आयुष्य जरी असलं अवघड
खूप काही शिकवत असतं
उतरत्या चंद्रकले प्रमाणे
जीवन आपलं सरत असत
नवी दोस्ती नवं नात
जोडणं जरी सोपं असत
एकदा जोडल्यानंतर मात्र
टिकवणं मोठं कसब असत
बघू-करू म्हणता म्हणता
आयुष्य सर्रकन सरकत असत
आठवणींचे मोती ओवता ओवता
म्हातारपण येत असत
सरणावर देह विसावतो तेव्हा
जगणं आपलं संपत असतं
तिथवर पोहोचण्याआधी मात्र
माणूस म्हणून जगायचं असतं
----------
149
प्रतिक्रिया
3 Aug 2016 - 11:13 pm | फुंटी
वास्तव
3 Aug 2016 - 11:24 pm | रातराणी
छान आवडली.
3 Aug 2016 - 11:25 pm | अभ्या..
कविता ओके टोके.
पण शेवटी १४९ का लिहिलय? इतक्या केल्यात कविता आजपर्यंत?
टाका ना इथे मग?
3 Aug 2016 - 11:36 pm | किसन शिंदे
मला ते १४३ माहीत होते, हे १४९ काय प्रकार आहे?
4 Aug 2016 - 12:08 am | ज्योति अळवणी
ही कविता १४८वी आहे.
4 Aug 2016 - 12:20 am | रातराणी
जहाँपनाह तूस्सी ग्रेट हो!
4 Aug 2016 - 12:47 am | पद्मावति
कविता आवडली.
4 Aug 2016 - 11:04 am | ज्योति अळवणी
प्रतिसादाबद्दल सर्वांनाच धन्यवाद