जै लंडनातले मिपाकर :)
आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे.
१) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :)
२) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल?
३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :)
४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :)
आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती
१) स्टोनहेंज
२) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव
३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन
४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी
५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज
मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल
याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल)
भेटू लवकरच :)
प्रतिक्रिया
11 Jul 2016 - 6:26 pm | विशाखा राऊत
वेलकम..
11 Jul 2016 - 6:26 pm | सूड
इनो द्या आता मला.
11 Jul 2016 - 6:53 pm | वाल्मिक
मेक इट टु
11 Jul 2016 - 6:57 pm | स्पा
मेक इठ थ्री विथ सुतशेखर
11 Jul 2016 - 6:39 pm | अभ्या..
टक्या लेका लंडनला चालला?
कशाला???
11 Jul 2016 - 6:50 pm | सतिश गावडे
टकया निघालंय लंटनला...
11 Jul 2016 - 6:55 pm | अस्वस्थामा
टक्या भावा, ये तू, वला कट्टा करु.. आपल्यातर्फे सिंगल माल्ट कट्ट्यासाठी नक्की. ;)
11 Jul 2016 - 6:57 pm | टवाळ कार्टा
फोन नंबर व्यनी करा...प्लान करु ;)
11 Jul 2016 - 7:30 pm | धनंजय माने
या प्रतिसादासाठी तुला एक सरदारोंवाली पगड़ी (टाचण्या सह), एक मिस्टर बीन ची सीडी आणि न्यूटन यांचा दोन भोकं वाला दरवाजा सप्रेम भेट.
11 Jul 2016 - 9:22 pm | अस्वस्थामा
:)))
मि. बीन भेटेल बघ तुला लंडंन मध्ये पायजे तर.. ;)
11 Jul 2016 - 7:00 pm | अभ्या..
ह्येला म्हणतेत आ बैल मुझे मार.
अस्वस्थाम्या काय अवदसा आठवली रे तुला. ;)
11 Jul 2016 - 9:25 pm | अस्वस्थामा
येऊ दे तर (बैलाला), मग बघू की.. ;)
11 Jul 2016 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा
The मामी भेटेल का रे तिकडे?
टक्कूमक्कूशोनू Ssssssssssss!
11 Jul 2016 - 6:55 pm | धनंजय माने
झैरात झैरात....
(आता तरी बाळाचं लगीन जमू दे रे रवळनाथा ;) )
11 Jul 2016 - 7:07 pm | अजया
टक्कुबाळाला नाक पुसता येईना लंडनला चाललं का ;) या घे टिप्स..
विमानातून हात बाहेर काढु नको
विमानाच्या सिटवर उड्या मारु नको
सारखी चाॅकलेट मागु नको
कपड्यांवर खायचं सांडायचं नाही अजिबात.
राहायला राणीकडे चौकशी करणे.तिची कोणी पतवंडी लग्नाची असेल तर ते पण काम होईल एकात एक. रोझ तयार ठेवावे लागेल रोज.रोझ फाॅर रोज!
11 Jul 2016 - 7:14 pm | स्पा
अॅवामाइन घे, विमान लागणार नाही
11 Jul 2016 - 7:21 pm | माझीही शॅम्पेन
हे घे रे काही टिप्स
1) विमानात फुकट मिळते म्हणून जास्त पिवू नको
2) गोरी मुलगी दिसली म्हणून एकटक बघू नकोस
अजुन मिपकर्स तुझा बाजार उठवायला समर्थ आहे हे नक्की म्हणून टंकनश्रम वाचावतो .. पळा
11 Jul 2016 - 7:29 pm | सूड
एखादी गोरी, हिरव्या डोळ्यांची पुणे तीस मधली असेल तर पंचाईत व्हायची. =))
16 Jul 2016 - 7:39 pm | माझीही शॅम्पेन
अगदी खरं आहे त्यातून ती जर मिपा वाचणारी असेल तर बाजार उठला म्हणायचा :)
11 Jul 2016 - 7:36 pm | अभ्या..
राणीची चेंज ऑफ गार्डस परेड बघताना पण जवळ ठेव हो अवामाईन.
