
नाही...
तरी आजही गेममुळं प्रत्येकजण 'चालतो'..
वायफाय असूनही आपला नेटपॅक लागतो..
'गेम में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'गेम'
खेळतं...
मेसेज कशे करता आलं पाहिजे...
मोकळेपणान वाचता आल पाहिजे...
थोड़ हसून..स्मायली पाठवता आलं पाहिजे
...
वेड बनून..फाॅरवर्ड करता आलं पाहिजे..
सगळ्यांना हे जमतच अस नाही...
फाॅरवर्ड करून बॅलेंस भेटतो असं नाही...
स्मायली पाठून रोमान्स घडतोच अस नाही...
'पिंग' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस
नाही...
तरी आजही मेसेजवर जग चालत..
सगळ काही असूनही आपलं एखाद लफडं लागत..
'प्यार में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'मेसेज'
करत...
प्रतिक्रिया
8 Aug 2016 - 6:10 pm | अभ्या..
हेहेहेहेहेहे. मस्तच की.
आमच्या मार्कसरावांना वाचायला लावतो ही कविता. नाहीतिथं पोकेमानं हुडकतात उगी.
.
अवांतर : ह्याची विडंबने पडणार. शुअर. लिहुन ठेवा.
8 Aug 2016 - 6:13 pm | लालगरूड
हे ज्योति काकू च्या प्रेम कवितेच विडंबन आहे...येऊद्या अजून
8 Aug 2016 - 6:26 pm | नीलमोहर
भारी :)
8 Aug 2016 - 6:52 pm | एस
हुच्चगरूड. =))
8 Aug 2016 - 7:21 pm | विप्लव
गेमच ;)
8 Aug 2016 - 8:12 pm | लालगरूड
धन्यवाद निमो एस विप्लव ___/\___
8 Aug 2016 - 9:11 pm | मुक्त विहारि
जमलंय
8 Aug 2016 - 10:47 pm | लालगरूड
धन्यवाद
9 Aug 2016 - 6:48 am | रातराणी
सही आहेत दोन्ही!
9 Aug 2016 - 8:08 am | क्षमस्व
छान लिहिलंय!
9 Aug 2016 - 9:47 am | सस्नेह
एकदम सह्ही....!
9 Aug 2016 - 9:55 am | नाखु
गरूडा बरंच लक्ष ठेऊन आहेस रे प्रेम कवीतेवर !
मिसामा
9 Aug 2016 - 10:04 am | लालगरूड
धन्यवाद रातराणी,क्षमस्व स्नेहांकिता नाखुकाका... म्हणल प्रेम आपलं विडंबन करतं तर आपण प्रेमाचं करावं..=D