नाते

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
26 Jul 2016 - 11:35 pm

शब्दांच्या पलीकडचे
जे नाते जुळले होते
आदी असे न अंत तयाला
ते कालातीत होते

जुळले म्हणून होते म्हणू
की होते म्हणून जुळले?
प्रवाह होते नाते की ते
अथांग सागर होते?

पृथ्वीच्या गर्भातील अंकुर
आकाशी भिडणारे पाखुर
फुलातील मकरंद असे की
प्रेमातील एक युगुल?

ते आहे जोवर अर्थ जीवना
जरी असे ते पलीकडले
नाते जुळता शब्द थिटे अन्
भावनाच खरी मज भासे!

-------------

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

26 Jul 2016 - 11:40 pm | प्रसाद गोडबोले

अय्या , किती गोडं लिहिलं आहेस गं !

मुह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआ

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 9:30 pm | टवाळ कार्टा

ग-ग्यांगबद्दल काही बोलू नकोस रे...तुझा आयडी टपकवायला इथे टपूनच बसलेले आहेत

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2016 - 11:46 am | ज्ञानोबाचे पैजार

शब्दांच्या पलीकडचे
जे नाते जुळले होते
शब्दांची गरज नसे तयाला
खुणेने काम सहजी होते

१२० - ३०० म्हणू
की म्हणू माणिकचंद जर्दा
दाने दानेमे केसर का दम
किंवा असो सातारी जर्दा

चिमटीभर गायछाप घेउनी
मळुनी त्यावर केशरी चुना
दाढेखाली अलगद ठेवत
रामकृष्णहरी तुम्ही म्हणा

ते आहे जोवर अर्थ जीवना
जरी पुडी असे दुसर्या कडे
मागायला शब्द कशाला,
तळव्यावर बोट ठेवणे असे पुरे

Tambhaku
(चित्र अंजा वरुन साभार)

पैजारबुवा,

नाखु's picture

27 Jul 2016 - 2:43 pm | नाखु

काऊ ष्टांम्प ऊठिवलाच लगेच....

सातारी जर्दावाल्या सोलापुरीचा पुणेरी मित्र नाखु

जव्हेरगंज's picture

27 Jul 2016 - 9:15 pm | जव्हेरगंज

मस्त आहे!