त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?
भरल्या वांग्याच्या भाजीत ओतिशी तू चव का?
मिसळीच्या रश्शांत सांग तू तरंगतोस का??
ओनियन उत्तप्यास सांग तुझ्याशिवाय चव का?
भाजी रस्सा वरण सांबाराचा प्राण तू आहेस का?
चिरताना तुला अश्रू चे घोर ते तू रूप का?
शेव चिवड्यात वर्षणारा चवीचा तू मेघ का?
कोथिंबीर मिरची खोबरे वाटणात नेमका हवा का?
सामिष असो वा मत्स्य आहारातला प्राण तू आहेस का?
कष्टणार्या बांधवांच्या भाकरीचा मित्र तू आहेस का?
सुगरिणीच्या व्यंजना चा सांग तू अविभाज्य भाग का?
असो सामिष वा शाक पाकात तिथे रे, सांग तू आहेस का
प्रतिक्रिया
12 Jul 2016 - 9:45 pm | माम्लेदारचा पन्खा
काय हे झेंगाट ?
12 Jul 2016 - 9:51 pm | अभ्या..
अरे पंख्या, (अकलेचा) कांदाय रे तो.
12 Jul 2016 - 9:58 pm | धनंजय माने
'अकु'लेचा?
12 Jul 2016 - 10:04 pm | नूतन सावंत
कोथिंबीरीवर एवढी भारी कविता.आवडली.सध्या भावपण भारी आहे.
12 Jul 2016 - 10:06 pm | नूतन सावंत
"कांद्यावर" असे म्हणायचे आहे.
12 Jul 2016 - 10:49 pm | टवाळ कार्टा
आवडली :)
13 Jul 2016 - 6:44 am | अत्रुप्त आत्मा
अकु काकांची आत्मकुंथीत जिल्बी! ;)
13 Jul 2016 - 9:39 am | मदनबाण
अकुनी घाणा बदललेला दिसतोय... जिलबीच्या जागी भजी टाकलेली दिसत आहेत ! =)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh
13 Jul 2016 - 11:05 am | चिनार
पैजारबुवांच्या प्रतीक्षेत !!!
या संधीचे सोने करा...
13 Jul 2016 - 11:25 am | ज्ञानोबाचे पैजार
एकदा वाचल्यावर माझ्याच नाका पुढे कांदा धरावा लागला (लोकांना.... वाचता वाचता पडलो म्हणुन).
एका दुष्ट मित्राने कोल्हापुरी चप्पल देखिल काढली होती. पण आम्हाला काही करण्या आधी त्याचे लक्ष चुकुन माझ्या काम्युटराच्या पडद्यावर गेले आणि तो पण आमच्या शेजारी आडवा झाला. त्याची चप्पल त्यालाच हुंगवावी लागली.
तुमच्या विनंतीला मान देउन आम्ही यात हात घातला आणि काही बाही झाले तर आम्हाला त्यातुन बाहेर काढायला आमचे "मांत्रिक" बुवाही हल्ली मिपावर येत नाहित.
पैजारबुवा,
13 Jul 2016 - 12:24 pm | सस्नेह
विडंबनारिष्ट मारा की दोन ग्लास !
13 Jul 2016 - 2:00 pm | चिनार
विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद !
पण तुमच्या लेखणीतून काही वाचायला मिळाले असते तर मजा आली असती बुवा...
असो. पण अकुकाकांना या कवितेसाठी 'भजेपीठ' पुरस्कार' आपल्या शुभहस्ते द्यावा अशी प्रार्थना करतो.
13 Jul 2016 - 11:32 am | कैलासवासी सोन्याबापु
पुढले कडवे,
भजी खाऊन झाल्यावर
सकाळी सहाच्या एक्सप्रेस मध्ये
सांग तू आहेस काय!
13 Jul 2016 - 11:52 am | ज्ञानोबाचे पैजार
ते विचारायची गरज नाही.
ते तर तुम्ही पलिकडच्या डब्यात बसुन देखिल सहज ओळखू शकता.
पैजारबुवा,
13 Jul 2016 - 12:19 pm | चिनार
नाखुकाका तुम्ही उगाचच तिकडे शेतीविषयक लांबलचक धागे काढता...
ही कविता वाटा जागोजागी उभे राहून...कांद्याचे मागणी वाढून भाव गगनाला भिडतील..
13 Jul 2016 - 1:41 pm | बोका-ए-आझम
पण चालीत बसत नाहीये.
13 Jul 2016 - 1:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
डोक्यात जाणे, हे आपले डोक्यात बसणे महत्वाचे!
13 Jul 2016 - 1:49 pm | रातराणी
कहर आहेत अकुकाका!
14 Jul 2016 - 12:37 pm | एस
टोमॅटो उत्तप्पा जास्त चवदार असतो.
14 Jul 2016 - 4:12 pm | अभ्या..
चकत्यावाला की तुकडेवाला?
14 Jul 2016 - 4:28 pm | नाखु
ओन्ली तुकडा !