बऱ्याचदा वाटतं....

वटवट's picture
वटवट in जे न देखे रवी...
20 Jul 2016 - 3:05 pm

बऱ्याचदा वाटतं.... वागावं अगदी बावळटासारखं....
शर्टाच्या वरच्या दोन गुंड्या लावूच नयेत...

लागली असावी खूप भूक... पोटात पेटलेला असावा वणवा.....
आणि समोर ताट असतानाही, काही खाउच नये...

उगाच हिंडावं आपण गावभर पायाने अनवाणी....
आणि सुखासुखी गावी उगाच दुःखाची गाणी...

उगाच करावा चेहरा आपला चिंताग्रस्त..
आयुष्याने जणू करून टाकलं असावं आपल्याला अगदी त्रस्त...

वाटावं सारया जगाला आपण अगदी वेडाखुळा .....
अगदी मोठ्ठ्या, भसाड्या आवाजात म्हणावीत गाणी फाडून आपला गळा...

उगाच करत राहावं असलं काहीतरी...
लोकांनी म्हणावं, बहुतेक इथे फसलंय काहीतरी...

चुकवावेत साऱ्यांचे अंदाज..आपण अगदी सपशेल....
कधीतरी खेळूनच बघावा आपण आपल्या आयुष्याशी हा खेळ...

बोलणं.... लिहिणं खूप सोपं आहे... पण वागणं खूप कठीण...
इतक्या सहज नाही सुटत आपल्या सभ्यतेची वीण...

मलाही अस खूप वागावं वाटतं पण मी स्वप्नातच तसं करतो... ;)
आणि जाग आली कि... असलं काहीतरी लिहितो.....

- चेतन दीक्षित

कविता

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Jul 2016 - 3:41 pm | माम्लेदारचा पन्खा

कस्काय जमतं तुमास्नी ?

सामान्य वाचक's picture

21 Jul 2016 - 10:25 am | सामान्य वाचक

एक उनाड दिवस आठवला