वात्रटिका - पे कमिशन

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
30 Jun 2016 - 8:18 pm

गेल्या पे कमिशनच्या वेळी किमान आठवड्याभर सरकारी केंटीन मध्ये पार्ट्या चालल्या होत्या. पण या वेळी २९.६.२०१६ला दुपारनंतर दिल्लीतल्या अधिकांश सरकारी केंटीन मध्ये शुकशुकाट होता. एवढेच नव्हे सरकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या दुकानांवर संध्याकाळी चहा-नमकीन, बिडी -सिगारेट, तंबाकू इत्यादी खाण्यासाठी बाबू थांबलेच नाही. मेट्रो मध्ये हि कुठलीच चर्चा घडली नाही. बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी. बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे दिनोंं कि सुरुवात झाली.

कढईतल्या तेलात आज
पकौडे नाही नाचले.

चहाच्या कपबश्या आज
टेबलावर नाही खिदळल्या .

रंगीत बर्फी हि आज
स्वाद हरवून बसली.

बाबूंच्या नशिबी आज
झाली बुरे दिनों कि शुरुवात.

जीवनमान

प्रतिक्रिया

जेपी's picture

30 Jun 2016 - 8:21 pm | जेपी

=))

बुरे दिन म्हणजे नक्की काय झालंय?
दर दहा वर्षांनी येणारे हे आयोग ठराविक रकमेची पगार्वाढ देतात की चर्चेतून ठरते?
दोन्ही केसेस मधे मग नाराजीचं कारण काय? की अजून काही अँगल आहे हे कुणी सांगत नाय. नुस्ता बाजार उठलाय तो!

-(माजी राज्यसरकारी कर्मचारी) खेडूत

पटाईतकाकांनी मध्यंतरी एक धागा काढून पे कमिशन लोकांना कश्या वाटाण्याच्या अक्षता लावत आहे ते सांगितले होते.. धागा मिळत नाहीये. मिळाला की डकवतो.

तिमा's picture

1 Jul 2016 - 5:34 pm | तिमा

तुम्ही संघटित आहात म्हणून एवढं तरी मिळताय! बाहेरच्या छोट्या नोकर्‍या करणार्‍यांचे हाल बघा. कागदावर पगार एक, हातात त्याच्या निम्मा, पीएफ वगैरे काही नाही, कसलीच शाश्वती नाही.