11 Jul 2016 - 7:37 pm | अत्रुप्त आत्मा
. =))
11 Jul 2016 - 7:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
इथे नक्की जाऊन या. फार सुंदर आहे.
11 Jul 2016 - 7:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का?
ह्याच्यासोबत कंसात (कृपया एनफिल्डच्या बाईक्स सुचवू नये ही नम्र विनंती) असे लिहिले असते तर बरे पडले असते न टका भाऊ
(तुम्हाला सांगायची गरज नाही तरीही हलके घ्या ही विनंती)
12 Jul 2016 - 1:14 pm | मी-सौरभ
बाप्पु: लै भारी...
पार शाल जोडी...
12 Jul 2016 - 2:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
असंच काही नाही हो! टक्या आहे म्हणून टवाळपणा चाललाय, *विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते, असा टवाळपणा आमच्याबर करायची सुद्धा टकोजी राजे ह्यांसी परवानगी अध्याहृत आहेच सौरभ भाऊ!
*डायलॉग सौजन्य धनंजय माने साहेब, अजिबात माफी न मागता त्यांची!
11 Jul 2016 - 7:48 pm | धनंजय माने
बाकी ऑन सीरियस मोड़, टका स्वत:च्या मेहनतीवर आणि स्वबळावर (स्वकष्टार्जित) लंडन ला जाऊन येत आहे याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन!
अशाच संधी वारंवार येत राहोत आणि टका सहकुटुंब फिरत राहो.
11 Jul 2016 - 7:50 pm | अभ्या..
अर्थात,
ह्याबद्दल त्याचे अभिनंदन आहेच...
जरा काळजी वाटती, बाकी कै नै.
11 Jul 2016 - 7:53 pm | वाल्मिक
स्वकष्टार्जित?
अहो कलाईन्ट पाठवतोय
11 Jul 2016 - 8:17 pm | धनंजय माने
कंपनी कुनाला बी न्हाय पाठवत!
त्येच्यासाटी ह्याच्यात त्ये असावं लागतंय. डोक्यात मेंदू.
11 Jul 2016 - 10:03 pm | मुक्त विहारि
+ १
12 Jul 2016 - 12:32 pm | वाल्मिक
नशीब पण असते
12 Jul 2016 - 12:36 pm | धनंजय माने
हो. तुझं देखील उजळेल. कल्जी क्रू न्ये.
पोरं होतील,लग्न होईल, नोकरी लागेल, फिरुन येशील वगैरे.
नशीब नसलं तर गोष्टी होतात फ़क्त क्रमाने होत नाहीत.
12 Jul 2016 - 12:56 pm | अभ्या..
त्यांच्यात रांजणे असतात.
भरलेत म्हणे.
11 Jul 2016 - 7:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
+१ , सहमती आमची तह-ए-दिल से :)
11 Jul 2016 - 7:56 pm | नीलमोहर
मस्त जीवाचे लंडन करून या,
जमल्यास तिकडेच दोनाचे चार हातही करून या,
काय सांगावं, फोटोशॉप केलेला फोटो प्रत्यक्षातही यायचा तिकडे (तरी :)
शुभेच्छा !!
11 Jul 2016 - 8:17 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
अनावश्यक धाग्यावर प्रतिसादांचा रतीब!!
11 Jul 2016 - 8:28 pm | खटपट्या
तुम्ही इनो घ्या...
11 Jul 2016 - 10:52 pm | बोका-ए-आझम
चालते व्हा.
12 Jul 2016 - 12:13 am | मितभाषी
कुठे पाकिस्तान का
हे हॅ हॅहॅ हम्म्म्मन
12 Jul 2016 - 12:17 am | बोका-ए-आझम
तसेही ते पाताळ धुंडत असतात ना!
12 Jul 2016 - 12:21 am | मितभाषी
म्हणजे लूगड्यात का?
11 Jul 2016 - 8:19 pm | सुनील
असे असेल तर, मी ब्रायटन हे गाव सुचवेन. लंडनहून तासाभरात पोचता येते (रेल्वे वा बस). अतिशय सुरेख बीच.
11 Jul 2016 - 8:29 pm | खटपट्या
तिकडेच लग्न जमल्यास बघावे. म्हंजे आम्ही कधी आलो तर रहायची सोय होइल.
