आणि थोडी ओली फुले

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in कलादालन
22 Sep 2008 - 7:59 pm

एवढ्या लोकांनी त्यांचे फोटो इथे टाकले, मग माझ्या कॅमेय्राला फार वाईट वाटायला लागलं. मला तो "आत्मवृत्तात" (तेच ते, आपण शाळेत लिहायचो ते) सांगत होता की त्यालापण तो किती चांगला आहे ते दाखवायचं आहे. आणि खरडवहीतल्या फोटोची बरीच चौकशी झाली त्यामुळे फारच उल्हसित झाला तो! मग काय मी गेले हापिसाच्या मुख्य इमारतीच्या समोर आणि वेडीवाकडी वाकून त्याला बिचाय्राला कामाला लावलं (इतरांकडून काम करवून घेण्याची माझी जुनीच खोड हो!). तर हे पहा ते फोटो.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

22 Sep 2008 - 8:00 pm | आनंदयात्री

२ णंबरचे फुल लैच भारी !!

*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*

मेघना भुस्कुटे's picture

22 Sep 2008 - 8:36 pm | मेघना भुस्कुटे

मला बै पहिलंच खूप आवडलं. यमे, तुला नक्की काय काय येतं? एकदा सांगून टाक बाई.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 9:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> यमे, तुला नक्की काय काय येतं? एकदा सांगून टाक बाई.
हं ... तसं मला बरंच काही येतं ... हिमेश रेशमियांची गाणी म्हणता येतात, पकवता येतं, अवांतर आणि वायफळच्या गप्पा मारता येतात, चिडवता येतं, टाईमपास करता येतो ... हॅ हॅ हॅ ... किती स्तुती करू स्वतःची, आता बास!

टारझन's picture

23 Sep 2008 - 2:11 pm | टारझन

आमच्या आज्जींना अतर्क्य तर्क करता येतात, सिरेंटचा फक्त सिमेंट हा अर्थ लावता येतो (संदर्भ असून देखिल) , पोकळ युक्तिवाद करता येतात, पायतान घालण्या ऐवजी संपुर्ण जमिनीवर चमडे अंथरता येतं, आणि एंडलेस वॉर करता येते.
व्हय का नाय आजे ...

अति अति अवांतर : फुले माला आवडत नाहीत परंतू फोटू जरा बरे आले आहेत. अंगावर काटे आणनारी फोटूग्राफी असावी .. जसे सिंहाने आ केल्यावर त्याच्या दातावर बसलेल्या माशीचा फोटू , किंवा मगरीची पाठ खाजवताना काढलेला फोटू , भिकार्‍याच्या कटोरीतुन १ रुपया पळवतानाचा फोटू ई.ई.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अनामिक's picture

22 Sep 2008 - 8:01 pm | अनामिक

मस्तच!

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2008 - 8:05 pm | स्वाती दिनेश

फुलं आवडली,
स्वाती

मदनबाण's picture

22 Sep 2008 - 8:07 pm | मदनबाण

४ नंबर चे फुल एकदम वेगळे वाटले..फुलात छोटे अजुन फुल !! हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला..या फुलाच नाव काय ?

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 9:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

..या फुलाच नाव काय ?

थांबा हं, माझ्या कॅमेर्‍यालाच विचारते.... "माहित नाही" म्हणतोय. असे कठीण प्रश्न नै बाबा विचारायचे.

