प्रेम

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
7 Aug 2016 - 11:41 pm

प्रेम कस जगता आल पाहिजे...
मोकळेपणान अनुभवता आल पाहिजे...
थोड़ समजून.. थोड़ समजावता आल पाहिजे...
वेड बनून.. वेड करता आल पाहिजे..

सगळ्यांना हे जमतच अस नाही...
पौर्णिमेचा चंद्र मन जाळतोच अस नाही...
पावसातून रोमान्स घडतोच अस नाही...
'प्रेम' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही...

तरी आजही प्रेमावर जग चालत..
सगळ काही असूनही आपल् माणूस लागत..
'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत..
आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'प्यार' करत...

कविता माझीकथा

प्रतिक्रिया

कितीही खरं असलं तरी हाती प्रेमाचा गुलकंदच येतो..

ज्योति अळवणी's picture

7 Aug 2016 - 11:48 pm | ज्योति अळवणी

ज्याचा त्याचा दृष्टीकोन. मला प्रेम भेळेसारख वाटत. आंबट, तिखट, गोड, चटकदार... आणि खूप काही गोष्टी एकत्र मिळवलेलं