खुप भांडावस वाटत ,
ओरडावसं वाटत,
जेव्हा गरिबांवर होतो अन्याय,
सत्य बोलणाऱ्याची जीभ कापली जाते,
जिथे कष्टाचे पैसे उन्माद झालेली गिधाडं पळवतात,
अशी एकेक ठिणगी पडत राहते,
ठिणग्यांचा बनतो अग्नीगोल,
अग्नी गोलाचा बनतो ज्वालामुखी,
हाच ज्वालामुखी घेऊन जाऊ इच्छितो,
अन्याय करणारे,भ्रष्टाचारी,गुंड,माफिया,बलात्कारी,
आतंकवादी यांच्या समुहामध्ये
आणि ब्रम्हाडाची निर्मिती ज्या शक्तिशाली स्फोटाने झाली तितक्याच ताकतीने तो ज्वालामुखी फोडू इच्छितो,
भस्म होउदेंत सगळे भाडखाऊ
यांच्याबरोबर मी देखील भस्म होउदे
कारण त्या स्फोटानंतर होणाऱ्या
नवनिर्मितीचे सुख असेल मला,
माहितीय मला एकटा नाही लढू शकणार
इतक्या हरामी लोकांशी,
पण इच्छा आहे कि
एका क्षणात सगळ्यांना संपवायची
विचार जरी स्फोटक असले तरी
अतिशयोक्ती नाही रे
अशीच परिस्थिती राहिली तर ,
क्रांतीची वेळ दूर नाही रे
अशीच परिस्थिती राहिली तर,
क्रांतीची वेळ दूर नाही रे .
मिपाकरानो मिपा वरची हि माझी पहीली कविता आहे. म्हणजे हिला कविता म्हणावे की नाही या बद्दल थोडी शन्का आहे.
प्रतिक्रिया
28 Jul 2016 - 6:15 pm | पैसा
आमेन!
28 Jul 2016 - 6:17 pm | पद्मावति
आवडली कविता!
28 Jul 2016 - 8:35 pm | कविता१९७८
मस्तय
7 Aug 2016 - 11:53 pm | ज्योति अळवणी
चांगली आहे. कल्पना आवडली. पण अजून खुलवता आली असती
8 Aug 2016 - 12:06 am | योगेश कोकरे
मिपाच्या प्रान्तात जरा नवखाच आहे. अजून चांगले लिहाय्चा प्रयत्न करेन