टारझन's picture

23 Sep 2008 - 2:23 pm | टारझन

"माहित नाही" म्हणतोय.
आइला ... काय बोलतेस ? तुझा कॅमेरा बोलतो ? अरे वा !! भलताच हुशार आणि अँटिक कॅमेरा आहे आ ... आणि त्याला तु विचारलेला प्रश्न पण कळला .. मेन म्हणजे त्याने योग्य ते उत्तर दिलं ,,. ह्युमन इंटेलिजन्स कॅमेर्‍यात शिफ्ट झाला काय ग ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

शितल's picture

22 Sep 2008 - 8:10 pm | शितल

सर्वच फुले मस्त.
:)

प्राजु's picture

22 Sep 2008 - 8:46 pm | प्राजु

सगळीच फुले उत्तम..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

22 Sep 2008 - 8:55 pm | झकासराव

वा!
मस्त आहेत सगळे फोटो.
माझा सगळ्यात आवडता तिसरा :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामदास's picture

22 Sep 2008 - 9:15 pm | रामदास

आवडले फोटो.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

सर्वसाक्षी's picture

22 Sep 2008 - 9:36 pm | सर्वसाक्षी

एकदम बहर आलेला दिसतोय कॅमेर्‍याला!

देवदत्त's picture

22 Sep 2008 - 9:43 pm | देवदत्त

सर्व छान आहेत.

मला सर्वांत आवडलेले १ले आणि २रे :)

रेवती's picture

22 Sep 2008 - 9:45 pm | रेवती

पहिली दोन ब्येष्ट!
लई अवांतरः अगा बया बया बया! ष्टुरी लिवायची सोडून ह्ये काय नविनच?

रेवती

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2008 - 9:47 pm | प्रकाश घाटपांडे

रसग्रहण-
बर का आदिती, ती वल्ली फुल आस्ली त र्‍हाउं दे तशीच. उग पुसायच्या भानगडीत पडू नको. वाळतीन आपाप.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 10:37 pm | विसोबा खेचर

सु रे ख...!

धनंजय's picture

23 Sep 2008 - 3:01 am | धनंजय

छानच.

अनिल हटेला's picture

23 Sep 2008 - 7:24 am | अनिल हटेला

सही च आहेत !!

शेवटचे फूल जास्त आवडले !!

माझ्यातर्फे कॅमे-याला धन्यवाद !!

(फोटो त्याने बिचा-यानेच काढले ना!!)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2008 - 9:30 am | पिवळा डांबिस

ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!!
नाहीतर मी पण घाणेरीची फुलं दाखवून भाव खाईन!!!!:)
बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 9:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> ही कोणती फुलं आहेत ते सांगा ना!!!
पिडाकाका, लिहिलंय ना वर, असे कठीण प्रश्न नाही विचारायचे, मग कॅमेरा हिरमुसतो. नाही माहित मला नावं, एकाचं सोडून! पाच नंबरचं लिलिचं आहे, एक आणि दोनपण त्यातलीच दिसताहेत.

>> बाकी घाणेरीची फुलं दिसतात मस्त!! त्याला घाणेरी हे नांव कोणत्या गाढवानं दिलं कोणास ठाऊक!!!
ती तीन नंबरच्या फोटोतली घाणेरीसारखीच आहेत ना? खरं आहे, एवढ्या छान फुलांना घाणेरी हे नाव कायतरीच वाटतं!

>> अहो, फुलवंती बाई!!!
मी काय फुलवंती बाई नाही आहे, मी अदिती आहे, तुमचा कायतरी गैरसमज झालाय! :-)

विजुभाऊ's picture

23 Sep 2008 - 9:46 am | विजुभाऊ

पहिली दोन लीली
तिसरे :जिरॅनियम ( घाणेरी नाही)
पाचवे :लिली
सहावे :
सातवे : झेन्डु

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 9:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे हो, मी झेंडूचं नाव कसं काय विसरले?

मनस्वी's picture

23 Sep 2008 - 10:19 am | मनस्वी

झेनिया आहे. झेंडू केशरी असतो.

अदिती, सगळे फोटो मस्त आलेत!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

विजुभाऊ's picture

23 Sep 2008 - 10:25 am | विजुभाऊ

झेनीया नाही तो झेन्डु च आहे. झेन्डुच्या रंगात फिका पिवळा ते सोनेरी केशरी पर्यन्त छटा असु शकतात( माती नुसार/ जाती नुसार/ आणि सावली तसेच पाण्या नुसार)
झेनीया च्या पाकळ्या एकेरी असतात. पाने जाड सलग असतात.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 10:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ठीक आहे, मला थोडा वेळ द्या, मी आणखी फोटो काढते फुलांचे, पानांचे आणि टाकते. मग वाद घालुया!

