युरोप टूर

सुमेधा पिट्कर's picture
सुमेधा पिट्कर in जे न देखे रवी...
13 Jul 2016 - 5:05 pm

आमचे स्वप्न होते भेट द्यावी युरोपला
16.4.2016 ला तो सुवर्ण योग जुळुन आला
"वीणा वर्ल्ड" तर्फे केली युरोपची टूर
अद्भूत रम्य् देश, हिरवळ सर्व दूर
प्रथम पाहिले लंडन शहर
आखिव रेखिव स्वंच्छ सुंदर
साहेबाचा देश पाहिला "लंडन आय" मधुन
"कोहिनुर" मात्र नेला त्यांनी भारता मधुन
वॅक्सचे पुतळे, थेम्स नदी आणि राजवाडा राणीचा
युरोस्टा‍र ने उघडला दरवाजा फ्रान्स शहराचा
जगातले एक आश्चर्य आयफेल टॉवर
लूर म्युझियम, आर्च द ट्रॅम्प आणि कॉनकर्ड स्केअर
लहान मुले होउन भेट दिली "डिस्ने लँडला"
क्षणात होउन मोठे, गेलो "नाईट शोला"
फ्रान्स आहे युरोपमधील सगळयात श्रीमंत देश
पण पॅरिस शहराचा पसंत नाही आला वेष
मनमुराद स्वातंत्र्य आणि वागण मोकळ ढाकळ
चकचकीत पणाच्या बुरख्या खालचे पितळ मात्र पडत उघड
जर्मनीच्‍या ब्लॅक फॉरेस्ट मध्ये डोळयाचे पारणे फिटले
कूकू क्लॉक फॅक्टरीत घड्याळाचे टोले वाजले
नेदरलॅन्ड कुकेनहॉफ मध्ये पाहिले टयुलिप गार्डन
जणु असंख्य फुलांनी केली रंगाची उधळण
कुठे किती आणि काय काय बघु, अस गेल होउन
मन तृप्त होईना, पण डोळे गेले रंगानी माखुन
निसर्ग सौंदर्याचा बादशहा म्हणून ओळख स्विझरलँडची
हिरव्यागार कुरणांवर डोलतात पिवळी फुले मोहरीची
स्वी्स कडे जातानाच बदलू लागतो रंग डोंगरांचा
जणू हिरव्यारगार शालूवर शेला पांघरला बर्फाचा

सरळ, सुंदर रस्ते, आणि असंख्य टनेल
काय बिशाद, तुमच्या पोटातले पाणी हलेल
-हाईन फॉल्स वाटतो जणू मिनी नायगारा
फेसाळते पाणी, अंगे भिजवीती या जलधारा
दहा हजार फुटांवर आहे माउंट टिटलीस
जणू एका तपस्यावने बर्फाची चादर पांघरलीस
बर्फात मनसोक्त खेळताना भान गेले हरपून
एक स्वाप्न झाले साकार मनात "वीणा" झंकारून
ट्युमलबर्ग वॉटर फॉल आहे मानव निर्मित
दहा पहाडांमधुन पाणी पडते, पाहुन होतो स्तिमीत
भेट दिली आम्ही युंगफ्राउ-जगातल्याी सर्वात उंच स्टेशनला
अचंबीत झाले मन, पाहुन माणसाच्या पॅशनला
नजर जाईल तिथे अप्रतिम निसर्ग सौंदर्य दिसते
जणू निसर्गाचा कॅलिडोस्कोिप रोज नवनवीन दृश्य दाखवते
जड अंत:करणाने घेतला निरोप स्वीसचा
रीता केला निसर्गाने खजिना, वेचाल तितका वेचा
ऑस्ट्रीया आणि स्वीस, शर्यत निसर्ग सौंदर्याची
कोण आहे सरस ? ही तुलना काय कामाची !
दोघे शोभतात जणू राजा आणि राणी
दोघांकडे आहेत सृष्टी सौंदर्याच्या अनंत खाणी
ऑस्ट्रीेयात झाडांनी घातली होती टोपी बर्फाची
इथेच अनुभवली आम्ही मजा स्नो फॉलची
अगणित रूपे निसर्गाची, दोन डोळे अपुरे पडतात
कॅमेराच्या डोळयांनी बघताना, असंख्य फोटो पण कमीच वाटतात
"स्वरोस्की" म्हणजे क्रिस्टलची दुनीयादारी
महिलांनी केली इथे भरपुर खरीदारी
इटली हा देश मिरवतो ऐतिहासीक वारसा
चोरांपासुन जपा मंडळी, पासपोर्ट आणि खिसा
व्हेनिस म्हणजे प्रदेश आहे कालव्यांचा
नावलौकिक आहे त्याचा तरंगत्याे शहराचा
पीसाचा आहे हा मनोरा झुकता
फसलेल्या वास्तुशास्त्रांचा पुरावा हा कलता
व्हीक्टर ईमान्युअल दोन, कधी वेडींग केक वर मिरवतो
कोलोसियम आहे भव्य थिएटर, ऐंशी हजार प्रेक्षकांना सामावतो

