कर…!!!

वटवट's picture
वटवट in जे न देखे रवी...
28 Jun 2016 - 4:50 pm

कर…!

काजळलेल्या राती.. पाजळलेली स्वप्नं..
कातरवेळी डोळ्यामधुनी.. पाझरलेली रत्नं..

मग, रत्नांच्या त्या गर्दीमध्ये.. गुरफटलेली धुंदी..
तू मी असता दुःख गं कसलं??... सारे काही आनंदी..

तू असताना दुःख सुद्धा गं रूप बदलते राणी..
वणव्याच्याही ओठी फुलती.. नाजूक फुलांची गाणी..

ऐक गं राणी, फुले सुद्धा ही नाहीत अगदी साधी…
ह्याच फुलांनी बरी होते, शतजन्मांची व्याधी…

शतजन्माची माझी व्याधी, बरी कराया ये ना…
नक्षत्रांवर आपुली नावे, कोराया ये ना…

चंद्र चंद्र मी.. रात्र रात्र तू.. होऊन होऊन जाशील…
रोज सकाळी .. संध्याकाळी ... माझी कविता गाशील…

ये ये माझी कविता गाण्यासाठी… माझी होऊन जाण्यासाठी…
दोघे मिळून बांधून टाकू… पुढील शतजन्माच्या गाठी…

सार्थक होईल ह्या जगण्याचे... तुझ्या गं राणी अस्तित्वाने…
प्रश्न पडतो पदरी माझ्या, खरंच पडतील एवढी दाने???

भगवंतालाच आता साकडे.... "देवा.... इतुके माझ्यासाठी कर…!"
आयुष्यभर करीन चुकता… "अगदी जो जो म्हणशील तो तो कर...!"
.
.
.
आयुष्यभर करीन चुकता… "अगदी जो जो म्हणशील तो तो कर...!"

-चेतन दीक्षित

कविता

प्रतिक्रिया

निश's picture

28 Jun 2016 - 10:37 pm | निश

मस्त ...अजुन येउ द्या.

अभ्या..'s picture

28 Jun 2016 - 10:39 pm | अभ्या..

ते कर शब्दाचे दोनतीन अर्थ होतात ना म्हणून शेवटचं जरा कंफ्युज झालं.
बाकी कविता उत्तम.

अभ्या..'s picture

28 Jun 2016 - 10:41 pm | अभ्या..

तुम्ही बार्शीकर का हो?

वटवट's picture

10 Jul 2016 - 3:14 pm | वटवट

होय...

ह्ये जिगर, मिलाओ हाथ. मी पण बार्शीकर :)
आता मिसळपाव लीगच्या मॅचेस होतील तेव्हा आपली सोलापूर लेखकटीम मजबूत पायजेल. तुम्ही आहेत भारी झाले.

एकप्रवासी's picture

29 Jun 2016 - 5:42 pm | एकप्रवासी

आवडली कविता ...