11 Jul 2016 - 8:33 pm | बोका-ए-आझम
लाॅर्डस् आणि ओव्हल आणि फुटबाॅल फॅन असलात तर वेम्बली सोडू नका. शिवाय मिलेनियम आय, मादाम तुसाँ, राॅयल आल्बर्ट हाॅल, बिग बेन, टाॅवर आॅफ लंडन वगैरे पाहाच. चेंजिंग आॅफ गार्ड्स ही उगाचच केलेली हवा आहे असं मत आहे. त्यापेक्षा आपला वाघा बाॅर्डरवरचा समारंभ जोशपूर्ण आणि दणदणीत असतो. बाकी ट्यूबमधून भटकणे आणि एखाद्या जर्मन kiosk मध्ये mustard sauce लावलेला pretzel खाणे अाणि हो, Fish n chips - हे विसरू नका.
11 Jul 2016 - 8:37 pm | माम्लेदारचा पन्खा
दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !
12 Jul 2016 - 3:40 pm | पक्षी
महालोल... जाम हसलो
11 Jul 2016 - 8:38 pm | माम्लेदारचा पन्खा
दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !
11 Jul 2016 - 8:39 pm | माम्लेदारचा पन्खा
दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !
12 Jul 2016 - 8:24 am | चौकटराजा
तो कोहिनूर पळवताना तो हिराच आहे ना .... हे पाहून घ्यावे. हल्ली कोहिनूर कशाचेही नाव असते.
11 Jul 2016 - 9:57 pm | मुक्त विहारि
कुठेही भटक
पण...
पण...
पण....
येतांना २ कार्ढू ( https://www.thewhiskyexchange.com/p/1461/cardhu-12-year-old) मात्र नक्की आण. फार महागाची आणू नकोस. १२ वर्षे जूनी पण उत्तम लागते.
कार्ढूची चटक एकदा लागली की, ब्लॅक लेबल, शिवास रीगल पण फिक्या वाटतात.
12 Jul 2016 - 8:27 am | चौकटराजा
सध्या फार्म हाउस चा एक कोपरा सुताराच्या हाती दिला आहे. मस्त ,, झाला आहे,, ये दुनिया उसीकी जमाना उसीका हे गीत ही गाउ ... !
11 Jul 2016 - 10:09 pm | आदूबाळ
या बात!
11 Jul 2016 - 10:26 pm | खटपट्या
हो आणि व्रुत्तांत पायजेलाय...
11 Jul 2016 - 10:33 pm | चिमी
लंड्न -> बेकवेल - > व्हिटबी अॅबी - > फ्लॅमबराह लाईट-हाऊस आणि फ्लॅमबराह हेड
http://www.misalpav.com/node/32097
11 Jul 2016 - 10:46 pm | रातराणी
बघा जमलं तर एखादी जुड़ी पटवा आता तिकडेच =))
12 Jul 2016 - 12:27 am | वाल्मिक
नाही जमणार त्याला
12 Jul 2016 - 8:07 am | नमकिन
शून्य वेळ सुरु होणा-या बागेत जाऊन ये.
पाण्यावर उगं लय पाऊंड उडवू नगंस, बीयर बरी त्यापरिस.
जिथे प्रवेश शुल्क नसेल ते ते सर्व पहा ;-)
नियमात रहावे, विनोदवीरता सगळेच खपवून घेतील असे नव्हे.
पाऊंड इथल्या बँकेतनच घे, स्वस्त पडेल
12 Jul 2016 - 8:59 am | प्रमोद देर्देकर
चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप शुभेच्छा! नि नुकताच एक धागा आला होता मेघना मन्दार आणि अभिजीत अवलिया यांच्या लंडनवारीचा तो वाचुन जा.
फक्त एकच कोणीही असं केले तर लगेच पा-ग- घळू नकोस.
12 Jul 2016 - 8:59 am | प्रमोद देर्देकर
चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप शुभेच्छा! नि नुकताच एक धागा आला होता मेघना मन्दार आणि अभिजीत अवलिया यांच्या लंडनवारीचा तो वाचुन जा.