ग्लॅडिएटर शो म्हणजे योध्यांची मारामारी
इथेच दाखवायची शौर्याची कलाकुसरी
मायकेल एंजेलोचे पेंटिगस् आहेत अनमोल
कला त्यांची जपली गेली, झाली नाही माती मोल
ट्रेव्हीे फाउंटन मधे आहे नेपोलियनचा पुतळा
एक नाणे पाण्याेत टाका, परत याल रोमला पुढच्या वेळा
रोमलसच्या नावाने रोम प्रसिद्ध झाले
व्हॅटिकन म्युझियम बघताना मन डोलू लागले
"वीणा वर्ल्ड" ने केली आमची उत्तम सरबराई
परतीच्या ह्या वाटेवर मात्र आठवते आपली आई
स्वच्छ व सुंदर युरोप मधे जीव रमला खरा
पण, तरीही वाटते गड्या अपुला देशच बरा

सौ. सुमेधा पिटकर

कविता

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

13 Jul 2016 - 6:33 pm | चौकटराजा

आतपर्यंत यूरोप वरचे अनेक ब्लॉग वाचले. ५००पानाचे पुस्तकही वाचले पण हे तुमचे अजबच आहे. मस्त प्रयत्न. शेवटची ओळ॑
काही शिकवून जाते. १९७७ साली माझ्या मित्राचे आईवडील अमेरिकेला जाउन आल्यानंतर " आपला गाव मस्त" अशीच प्रतिक्रिया त्यानी दिली होती.तरीही वास्तूकलेचा युरोप जर निरखून पाहिला तर भारत त्यापेक्षा मस्त असे म्हणणे अतिरेकच ठरेल.

प्रशांत's picture

14 Jul 2016 - 12:58 pm | प्रशांत

पण पॅरिस शहराचा पसंत नाही आला वेष

हे पहिल्यांदा वाचल.

पैसा's picture

13 Jul 2016 - 7:26 pm | पैसा

वेगळाच प्रयत्न! आवडला!

पद्मावति's picture

13 Jul 2016 - 7:39 pm | पद्मावति

+1
मस्तं!

रुस्तम's picture

13 Jul 2016 - 9:38 pm | रुस्तम

मस्तच

:)
छान झाली की टूर कवितेतून!

सुमेधा पिट्कर's picture

14 Jul 2016 - 10:02 am | सुमेधा पिट्कर

आभारी आहे

फ्रान्स आहे युरोपमधील सगळयात श्रीमंत देश
पण पॅरिस शहराचा पसंत नाही आला वेष
मनमुराद स्वातंत्र्य आणि वागण मोकळ ढाकळ
चकचकीत पणाच्या बुरख्या खालचे पितळ मात्र पडत उघड

पॅरिसचा वेष पसंत नाही आला? आणि बुरख्याखालचं पितळ उघडं पडलं ?

आँ? मला तर सर्वाधिक ग्रेसफुल ड्रेसिंग करणार्या स्त्रिया पॅरिसमधे दिसल्या. इनफॅक्ट वेगवेगळ्या सीझनमधे थंडीला अनुरुप असे कमी किंवा पूर्ण लांब कपडे तिथले लोकल लोक्स घालताना दिसले आणि भर बोचर्या कडाक्याच्या थंडीतही थरथर कापत बळंच हौस म्हणून मिनीस्कर्ट घालणार्या मुली भारतीय हनिमूनछाप टुरिस्टांतच फक्त दिसत होत्या.

अर्थात क्लबातलं नाही हं म्हणत मी. तो प्रकार वेगळाच..

आणि पितळ उघडं पडण्यासारखं तर पॅरिसबाबत काही दिसलं नाही बुवा.

धनंजय माने's picture

14 Jul 2016 - 12:22 pm | धनंजय माने

आपण देखील प्यारिस (लोकल उच्चार पारी पण ते असो) फिरुन आलो आहोत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न.

जर अशी कविता टाकता आली असती तर जाऊन आला आहात असं मान्य करता आलं असतं पण....

