श्री. गंगाधरजी मुटे ह्यांचा 'मी बी मंत्री होईन म्हणतो' हा नागपुरी तडका लावून आम्ही केलेला सावजी रस्सा सादर आहे. ही रेसिपी खवय्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे.
आंबटगोड चटक चाखीन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो
गिराइकाले नागपुरी माल
भेटला काय, न भेटला काय
गिराइकाले मालात ठगाची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो....!!
गिराईकाले रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
गिराईकाले भावात मराची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा खाली करून
घेईन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो....!!
संत्र्याइची चव
आंबट काय न तुरट काय
या बैताडबेलन्या गिराइकाले
उपजत अक्कलच नाय
चारपाच कट्टे घेऊन
साजरे संत्रे ढुंढत जाईन म्हन्तो
मी बी संत्री खाईन म्हन्तो....!!
संत्र्यामदि भेसळ करून
संत्रा इकता येते
गिराइकासीन इमान राखनारा
खड्ड्यामदि जाते
गिराइकाचे नाव फक्त
मालापुरते घ्यावे
माल इकून झाला का
खुश्याल सोडुन द्यावे
संत्राकारण करावे
तरच मिळते फायदा....!!
एकमुखाने बोला भाऊ!
संत्रानगरी की जय....!
-- स्वामी संकेतानंद
*ठगाची = ठगायची
*मराची = मरायची
प्रतिक्रिया
20 Jul 2016 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या!
स्वामिज्जी की म'हान रचनाएं.
20 Jul 2016 - 10:48 am | स्वामी संकेतानंद
म'हाण्ण रचनाएं ! ;)
20 Jul 2016 - 10:49 am | मोदक
कंपूमध्ये स्वागत आहे स्वामीम्हाराजजी.
20 Jul 2016 - 10:52 am | स्वामी संकेतानंद
आम्ही कुणाच्याही कंपूत नसतो. हम खुद एक मुख्तसर कंपू है!
20 Jul 2016 - 10:54 am | सस्नेह
कंपू राहूदे, झुंडीत तरी व्हाल का नाही सामील ?
20 Jul 2016 - 10:58 am | स्वामी संकेतानंद
शेर तो अकेला शिकार करता है, झुण्ड में तो.....
वगैरे वगैरे!! हेहेहे! ;)
20 Jul 2016 - 10:51 am | कैलासवासी सोन्याबापु
स्वाम्या भुसनळ्या !! =))
लैच खास न जी! सगरा मार्केट साफ केला ना जी
20 Jul 2016 - 11:03 am | मोदक
स्वाम्या भुसनळ्या !! =))
बापू, पत्ता द्या तुमचा!
20 Jul 2016 - 11:07 am | स्वामी संकेतानंद
बापू सध्या 'बेपत्ता' आहेत दुर्दैवाने! ( यात विनोद नाही.)
20 Jul 2016 - 11:15 am | नाखु
अता काय क्लब काढतोयस का पत्त्याचा !!!
अति अवांतर : जुगार खेळणे बेकायदा आहे आणि हा प्रतिसाद त्याला अनुसरून आहे,उगा फाटे फोटुन "स्वामींचा"धागा काडी काडीने पेटवू नये.
मूळ अवांतर : स्वामीजीम्नी "संत्र्या" ची साले काढली आहेत आणि "मोसंबी"ला अनुल्लेखले आहे.
कवीताबाह्य अवांतर : परवानगी घेऊन विडंबन पाडल्याबद्दल स्वामींना "विनम्र कंपुविरहीत झुंडीबाहेरचा रसाळ साहीत्यीक" असा पुरस्कार द्यावा अशी मी टक्याच्या समीतीला विनंती करतो.
20 Jul 2016 - 11:42 am | अत्रुप्त आत्मा
@ "विनम्र कंपुविरहीत झुंडीबाहेरचा रसाळ साहीत्यीक" ››› =))
20 Jul 2016 - 12:34 pm | स्वामी संकेतानंद
समितीने पुरस्कार जाहीर केल्यास तो स्वेच्छेने स्वीकारण्यात माझी काही हरकत नाही.
