काल सकाळी आमची जीवन वाहिनी अडकली आणि आम्ही या गाण्यात कसे अडकलो कळलंच नाही
( चाल: एका पावसात दोघांनी भिजायचं)
----------------------------------------
मध्य पश्चिम हार्बरने जायायच
एका पावसात सर्वानी अडकायचं
तशी दिसेना लोकल केंव्हा पासून
गर्दी जाहली ठाण्याला तेंव्हापासून
आता तिकीट कशाला काढायचं
एका पावसात सर्वानी अडकायचं
वाशी लोकल लागेल स्टेशनाला
तेंव्हा शोधूया जागा शिरायला
हात सोडून तसेच सावरायचं
एका पावसात सर्वानी अडकायचं
गाडी हळूहळू वाशीला जाईल निघून
माझ्यानोकरीच ठिकाण येईल दिसून
टाइम टेबल नवीन करायचं
एका पावसात सगळ्यानी अडकायचं
संकल्पना: अमोल केळकर
-----------------------------------------
मूळ गाणे :
गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं
तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगांत सांकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं
खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुसायचं
गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं
------------------------------------------
गीत-सुधीर मोघे
संगीत-सुहासचंद्र कुलकर्णी
स्वर-उषा मंगेशकर
चित्रपट-तुझ्यावाचून करमेना
-----------------------------------------
पूर्व प्रसिद्धी :
www.poetrymazi.blogspot.in
प्रतिक्रिया
22 Jun 2016 - 12:43 pm | एस
कविता खुसखुशीत आहे.
22 Jun 2016 - 12:50 pm | जगप्रवासी
छान
22 Jun 2016 - 1:06 pm | राजा मनाचा
अगदीच बाळबोध झालीय