Dilipkumar's picture

25 Sep 2008 - 4:42 pm | Dilipkumar

फूलो का मुरझाना बहार की रुसवाई है!!

मनस्वी's picture

23 Sep 2008 - 10:54 am | मनस्वी

बर.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

ऋचा's picture

23 Sep 2008 - 9:54 am | ऋचा

क्रमांक २ लै बेश्ट!!!
बाकी पण छान आहेत .
:)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

नंदन's picture

23 Sep 2008 - 12:01 pm | नंदन

सुरेख आहेत सगळेच फोटोज. दुसर्‍या आणि चौथ्या चित्रातली फुलं विशेष आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2008 - 12:24 pm | प्रभाकर पेठकर

फुलांचे फोटो मस्त आहेत. टेक्निकल माहिती विचारत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> फुलांचे फोटो मस्त आहेत
धन्यवाद.

>> टेक्निकल माहिती विचारत नाही.

फार देताही येणार नाही ... मी कॅनन पावरशॉट S3 IS वापरलाय. त्यातलं Digital IS वापरलं नाही आहे. बरेचसे फोटो कमीतकमी aperture ठेवून (F 2.7) काढायला लागले कारण खूप उजेड होता तेव्हा! आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही.

काका, मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे?

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2008 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर

मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्वयंपाकशास्त्र, फोटोग्राफी, राजकारण, विनोद, समाजशास्त्र हे विषय सोडून आणखी कोणकोणत्या विषयात गती आहे?

पुतण्यांना छळणं. हा:..हा:. हा:...

ते काय ते म्हणतात नं... जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, तोस्सी ग्रेट हो! :-)

>> जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)
=))

मी यात फक्त अक्षरांना दिलेला रंगच पाह्यला!

(साळसूद पुतणी) अदिती

ऋषिकेश's picture

23 Sep 2008 - 4:12 pm | ऋषिकेश

जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन! (ह्याला कोणी धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करू नये, ही नम्र विनंती.)

=)) =)) =))

बाकी फोटो मस्त ३ रा आणि शेवटच्या फुलांचे रंग लई भारी :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

झकासराव's picture

23 Sep 2008 - 5:40 pm | झकासराव

आणि exposure time 1/1600 किंवा 1/800 होतं. पण अस्सल भारतीय असल्यामुळे या गोष्टींची नोंद ठेवली नाही.>>>>>>>>>
तु जर फोटो फ्लिकर किंवा पिकासावर अपलोड केले असशील तर तिथे फोटोच्या उजव्या बाजुलाच शटर स्पीड अपेरेचर ही माहिती मिळेल प्रत्येक फोटोची. जर दिसत नसेल तर मोअर प्रॉपर्टिज वर क्लिक कर. :)
कॅनन एस ३ आयएस. मस्त आहे तो कॅमेरा.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

दिपोटी's picture

23 Sep 2008 - 12:30 pm | दिपोटी

सुरेख फुले ... १, २ आणि ६ खास आवडली.

- दिपोटी

राघव's picture

23 Sep 2008 - 1:23 pm | राघव

खूप छान फोटोज.. २रे अन् ५वे सगळ्यात जास्त आवडलेत. :)
मुमुक्षु

अवलिया's picture

23 Sep 2008 - 3:37 pm | अवलिया

छान आहेत सगळेच फोटो

नाना

मृगनयनी's picture

23 Sep 2008 - 5:28 pm | मृगनयनी

मस्तच आहे गं फुलं!

थोडीशी ओली असल्यामुळे, जास्तच टवटवीत दिसतायेत.....

बाकी तुलाही फोटोग्राफीची आवड दिसते.... :)

येऊ देत अजुन फुलं

:)