20 Jul 2016 - 12:37 pm | महासंग्राम
स्वीकारताना परत करता येतो का ते पण इचारून घ्या :P
20 Jul 2016 - 11:31 am | कैलासवासी सोन्याबापु
हलकट शिरोमणी स्वामीजी! =))
20 Jul 2016 - 11:24 am | महासंग्राम
मी बी पत्ता मागीन म्हणतो : पश्चिम वैदर्भी तर्री
लोकाईच्या गावी जाईन म्हणतो
मी बी पत्ता मागीन म्हनतो .. !!
माया प्रतिसादाला भाव
भेटन काय, न भेटन काय
मले गडे काढाची
जल्मापासून सवयच हाय
तरी बी भांडण करीन म्हनतो
मी बी पत्ता मागीन म्हनतो .. !!
20 Jul 2016 - 1:11 pm | सामान्य वाचक
संत्री खाल्ली नाहीत
मी पत्ता देणार नाही
20 Jul 2016 - 1:23 pm | स्वच्छंदी_मनोज
संत्री खाणे सोडा हो... कवीता वाचली ना, मग?
इथे कवीता वाचली की लगेच पत्ता द्यायला लागतो :):)
20 Jul 2016 - 11:28 am | प्रीत-मोहर
स्वाम्या लयच भारी !!
20 Jul 2016 - 11:55 am | टवाळ कार्टा
खिक्क
20 Jul 2016 - 12:05 pm | अभ्या..
स्वामी नीच हाय. पण त्याची खुदगब्बर स्टाईल लै दिलखेचक हाय.
कृपा माडरी स्वामी.
20 Jul 2016 - 12:06 pm | अभ्या..
स्वामी नीच हाय. पण त्याची खुदगब्बर स्टाईल लै दिलखेचक हाय.
कृपा माडरी स्वामी.
20 Jul 2016 - 12:33 pm | स्वामी संकेतानंद
आमच्या साधेभोळेपणाला नीचपणा म्हटल्याबद्दल अभ्याजींचा णि षे ढ !!!
20 Jul 2016 - 12:10 pm | सामान्य वाचक
जमलय
20 Jul 2016 - 12:37 pm | मुक्त विहारि
जमलंय
20 Jul 2016 - 12:41 pm | सुबोध खरे
स्वामी धरून कंपू आणि झुंडीतल्या सर्व लोकांचा आणि त्यांच्या कंपूबाजीचा आणि झुंडशाहीचा निषेध.
बाकी कविता लै झ्याक( अर्रर्र मला कवितेतील "क" सुद्धा कळत नाही) तेंव्हा हा प्रतिसाद बाद धरावा.
20 Jul 2016 - 12:52 pm | आदिजोशी
संत्री खाण्यापेक्षा संत्र्याची पिण्यात जास्त मजा आहे लोकांना समजेल तो सुदिन. संत्रा शेतकरी संघटने तर्फे संत्रा उत्पादकांवर पिढ्यानुपिढ्या होणारा अन्याय दूर व्हावा ह्या उदात्त हेतूने त्यांना घरीच गाळीपाची घरगुती भट्टी लावण्यासाठी लोन देण्याची मी सरकारला विनंती करत आहे.
20 Jul 2016 - 1:54 pm | मुक्त विहारि
+ १
20 Jul 2016 - 1:59 pm | इरसाल
देशी पद्धतीने कशी बनवावी याची रेसेपी तयार आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर मिळेल.
20 Jul 2016 - 2:26 pm | सूड
ह्याला म्हणतात घरचा आहेर!! =))
-निर्भय
20 Jul 2016 - 2:32 pm | बोका-ए-आझम
हापूस आंब्यांवर अन्याय केल्याचा णिशेध!
20 Jul 2016 - 2:52 pm | नाखु
निषेधाला "हाणुन मोदन"
पत्ता मागू नये पैसे पडतील प्रति पत्ता ५ रू (बदाम गुलाम व राणी प्रत्येकी ५० रू)
20 Jul 2016 - 3:20 pm | सूड
ते पैसे वरच्या खिशात ठेवणार नाहीत.
20 Jul 2016 - 2:56 pm | पैसा
=))
20 Jul 2016 - 3:28 pm | यशोधरा
विडंबन आवडले! =))
22 Jul 2016 - 7:24 am | गंगाधर मुटे
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
या कवितेचे विडंबन केल्याबद्दल धन्यवाद!
