जै लंडनातले मिपाकर :)
आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे.
१) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :)
२) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल?
३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :)
४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :)
आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती
१) स्टोनहेंज
२) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव
३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन
४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी
५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज
मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल
याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल)
भेटू लवकरच :)
प्रतिक्रिया
14 Jul 2016 - 10:27 am | अभ्या..
Rango Bapooji Yanchyawar lihileli lekhamala saptahik Marmik madhye 4-5 varshapurvi vachalyache mala smarate.
15 Jul 2016 - 1:00 am | एस
https://mr.m.wikipedia.org/wiki/रंगो_बापूजी
15 Jul 2016 - 1:55 am | बॅटमॅन
आयमाय स्वारी, स्पेसिफिक पुस्तक मला माहिती नाही. वाचून सांगतो.
बायदवे इंग्लंडात स्थायिक झालेल्या अजून एका भारतीयाबद्दल इथे वाचता येईल. या प्राण्याने इंग्लंडातले पहिले इंड्यन हाटेल काढले तेही दोनशे वर्षांपूर्वी, एवढेच नव्हे तर शांपूचा शोधही त्यानेच लावला. इनफॅक्ट शांपू हा शब्दच चंपी या शब्दावरून आलेला आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Sake_Dean_Mahomed
अजूनही काही लोक त्या काळाच्या आसपास इंग्लंडात जाऊन आले होते. त्यांच्या प्रवासवर्णनात "पायांनी तुडवलेल्या पिठाचे पाव खाणारे", "जाऊन आल्यावर न धुणारे", "धड आंघोळ न करणारे", "कुठल्याही फालतू विषयाची नोंद करणारे", अशी इंग्रजांची निरीक्षणे दिसतात.
15 Jul 2016 - 9:48 am | पद्मावति
धन्यवाद अभ्या.., एस आणि बॅटमॅन.
20 Jul 2016 - 2:55 pm | आदूबाळ
अजून एकः
वेणू चितळे या दुसर्या महायुद्धाच्या काळात बीबीसीमध्ये निवेदिका होत्या. त्यांनी जॉर्ज ऑरवेलबरोबर काम केलं होतं.
http://www.open.ac.uk/researchprojects/makingbritain/content/venu-chitale
त्यांची "इन ट्रान्झिट" आणि "इन्कॉग्निटो" अशी दोन पुस्तकं आहेत. फारा वर्षांपासून शोधतो आहे.
13 Jul 2016 - 12:06 am | बॅटमॅन
अजूनेक रिक्वेष्टः तिकडून जाऊन आल्यावर एक फर्मास मुक्तपीठीय शैलीत प्रवासवर्णन होऊन जाऊंदे.
15 Jul 2016 - 9:59 am | नाखु
"मी लंडनला होतो तेंव्हा" अशी सुरुवात अज्जिबात करु नये असे नाही असे नक्की नाही.
धुराळी वाचक नाखु
13 Jul 2016 - 8:34 am | अजया
=)))
हो हो मुपि प्रवासवर्णन हवेच!
13 Jul 2016 - 10:30 am | सस्नेह
टक्कूमक्कू लंडनला ? आकाशातला बाप लंडनवासियांचे भले करो !!
आमेन !
13 Jul 2016 - 10:41 am | मदनबाण
टक्या नीट जा हो... राणी भेटली तर मी राम राम म्हंटल आहे, हे आठवणीने सांग. हल्लीच प्रिन्स इकडे गेंडे पाहुन गेला म्हणे... त्यामुळे तू तिकडे काय पाहिलेस ते सचित्र लिहुन प्रसिद्ध कर.
चांगली गोरी गुबगुबीत फिंरगीण दिसली तर कटवुन "मोकळा" हो... आपण फॉरिनची टकीण असा पिच्चर काढु ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh
14 Jul 2016 - 1:10 am | खटपट्या
गुबगुबीत ?
14 Jul 2016 - 9:21 am | मदनबाण
गुबगुबीत नको म्हणता ? मगं गोलमटोल चालेल ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- Armaan
15 Jul 2016 - 12:14 am | माम्लेदारचा पन्खा
त्यामुळे तिथे गुबगुबीत मुलगीच टक्याला पटेल ! केम छो...मजा मा ?
13 Jul 2016 - 3:14 pm | सिरुसेरि
लंडन मधे कोवेंट गार्डन येथे माउसट्रॅप , द विकेड या नाटकांचे प्रयोग अनेक वर्षे होत आहेत असे ऐकले आहे .
प्रसिद्ध अभिनेता जुड लॉ हा "हेन्री - ४" या नाटकात काम करतो . हॅरी पॉटर सिरीज मधला रॉन ग्रिफिथचे काम करणारा रुपर्ट प्रिंट याचे "मोजो" हे नाटकही गाजले आहे .
15 Jul 2016 - 12:40 am | राघवेंद्र
लंडन वारीला शुभेच्छा !!!
15 Jul 2016 - 12:43 am | राघवेंद्र
लंडन प्रवासात ऑयस्टर कार्ड खूप उपयोगी असते. तसेच वापस येताना त्यातील अनामत रक्कम परत मिळते (पावती असल्यास )
https://oyster.tfl.gov.uk/oyster/entry.do
15 Jul 2016 - 7:57 pm | विशाखा राऊत
ऑयस्टर कार्ड परत करायला पावती लागत नाही. मशीन ऑयस्टर रिटर्न साठी ऑप्शन्स देते
16 Jul 2016 - 1:27 pm | तिमा
लंडनवारीसाठी मनापासून शुभेच्छा. कमीतकमी पैशांत जास्तीतजास्त स्थळे बघायला मिळोत ही सदिच्छा.
याठिकाणी कोणी स्थळावर कोट्या करु नयेत.
20 Jul 2016 - 2:47 pm | टवाळ कार्टा
सगळ्यांचे शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि काही सूचनांचा नक्कीच विचार केला जैल ;)
भटकायचा रफ प्लान तयार झालेला आहे आणि वेळ + पैसे कमी आणि ठिकाणे जास्त अशी परिस्थिती आहे...तस्मात पैसे कसे वाचवावे यावर लंडनकरांनी थोडा प्रकाश टाकावा अशी विनंती :)
अजून एक...जर कोणाकडे फोटोत दाखवल्याप्रमाणे पाठिवर घेण्यासारखी बॅकपॅक आहे का आणि मुख्य म्हणजे मला १० दिवसांकरता देउ शकाल का? :)