फक्त एकच कोणीही असं केले तर लगेच पा-ग- घळू नकोस.
12 Jul 2016 - 9:15 am | नाखु
आणायचे आहे लंडनवरून कोहिनूर आणि भवानी तलवार वगैरे त्याची यादी मलोजीरावांकडून घेणे इतर माहीती बॅट्याकडून लगेच घेणे (एकदा तो मिपावर आला की ,नाही तर थेट १५ दिवसांनी उगवतो नंतर तक्रार चालणार नाही) .तुला ललनांची नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची "विजय पुरोहित" जुन्या नावाने देतील. बुवांकडून तांब्या घे लंडनला त्याचे बदल्यात कोहिनूर मिळतोय का ते बघ, (ब्रिटिशांना जुन्या वस्तूंचा शौक आहे असे प्यारे मानेंना सांगत होते खखो दोघेच जाणे).
आणि आल्याव्र तो बहुचर्चित धागा पुररुज्जीवेत करावा लागणार नाही याची बेगमी तिकडून्च करून ये (रडू देत इथल्या वाट पाहणार्या वधू पित्यांना)
प्रवासाला शुभेच्छा...
वाचकांची पत्रेवाला नाखु
12 Jul 2016 - 9:32 am | अजया
या धाग्याचा 'तो' धागा रद्दबातल करण्यास उपयोग झाला का ते कळवणे.योग्य ठिकाणी झैरात झाली का;)
12 Jul 2016 - 9:39 am | कंजूस
तिकडेच स्थायिक होणाय्रा लोकांपेक्षा 'जाऊन येऊन असणारे मामा' भाच्यांना फार आवडतात.
12 Jul 2016 - 9:45 am | महासंग्राम
जायचा सूट त्या कोपऱ्यावरच्या फ्रान्सिस शिंप्याकडे शिवून घे आणि बूट चिनी चाम्भाराकडे.
येताना शेक्सपियरच्या घरी जाऊन भेटून ये तो सारखं 'नावात काय ए' असं बोंबलत असतंय ते त्याला समजावून सांग .
जाता जाता २२१ B वर ते वाह्यात कार्ट शेरलॉक भेटलं तर त्याला पूढचा सिजन कधी काढणारे ते इचार
यमाई- ६ च्या हाफिसात तो बॉण्ड बाबा भेटला तर त्याला एवढ्या ललना आणि ती म्हातारी बॉस कश्या मॅनेज करतो ते सांग म्हणावं
टेम्स च्या किनाऱ्यावर वर्डस्वर्थ ची कविता नक्की म्हण वाचून ...
12 Jul 2016 - 11:32 am | बोका-ए-आझम
स्कायफाॅल मध्येच चचली ना म्हातारी! आता मॅलोरी नावाचा इसम बसतो तिथे!
12 Jul 2016 - 11:35 am | महासंग्राम
आयला खरंच की जाऊ द्या म्हातारी कॅन्सल ...
12 Jul 2016 - 5:44 pm | खडीसाखर
>>जाता जाता २२१ B वर ते वाह्यात कार्ट शेरलॉक भेटलं तर त्याला पूढचा सिजन कधी काढणारे ते इचार
शेरलॉक च्या सिजन-४ चे चित्रीकरण एप्रिल पासुन सुरु झाले आहे. हे पहा -
Sherlock-season 4
12 Jul 2016 - 9:52 am | पिशी अबोली
टकादादा यांस,
सानविवि.
लंडनास सूखरुप जाऊन परत येणे. तूमचे लेख छोटे छोटे आस्तात. जरा नीट लीहिणे. तूमचे लक्षण हे आधीपासून आसेच असे आजी म्हणत होती. तीकडून येतानातरी एकदाची कुणी बायको करून आणणे, म्हणजे हे कारटं संसाराला लागेल आणि जरा छळवाद कमी होईल आसे मिपाबायकांचे म्हणणे आहे आसे पार्वतीकाकू मानेकाकांना सांगत होत्या ते आमच्या कामवाल्या मावशीने आजीला सांगताना मी चोरून आईकले.
लंडनच्या बाजारात छान छान रिबिनी मिळतात त्या सगळ्या छोट्या बहिणींसाठी घेऊन येणे.