एखाद्या कवितेचे विडंबन होणे किंवा विडंबन करावेसे वाटणे हे त्या कवीचे आणि कवितेचे फार मोठे यश असते. कवितेचा आशय किंवा आकृतीबंध म्हणजे दोन किंवा एक किंवा दोन्हीही जेव्हा रसिकाच्या थेट हृदयाच्या आरपार जाते, रसिकाला खुणावते किंवा वेड लावते तेव्हाच ती कविता सफल होते, असे मला वाटते. आणि अशीच सफल कविता विडंबनाला पात्र ठरत असते. कवितेचे विडंबन म्हणजे रसिकाने कवीच्या कौशल्याला दिलखुलास दाद असते.
आता या कवितेच्या विडंबनकाराला असेही वाटेल की मी जे वर लिहिले ते खोटे आहे. मी तर मूळ कवीची चेष्टा करण्यासाठी, टर उडवण्यासाठी हे विडंबन केले आहे, हे निखालस असत्य असून त्या विडंनकाराने करून घेतलेली स्वतःची फसगत आहे.
विडंबनकाराने आता हे लक्षात घ्यावे;
मूळ कवितेच्या कविचे आणि विडंबनकाराचे कवितेच्या आकृतीबंधाशी मतभेद नसून कवितेतल्या आशयाशी मतभेद आहे किंवा कवितेबाहेरच्या व्यक्तीगत आकसाशी निगडीत आहे.
पण या विडंबनाने मूळ कवितेच्या आशयाला कुठेही धक्का लागलेला नाही किंवा कवीच्या व्यक्तीगत विचारधारेलाही धक्का लागलेला नाही.
कवितेच्या आकृतीबंधाने विडंबनकारावर मोहिनी घातली, असा त्याचा अर्थ असल्याने मूळ कविता ही कवीची अत्यंत सफल कलाकृती असल्याचे सिद्ध होत आहे.
मात्र विडंबनाच्या खाली किंवा वर मूळ कवितेची लिंक द्यायला हवी होती. पण मानवी मनाचा कोतेपणा लक्षात घेतला तर त्यातही काही वावगे वाटून घेण्याची आवश्यकता उरत नाही.
(ही पोस्ट लिहिताना मी प्रताधिकाराच्या बाबीकडे दुर्ल्क्ष केले आहे)
- गंगाधर मुटे
23 Jul 2016 - 4:07 pm | स्वामी संकेतानंद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! व्यक्तिगत आकस वगैरे काही नाही. मला एखादी आवडली आणि कविता विडंबनयोग्य वाटली की मी तिचे विडंबन करतो. माझ्यासाठी विडंबन ही एक कला आहे, मूळ कवितेला तुच्छ लेखणे हा हेतू कधीच नसतो. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामांचे अभंग, रामदासांचे मनाचे श्लोक, केशवसुतांची 'तुतारी', बालकवींची 'श्रावणमासी', तांब्याचे 'तिनी सांजा सखे मिळाल्या', भटांच्या अनेक गझलांपासून ते माझ्या काही जवळच्या मित्रांच्या मला आवडलेल्या कवितांचेही मी विडंबन केले आहे.
विडंबनाच्या विषयाचे म्हणाल तर शक्यतो त्याने मूळ कवितेच्या आकृतिबंधाला कमीत कमी धक्का पोचेल असे पाहतो आणि त्यानुसार विषय असतो किंवा रचना असते.
दुसरा मुद्दा लिंक देण्याचा. ते माझ्या डोक्यात आले नाही. मूळ कविता मिपावरच आणि टॉप 10 मध्ये, ताजीच असलेल्या मी फक्त नामोल्लेख केला. पुढच्या खेपेला लिंक देईन. किंवा संपादक इथे लिंक देऊ शकतील.
22 Jul 2016 - 7:46 am | गंगाधर मुटे
विडंबनाबद्दल खास नजराना म्हणून एक शेर पेश करतो. विडंबनकाराने सहर्ष स्विकार करावा, अशी अपेक्षा आहे.
सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे
वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे
(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
23 Jul 2016 - 4:07 pm | स्वामी संकेतानंद
उत्तम शेर!