(जमलंय का गवि)

हा क्षीण हलकटपणा आहे माने..!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2016 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही प्रतिसादांना इग्नोर करायचं जमेना वाटतं. गविशेठ तुम्हाला. :)

बाकी, प्रशांत मला प्यारीसला नेणार आहे ;)

तेव्हा मला मार्लिन मोनेरोच्या समाधीवर मोगऱ्याची फुले अर्पण करायची आहेत.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

14 Jul 2016 - 1:11 pm | माहितगार

प्रवास काव्य झाले फर्मास
नीलकांताचे बील पोहोचावे
वीणावर्ल्डच्या जाहिरात विभागास

(ह.घ्या) उत्तम नवा काव्य प्रयत्न

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

14 Jul 2016 - 2:34 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

उत्तम काव्य आहे,थोडक्यात युरोपची सहल घडवलीत.

सामान्य वाचक's picture

14 Jul 2016 - 2:40 pm | सामान्य वाचक

मिपा बदलले हो
सगळे सहिष्णू झाले आहेत

जयन्त बा शिम्पि's picture

15 Jul 2016 - 8:22 am | जयन्त बा शिम्पि

युरोप काय अन अमेरिका काय , तेथे जावून आल्यानंतर कोणालाही हेच सांगावेसे वाटते कि हे देश पहाण्याकरीता खुप छान आहेत , पण रहाण्यासाठी " आपला भारत " देशच छान आहे .भारतात माणुसकी, जिव्हाळा, प्रेम सहजपणे मिळते.
भारतात साधे एस. टी. मध्ये शेजारी कोणी अनोळखी जरी बसला, तरी पाच दहा मिनिटात गप्पा मारू लागतो , पण अमेरिकेत शेजारी कोण रहातो, त्याचे कुटुंब कसे आहे, याचा जरा देखील पत्ता वर्षानुवर्षे दुसर्‍या शेजार्‍याला लागत नाही. घरांचे , खिडक्यांचे पडदे , नेहमी लावलेले. खाजगीपणाचा अतिरेक येथेच पहावयास मिळतो. आमच्या भारतात मात्र , " द्वार घराचे , सदैव उघडे, भागवताची ध्वजा फड्फडे ." अशी स्थिती असते. नाहीतरी आपल्याकडे म्हटले जाते की " ज्या गावात भरेल , पोटाचा दरा, तोच गाव , गड्या आपला खरा " जय भारत ! !

सप्तरंगी's picture

15 Jul 2016 - 5:31 pm | सप्तरंगी

तुम्ही जे लिहिताय ते सगळेच काही अगदी खरे नाहीये, असे generalize करणे काही बरोबर ठरणार नाही.

भारतातही शेजारचे, नातेवाईक यांच्याकडून जिव्हाळा न मिळण्याचे असंख्य प्रकार सांगता येतील.
माणूस असून असून किती वेगळा असणार?
आम्हाला मात्र आमच्या शेजार्‍यांबद्दल जितपत असायला हवी तेवढी माहिती आहे व त्यांच्याकडून मदतही मिळते. उग्गीच काहीही हां!

सप्तरंगी's picture

15 Jul 2016 - 5:34 pm | सप्तरंगी

काव्य छान जमले आहे पण पॅरिस खालील लिखाण पटले नाही: असे खरेच मत आहे की की यमक थोडेफार जुळत होते म्हणून तसे लिहिले??

''मनमुराद स्वातंत्र्य आणि वागण मोकळ ढाकळ
चकचकीत पणाच्या बुरख्या खालचे पितळ मात्र पडत उघड''

मस्त...

रेवती's picture

16 Jul 2016 - 6:34 am | रेवती

कविता आवडली.

माझ्या कवितेला दिलेल्या प्रतिसादा बद्दल आभार, फ्रान्स शहरात शिरल्या शिरल्या दिसलेल्या द्रुश्यामुळे माझे असे मत झाले,रस्त्याच्या कडेला "नको ते विधी" करुन घाण केली होती,वास येत होता त्यामुळे "चकचकीत पणाच्या बुरख्या खालचे पितळ मात्र पडत उघड" असे मला वाटले.
प्रथम दर्शनच खराब झाले, त्यामुळे असेल कदाचित .....त्यावेळी मनात आलेली पहिली प्रतिक्रीया कवितेत नकळत उमटली.अर्थात ह्याचा अर्थ सगळे शहरच खराब होते असा नाही.

एकेका वर्षाच्या अंतराने पॅरिस भेट घडत गेल्याने फरक ठळक जाणवला.. निरुद्देश भटकणारी भणंग दिसणारी माणसं एकेकटे किंवा घोळक्याने हल्लीच अचानक दिसली. कचरा आणि भिकारीही. हे इतरही युरोपियन शहरांत दिसलंय. फरक पडलाय खरा. मायग्रंट्सनी वाढत्या श्रेणीने दृश्य बकाल करत नेलंय अशी शंका येते. अर्थात तिथे राहणारे स्थानिक मिपाकर अधिक खात्रीने सांगू शकतील.