तूमची नम्र
पिशी
12 Jul 2016 - 11:30 am | पैसा
=))
कार्टं निघालं लंडनला!
13 Jul 2016 - 7:54 am | नावातकायआहे
पारपत्र सांभाळा!! =))
12 Jul 2016 - 11:41 am | धनंजय माने
हा शुद्ध हलकटपणा आहे पिशे.
बाकी ते >>>एकदाची कुणी बायको करून आणणे
'एखाद्याची कुणाची बायको करुन'आणणे
असं वाचल्या गेलं.
म्हटलं असेल ब्वा काही चाल लंडनची!
12 Jul 2016 - 10:05 am | प्रमोद देर्देकर
पिश्वे तुम्ही सगळ्यांनी ते गाणं म्हणा की "गोरी गोरी पान , फुलासारखी छान, टक्यादादा आम्हाला एक (एक पुरे ना की जास्त पाहिजेत) वहिनी आण"
करा बघु विडंबन.
13 Jul 2016 - 12:01 am | बॅटमॅन
नको नको...वहिनी म्हटली की पार सायीपर्यंत जातात लोकं. जुने धागे चाळून पहा. =))
13 Jul 2016 - 11:23 pm | इशा१२३
टक्यादादा? टकाला दादा,भाउ म्हटलेलं चालत नाहि हो.त्यामुळे वहिनीच राहुद्या.
बाकी लंडनवारिला शुभेच्छा हं!
12 Jul 2016 - 11:52 am | पियुशा
वा वा वा..... लंटन वारिच्या सुभेच्चा :)
12 Jul 2016 - 11:53 am | ब़जरबट्टू
28 -29 ऑगस्ट ला जरा लंडन ला असाल तर न चुकता Notting हिल कार्निव्हल ला जाच ,,, जाम मजा असते ... http://thenottinghillcarnival.com बाकी थोडे सांभाळून घ्याल,,, पोरी बिरी लय चेकाकल्या असत्यात परेडमधल्या.. :)
12 Jul 2016 - 12:52 pm | आनंदी गोपाळ
अरे एक जण तरी उपयोगाचे सल्ले लिहाल का?
12 Jul 2016 - 2:58 pm | अभ्या..
कसले उप्योगाचे सल्ले अन कसलं काय गोपाळराव?
उगी हपिसात चिट्ठीवर लिहुन दिलेत "लोणंदवरुन पेन ड्राइव्ह घेउन ये. जायचा यायचा खर्च क्लायंटकडून घे" हे बिचारं लंडन लंडन करुन धागा काढुन मोकळं झालंय. ;)
(टक्या आपलाच है म्हणून चेष्टा बरका. नाहीतर चिडायचं अन लंडनला जातच नाही म्हणून बसायचं)
12 Jul 2016 - 1:02 pm | चिनार
टक्या...अभिनंदन !!
नीट जा हो...जाताना माईंकडून चार थालीपीठ आणि मुरलेलं लोणचं घेऊन जा विमान प्रवासात खायला.
बाकी माझे एक विनोदी स्वप्न आहे . ते पूर्ण करता आले तर बघ
दीडशे वर्ष गुलामी केली या साहेबाची. आता आपली वेळ. ज्या हॉटेल मध्ये राहशील तिथल्या वेटरला एकदा रूम सर्व्हिसला बोलव. साहेबी थाटात त्याला चहा बनवायला सांग. आणि चहात साखर कमी झाल्याचे कारण देऊन पेकाटात लाथ घाल त्याच्या. आणि सांग त्याला," तुम साला गुलाम लोग हमारी जुती के नीचे ही रहेगा !!"
13 Jul 2016 - 12:22 am | संदीप डांगे
चिनारभौस ह्या प्रतिसादासाठी एक लंडनवारी सप्रेम भेट.. =))
12 Jul 2016 - 2:31 pm | कवितानागेश
माझ्या २ बहिणी, २ काका आणि ५ मैत्रिणी राहतात तिकडे. पार्सले बांधून देतेय त्यांच्यासाठी. ती पोचवून दे फिरता फिरता. :)
12 Jul 2016 - 7:00 pm | विशाखा राऊत
मला सांडगा मिरची, पापड, लोणचे, मेतकुट, चटण्या देशील का ग माऊ?
12 Jul 2016 - 3:33 pm | आदिजोशी
जिवाचं लंडन करून या टकोबा. ब्रिटिशही असेच फिरत फिरत भारतात घुसले होते आणि देश ताब्यात घेतला. स्वारीच्या शुभेच्छा.
ह्या धाग्यावरून आमचे प.मि., मिपाचे जुने खंदे खंबे आणि बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समितीचे संस्थापक सभासद श्री श्री डान्राव हे लंडनला निघताना त्यांना समस्त मिपाकरांनी दिलेल्या शुभेच्छा आणि सल्ल्यांची आठवण झाली. धाग्याची लिंक मिळाली तर डकवा कुणी तरी.
12 Jul 2016 - 8:03 pm | खडीसाखर
>>UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो?
UK व्हिसावर england, scotland, wales, आणी northern ireland मध्ये फिरु शकतो.europe फिरायला schengen व्हिसा लागतो.
>>२ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल?
विकान्ताला लंडनात फिरणार असाल तर आधि https://tfl.gov.uk/status-updates/planned-works-calendar या लिन्क वर जाउन आपल्याला पाहिजेत त्या Underground lines उपलब्ध असतील की नाही ते तपासुन घ्या.
१ आठवड्याच्या सुट्टीत Wales नाहीतर Lake District फिरता येईल. North Wales मधील Llandudno (http://www.visitllandudno.org.uk/outdoors/great-orme-country-park) आणी Snowdonia छान आहेत. South Wales मधील Pembrokshire चे बीचेस छान आहेत.http://www.visitpembrokeshire.com/explore-pembrokeshire/beaches/
>>तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का?
भारतीय Driving license वर कार भाड्याने मिळते. पण इथले वाहतुकीचे नियम बरेच असतात. आधि नियम वाचुन घ्या आणी मगच कार भाड्याने घ्यायची का ते ठरवा ;-). आपण जिला 'सायकल' म्हणतो, तिला लंडनात 'बाईक' म्हणतात. आपण जिला 'बाईक' म्हणतो, तिला लंडनात 'मोटरसायकल' म्हणतात.
प्रवासाला आणी लंडन मधील वास्तव्या साठी शुभेच्छा.
12 Jul 2016 - 9:14 pm | पीशिम्पी
१ आठवड्याच्या सुट्टीत जमत असेल तर कॉर्नवॉल किंवा / आणि डेव्हॉन ला जाउन या. अगदी स्वर्ग आहे. मनमोहक निसर्ग , उत्त्तमोत्तम समुद्र किनारा (बीचेस), फिश अॅण्ड चिप्स , विशेषकरून Titangel Castle & St Michael's Mount हे दोन ठिकाणे खुपच सुंदर आहेत.
http://www.stmichaelsmount.co.uk/
http://www.english-heritage.org.uk/visit/places/tintagel-castle/
आणि गड किल्ल्यांना भेटी द्यायच्या असल्यात खालील दुव्याला भेट द्या, खुप स्वस्त पडते.
http://www.english-heritage.org.uk/visit/overseas-visitors/
मला फार माहीती आहे असे नाही पन जेवढे सांगता येईल तेव्हढे नक्कीच सांगीन. व्यनि करा हवे तर.
लंडन जेव्हढे ऑफीस वेळेव्यतीरिक्त पाहता येईल तेव्हढे पहा पण अख्खा विकांत वाया नका घालवू. स्कॉटलंड मध्ये कमीत कमी एडीनबरा आणि ईन्व्हर्नेस ला भेट देता येईल तर पहा.
प्रवासाला आणी लंडन मधील वास्तव्या साठी शुभेच्छा.
12 Jul 2016 - 9:30 pm | नूतन सावंत
टका,अभिनंदन.
यूथ हॉस्टेलची मेंबरशिप घे.बेड आणि ब्रेकफास्टची छान सोय असते.एकदा मेंबर झालं की जगभर सोय होते.
12 Jul 2016 - 11:56 pm | मनो
मी काही लंडनमध्ये राहत नाही तरी तिथे फिरायच्या अनेक संधी आल्या म्हणून हे अनुभवाचे बोल. खरं तर एक स्वतंत्र लेखच लिहायला हवा पण आत्ता इथे लिहितो.
राहण्यासाठी आम्ही एकदा EasyHotel नामक प्रकार try केला होता. अगदी छोटी म्हणजे आपल्या घरातली बाथरूम पेक्षा थोडीशी जास्त जागा असते पण ती अगदी मोक्याच्या जागी आणि एकदम स्वस्त (compared to त्या area मधील इतर ऑपशन्स) online पाहून ठरवता येईल आवडेल की नाही ते. (http://www.easyhotel.com/) बाकी लंडन राहण्यासाठी महागडे आहे. दुसरा option म्हणजे अगदी दूर राहणे आणि tube ने रोज ये जा करणे पण त्यात खूप वेळ जातो
लंडनच्या कोणत्याही मोठ्या रेल्वे स्टेशन वर (ट्यूब नाही) प्रॉपर रेल्वे जसे व्हिक्टोरिया स्टेशन - ट्यूबचा दिवसाचा अथवा 2-3 दिवसाचा पास बाहेरपेक्षा स्वस्तात मिळतो. तिथेच तो घ्या. तो बस मध्ये पण चालतो. जवळ गुगल मॅप्स आणि मॅट्रिक्स सिमकार्ड विथ data असू द्या, मग कुठेही जाणे अवघड नाही. या ट्यूब तिकिटावर काही ठिकाणी entry फीमध्ये सवलत मिळते (उदा. टॉवर ऑफ लंडन मध्ये)
गाडी अथवा bike रेंट करणे सोपे असले तरी ते कटकटीचे आहे , लंडनमध्ये तरी. पार्किंग खूप महाग आहे, लंडनमध्ये कंजेशन surcharge टोल अश्या अनेक भानगडी आहेत त्यामुळे uber आणि tube हे सगळ्यात जलद आणि स्वस्त पडते. हौस म्हणून वीकेंड ला गाडी रेंट करता येईल. बहुदा इंडिअन लायसेन्स चालून जाईल पण सगळे नियम पाळून आणि मुख्य म्हणजे safely गाडी चालवणे हा अवघड प्रकार आहे. पाश्चात्य देशात अगोदर चालवली नसेल तर हे साहस एकट्याने करू नका. कोणी स्थानिक मदत असेल तर करा. कारण fines खूप जबर आहेत. एक तर इतकी roundabouts आहेत वर स्पीड लिमिट्स आणि लहान रस्ते. त्यामुळे थोड्या काळासाठी गाडी रेंट न करणे हे जास्ती शहाणपणाचे होते.
लंडनमध्ये संबंध महिना पाहता येतील अश्या अनेक जागा आहेत, त्यातल्या माझ्या आवडीच्या खालील जागा
Tower ऑफ लंडन - इथे फक्त कोहिनुरचा नव्हे तर राजघराण्याचा पूर्ण खजिनाच आहे त्यामुळे मस्ट गो
जवळच लंडन ब्रिज आहे, पलीकडे सिटी. त्यामुळे या दोन जागा पहिल्या तर अक्खा दिवस जातो
Saint Paul कॅथेड्रल - भव्य आणि उत्कृष्ट architecture तळघरात न्यूटन वगरे प्रख्यात लोकांची थडगी आहेत
ट्रॅफल्गार sqaure इथे architecture नॅशनल गॅलरी असे अनेक पाहण्यासारख्या जागा आहेत
ब्रिटिश लायब्ररी मध्ये इंडियासंबंधी काही ना काही प्रदर्शन चाले असते ते पहा
ब्रिटिश Museum हे मात्र नक्की पहा - एक पूर्ण दिवसही पुरत नाही सगळे पाहायला.
हे पाहून कंटाळा आला तर Hyde पार्क सतत दिसत राहते, तिथे चक्कर मारा
Greenwitch केम्ब्रिज ऑक्सफोर्ड ही जवळची गावे. ती पहा.
Henry the 8th याचा राजवाडा आणि केसिंग्टन राजवाडा हा पाहण्यासारखा आहे.
राजघराण्याला पुरवठा करणारे Harrods नक्की पहा - एक एक महाग आणि आकर्षक वस्तू आहेत वरच्या मजल्यावर.
संध्याकाळच्या वेळी लंडन आय ची सफर
थेम्स नदीवरची बोटीची सफर
Buckingham Palace मध्ये काही ठराविक दिवशी आत जाऊ देतात. मी आगाऊ online बुकिंग करून ठेवले होते. आतले फोटोस online आहेत. ते पाहून ठरवा आत जायचे का ते. मला तरी नक्कीच जावेसे वाटेल अजून एकदा.
अजून एक स्मरणीय ट्रीप म्हणजे वेस्टमिन्स्टर पार्लमेंटच्या आतली टूर. यालाही आगाऊ बुकिंग करावे लागते. पण तो राजवाडा आणि विशेषतः त्या guide ची खास इंग्लिश विनोदी फटकेबाजी या मुले ही ट्रीप अजूनही आठवणीत आहे.
माझी (आणि बायकोची) एक आवडती सफर - लंडनच्या व्हिक्टोरिया अथवा जवळच्या स्थानकावर डबलडेकर बस पकडायची, जमले तर सकाळी 8-9 च्या सुमाराला - स्ट्रॅन्ड किंवा ट्रॅफल्गार sqaure कडे जाणारी. जागा पकडायची ती ड्राइव्हर च्या एकदम वरची front सीट. तिथून स्ट्रॅन्ड इत्यादींच्या जुन्या इमारती आणि रस्ते काय खास दिसतात. जुन्या मुंबईची आठवण येते - खूपच साम्य आहे शैली मध्ये.
दुपारचा चहा (आफ्टरनून टी) हा एक special ब्रिटिश प्रकार आहे , जमलं तर करून पहा.
आणि खाण्याबद्दल तर सांगायलाच नको. जगभरचे सगळे options मिळतात. भारतीय जेवण लंडनमध्ये माझ्या उपहारगृहात भारतापेक्षा चांगले मिळते असा लंडनच्या शेफचा दावा आहे !
अजून काही सांगतो आठवलं तर.
13 Jul 2016 - 12:05 am | बॅटमॅन
टकाशेठ, स्वारीच्या शुभेच्छा. तिथे जाऊन तुम्हीही झेंडा लावा. अटकेपार तसे खाडीपार जाऊन अवश्य सगळं हिंडून या. लंडन प्यारीस सगळं बघून या. तो टोपीकर माकडांनी हडपलेला कोहिनूरही बघून या आणि एकूणच मज्जा करा. गेम ऑफ थ्रोन्समधील कुणी क्यारेक्टर्स दिसले फिरताना तर पापाराझ्झींचे बाप बनून गनिमी काव्याने त्यांच्याबरोबर फटू काढावयास विसरू नका.
रच्याकने: सातारच्या राजाचे प्रतिनिधी रंगो बापूजी हे १८४० पासून पुढे बारातेरा वर्षे इंग्लंडात राहिलेले. तिथे जाणारा तो पहिला मराठी माणूस.
14 Jul 2016 - 12:23 am | पद्मावति
मस्तं. रोचक माहिती, बॅटमॅन.
त्या काळात परदेश आणि तेही इतके वर्षं.
त्यांच्या या वास्तव्या विषयी काही माहिती, पुस्तक उपलब्ध आहे का? एका भारतीयाच्या दृष्टीने त्या काळाच्या लंडन चे वर्णन असेल तर वाचायला इण्टरेस्टिंग वाटेल.
14 Jul 2016 - 3:57 am | आदूबाळ
रंगो बापूजी गुप्ते यांनी स्वतः काही लिहिलं असेल असं वाटत नाही. त्यांचं आयुष्यच एवढं नाट्यपूर्ण आणि धकाधकीचं गेलं की लेखन वगैरे गोष्टींना सवड मिळाली असेलसं वाटत नाही.
पण रंगो बापूजींच्या आयुष्यावर प्रबोधनकार ठाकऱ्यांनी संशोधन केलं आहे. ते ऑनलाइनही उपलब्ध असेल.
14 Jul 2016 - 9:31 am | पद्मावति
धन्यवाद आदूबाळ.